..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

०५/००८

पहिला क्लू... हे संपूर्ण गाणे या कोड्याला फिट्ट आहे !

भरत, असे खरेच गाणे आहे का ?

जिप्स्या, वेलीचे फोटो काढायला गेला होतास का प्रेमात पडायला ?

भरत, खुप कॉम्प्लेक्स येतो अशी गाणी मला माहित नाहीत याचा !

दिनेशदा, हे ..........
जोगी जबसे तू आया मेरे व्दारे...

हे वाटायच कारण त्यातल शेवटच कडवं
मिठी मिठी अगन ये सेहे ना सकुंगी
मैं तो चुई मुई अबला रे....
मेरे और निकट मत आ रे ओ जोगी...

०५/००८

जिप्स्या जेवलास का ? आज काय गोड ?
मामी बहुतेक परदेशवारीवर आहे, तिला नक्कीच उत्तर आले असते, पण भरत मयेकर आहेत ना ? ( चौथा क्लू )

आर्या, त्या वेलीला, चंद्रप्रकाश पण सोसत नाही.
सगळे क्लू एकत्र करुन बघितल्यास उत्तर सुचेल बहुतेक !

०५/००८

आता हा शेवटचा क्लू बरं का.
ज्या प्रसंगातले हे गाणे आहे, तसे प्रसंग हिंदी सिनेमात खुप असतात पण त्या प्रसंगात गाणे क्वचितच असते.
ऐश्वर्या आणि हृतिकच्या जोधा अकबर मधे पण असा प्रसंग आहे, पण त्यातही गाणे नाही.

भारती, तसाही थोडा संदर्भ आहेच.. एरवी मी काय जिप्स्याला असा उगाच छळणार होतो का ? Happy

आठवा रे सगळ्यांनी. सुंदर गाणे आहे हे. उद्या दुपारी उत्तर सांगतो.

संपूर्ण गाणे, जिप्सी, मामीचे परदेशी असणे, मयेकरांचे भारतात असणे, चित्रपटातला कॉमन प्रसंग, जिप्स्याचे जेवण, ( तेही गोडाधोडाचे ) एकाच चित्रपटात एकत्र आलेली जोडी, वेलीला प्रकाश न सोसणे... या सगळ्यांचा
एकत्र विचार करा !

जिप्सी म्हणजे योगेश असाच केवळ संदर्भ नाही ! ( याउप्पर जर कुणाला उत्तर आले नाही.... तर... मी देईनच. )

जिप्सी म्हणजे योगेश असाच केवळ संदर्भ नाही !<<<<
जिप्सी म्हणजे भटक्या. रमता जोगी वगैरे आहे का?
'ताल'मधलं 'रमता जोगी' आठवलं. त्यात तो 'सारी मधुशाला पी आया' म्हणतो. (याला गोडाचे जेवण म्हणता येईल काय? :फिदी:) पण अक्षय खन्ना आणि अनिल कपूरबरोबर ऐश्वर्या रायने एकेकच सिनेमा केलाय असं नाही.

हे असण्याची शक्यता नाहीच.

काश्मिर की कली हूं मैं मुझसे ना रूठो बाबूजी
मुरझा गयी तो फिर ना खिलुंगी कभी नही कभी नही कभी नही

मूळ कोड्यापेक्षा क्लूज जास्त कठीण वाटताहेत.

आपुन कल छुट्टीपे था. ये ३ कोडी आपुनकी तरफसे

०५/००९

'सरिता? सरिता देसाई ना तू?' रस्त्यात थांबून दिनकररावांनी विचारलं.
'दिन्या? अरे, किती वर्षांनी भेटतोयस?' सरिता म्हणाली. 'आणि माझं आडनाव आता कामत आहे बरं का'
'माहित आहे मला. पण तरी जुन्या नावानेच हाक मारली.' दिनकररावांच्या स्वरात खिन्नता होती.
'जाऊ दे रे दिन्या. तू कधी लग्न केलंस?'
'तुझ्या लग्नानंतर ५ वर्षांनी' दिनकरराव अजूनही उदास होतेस.
'अरे, मग आता आजोबाही झाला असशील.' सरिता म्हणाली. दोघे जुन्या गप्पात रंगले.
'इथे कशी?' दिनकररावांनी विचारलं.
'अरे, मिस्टरांची इथे बदली झाली आहे. भाड्याचं घर शोधतोय.'
'असं होय. अग मग माझ्या सुनेने आणि मुलाने इन्व्हेस्टमेन्ट म्हणून २ घरं घेतली आहेत ह्या शहरात. सुनेचं घर आहे हिन्जवडीला. आणि मुलाचं पाषाणला. दोन्ही पहाणार का? दोन्ही घरांसाठी भाडेकरू शोधतोय.'
'हिन्जवडीचं बघू यात का?मिस्टरांना ऑफिस जवळ पडेल तिथून.' सरिता म्हणाली.

घर बघून ती फार खूश झाली. चांगलं २ बेडरूम्चं प्रशस्त घर, मार्बल फ्लोअरिंग, मॉड्युलर किचन.
'काय? आवडलं का घर?' दिनकररावांनी विचारलं.

मिश्किल हसत सरिताने उत्तर दिलं एका जुन्या हिंदी गाण्याच्या रुपात. ओळखा ते गाणं.

०५/००८

जास्मिन कुळातील फुलात ( जाई, जुई, सायली वगैरे ) सुगंध असला तरी रंग नसतातच. तर शशांक आणि शांकलीने एक प्रयोग करायचा ठरवले. यातल्या अनेक वेलींचा संकर करुन त्यांनी प्रयोगशाळेत एक वेल वाढवली.
आणि त्यांच्या प्रयोगांना यश आले. सुगंध आणि रंग यांचा अनोखा मिलाप असलेले फुल आले त्या वेलीला. इतकेच नव्हे तर एकाच फुलात, अनेक रंग दिसू लागले.

अर्थात ते फुल बघायला, नि.ग. वरचे सगळे शशांक शांकलीच्या घरी गेले. सर्वांनी त्या फुलाचे अनोखे रंग बघून, नवल केले. वर्षूला मात्र मनात असूनही येता येत नव्हते. तिने जिप्स्याला फोटो पाठवायची विनंती केली..

मग सगळ्यांना लक्षात एक गोष्ट आली. त्या दोघांनी हि वेल, प्रयोगशाळेत, कृत्रिम प्रकाशात वाढवली होती.
तिला प्रकाश अजिबात सहन होत नसे. अगदी एक नाजूक फांदी जर दिवसा प्रकाशाकडे नेली तरी कोमेजत असे. रात्रीच्या चंद्रप्रकाशाचाही प्रयोग अयशस्वी ठरला. त्यामूळे जिस्प्सी फ्लॅश वापरायला घाबरत होता.
पण वेलीच्या मनात काय होते, हे ती गाण्यात कसे सांगेल ?

उत्तर :
सैंया जाओ जाओ, मोसे ना बोलो
अब ना मोहे सताओ,

फ़ुलसी मोरी छोडो कलाई
छेडो ना मुझको, ओ हरजाई
प्रीत कि करके बतिया छोडो, हटो

सुरज दिन के, रात के चंदा
डालो ना मोपे, किरनोंका फ़ंदा
झुमत घुमत मोरे द्वारे दिना

चित्रपट > झनक झनक पायल बाजे
गायिका > लता
संगीत > वसंत देसाई
कलाकार > संध्या आणि गोपीकृष्ण
राग > देस

या गाण्यात लताने अप्रतिम कारागिरी केली आहे, खास करुन समारोप करताना. एखादी ठुमरी गावी तशा हरकती आणि मुरक्या आहेत. ( ऐकले नसेल तर जरुर ऐका. )
राग आहे देस / देश- या रागाचे उदाहरण म्हणून हे गाणे संगीत सरीता मधे नेहमी लावत ( मामी परदेशी / मयेकर देशात. असा संदर्भ )

सैंया या शब्दावरुन, गेल्या भागात जिप्स्याने खुप छळले होते. ( हम ख्यून का बदला ख्यून से लेते है )
चित्रपटात, संध्या, गोपीकृष्णला जेवायला वाढताना हे गाणे आहे. जेवणात जिलेबी, म्हैसूर असे पदार्थ आहेत. ( हा जेवणाचा आणि गोडाधोडाचा संदर्भ ) जोधा अकबर मधेही असा प्रसंग आहे. ( ती वाढत नाही ) असेच एक
म्हणजे जेवायला वाढतानाचे / भरवतानाचे गाणे मौशुमी आणि जितेंद्रचे पण आहे. बाकी चित्रपटात गाजर का हलवा / बादाम कि खीर.. असे प्रसंग असतातच. पण या प्रसंगातली गाणी आठवत नाहीत.
( सैंया आणि देस राग या संदर्भाने शोधले असते, तरी नक्कीच सापडले असते. )

वेल घेतली, म्हणून वेलीचे नाव आलेच पाहिजे असे नव्हते. पण सूरज / चंदा हा संदर्भ होताच.
गोपीकृष्णने नंतर नायकाची भुमिका केल्याचे आठवत नाही. दोघांनी एकत्र तर नाहीच नाही. गोपीकृष्ण मला
वाटतं पडद्यावर शेवटचे, रझिया सुलतान मधे दिसले ( शुभ घडी आयो रे गाण्यात. गायक - बेगम परवीन
सुलताना आणि दिलशाद हुसेन )

या चित्रपटाने ( झनक झनक पायल बाजे ) तिकिटबारीवर यश मिळवले होते.

हुश्श !

०५/०१०

'काय ग? लग्नाची तारीख ठरली का तुमच्या?' मिथिलाला तिची मैत्रिण विचारत होती. पण मिथिलाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर मागच्याच आठ्वड्यात घडलेला प्रसंग तरळत होता.

'मिथिला, मी तुझं लग्न ठरवलंय' ती कॉलेजातून आल्या आल्या तिच्या बाबांनी जाहिर केलं.
'लग्न? मला न विचारता? बाबा, मला एव्हढ्यात लग्न करायचंच नाहिये'
'तुझं मत विचारलं का मी? ग्रॅज्युएट होतेयस ना पुढच्या महिन्यात? बस झालं एव्हढं शिक्षण'
'मी विचारू शकते का बाबा की माझा होणारा नवरा कोण आहे?' मिथिलाच्या शब्दांत आता कडवटपणा होता.
'शहरातले प्रसिध्द उद्योगपती आबासाहेब कानविंदेंचा एकुलता एक मुलगा मुकुंद कानविंदे. चांगला शिकलेला आहे. दिसायला चांगला आहे. निर्व्यसनी आणि सुस्वभावी आहे'
'पण माझं त्याच्यावर प्रेम नाही....' ओठांशी आलेले शब्द मिथिलाने गिळून टाकले. बाबांना हे सांगून काही फायदा नव्हता.

पण तिचं तिलाच माहित नव्हतं की ती तिचं कोणावर प्रेम आहे. एकीकडे तिला तुषार उपाध्यायचा बिनधास्त स्वभाव आवडायचा तर दुसरीकडे यश एकबोटेचा विचारीपणा. आणि विरेन ऑबेरॉयच्या वागण्यातून अलिकडे तिला हेही जाणवू लागलं होतं की त्याला ती आवडतेय.

मिथिला आपल्या मैत्रिणीकडे वळली. मनातला प्रश्न तिने विचारला. ओळखा तिचं गाणं.

दिनेशदा... Sad हे गाणं माहित नव्हतं. माहित असतं तरी संबंध लावताच आला नसता.

कळीचा, वेलीचा काहीच संबंध नव्हता. पण त्यासाठी जस्मिन कुळातील आणि शशांक शांकलीचा प्रयोग,वेलीचा संकर,... नविन विविधरंगी फुल असं कित्ती फिरवुन आणलत.
शेवटचा पॅराग्राफच महत्वाचा होता म्हणजे. Sad

http://www.youtube.com/watch?v=tnMN7azLwrg

आर्या, इथे आहे हे गाणे, ( बघण्यासारखे नाही Happy पण ऐकण्यासारखे नक्कीच आहे Happy )

कोड्यापेक्षा क्लू महत्वाचे होते.

ती शांताराम बापूंची नक्कल करतेय. आधी ते करुन दाखवत आणि कलाकारांनी तसेच करायचे, असा आग्रह धरत.
माझी आई म्हणते, ती आणि शम्मी कपूर एकत्र यायला हवे होते !

<<ती आणि शम्मी कपूर एकत्र यायला हवे होते<<< Lol
हाहा...चित्रपटसृष्टीचा इतिहास बदलला असता मग! Proud

कोडं अ आणि अ होतं. संध्याबाईंचं हे कोड्यातलं गाणं, पाहिल्याचं आठवत नाही. मात्र ऐकलंय. अशाच प्रसंगावर संध्याबाईंचंच आणखी एक गाणं आहे.
http://www.youtube.com/watch?v=X8Ky3pUpzZk मस्ट वॉच. Lol

बरं, संध्याबाईंचा एकतरी हिरो रिपीट झाला आहे का?

भरतजी.... Rofl
अशी प्रत्येक गृहिणी सगळी कामं करतांना नृत्य करेल तर काय धम्माल!! Lol

तो जेवायला बोलावण्याचा आणी पदराने वारा घालण्याचा प्रसंग उच्च कोटीतला आहे. :हहपुवा:

अशी प्रत्येक गृहिणी सगळी कामं करतांना नृत्य करेल तर काय धम्माल!! >>>>>>>>>>>आर्ये, त्या संध्याच्या ठिकाणी मी तुला बघत होते. Rofl Rofl Rofl

Pages