मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरची एक खास गंमतीची जागा माहित आहे. दक्षिण मुंबईतून गोरेगावच्या दिशेनं जाताना, जोगेश्वरीचा आधी हायवे थोडा डावीकडे वळतो. त्या वळणानंतर एका मिनिटातच ती जागा येते.

या जागेवर रस्ता काहीसा उंच होतो आणि पलिकडे लगेच खाली जातो. त्यामुळे वळणानंतर गाडी स्लो करून पुढच्या गाड्यांच्यात आणि आपल्या गाडीत अंतर ठेवावं. मग गाडीचा वेग वाढवून त्या उंचावरून गाडी नेली की मस्त मज्जा येते. Happy एक क्षण रोलर कोस्टरमधे बसल्यासारखं वाटतं.

फार साहसीपणा करू नका, थोडक्यात मजा घ्या. सराईत ड्रायव्हर असेल आणि आजूबाजूला फार ट्रॅफिक नसेल अशा वेळीच ही गंमत अनुभवा.

मामी. मस्त धागा.

मी त्या धाग्यावर विचारलेला प्रश्न परत विचारते. लव्ह लेन या जागेबद्दल कुणाला माहित आहे का? वरळीचा लव्हग्रोव्ह नव्हे. ही लव्ह लेन माझगांवच्या आसपास येते. माझगांवजवळच म्हातारपाखाडी म्हणून भाग आहे, त्याचे नावदेखील कसे पडले असावे असा मला कायम प्रश्न पडायचा. Happy

सध्या खास जागा म्हणजे शिवडी क्रिक, सक्काळी लवकर गेले तर ओहटी असते आणि त्यावेळी सध्या खुप प्लेमिंगो दिसतात. धुक्याचे बॅक्ग्राऊंड आणि सकाळची लाईट फोटोग्राफीला मस्त.

वडाळा आय्मॅक्स कडुन शिवडी स्टेशन फाटकाहुन डावीकडे वळायचे पाचेक मिनीट ड्राईव्ह करुन खाडिवर पोचता येते. जवलच शिवडिचा किल्ला आहे (ऑडी वर्कशॉप जवळ).

खाण्यापिण्याच्या गोष्टी करायच्या नाहीत या मामीच्या ताकीदिला न जुमानता पांदहर्‍या शाईत लिहतोय
. खाडिजवळ लोकल लोक क्रॅब पकडुन विकतात. आम्ही मागच्या आठवड्यात गेलो होतो तेव्हा भरपुर भरलेल्या क्रॅब्ज मिळाल्या फक्त २०० रुपयात ज्याचि मार्केट मधे किंमत कमित कमी १००० रुपये तरी असेल.

सूचनेसाठी धन्यवाद, अ‍ॅडमिन.

पाटील, या धाग्यावर तुमच्या खास मुंबईच्या चित्रांची लिंक पण देऊन ठेवाल का?

अशा वेळीच ही गंमत अनुभवा > मामी.. मी घेतला आहे तो अनुभव... इस्माईल युसुफच्या थोड अलिकडेच (म्हणजे आधी) ती जागा आहे.

विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर सिप्झचा रस्ता डावीकडे सोडला की एक रस्ता वर जातो. तिथे लगेचच डाव्या बाजुला टेकडी आहे आणि त्यात खोदकाम केलेल्या गुहा आहेत. आम्ही दोन मैत्रिणी एकदा भोचकपणा करुन वर चालत गेलो होतो ( तेव्हा तो ब्रीज नव्हता ) गुहांमधे कबुतर आणि वटवाघळांचा प्रचंड वास होता. नॅशनल पार्क मधे असलेल्या गुहांसारख्याच वाटल्या. पण तिथे आसपास लोकही रहातात. त्यामुळे आम्ही आत जाण्याचा फारसा धोका न पत्करता परतलो.

इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.
>>> सुचनेकरता धन्यवाद, अ‍ॅडमिन.

लोक्स, शक्यतो स्वतःकडचीच प्रचि टाकावीत. दुसर्‍या कोणाची, आंतरजालावरची प्रचि टाकू नयेत. टाकलीतच तर प्रताधिकारासंबंधी योग्य ती परवानगी घेऊनच टाकावीत.

खाण्यापिण्याच्या गोष्टी करायच्या नाहीत या मामीच्या ताकीदिला न जुमानता पांदहर्‍या शाईत लिहतोय
. खाडिजवळ लोकल लोक क्रॅब पकडुन विकतात. आम्ही मागच्या आठवड्यात गेलो होतो तेव्हा भरपुर भरलेल्या क्रॅब्ज मिळाल्या फक्त २०० रुपयात ज्याचि मार्केट मधे किंमत कमित कमी १००० रुपये तरी असेल.
>>> हे धावेल की! Happy नी, ला अनुमोदन. Proud

या बाफवर इनफ जागांची माहिती जमली की एकदा टाऊन, एकदा उपनगरे असे भाग करून ’क्लिक मुंबई’ अशी गटगं ठरवूया आणि अर्थातच त्याला खादाडी गटगंची जोड देऊया..
साऊथ मुंबई खरंच भारी असणार एक्स्प्लोअर करायला..

अशा वेळीच ही गंमत अनुभवा > मामी.. मी घेतला आहे तो अनुभव... इस्माईल युसुफच्या थोड अलिकडेच (म्हणजे आधी) ती जागा आहे.

>>>> मज्जा येते ना! Happy पण परतीच्या प्रवासाच्या रस्त्यावर तसं काही नाहीये.

बरोबर. साधारण त्याच आसपास. खालच्या नकाशात हरिश एंटरप्राईजच्या आसपास ही जागा आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
https://maps.google.co.in/maps?hl=en&q=western+express+highway&ie=UTF-8&...

सावली तु बहुतेक महाकाली केव्ह्ज बद्दल बोलतेयस, हल्ली आर्किऑलॉजी डिपार्ट्मेंट्ने बर्‍यापैकी मेंटेन केल्यात.
याहुन सुंदर गुहा जोगेश्वरीला आहेत. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि जेव्हिएलार जिथे मीळतो तीथुन सर्वीस रोडने दक्षीणेकडे गेल्यावर १५० मीतर्च्या आसपास ये छोटा रशात डावीकडे वर जातो , त्या भागात या लेणी आहेत, आत पायर्‍या उतरल्यावर सुंदर लेणी आणि पिलर्स आहेत, आत जोगेश्वरी आणि बरीच मंदीरे आहेत, तीथे कायम पुजा आर्चा /लग्न/ बाकी विधी चालु असतात, बरोबरीने येणारी अस्वछता पण आहे , तरीही ही लेणी भेट देण्यालायक आहेत. जमीनी खाली खोदुन बनवलेलि असल्याने फोटोग्राफीला टॉपलाईट मीळतो
http://en.wikipedia.org/wiki/Jogeshwari_Caves

पृथ्वीच्या कॅफेमधे बसून लिहायला मजा येते. सुचतं पण मस्त. खादडी पिदडी कंटिन्यू ठेवता येते. दिवसभर बसा कोणीही उठवत नाही...
हवं तर स्केचिंग पण करू शकता. हवं तर बासरीही वाजवू शकता..
बहुतेक दुनिया येडीबागडीच असते तिथे त्यामुळे कोण काय म्हणत नाही.. Happy

पाटील, सही आहेत जोगेश्वरी केव्हस. खरच जायला हवं एकदा.
मला त्या केव्हस चे नाव नाही माहित. पण त्या मेंटेन केल्या असतील तर मस्तच. पुन्हा भेट द्यायला हवी.

पृथ्वीच्या कॅफेमधे बसून लिहायला मजा येते. सुचतं पण मस्त. खादडी पिदडी कंटिन्यू ठेवता येते. दिवसभर बसा कोणीही उठवत नाही...>> तिथे बसून कधी क्रीएटीव्ह लिहिलं नाही पण ग्रूपने एकत्र जाऊन कधीकधी असाईनमेंट्स पूर्ण केल्या होत्या. तेव्हा आमच्या जोरजोरांत चर्चा चालू अस्ताना आजूबाजूचे काही लोक (जे बर्‍यापैकी मान्यवर लोक असायचे) येऊन आपले मतप्रदर्शन बिनधास्तपणे करून जायचे- ते सगळ्यात भारी वाटायचं आम्हाला.

असाईनमेंट संपल्या की आम्ही जुहू चौपाटीवर भटकत बसायचो.

ती 'द आयरीश कॉफी' आता मिळत नाही. Wink
पण तो माहौल असला भारी असतो ना..
पाटील, कधी तरी स्केचिंग करा तिथे जाऊन. मेन एन्ट्रन्समधून कॅफेटेरियाची दगडी टेबलं वगैरे दिसतात आणि डावीकडच्या अ‍ॅम्फी थिएटर सदृश पायर्‍या.. मस्त फ्रेम्सआहेत तिथे.

रविवारी फोर्ट एरीआ गपगार असतो, सकाळी फाउंटन जवळ कॅफे मिलिटरीमधे ईराणी ब्रेकफास्ट नंतर होर्नीमन सर्क्लल, फोर्ट एरिआत फोटोग्राफी, ( सेंट थॉमस चर्च मधे खुप सुंदर शिल्प आहेत आणि चर्च मधे आत शांतपने केलीत तर फोटोग्राफी पण करु देतात), दुपारी बगदादीत लंच आणि नंतर कुलाबा, ससुन डॉक , एव्हढे फीरुन जे थकटिल ते माँडेगार मधे भेटतील Wink बघा हा प्लॅन कसा वाटतो

नीधप- नक्की म मी मुंबईवर एक पेंटींग सिरीज करतोय, पुढल्या वर्षी नेहरु सेंटर मधे एक्जीबीट करायला, त्यात बसत असेल तर करायलाच पाहीजे

माटुंगा इस्टला उतरुन फुल गल्लीतून (इच्छूकांनी) नल्लीज मधे जा आणि खा.इच्छूकांनी नल्ली समोरील सा.इं. डोस्यावर ताव मारा.

पाटिल मस्तच Happy

Pages