फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय .....
नेहेमी वाचतच असते ...पण...........
असो...तर वर्षू त्या फ्लोरल पलाझोज येऊ घातल्यात बरं देशात. कारण परवाच सन्डे टाइम्समधे अगदी पहिल्यांदाच अ‍ॅड पाहिली. खूप आवडल्या मला. बहुतेक वेस्ट साइडची अ‍ॅड होती ती. आणि प्लेन कलर्फुल अ‍ॅन्कल लेन्थ्च्या नॅरो बॉटमही येऊ घातल्यात. त्याचीही अ‍ॅड पाहिली. अगदी हिरवी पिवळी केशरी लाल भडक. टॉपचं कॉम्बो चांगलं केलं तर छान दिसणार!

>>>फ्लोरल पँट्सनी भलताच जोर धर>>><<

अगदी अगदी! इथे सुद्धा(अमेरीकेत). अगदी वात येइल असा.... मी गोविंदा स्टाईल हिरवी फ्लोरल पँट घेतली. Happy

झंपी.. फोटो टाक ना तुझ्याकडल्या फ्लोरल्स चा.. Happy
मानुषी.. मी बी घेतलीये प्लेन कोरल्,लाल्,आणी निळ्या रंगात.. पिवळा रंग खूप आवडला होता पण त्या रंगाची पँट ..वेल!!! नाही घेतली.. Happy
वॉव्..आता देशात वेस्ट साईड, मॅक्स मधे शॉपर्स ची झुंबड उडालेली असणार....

पुण्यात लक्ष्मी रोड वर कुठे मिळतील पलाझो पॅन्ट्स? आत्ता परवा चालले आहे मी देशात. खरेदीसाठी खुपच कमी वेळ आहे. वामामधे कोणी शॉपिंग करत नाही का?

उंची पाच फूट असेल पण अंगकाठी सड्पातळ असेल तर पलाझो फ्लोरल टाइप पॅन्ट कशी दिसेल?
घालावी की नको? वर्षू नील , तुम्ही दिलेल्या फोटोतली ३ नं.ची पलाझो फ्लोरल टाइप पॅन्ट खूपच आवडली , पण उंची चा वांधा आहे हो.

पलाझोज बरोबर
१) स्टिलेटोज - एलिगंट,थिन पेंसिल हील्स सर्वात सूट करतात.
२) वेजेस (Wedges)- वेज्ड हील्स पण ऑफिसवेअर करता खूपच कंफर्टेबल आहेत आणी छान ही दिसतात.
३) हाय हील सँडल्स- पार्टीवेअर करता एकदम फिट.. यात थोडी फँसी ( पर्ल, डायमेंटिज(diamantes) लावलेले) ही घेऊ शकतेस.. वर्क प्लेस करता मात्र साधे, कंफर्टेबल हील्स चे सँडल्स घालावेत.

@ वर्षुताई
बॅगिटच स्टोर आहे, दादरहुन माटुंग्याकडे (parallel to station) जाताना लागत.

भुलभुलैय्या चं शॉर्ट काय? भुभु? काय्पण...(सॉरी.. भयंकर पकाव मूडमधे आहे).
मस्तं धागै.
इथे सिडनीत अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन आहे ह्या विकान्ताला. मी खूप कार्यक्रमांमधे लुडबुडतेय. मला सगळ्यात न आवडणारा विचार म्हणजे "काय घालायचं?"
अनेकजण(णी) हाच प्रश्नं विचारून वात आणतायत... माझी उत्तरं अत्रंग असतात पण मनातून मी भयंकर वैतागलेली किंवा हबकलेली असते.
ए... काय घालणार सम्मेलनाला?
... कपडे!
नीट सांग ना... स्पेशल... काय?
मंगळसूत्र... नेहमी नाही घालत...
कायपण... अगं कपड्यात... त्या अभिमान्गीताला बायका पैठणीत आहेत आणि सगळे पुरुष फेटा... तू?
टोपी! पैठणी किंवा फेटा घालून तबला वाजवणं कठीणै...
नॉर्मली इथपर्यंत माझा नाद सोडलेला असतो. पण मी टोटल पीडलेली असते.
खरच... हात हलवता येतात, इस्त्री केलेला आहे, गेल्या कार्यक्रमाला घातलेला नाही, आणि खूप लांब हात नाहीत इतक्यावर माझा कार्यक्रमासाठी कपड्यांवर विचार असतो... जो अर्ध्या मिनिटांत संपतो. तबले-बिबले आपले आपण उचलायचे.. कुठून-कुठे न्यायचे... ह्या सगळ्यातून टिकल्या-टुपल्या, मोठे गळे-बिळे (बिळे?) टाळत कपडे निवडायचे.
हातात काहीही घाल्ता येत नाही. गळ्यात काहीतरी अन कानात खूप लोंबणारे नाहीत असं काहीतरी... बस्स. (एका सताठ अंगठ्या घालून सतार वाजवणारीला बघून माझ्या सासूबाईंनी खूप विचार करून... 'तुला एक मुगुट करून घेऊया' असं सुचवलं होतं... आम्ही दोघीही टवाळक्या करायला मागेच बसलो होतो म्हणून वाचलो.)
पण...
इथे येऊन ही चर्चा बघितली अन लक्षात आलं की आपण किती अन काय मिस करतोय. किती मनापासून चर्चा चाललीये... रंग, शेप, लेटेस्ट स्टाईल्स.. ह्यावर खरोखर चांगली चर्चा आहे. मी फिदा आहे ह्या धाग्यावर. स्वतःच्या दिसण्याविषयी अनास्था ही माझी खासियत आहे... पण इथे शिकण्यासारखं खूप आहे...
पुढल्यावेळी भारतात आले की, तुमच्यापैकी कुणालातरी शॉपिंगला नेईन... किंवा इथे विचारून तरी शॉपिंग करेन... तरच काही खरै.
असो... तर... सम्मेलनाला मी ज्या दिवशी तबला वाजवत नाहीये त्या दिवशी साडी नेसतेय... बाकी एक दिवस काळा आणि एक दिवस पांढरा असे कॉटनचे ड्रेसेस घालतेय. ऐकून माझ्या मैत्रिणींना झीट आलीये.

दाद तुझी पोस्ट मस्त आहे ...मेनली ते मुगुट प्रकरण भन्नाट Wink लोळलेच मुगुट्वाली तबला वाजवणारी इअमॅजिन करून.

पण तू काळा आणि पांढरा असे एकदम आर या पार कपडे का निवडलेस Wink जरा अधलं मधलं कही असेल तर बघ नं

अवांतर - खरं पांढरा माझा सर्वात आवडता रंग आहे...:)

म्हटलं ना... इतक्यात घातलेले नाहीत, इस्त्री केलेले आहेत, टिकल्या-टुपल्या नाहीत, हात खूप लांब नाहीत, मोठे गळे नाहीत वगैरे चाळण्यांमधून पडलेले हे दोन Happy
मला काहीही तितपतच चांगलं दिस्तं असा माझा थोर (किंवा ठार) समज (किंवा गैरसमज) आहे... किंबहुना मी कशातही इतपतच बरी दिसते... हे अधिक बरोबर आहे Happy
भिन्न झालय डोकं.

@ दाद
व्हयजी! लवकरच म्ह्ण्जे कधी ते माहीत नाही :p
आणि माझ्या मनाला वेदना वगरै होत नाहीयेत !

स्टिलेटोज - एलिगंट,थिन पेंसिल हील्स सर्वात सूट करतात.>>>>>>>>>>>>> माझे सर्वात फेव्हरेट.......माझे खराब झालेत....नवीन घ्यायचेत पण मोचि चे सध्या या महिन्यात तरी परवडण्यासारखे नाहीत....नवर्याकडे बघुन बोलतेय सध्या...कोणी स्टिलेटोज देता का स्टिलेटोज????????? पण नो दया प्रकार अ‍ॅट माय होम.... Sad

पलाझ्झो पॅंट्स स्वस्त बांन्द्रा लिंकिंग ला मिळतील ( नो फिनिशिंग गॅरेन्टी).....बेस्ट ऑप्शन फिनिक्स मिल च्या मॉल - परेल मधे मिळतील.....

दाद, तू खादीमधे वगैरे कुर्ते का घालत नाहीस? वेगवेगळ्या रंगात येतात शिवाय ढगळपगळ असल्याने वावरायला सोपं पडतं.

फॅब इंडिया झिंदाबाद! मला भयंकर म्हणजे भयंकर आवडतात तिथले कपडे.
नीरजा, सांगच. तू सांगणार म्हणजे ब्रह्मंवाक्यं...

मी सांगु का???? मी पण फॅब फॅन आहे..पण हल्ली काही कपडे (कॉटन) चे टिकत नाहीत....फक्त ड्राय क्लीन करावे लागतात...प्रत्येक वेळेला तसे करणे परवडत नाही....सिल्क चे कपड चांगले अस्तात...मी मागे घेतलेला सिल्क कुर्ता,दुपट्टा छान आहे अजुनही पण सिल्क चा चुडीदार मात्र एक दोनदा घालुन खालच्या बाजुने विरला. माझे पैसे पाण्यात.... बाकी एलिगंस, फिटिंग , डिझाईन्स बेस्ट...... अ‍ॅक्सेसरिज फार छान असतात तिथे..... Happy

मी पण फॅबची फॅन. गेली निदान वीस वर्षं तरी नियमित वापरतेय. कॉटन आणि सिल्क दोन्ही. फॅबची शिवण पक्की असते आणि कट परफेक्ट. त्यांचं ट्युनिक कलेक्शन तर सुंदरच आहे.

फॅब किंवा कॉटन कॉटेजचे वगैरे कोणतेही सुती, रंगित कपडे वापरताना काही काळज्या कायम घ्याव्या लागतात. शक्यतो गार पाण्यात, माइल्ड डिटर्जन्ट घालून हॅन्ड वॉश करावे. ब्राईट कलर्स असतील तर उलट्या बाजूने धुवावेत. घट्ट कधीही पिळायचे नाहीत. निथळत ठेवावे आणि मग थोड्या वेळाने झटकून उलट्या बाजूनेच सावलीत सुकवावे. इस्त्री करतानाही उलट्याच बाजूने करावी. अशी काळजी घेतली तर कपडे खूप सुंदर टिकतात. कॉटनचे कपडे रंगांचा वरचा तजेला काही महिन्यांनंतर गेला तरी त्यांना जुनाटपणा आला असं समजू नये. छान मऊपणा येतो त्यांना. मिक्स अ‍ॅन्ड मॅच करुन वर्षानुवर्ष वापरता येतात.

फॅबचे साबण, मॉयश्चरायझर, आयजेल, फेसपॅक्स, सनस्क्रीन लोशन्स, मिक्स्ड दलिया, सनड्राईड फ्रूट्स, सरबताच्या पावडरींचे सॅशे, दागिने, स्टोल्स.. मी सगळं वापरते. आय अ‍ॅम अ कंप्लिट फॅब गर्ल Proud

विल्सन कॉलेजच्या मागच्या अनोखीचे कॉटन्स ही सुंदर असतात. मल कॉटन्स. हॅन्ड ब्लॉक प्रिन्ट्सचे असतात. पण खूप महाग.

शर्मिला... तू सच्ची फॅब भक्त दिसतेस.. Happy
मला फॅब च्या साड्या आवडतात.. मात्र काही कापडं वर्षानुवर्ष रंग सोडतात्..तर काही अगदी मऊ मऊ राहतात शिवाय रंग ही निघत नाही..
दाद.. Rofl कसले भयंकर प्रश्न पडलेत गा तुला... ,थांब आता नी ला वेळ होईस्तो !!!

Pages