मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

दिनेशदांचे खुप लेख आहेत जुन्या मुंबईच्या आठवणींवर.. मी अधुनमधुन त्याची पारयणे करत असतो.. ते इथे डकवु का..

ए, हसते काय...
मी रोजच येते इकडे, पण तरीही कॅफे मिलिटरी, बगदादी, माँडेगार इत्यादीसाठी रविवारीही यायला आपण एका पायावर तयार Wink

इथेच व्होट करा..
ज्यांना दोन्ही चालणारे त्यांनी दोन्हीकडे नावं टाका. Happy

७ एप्रिल
१. पाटील
२. नीधप

१४ एप्रिल
१. पाटील
२. नीधप

मला वगळा मग. आमची परीक्षा चालू आहे. मामी नंतर कधीतरी फिरवेल मला कॅफे मिलिटरी, बगदादी वगैरे ठिकाणी.

रच्याकने, कॅफे मिलिटरी म्हणजे 'तेजाब'चं शूटींग झालं होतं तेच का?

.

सतिश.. , प्रतिसादात एवढी मोठी पोस्ट नको प्लिज.

दिनेशदांना सांगून जुन्या मायबोलीतले लेख नव्या मायबोलीत आणता येतील. मग त्याच्या लिंका इथे अपडेट करा प्लिज.

कॅफे मिलिटरी म्हणजे 'तेजाब'चं शूटींग झालं होतं तेच का?> नाही ते... ब्रिटानिया रेस्टॉ. तिकडची बिर्यानी... अह्हा

>>अशा वेळीच ही गंमत अनुभवा > मामी.. मी घेतला आहे तो अनुभव... इस्माईल युसुफच्या थोड अलिकडेच (म्हणजे आधी) ती जागा आहे>><<
ह्या जागेवर अपघात झालेत भरपूर असे गोरेगावच्याच जवळच्याच नातेवाईकाकडून एकलेय.. त्यमुळे हि गंमतीची जागा म्हणणे कठिण आहे.
तिथे ट्रॅफीक तसे कमी असे नसतेच...

बाकी चालू द्या.

मुंबईचे काही कानेकोपरे नितांतसुंदर आहेत. एखाद्या दोनप्रहरी (कलत्या दुपारी) निघायचे. अंधेरीहून, स्वा.वि. रस्त्यावरून कुठूनही वेसावे बस डेपो गाठायचा. तिथून पाच-सात मिनिटे चालत वेसावे जेटी गाठायची. तिथून खाडी पार करणारी 'तर' (फेरी) पकडायची. समोरच्या मढ जेटीला उतरायचे. पंचवीस मीटर वर बस डेपो आहे. तिथून मालाडला जाणारी बस पकडायची. स्टेशनला न जाता मध्येच मारवे जेटीला उतरायचे. . चौकशी करत करत जेटी गाठायची. इथून मनोरीसाठी आणि गोराई-एस्सेल्वर्ल्ड साठी वेगवेगळ्या तरी सुटतात. फेरीत आपण दुचाक्या चढवू शकतो. एस्सेल्वर्ल्ड च्या फेरीज पाच वाजता बंद होतात. पण मनोरी-गोराईच्या उशीरापर्यंत सुरू असतात. मढ-मारवे रस्ता अफलातून आहे. आइस्क्रीम्-क्रीपर्स, बोगन्विलिया, जास्वंदी कुंपणावर जागोजाग डवरलेल्या असतात. आणि मारवे मनोरी किंवा गोराई तरीप्रवासही भन्नाट. परतीच्या प्रवासात हवेतर तोच आराखडा घ्यावा किंवा.मारवेवरून मालाड स्टेशन अथवा गोराईवरून बोरिवली किनारा गाठावा आणि तिथून बोरिवली स्टेशन गाठावे. खूप वेळ हाताशी असेल तर गोराईवरून बसने/ वाहनाने उत्तन आणि तिथून भाईंदरही गाठता येते. उत्तनला आमराया आहेत. तिथे हंगामात आंबेविक्री होते. फळ लहान असले तरी अतिशय स्वस्त आणि चविष्ट असते. दीनदयाळ उपाध्याय संस्कार केंद्रही आहे. त्यात शाळांच्या, महिलागटांच्या सहली येतात. मात्र हे सर्व दिवेलागणीच्या आत आटपायला हवे. नाहीतर मिनी कोंकणाच्या या यात्रेत काहीच हिरवाई आणि निळाई (खाडीचे पाणी काळपट असते म्हणा) दिसणार नाही.

इस्माईल युसुफच्या फायरिंग रेंजवर आम्ही शाळेत असताना फायरिंगच्या प्रॅक्टिससाठी जायचो. आता खरंच वाटत नाही की कोणे एके काळी 303 रायफल चालवली होती. गिरगावातल्या शाळेतून खाकी युनिफॉर्ममधल्या सगळ्या मुली NCC च्या व्हॅनच्या कडेच्या कट्ट्यावर बसून जोगेश्वरीला जायचो. एकदा एका झाडाची फांदी डोक्याला निसुटती (नशिब निसुटतीच) लागून लांब केस गुंडाळून त्याला लावलेली जाळी त्या फांदीला लटकून गेली होती Proud काही काही गंमती कायम आठवणीत राहतात.

मी पण नंतर दक्षिण मुंबई भटकायला यायला तयार आहे. मला पण धरा त्यात Happy

गोराईला (एस्सेल वर्ल्ड) च्या बाजुला ग्लोबल पॅगोडा आहे, तीथले बांधकाम आत्त्ता जवळजवळ पुर्ण झालेय, तीथल्या दर्वाज्यावरचे कोरिवकाम, पॅगोडाच्या पिलर्स वरचे काम, तेथल्या काहि मुर्त्या या सुंदर , अगदी येखादया मॉनेस्ट्री सारख्या आहेत. तीथे येक बुद्धच्या जिवनावर मोठे परमनंट चित्रप्रदर्शन आहे , अ‍ॅक्रेलिक माध्यमात चार पाच फुटांपक्षाही मोठे कॅन्व्हासवर ही चित्र रंगवली आहेत आणि अशी साधारण १५० चित्र आहेत, व्यक्तीचित्रण, इलस्ट्रेशन या दृष्टीने ही चित्र उच्च दर्जाची आहेत, गॅलरीत ऑडीओ गाईड ची सुविधा आहे, आप्ण चित्र बघताना त्या चित्र विषयाची थोड्क्यात माहिती ऐकु शकतो. त्या चित्रांची सिडी/पुस्तक सुद्धा विक्रिसाठि तीथे उपलब्ध आहेत .

ह्या जागेवर अपघात झालेत भरपूर असे गोरेगावच्याच जवळच्याच नातेवाईकाकडून एकलेय.. त्यमुळे हि गंमतीची जागा म्हणणे कठिण आहे. >>>> मला खरंच याची कल्पना नव्हती. पण आम्ही दरवेळी इथे एक छोटीशी उडी मारतो. पण धन्स. लक्षात ठेवेन आता. Happy

आणि या पॅगोड्यामध्ये विपश्यनेची छोटी पाऊण तासांची सत्रे किंवा आठवडाभराची मोठीही करता येतात .पॅगोड्यातल्या उपाहारगृहातले खाद्यपदार्थ अत्यंत परवडण्याजोगे, स्वच्छ आणि चविष्ट असतात. एस्सेल्वर्ल्ड्मध्ये मात्र सर्वच खूप महाग आहे.

माझी आईचं लहानपण दादरमधलं. ती खूप मस्त मस्त आठवणी सांगते. पूर्वी मुंबईतले रस्ते दर रविवारी पाण्यानं धुऊन काढायचे. लोकं दोन की चार आण्याचं ट्रॅमचं तिकीट काढून एका टोकापासून दादर टीटी (ट्रॅम टर्मिनस) ते कुलाबा जाऊन यायचे.

दादरला गोखले रोडच्या मागच्या बाजूस समुद्रापर्यंत भाज्यांचे मळे असायचे. आईच्या चाळीतून मागे असे सगळे हिरवेगार मळे आणि त्या मळ्यातली मोट दिसायची. त्यावेळी पोर्तुगीज चर्चनंतर गर्द झाडी लागायची. प्रभादेवी तर जंगलंच होतं. त्यावेळी सिद्धीविनायकाच्या मंदिराच्या जागी एक अगदी छोटंस (आता एखाद्या रस्त्याच्या कडेला शेंदूर फासलेल्या मारूतीचं असतं) तसं त्या गणपतीचं देऊळ होतं. आईच्या वडिलांचे एक ज्योतिषमित्र होते त्यांनी त्यावेळी हे जागृत देवस्थान आहे आणि याची पुढे खूप भरभराट होईल असं सांगितलं होतं.

पाटील, अगदीच चूक बरंका.

हार्डवेअर पासून सगळ्या गोष्टी मिळतात. मुंबईतल्या कितीतरी छोट्या उद्योगांचे रॉ मटेरियल आणि टूल्स या ठिकाणी मिळते.

Pages