..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिंगो स्निग्धा Happy थंडगार कैरीचं पन्ह बक्षीस Happy

०५/२१
तुमने मुझे देखा होकर मेहरबा
रुक गयी ये जमी थम गया आसमां
जानेमन जानेजा

जिप्सी, जियो!!! हा ही नविन प्रकार मस्त आहे ...... तुझ्या कल्पनाशक्तीला ____/\____

नमस्कार केल्याबद्दल थंडगार पन्ह्याचा एक ग्लास माझ्याकडेही सरकवशील ना?

५/२२

जगायची लाखो कारणे आहेत पण तुला जगायला नाही आले
कोणी तुझ्या आयुष्यात येऊ शकले असते पण तूच तसे केले नाहीस

माधव, मला आधी वाटल तुम्ही कोडंच दिलंय Happy
मी उत्तर पण टाईप केलेलं Happy Happy

मामी, माधवला बक्षीस देऊन टाक पटकन. Happy

.

०५/०२० श्रीपाद आणि देवकी काळेंच्या मुलाचं लग्न महत्प्रयासानं झालं. करियरच्या मागे लागलेल्या घनश्यामला वधुसंशोधन, लग्न, इ.साठी वेळच नव्हता (म्हणे). लग्न तर झालं. पण त्याच्या दोन काका-काकूंनी भेट म्हणून दिलेली केरळची मधुचंद्र ट्रिप काही त्याच्या नशिबात नव्हती. ऐनवेळी त्याचा कसलातरी प्रोजेक्ट उपटला. मग त्याच तिकिटांवर श्रीपाद आणि देवकी आरोग्य-पर्यटनासाठी गेले. एका आधुनिक निसर्गोपचार केंद्रात श्रीपादराव आपल्या हृदयविकारावर उपचार करून घेण्यासाठी दाखल झाले. देवकीबाईंना प्रकृतीची कोणतीही समस्या नव्हती. त्यांनी त्याच केंद्रातली नखशिखान्त-सौंदर्यवर्धन-उपचारमालिका आजमावायची ठरवली.
रंगीत पडदे, रंगीत दिवे यांद्वारे तिथे रंगोपचारही केले जात. केंद्रातील कडक नियमांमुळे दोघांनाही वेगवेगळ्या कुटिरांत राहावे लागत होते.
भ्रमणध्वनीही दिवसात दहा मिनिटांपेक्षा जास्त वापरता येत नसे. तो हाती आला की श्रीपाद आणि देवकी एकमेकांशीच बोलत. श्रीपादराव तेव्हा कोणते गाणे म्हणत असतील?

उत्तर : उधर तुम हंसी हो इधर दिल जवां हैं
ये रंगीन रातों की इक दास्तां है

मि & मिसेस 55 मजरूह - ओ.पी.- रफी-गीता दत्त- गुरु दत्त-मधुबाला.

केदार, मधुबालाचं एक पोस्टर बक्षीस.

जिप्सी तुला तो उन्हाळ्याची चाहुल देणारा बर्फाचा गोळा.

०५/०२३:
किरण बेंबी तिसरा (पहिलं अक्षर)
श्या!!! विनवून आले

रे नाबी(नाभी) तीजा ए
श्या मना आए

भरत.. आधी मला मधु इथे अन चंद्र तिथे.. हे गाणे असेल असे वाटले होते. पण बाकिचे काही जुळत नव्हते.

०५/०२४ : मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पा वाचून उषाताईंना निसर्गपर्यटनाची हुक्की आली. त्यांनी तारकर्ली आणि त्यानंतर कासचे पठार अशा दोन ट्रिप्स लगोलग करायच्या ठरवल्या. या दोन्ही ठिकाणी गेल्यावर छायाचित्रण तर केलेच पाहिजे. मस्त मस्त फोटो कसे काढावेत यासाठी टिप्स घेण्यासाठी त्या जिप्सीला भेटल्या. जिप्सीला उद्देशून त्यांनी कोणते मराठी गाणे म्हटले असेल?

०५/०२५ देशमुखांकडे संयुक्त कुटुंबपद्धती अजूनही टिकून होती.तीन पिढ्यांच्या घरात चौथ्या पिढीच्या बाळपावलांची चाहूल लागली होती. 'हम दो हमारे दो'चा संदेश त्यांच्या मागच्या काही पिढ्यांनी अंमलात आणल्याने कुटुंब काही फार मोठे नव्हते. मुली लग्न होऊन सासरी गेल्याने कुतुंबात आता आरतीबाईंच्या दोन सुना - सुवर्णा आणि शोभा आणि त्यांच्याही सुना , अनुक्रमे राधा आणि मीरा. देशमुखांचे संयुक्त कुटुंब असले तरी देशमुख मंडळी खुल्या विचारांची होती. सगळे निर्णय शक्यतो सर्वसहमतीने व्हायचे. गावची सरपंचकी लोकशाही परंपरेनुसार देशमुखांच्या घराण्यातच होती. थोरल्या देशमुखांच्या स्वर्गारोहणानंतर आरतीबाईंना विरक्तीची ओढ लागली होती. त्यातच महिला आरक्षणाचा फेरा देशमुखांच्या बाभुळगावावर पडला.सरपंच कोण असावा यावर चर्चा, प्लानिंगही होऊ लागले. शोभा ही थोरली सून असली तरी सुवर्णा ही अधिक कर्तबगार, समंजस असल्याने तिलाच सरपंच करावे असा बहुमताचा कौल होता. पण शोभाताईंना हे खपले नाही आणि त्यांनी चक्क वेगळी चूल मांडायचा विचार चालवला. पण त्यांना अगदी त्यांच्या यजमान, मुलगा, सून यातल्याही कोणी मनापासून साथ न दिल्याने त्या चांगल्याच खट्टू झाल्या. यावर सुवर्णाबाईंनी शोभाबाईंची सून मीरालाच कुटुंबप्रमुख करावे असा धोबीपछाड टाकून आणखी वाहवाही लुटली.
सगळे झाल्यावर सुवर्णाबाई शोभाबाईंची समजूत काढायला गेल्या- एक हिंदी?गाणं म्हणत. शोभाबाईंच्या मन:स्थितीलाही ते गाणं फिट्ट बसत होतं. कोणते ते गाणं?
(टीव्हीमालिकांच्या परंपरेला जागून कोड्यातील पुरुषपात्रांचा अनुल्लेख करण्यात आला आहे.)

Pages