मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळाघोडा च्या पुढे वेलिंग्डन फाऊंटन समोर फिलिप्स अँटीक आहे तीथे मुंबईचे जुने फोटोग्राफ्स मिळतात, त्यांच्या वेबसाईटवर बघाता येतील ते फोटोज.

मामी, खलास धागा. किती रमून गेले होते मी सगळ्या पोस्टी वाचताना... यातल्या फार थोड्या जागा प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. वाचल्या-ऐकल्या भरपूर आहेत.

बाकी,
पर्‍यानं on paper गिरगाव गटगच्या निमित्तानं मनात मार्चिंग रूटचा व्यवस्थित आणि पक्का विचार करून ठेवलेला दिसतोय.
तो प्रत्यक्षात कधी आणतोय ते त्या बाबुलनाथाला ठाऊक.
पण तळटिपेबद्दल अगदीच अनुमोदन. Wink

मला काळा घोडा, म्युझीअम, आर्ट गॅलरी आणि रिदम हाउस, तो भाग फार आवड्तो. महा. चेंबर मध्ये काम करताना रोज तिथे भट्कत असे. समोवार मधील साधे पण मस्त जेवण फार आवडीचे. यावेळी ड्रायवराने वडाळ्याहून अगदी कमी वेळात फोर्टात नेले. खूप मजा वाटली.

वे साइड इन, चेतना समोवार, मस्त जेवण्याची ठिकाणे.

नव्या स्टारबक्स मध्ये कोणी गेले आहे का? मरीन ड्राइव वरून पुढे हाजी अली वरळी कडे आले कि राइटचा सिग्नल आहे तीजागा फार आवड्ते. पेडर रोड पण. माँडेगार मध्ये टीनेजर्सला नेले तर चालते का?

जुहू बांद्रा ला अर्ध्या दिवसाची भेट द्यायची असेल तर काय काय बघावे? जेवण झाली की आमचा चालण्याचा उत्साह मावळतो. मोतमावली चर्च अजून बघणेबल आहे का?

अमा, मोतमावली नक्कीच बघणेबल आहे. तिथे खाली उतरून ताज लँडस एंडच्या पुढे अनेक सिनेमातून दाखवलेली वांद्र्याच्या किल्ल्याची जागा आहे. मस्त आहे ती. फार उशीरा जाऊ नका मात्र. बॅंडस्टँडलाच एक छोटसं रोस्टॉरंट आहे. तिथे समुद्राजवळची सीट पकडून बसायचं. मावळतीचा सूर्य बघायचा.

चर्चगेटला रस्त्यावर पुस्तके आता मिळत नाहीत. गेले ते दिन गेले!>>>>>>>>>> आहेत की अजुनही. पुर्वी किती असायचे माहीत नाही पण आताही असतात ३-४ जण

रेसकोर्सवर घोडे तर पळतातच पण बाकीही अनेक कार्यक्रम सुरू असतात. रोज सकाळ-संध्याकाळ तिथल्या मातीच्या ट्रॅकवर चालण्याकरता असंख्य लोकं येतात. एक फेरी मारली तरी भरपूर रपेट होत असेल. (मला जायचंय एकदा.) एखाद्या रविवारी इथे एरोमॉडेलिंगवाले जमतात. त्यांची छोटी छोटी विमानं ग्राउंडच्यावर घिरट्या घालत असतात.

रेसकोर्सवरच एक हेलीपॅडही आहे. दिवसातून अनेक हेलिकॉप्टर्स इथे उतरतात आणि उडतात. सगळी उरण साईडला जातात. कर्जतच्या एन डी स्टुडियो (आता बिग स्टुडियो) मध्ये शुटिंग असेल तर स्टारलोक्स इथूनच हेकॉनं कर्जतला जातात असं ऐकून आहे.

शिवाय, प्रचंड मोठ्या प्रमाणावरचे लग्नसमारंभ असतील तर त्यांना रेसकोर्सशिवाय पर्याय नाही. रोषणाईचा लखलखाट लग्नाच्या मोसमात इथे हमखास.

अशीच लग्नाकरता प्रसिद्ध आहेत ती मरीन ड्राईववरची ग्राऊंड्स - पोलिस, जीए मेडिकल, पारसी जिमखाना, मुस्लिम जिमखाना, हिंदू जिमखाना अशी पाच की सहा मैदानं एकमेकांना खेटून उभी आहेत. तिथेही लग्नसमारंभाचा धडाका जोरदार असतो. एकसेएक रोषणाई केलेली असते. डोळ्यांचं अगदी पारणं फिटतं.

मुंबई बदलतेय आणि हो सुधारतेही आहे. मला जास्तच प्रिय होत आहे.
बदल होतच असतात, व्हायलाच हवेत. जिवंतपणाचे लक्षण आहे ते. पण मुंबईकरांचे "स्पिरिट" मात्र बदललेले नाही.
त्याचीच तर नशा चढते मला.
सध्या मुंबईत असलेल्या लोकांच्या पोस्टस वाचतोय. मजा येतेय.

मामी, दादर टीटीचा पारसी जिमखाना, जागा छोटीशी असली तरी फुलांची सजावट देखणी असते. वनिता समाजाचे पण तसेच. त्या जागेला एक खास भावना आहे. ( मला हटकून ओगले आज्जीच आठवतात. त्यांची कला तिथेच बहरली. )

सचिन तेंडूलकरच्या लग्नाचे रिसेप्शन वरळीला नेहरु सेंटरच्या पटांगणावर झाले होते. अगदी मोजके लोक होते.

सी.के.पी. हॉल, कित्ते भंडारी समाज, धुरु हॉल, लक्ष्मी नारायण हॉल... यांना आता आता पर्यंत मराठमोळा सुगंध होता.

सचिन तेंडूलकरच्या लग्नाचे रिसेप्शन वरळीला नेहरु सेंटरच्या पटांगणावर झाले होते. >>> दिनेशदा, ते रिसेप्शन ज्वेल ऑफ इंडियाच्या वर दोन मोठ्ठ्या टेरेसेस आहेत. त्यात झालं होतं.

समोरासमोरचे दोन फुटपाथ आणि परत त्याला ९० अंशात असलेलेही फुटपाथ असे सगळे पुस्तकांनी खचाखच भरलेले असायचे. ते सगळे लोक मधे उठवले. क्वचित कुठेतरी २-४ असतीलही.
हे मी बघितलेल्या मुंबईत.

मामी,

>> शेवटचं बाणगंगा आहे का?

मला आठवतंय त्यावरून बाणगंगेचं तळं पायर्‍यांचं आहे. त्यामुळे त्या प्रचितलं तळं बाणगंगा नसावं.

आ.न.,
-गा.पै.

पलिकडच्या गावांना मुंबई म्हणायला मेली जीभ रेटतच नाही. >>>>>>>>>>>> अगदी अगदी Happy

परेशने अगदी सगळा परिसरच फिरवून आणलं सगळ्यांना.

किती मस्त बाफ आहे.

अशा गप्पा ऐकल्या की मला दादरला, परळला वा गिरगावात १-२ महिने तरी भाड्याने घर घेउन राहायला जावंसं वाटतं.. गणपतीच्या दिवसात तर हमखास!

भारतीताई मस्त फोटो.
हेरिटेज गटग करा मुंबईमध्ये Happy सुट्टीच्या दिवसांत ठेवा, मला अस भटकायला यायला आवडेल. आधी सांगा.

गणपतीच्या दिवसात तर हमखास! > फारच धाडसी आहात... लालबाग मधिल रहिवासी गणपतीचे ११ दिवस वनवास भोगतात. असो.

नाटकप्रेमी मंडळीचे अड्डे... शिवाजी मंदिर, दामोदर, रविंद्र नाट्य मंदिर, साहित्यसंघ, षण्मुखानंद (इथे नाटक होतात का? की फक्त सभाच होतात.)

इंद्रा कुठलं विचारतोयस?षण्मुखानंद?? होतात नाटक काही वेळेस. नैतर मग सौंदीडीयन म्युझिकल कन्सर्ट Happy
आरेम भट - कामगार मैदानाचा कट्टा लि की Happy

Pages