फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए दाद.. नी ने पत्रातुन कळवलेलं.. आमच्या सारख्या सेम कॅटॅगरीत्ल्यां ना शेअर कर गं Happy

मला विचारायचे होते की.. फॅब इंडिया मध्ये सगळ थोड महागच मिळत ना...
बाहेर दुसर्या स्टोर मध्ये तेच दर जरा कमी असतात.. महिती नाही.. सगळ्यांच काय मत आहे?
आणि त्यांचे स्टोर नवी मुंबई मध्ये कुठे आहेत?

दाद............मुकुटातला तबलजी.....तुझ्या साबांचा सेन्स ऑफ ह्यूमर भारीच!

मी ह्या धाग्यावर विशेश (sorry potfadya SHA kasa type karayacha mahiti nahi) active नाही पण मी हा धागा वाचत असते. जून मध्ये मी भारतात येणार आहे. मला नेह्मी सतावणारा प्रश्न म्ह्णजे तिकडे आल्यावर purse, hand bag कसली वापरायची? कोणती style कोणता color? माझ्याकडे इकडे bags collection आहे. dresses, सण समारम्भ प्रमाणे वापरत असते. त्यामुळे तिकडे आल्यावर एकच एक वापरायला नको वाटते. आता १च बॅग बरोबर घेता येत असल्यने नाईलाज आहे. १, फारतर २ प्रकार मी आणु शकते. तर मला कोणी सान्गेल का कि कोणती style, color indian dresses as well as western dresses वर चान्गली?

डेझी एक दोनच बॅग्ज आणो शकत असाल तर.. एक शक्यतो मिडियम साईज- भारतात पिकनिकसाठी बाहेर जाताना जास्तीचं सामान राहू शकेल अशी तीन-चार कप्पेवाली व एक एकदम छोटी एलिगंट आर्म कँडी वाटेल अशी, ज्यात फक्त रेग्युलर मेकअप सामान, पैसे, मोबाईल, चाव्या व इतर जरूरी सामान राहील अशी!!! कलर्स सध्या समर स्प्रिंग सिझन चालू असल्याने, यू कुड लिटरली प्ले विथ कलर्स!! टो टोन कलर्स पण मस्त वाटतील... एमराल्ड विथ क्रीम ऑर कॉफी विथ लिनन शेड्स!!! वर वर्षू ने पिक टाकलेत तशा टॅन आणि बेज/क्रीम कशावरही सूट होतात, जास्त करून वेस्टर्नवर!

लग्नाला वगैरे जाताना ट्रेंडी ट्रॅडीशनल साठी डेकोरेडिव्ह क्लच मस्त!!

आणि हो पोटफोड्या ष s + h + h असा लिहायचा Happy

अरे मी थोडे दिवस आधी एक प्रश्न विचारला होता कोणी उत्तरच देत नाही येथे..
प्रश्नः-
मला विचारायचे होते की.. फॅब इंडिया मध्ये सगळ थोड महागच मिळत ना...
बाहेर दुसर्या स्टोर मध्ये तेच दर जरा कमी असतात.. महिती नाही.. सगळ्यांच काय मत आहे?
आणि त्यांचे स्टोर नवी मुंबई मध्ये कुठे आहेत?

फॅब इंडिया मधे बाकीच्या गोष्टी जसे क्रीम्,लोशन्स, खाण्याचे पदार्थ हे सर्व हॅन्ड्मेड अस्तात.....क्वालिटी चांगली असते....कपड्यान्चे पण तसेच......

फॅब इंडिया मध्ये सगळ थोड महागच मिळत ना. <<
असं काही वाटत नाही मला. डिसेन्ट लुक असलेले कपडे साध्या मार्केटातही त्याच रेंजमधे असतात.

नुकतेच ल रो ला हाय फॅशनमधे ५०० च्या आतल्या रेंजचे कॉटन कुर्ते बघितले. मला एकही आवडला नाही. परत सगळे तंबू आकाराचे होते.
अश्या वस्तूपेक्षा फॅबमधे १००-२०० रूपये जास्तीचे घातलेले परवडतात.

फॅब इंडीया नव्या मुंबईत वाशीला इन ओर्बीट मध्ये आहे.

मलाही फॅ महाग वाटते पण कपडा हातात घेऊन पाहिला, डिजाईन पाहिले की फरक कळतो. फॅब चांगले आहे. स्टाईल, दर्जा आणि वेगळेपणासाठी चार पैसे जादा मोजण्याची तयारी असल्यास जरुर घ्यावे.

पार्ल्यामधल्या दुकानांमधे ७००-७५० च्या रेंजमधे जे कुर्ते मिळतात त्यांची स्टाइल फारच बोर आणि टिपिकल असते. त्यापेक्षा फॅबमधले बरे.

पार्ल्यामधल्या दुकानांमधे ७००-७५० च्या रेंजमधे जे कुर्ते मिळतात त्यांची स्टाइल फारच बोर आणि टिपिकल असते. त्यापेक्षा फॅबमधले बरे.>>>>>>>>>>>> डोंबिवली ठाणे पण तिच कथा.....माझी उंची जास्त असल्या मुळे कुर्त्याचे साइड कट खुप वर जातात...खराब दिसतं.....फॅब मधले कपडे उंची ला मस्त असतात....फिटिंग पण मला अजुन पर्यंत चंगलिच मिळाली आहे....फक्त स्कर्ट्स तेवढे उंची ला येत नाही.. Sad बाकी अ‍ॅक्सेसरीज ऑसम... Happy

पुण्यात काकडे सिटि जवळ चांगला/ली टेलर कुणाला माहिति आहे का?

लक्ष्मी रोडवर हाय फॅशन जवळ एक धनश्री टेलर म्हणुन होत/आहे बहुतेक... त्यांचे फिटिंग चांगले असायचे.. त्याची ब्रॅंच पौड रोडवर आहे म्हणे.. पण नंबर किंवा पत्ता नाही मिळाला... कुणाला माहिति आहे का?..

पुण्यात काकडे सिटि जवळ चांगला/ली टेलर कुणाला माहिति आहे का?
काय शिवायचे आहे ?

हे माझे नवीन एअरिंग होल्डर..
लिटिल ब्लॅक ड्रेस - Happy खूप कनविनिअंट आहे वापरायला. वॉर्डरोब मधे हँगरवर लावलंय.

ऑस्सम!! कलेक्शन पण जबरदस्त आहे (नेहेमीप्रमाणे) Happy
वर्षू ताई, तुझा फोटो टाकण्याचा उत्साह पण जबरदस्त आहे.

अरे वा! सुपर ,एकदम मस्त कुठ्ले एअरिंग आपल्या जवळ आहे आठ्वण ठेवायचि गरजच नाहि............

वर्षू नील ,
एअरिंग होल्डर व तुमचे कलेक्शन खरंच छान आहे.
आणि आवर्जून फोटो टाकून शेअर करता याबद्दल कौतुक वाटते तुमचे.

वर्षु अ‍ॅक्चुली हे कानातल्यांसकट अंगात घातलंस तर पार्टी ड्रेस दिसेल Proud

नीधप, साधना .. धन्यवाद... Happy
मी नवी मुंबई मध्ये रहाते.. वाशी च्या फॅब इंडिया मध्ये नक्की जाउन बघेन..

वर्षु अ‍ॅक्चुली हे कानातल्यांसकट अंगात घातलंस तर पार्टी ड्रेस दिसेल>> अगदी अगदी Happy

वर्षु अ‍ॅक्चुली हे कानातल्यांसकट अंगात घातलंस तर पार्टी ड्रेस दिसेल Lol

हे माझे नवीन एअरिंग होल्डर.. लिटिल ब्लॅक ड्रेस>>> मला वाटले भोकं भोकं असलेला छोटासा हवेशीर ड्रेस Proud

Pages