मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक नाट्यकलाकरांच्या / नाट्यसंस्थेच्या माहितीमधे संपर्क म्हणून " तात्या तपकीरवाले " असे लिहिलेले असे.
कधीही शिवाजी ला गेलो, कि त्या माणसाकडे मी भयंकर आदराने बघत असे !

इंद्रा, रविंद्रला आता कुठे अड्डा?
शिवाजीलाही अड्डा नसतो. तो जिप्सी कॉर्नरला असतो.
दिनानाथचे रिनोव्हेशन चालू असल्याने तो एक अड्डा सध्या बंद आहे.
बाकी आविष्कार आणि पृथ्वी हे अड्डे विसरलास की.

एक जुहु- बांद्रा पण कसे करायचे ते सांगा ना. सकाळी ९ ला निघालो तर १० ला बांद्रा. मग कुठे जाऊ? काय करू? ते एक परेन्त मग बेस्ट लंच कुठेतरी. आणि ब्याक टू सबर्बज.

नेहरू सेंटरला पण आपल्या माबोकरांची मुले फॅमिली घेऊन जाउया ना. प्लॅणेटेरिअम बघता येइल. ग्रूप ने मज्जा येते.

नेहरू सेंटरला मरणाची गर्दी असते. रोजच पण शनिवार रविवारी तुंबळच. तिथे आतमध्ये पाणीही नेऊ देत नाहीत. पण त्यांचं कँटिन आहे आत त्यामुळे ठीकच. मुंबई दर्शनच्या सगळ्या बसेस नेहरू सेंटरला येतात आणि ती सगळी मंडळी नेसें बघायला असतात.

मात्र नेसें खरंच छान आहे. बाहेर बागबिग आहे तिथे पिकनिक लंच होऊ शकतं. तिथे ३डी की ४डी शोसुद्धा दाखवतात. केवळ ३० रुपयात. तोच शो अ‍ॅट्रिया मॉलमध्ये १५०रुपयाला दाखवला जातो. उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांकरता आठ्-दहा दिवसांची वर्कशॉप्स असतात. त्यालाही उदंड प्रतिसाद मिळतो.

रच्याकने, नेहरू सायन्स सेंटर आणि नेहरू प्लॅनेटोरीयम दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. नेसेंचा प्रवेश इ मोझेस रोडवर आहे तर नेप्लॅचा अ‍ॅनी बेझंट रोडवर. आतमध्ये दोन्ही शेजारी शेजारीच आहेत पण आतून कनेक्टिंग रस्ता नाहीये.

काही लोकं डोंबिवलीला पण मुंबई म्हणतात..
आणि ठाण्याला सुद्धा...
>>> झंपी, माझा मित्र म्हणायचा ठाणे म्हणजे मुंबईजवळील मोठे खेडे Proud

आरेम भट - कामगार मैदानाचा कट्टा लि की > आर्.एम्. भट... क्या याद दिलाई...

नवरात्र उत्सवात परळच्या कामगार मैदानात नऊ दिवस नऊ नाट्य प्रयोग असायचे. पावसाळा संपलेला असला तरी मैदानात चिखल असे. ते चिखलाने भरलेले मैदान रात्री नाट्य रसिकांनी भरुन जात असे.

नी.. ते सगळे ९५ पर्यंतचे अड्डे होते... आत्ताचे माहित नाही. पुथ्वीला फक्त एकदाच गेलो आहे तुझ्या नाटकाच्या प्रयोगाला... त्यावेळचा कट्टा आठवतोय. Happy

कुठलं विचारतोयस?षण्मुखानंद?? > तेच ते किंग सर्कलच

मामी- तपशिलात थोडी सुधारणा इ,मोझेस रोड्वर आहे ते नेहरु सायंस सेंटर, अ‍ॅनी बेझंट रोडवर प्लअ‍ॅनेटोरीअम जवळ जी गोल उंच ईमारत आहे ती नेहरु सेंटर

लोक्स आभार फोटोंना दिलेल्या काँप्लिमेंट्सबद्दल, अजूनही काही टाकेन ,'त्या' तळ्याबद्दल अधिकाराने सांगू शकणारी व्यक्ती सध्या पर्यटनात आहे,भेटली की विचारेन.
गटगबद्दल चवीने वाचतेय,अर्थातच यायला आवडेल.जुहू-बांद्रा अन वरळी फेव्हरिट दिसताहेत.
>>सकाळी ९ ला निघालो तर १० ला बांद्रा. मग कुठे जाऊ? काय करू? ते एक परेन्त मग बेस्ट लंच कुठेतरी. आणि ब्याक टू सबर्बज >>
हिलरोडमार्गे निघून खरेद्या वगैरे करत मोतमावली गाठून उताराने बँडस्टँड,मग लँड्स एंड पर्यंत अन परत वळून ताजमध्ये लंच ( Happy इतर बरेच परवडणारे पर्याय आहेत हिलरोड/कार्टर रोडवर )पण चालीचाली करत जायचं तर वांद्य्रातच संपेल वेळ.
वरळीचं रेस कोर्स बाहेरूनच पाहिलंय अन हाजी अलि दर्गा दूरूनच,हे जाणवलं.

हाजी अली दर्गा हा खास भावाबहीणींच्या रियुनियन साठी आहे. हाजी साहेबांच्या बहिणीची मजार अगदी पहिल्यांदाच आहे. दोन्ही मजारीवर चादर चढवायची असते. ओहोटीच्या वेळा संभाळून जावे लागते. तिथले फेरीवाले माहिती देतातच.
पुर्वी रेसकोर्सच्या आत, एक ब्रिटीश अँबियन्स असलेले रेस्टॉरंट होते. महाग होते पण छान होते. आता बंद झालेय असे मित्र म्हणाला.

मी एकदाच गेलेय हाजी अली दर्ग्याला. जाऊन परत येईपर्यंत पाणी रस्त्याच्या लेवलजवळ आलं होतं. पार होईपर्यंत जरा भिती वाटत होती. दर्गा मस्त आहे. मेन दर्ग्याबाहेर आल्यावर आजूबाजूचा परिसत बघत होते तेव्हा काही लोक कोपर्‍यात जुगार खेळताना दिसले. तेवढं जरा खटकलं.

धन्स दिनेशदा,अश्विनीमामी.
दिनेशदा,टचिंग तपशील बहिणींसाठी.फार दूर गेलेल्या भावांच्या.

>>पुर्वी रेसकोर्सच्या आत, एक ब्रिटीश अँबियन्स असलेले रेस्टॉरंट होते. महाग होते पण छान होते.>>

गॅलॉप्स....अप्रतिम हाटेल! Happy

एक टोट ऑन द टर्फ पण आहे. अकेरकरांचे त्यामुळे छानच असणार. बांद्र्याची ट्रिप एखाद्या शनिवारी जमविते. माहितीबद्दल धन्यवाद. आज आपले नेहमीचेच आर मॉल निर्मल लाइफ स्टाइल.

आणि आपला व्हिक्टोरिया टर्मिनस्-चक्क बैलगाड्या दिसताहेत समोरच Happy
या सर्व प्र.चिं.चा कालावधि १८५०-१९००,फारच जुना..
Victoria Terminus.jpg

वा, भारती, तू टाकलेल्या प्रचिंनी या धाग्याला एकदम रंजक बनवलं आहे. खूप मस्त वाटताहेत ही प्रचि.

धन्स मामी,अमेय,या शहरावरचं प्रेम व्यक्त करायला मिळालं.. अगदी माझ्या लहानपणापर्यंत वांद्र्याच्या शासकीय वसाहतीतले रस्ते धुतले जात होते, आम्ही लहान मुली मैत्रिणी मैत्रिणी पाचवी सहावीपासून बसने गिरगावात ,दादरला नातेवाइकांकडे जायचो स्वतंत्रपणे.पोदार रुइया कॉलेज परिसरात तरुण मुलामुलींची ,शाळकरीही,झुंबड असायची बसला पण वावगे प्रकार अस्तित्वात असल्याचंच माहिती नव्ह्तं.अतिशयोक्ती वाटेल आता. हे विपरित वास्तव नंतर फोफावत गेलं महानगरात.

सिंधी निर्वासित आले आणि मुंबईची रया गेली. तोवर मुंबई खरंच अतिशय टुमदार होती. (असं ऐकून आहे)

मस्त धागा Happy माझ आजोळ राणीच्या बागेसमोर BMC quarters मध्ये होत , आजोबा BMC मध्ये होते. आम्ही पार्ल्याला जागा घेतली हे जेव्हा त्यन कळल तेव्हा त्याना फारच वाईट वाटलं होत , त्यांची लेक पार्ल्याला म्हणजे मुंबईच्या बाहेर ( बृहन्मुंबाई झाली होती तरीही ) रहायला जाणार म्हणून. त्यातही माझ्या आईची हाइट म्हणजे ती कधी माहेरी गेलीच तर भायखळा मार्केट मधून भाज्या , कांदे , बटाटे घेऊन पार्ल्यला घरी यायची , पार्ला काही एवढ मागास्लेलं नव्हत तरीही Sad

आजोबा बहुतेक शनिवारी पिकेट रोड च्या मारुतीला जाताना मला बरोबर घेऊन जायचे , तिथे देवळाबाहेर एक सिंधी पानवाले चाचाजी बसायचे , त्याच्याकडे जे पान मिळायचं त्या चवीच पान कुठेच चाखायला मिळाल नाही , आणि ते पानवाले चाचाजी आम्हा लहान मुलाना पानाऐवजी गुलकंद द्यायचे .

राणीबागेच कौतुक लहानपणी हे तिथे असलेल्या झोपाळा घसरगुंडी होत आणि जरा कळत्या वयात तिथल्या वेगवेगळ्या झाडांमुळे वाढीस लागल:) बहुतेक त्यामुळेच झाडांबद्दलचा जिव्हाळा वाढीस लागला असावा.

पूर्वी BEST ची १ नंबर बस असायची ती तिला एडका बस कि काहीतरी असाच नाव होत , मला ती प्रचंड आवडायची. त्यात पुढे बसायला मिळालं की खूप धमाल यायची.

मागे दिनेशदानी मुंबई बद्दल सुरेख लेख लिहिला होता.

अगणित आठवणी आहेत मुंबईच्या Happy

पूर्वी BEST ची १ नंबर बस असायची ती तिला एडका बस कि काहीतरी असाच नाव होत , मला ती प्रचंड आवडायची. त्यात पुढे बसायला मिळालं की खूप धमाल यायची. >+१
ती डेबल डेकर बस असायची आणि तीला ड्रायव्हरची वेगळी केबिन असायची... ती वळताना बघायला जाम मजा यायची... आता तर साध्या डबल डेकर बसेसही मुंबईतून गायब केल्या आहेत. फक्त फोर्टात सुरु आहेत.

शिवडी ते व्हिटी असा हार्बर लाईन प्रवास दरवाज्यात उभ राहून करण्यात मजा येते.. कधी ती लोकल रस्त्याच्या शेजारुन तर कधी वरुन धावत असते.

त्यातही माझ्या आईची हाइट म्हणजे ती कधी माहेरी गेलीच तर भायखळा मार्केट मधून भाज्या , कांदे , बटाटे घेऊन पार्ल्यला घरी यायची <<<
हल्ली अनेक बायका पार्ल्याला लोकलीतून उतरून भाजी घेऊन मग बोरिवलीला जातात. Happy

तो १ नंबरचा रूट अजूनही आहे ना? सगळा गच्च वस्तीचा भाग वगैरे आणि मग पार भुलेश्वर/ काळबादेवी वगैरे एरियांपर्यंत?
माझ्या सुरूवातीच्या काळात जेव्हा कामाची खरेदी पण बस, ट्रेनला भरपूर सामानासकट लोंबकाळतच केली जायची त्यावेळेला मी बहुतेक बरेचदा गेलेय त्या रूटने.
साधी बस की डबलडेकर ते आठवत नाही.

मी लहान पणी बीडीडी चाळ वरळीत राहणार्‍या नातेवाईकांकडे आले होते तेव्हा बाबा मला त्या डबल डेकर मधून वरच्या डेक पहिली सीट वरून फिरायला घेऊन गेले होते.आणि ते बॉल मधील वॅनिला आइस्क्रीम घेऊन दिले होते. त्यामुळे कितीतरी दिवस ते आइस्क्रीम बॉल मधून खाताना मला डोळे मिटले की आपण बस मधून हिंड्तो आहोत असेच वाटायचे.

नरीमन पॉइंट पण आवड्तो मला. वेक अप सिडचा लास्ट सीन आहे ती जागा फार छान आहे. एक्स्प्रेस टावर मध्ये पण कामानिमित्त गेलेले. जुने लिंटास Happy जाहिरात क्षेत्रातील लोकांसाठी एक खास प्रेमाची जागा होती. त्यात आम्ही छोट्या गावठी एजन्सीत काही बाही लिहीणारे.

डबल डेकर मधून खूप फिरले आहे. ६६, १२६, ६५ नंबरच्या डबल डेकर बसेस जगन्नाथ शंकरशेट रोडवरुन जायच्या त्यामुळे त्या आमच्या नेहमीच्या सोबतिणी. गर्दीच्या वेळेस मधल्या जिन्यात उभं राहूनही प्रवास केला आहे.

Pages