फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती समोरून उलटी मागे गेलेली वेणी जरा टू मच दिसते आहे <<
+१००००००

ती वेणी नक्कीच खोटी आहे. खरी म्हणून लावलेलीही खोटीच असावी. एवढे लांबसडक नाहीयेते तिचे केस.

छान दिस्त्येय पण ....आता वयही दिसायला लागलय चेहर्‍यावर...

फोटो दागिन्यापेक्षा हेअरऑईल साठी जास्त सुट होइल :फिदी;

सिनेमा मस्त आहे रिया. हुमा कुरेशी खरेच गोड दिसते. सर्वांचे कपडे मस्त आहेत्.काल्कीचे तर जास्तच. केस, दागिने, कानातली, अंगठ्या, साड्या पण कथेचा एक भाग आहेत.

जातीच्या सुंदर मुली, स्त्रीयांना फार एंबेलिश मेंट ची गरज लागत नाही. मृणाल त्याबाबतीत गिफ्टेड आहे. अर्थात नटायला सर्वांनाच आवड्ते. तरीही, एखादेच फीचर उठावले किंवा चांगला दागिना घातला तरी असा चेहरा फार उठून दिसतो. सजविताना थोडे तारतम्य बाळगले म्हणजे फायनल इंपॅक्ट सुरेख दिसतो. करीनाला कधीकधी हे फार छान जमते. तिचा परवा एन डीटीव्ही साइट वर फोटो पाहिला
स्लीव्ह्लेस ब्लाउज लाल, केसांचा जुडा व गजरा, काठाची साडी, लिपस्टिक. आणि हलके हसत असतानाचा. फार छान ग्रूमिन्ग जमले आहे. माधुरी सुद्धा. अंजाना का काय सिनेमात. ( एअर होस्टेस असते शाहरुख तिला त्रास देतो. चने के खेतमें गाणे आहे बघा. ) त्यात पहिल्या गाण्यात सिल्कची निळी साडी नेसली आहे फार छान दिसते. - बडी मुशकिल है.

आपण काहीही घाला लोक नेहमी साडी छान नाइतर ड्रेस छान आहे म्हणतात तू छान दिसतेस असे नाहीच क्याटेगरीतले. Happy

ती वेणी भयानक वाटतेय. बॅड केशभुषा. मराठी दागिने घालून नॉर्थ पद्धतीची वाटतेय गेटअप. (मा. फु. म.)

खरच भयानक हेअर स्टाइल आहे मृणाल देव ची !
तिला तिचा हातखंडा' पेशवाइ थाट' सुट होतो किंवा मग सिंपल एलेगन्ट मिनिमलस्टिक मेकअप गेट अप !
अश्विनीमामी,
डिट्टो , मलाही एक थी दायन पोस्टर वाटलं तिचा ' वेणी' पॉवर फोटो पाहून Proud

मृणाल इतकी गोड दिसते ना तशीच... अश्या उलट्या वेण्या बिण्या लावून मृणाल कौर पटियालेवाली का बरं दिसावसं वाटलं असेल तिला... जौ दे!!! Lol

इथे वयानुसार मेकप करण्याचे डूज आणी डोन्ट्स अपेक्षित आहेत जाणकारांकडून

जसे कोणत्या प्रकारच्या मेकप मुळे वयापेक्षा जास्त दिसता किंवा चाळीशीत टीनेजर दिसण्याची धडपड कटाक्षाने टाळता..

थोडक्यात एज नुसार मेकप टिप्स इथे शेअर करा..

हा मृणालचा स्वतःचा चॉईस थोडाच असेल? ती गाडगीळ सराफांची ब्रँड अ‍ॅम्बॅसीडर आहे ना! मग काय सांगतील ते करावं लागतच असेल. असो. पण या एजलाही जाम गोड दिसते. पुढच्या आठवड्यात तिनी डिरेक्ट व अ‍ॅक्ट केलेला सिनेमा येतोय. नेहमीची व्यथा. इथे कधी बघायला मिळणार?

मी पाहीला तो चित्रपटेकदम फ्रेश टेकींग आहे. तीने एकदम सिंपल आणि डिसेंट कपडे घातले आहेत. तिचा डोळ्यांचा मेकप जरा हेवी असतो. पण तीला तो छान दिसतो.

अर्रे हा धागा का बरं मागं पडलाय.... दक्ष.........

या स्प्रिंग ट्रेंड प्रमाणे लाल (हो!!चक्क!! Wink ) , निळा, हिरवा या रंगांत पँट्स घेतल्यात.. राईट काँबी शोधत असता.. हे सापडलेत..

पर्सनली ब्लॅक अँड व्हाईट स्ट्राईप्स ची टी सर्व ब्राईट कलर्ड पँट्स वर सूट करतात असं मला वाटतं..

वर्षुतै मस्त आहेत काँबीनेश्नस.. मी अजुन लाल की ऑरेंज मधे कन्फ्युज आहे..
फ्लोरल प्रिंट्स पण कलर्ड जीन्स वर चांगले दिसतायत..
परवा एका जॉकीच्या अ‍ॅड मधे फ्लोरल प्रिंट्सवाले ३/४ नि पँट्स बघितले

ठांकु ठांकु..
चनस.. जर फार ब्राईट नसेल तर ऑरेंज ही चालेल ना.. मी घेतलीये एक अबोली रंगावर.. लाईट ग्रे, लाईट्ट ग्रीन, प्लेन टीज वर मस्त दिसते

ती सेम निळी माझ्या मैत्रीणीने मला जबरी जोर केला होता घे म्हणून पण मी धीर करू शकले नाही..आपले नेहमीचेच रंग आहेत माझ्याकडे अजून. फक्त त्याऐवजी त्याच निळ्या रंगाचा शर्ट घेतला त्याला बेल्ट आहे हे घरी लक्षात आलं. आता होपफुली ते चांगलं दिसावं. काळा बेल्ट आहे म्हणजे काळी ट्राउजर चालून जाईल.

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र वर्षूतै! Proud
मला नाही आवडत हा प्रकार Sad
माझ्या बहिणीला पर्पल घ्यायची आहे! बघ कशी दिसतेय... एकदा घरातल्या घरात घालून पाहीन Proud

कालच 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी- रमाबाई रानडे' वाचुन झालं. त्यात एका प्रसंगात रमाबाई झाडावरुन कैर्‍या पाडत असतांना त्यांचा छंद हरवतो. छंद म्हणजे काय दागिना होता? हातातला ते कळलं पण कसा ते कुणाला माहीत आहे काय?

छंद म्हणजे पैंजण असावेत. लहान मुलांना उभं केल्यावर ती पाय नाचवतात तेव्हा आपण गाणं म्हणतो ना, "एक पाय नाचव रे गोविंदा, घागरीच्या छंदा.... एक पाय नाचव रे"

Pages