फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी दी (नीधप) ने बनवलेला एक नेकलेस पण सही आहे.....कॉपर / सिल्वर वायर वाकवुन बनवु शकतो....हे नेट वरुन घेतलय....पण असे कानातले घरी बनवुन बघायचे आहेत......

नक्किच...थांब आधी माझा एक्स्पेरीमेन्ट सक्सेसफुल होउ दे.....मग तुला पण देइन.. Wink

माझ्या एखा मैत्रिणीने काल वन पिस घेतला पण तो गुडघ्याच्या बराच वर आहे आणी तिचे गुडघे बरेच काळे आहेत Uhoh
म्हणजे चक्क नजरेत भरतील असे...
काय करु शकते ती?

मी पण काल एक मस्त वन पिस घेतला... चांगला लाअंबलचक असुन पण आए ने आरडा ओरडा केला Sad

गुडघ्यांचा काळेपणा इतक्या सहजा सहजी जाईल असं वाटत नाही, तिला स्टॉकिंग्ज घालायला सांग.

रिया, पार्लरमधे जाऊन ट्रीटमेंट. अथवा डर्माटोलॉजिस्टचा सल्ला घेऊन ट्रीटमेंट. घरगुती उपायांचा फारसा फरक पडत नाही.

स्टॉकिंगचा ऑप्शन पण चांगला आहे.

ट्रिटमेंटचा फायदा होतं असेल तर ठिक आहे तोपर्यंत स्टॉकिंगचा ऑप्शन चांगला आहे.
रेड, ब्लॅक आणि डार्क ग्रीन वर कोणत्या स्टॉकिंग्स चालतील?

रच्याकने स्टॉकिंग्स की स्टकिंग्स?

.

नी, स्टकिंग्स असा शब्दच नाहीये का?
असल्यास त्या दोन्हीत फरक काय?
(सॉरी फॉर अज्ञान Proud )

आणि वर लिहिलेल्या कलर वर कुठले चालतील ते पण सांगा.
मला तरी स्वतःसाठी (गरज नाहीये तरी) स्किन कलरचे स्टॉकिंग्स आणि ब्लॅक हाय हिल्स घालावी वाटतेय बॅक्स वनपिसवर Happy

रेड, ब्लॅक आणि डार्क ग्रीन वर कोणत्या स्टॉकिंग्स चालतील? - लुक हवा असेल black semitransparent नाहीतर स्कीन सारखे. मस्त वन पीस असेल तरस्टॉकिंग्स कडे लक्ष नको जायला ना. वन पीस center of attraction हवा.

रीया! तू इथे आहेस?! Happy तुझ्या वन पीस चा फोटो टाक की!
गर्ल्स, मे मधे मॉरीशसला जातेय भटकायला.... तर सध्याचे समर स्पेशल ट्रेण्ड्स सांगा ना......
जीन्सवर नेहमीचे टॉप्स आहेतच.... पण काही वेगळ्या सजेशन्स?

.

ओके Happy
काल ती सेल्सवूमन बया इतक्यांदा आणि इतक्या कॉंफिडण्टली तो शब्द उच्चारत होती की मलाच वाटत होतं मी चुकीचा शब्द म्हणते.
इथेही दक्षी आणी नंदिनी कडुन मला माहीत असलेलाच शब्द ऐकला तेंव्हा वाटलं काय माहीत हे दोन्ही वेगळं वेगळं असत की काय Proud

.

अनिश्का सगळी कानातली मस्त.
रिया गरज नसेल तर आता उन्हाळ्याच्या दिवसात स्टॉकिंग्स घालू नको. त्यपेक्षा लेग्सना स्क्रब दे मस्त. स्किन कलरचे पाय क्रिम कलरच्या स्टॉकिंग्स पेक्शा खुप जास्त छान दिसतात. Happy

.

Happy
ओवी इतका काही भारी नाहीये की फोटो टाकावा तो तेरेको मै खुद पेहेनके फोटो ईमेल करवा दुंगी Happy
पारे ओकेज... पहाते Happy
सध्या तरी इतक्यात मला नाही घालायला मिळणार आमच्या गह्री शिमगा झालाय नुकताच त्या ड्रेस वरुन Proud

दक्षिणा, कानातले छान आहेत. इकडे असले कानातले लोकानी घातलेले पहिले हि आहेत. शेवट चे सापाचे काळ्या रन्गातील आहे ना ते mostly मुलाच्या कानात असावे असे वाटते. ... ८ एप्रिल च्या पोस्ट ला खुप उशिरा रीप्लाय.. Sad असो..

आज ची हि कानातली मस्त..

photo.JPG

खुप च मस्त नेकलेस... हा ठुशीचा प्रकार आहे का? ह्या भारत दौर्यात मला असे काही घ्यायचे आहे.. घरी भावच्या मुलाचि मुन्ज आहे.. नौवारी साडी थिम आहे. असा नेकलेस नौवरि वर कसा दिसेल? का टिपिकल मोत्याचा घालावा? तसा माझा आईच्या तन्मणी वर डोळा आहे.. Happy

Pages