..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या / शोभा, असे काय करता ? ती त्याच्या स्वप्नातली प्रतिमा ( मोहिनी ) असते. प्रत्यक्षातली जमुना वेगळीच असते. कधी नव्हे तो संध्याने, त्या भुमिकेत नैसर्गिक अभिनय केलाय.

दिनेशदा...संध्याचं नृत्यकौशल्य अप्रतिम आहे यात शंका नाही. पण हे हेटाळणीचं हसु नव्हतं हो.
अशा सिच्युएशनला एकही गाणं नाहीये कुठल्या सिनेमात आतापर्यंत.
पुर्ण गाण्यात तिच्या नृत्यावरच डोळे खिळुन रहातात. ज्या नजाकतीने ती प्रत्येक दृश्यात घरातलं काम करते ते वादातीत आहे.
पण तेच आताच्या सिच्युएशनला बसवलं असतं तर या कल्पनेने हसु आले होते. Happy

दिनेशदा... अरेरे हे गाणं माहित नव्हतं. माहित असतं तरी संबंध लावताच आला नसता. >>>>अगदी अगदी Happy

ख्युन का बदल ख्युन >>>>:हहगलो:

अशी प्रत्येक गृहिणी सगळी कामं करतांना नृत्य करेल तर काय धम्माल!!>>>>:फिदी:

आता कळलं, मला माहीत नसलेल्या गाण्यांवरची कोडी वाचून मला किती यातना होत असतील ते ?
आता सांगायला हरकत नाही, मी त्याच चित्रपटातल्या,

कैसी ये मुहोब्बतकी सजा हाय दी है किसीने
दुनियाही मेरे दिलकी, मिटा दी है किसीने.... या गाण्यावर HIV चे कोडे रचणार होतो. पण माझे मलाच ते क्रूर वाटले.

रच्याकने हे पण गाणे बघाच. नाच कसा असू नये, याचे चित्रपटातले उदाहरण म्हणून हे गाणे आहे.
http://www.youtube.com/watch?v=EPoJDWtzQKU

त्या गाण्याला गोपीकृष्णचा गुरु "चीप" वगैरे म्हणतो आणि मग गोपीकृष्णचे जोरकस कथ्थक आहे.

यातले एकही कोडे सोडवता न येणारे शेवटी कोडी घालू लागले तर चालेल का?
बाकी गाण्यांच्या अवतीभोवती रचलेल्या कथांचं ललितसाहित्य भन्नाट्च Happy

यातले एकही कोडे सोडवता न येणारे शेवटी कोडी घालू लागले तर चालेल का?>>>>>भारतीताई, येऊ द्या कोडी Happy

दिनेशदा, मला गाणं माहिती आहे, खुप आवडतही पण.....त्या कोड्याशी संबंध काही जोडता आला नाही......आणि मला बरीच गाणी ऐकून माहिती आहेत पण त्याच चित्रिकरण कसं आहे ते माहिती नाही. असो.....

मी परवा २ शब्दकोडी घातली आहेत. १-२ सोपी चित्रकोडी मनात आहेत. ती घालू का शब्दकोडी सोडवून होईपर्यंत थांबू?

श्रध्दा,

१. ०५/००९ आणि ०५/०१० ची गाणी एकाच पुरुष गायकाने गायली आहेत.
२. ०५/००९ ड्युएट तर ०५/०१० सोलो आहे.
३. ०५/०१० च्या चित्रपटात हिन्दी चित्रपटसृष्टीतल्या प्रसिध्द घराण्यातल्या २ व्यक्तींनी काम केलं आहे.

०५/०१०

'काय ग? लग्नाची तारीख ठरली का तुमच्या?' मिथिलाला तिची मैत्रिण विचारत होती. पण मिथिलाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर मागच्याच आठ्वड्यात घडलेला प्रसंग तरळत होता.

'मिथिला, मी तुझं लग्न ठरवलंय' ती कॉलेजातून आल्या आल्या तिच्या बाबांनी जाहिर केलं.
'लग्न? मला न विचारता? बाबा, मला एव्हढ्यात लग्न करायचंच नाहिये'
'तुझं मत विचारलं का मी? ग्रॅज्युएट होतेयस ना पुढच्या महिन्यात? बस झालं एव्हढं शिक्षण'
'मी विचारू शकते का बाबा की माझा होणारा नवरा कोण आहे?' मिथिलाच्या शब्दांत आता कडवटपणा होता.
'शहरातले प्रसिध्द उद्योगपती आबासाहेब कानविंदेंचा एकुलता एक मुलगा मुकुंद कानविंदे. चांगला शिकलेला आहे. दिसायला चांगला आहे. निर्व्यसनी आणि सुस्वभावी आहे'
'पण माझं त्याच्यावर प्रेम नाही....' ओठांशी आलेले शब्द मिथिलाने गिळून टाकले. बाबांना हे सांगून काही फायदा नव्हता.

पण तिचं तिलाच माहित नव्हतं की ती तिचं कोणावर प्रेम आहे. एकीकडे तिला तुषार उपाध्यायचा बिनधास्त स्वभाव आवडायचा तर दुसरीकडे यश एकबोटेचा विचारीपणा. आणि विरेन ऑबेरॉयच्या वागण्यातून अलिकडे तिला हेही जाणवू लागलं होतं की त्याला ती आवडतेय.

मिथिला आपल्या मैत्रिणीकडे वळली. मनातला प्रश्न तिने विचारला. ओळखा तिचं गाणं.

उत्तरः
किसको प्यार करूं, कैसे प्यार करूं
तू भी है, येभी है, वोभी है

किस = मुकुंद कानविंदे = मुका
तुषार उपाध्याय = तु
यश एकबोटे = ये
विरेन ऑबेरॉय = वो

धन्स जिप्सी.
०५/ ११ (अजून थोडे संपादित,लोक्स्,पुनः प्रयत्न करा Happy )

मारवाड्याचा भंवरलाल अन कुलकर्ण्यांची कमलिनी एकाच लॉ कॉलेजात शिकत होते. दोघांमध्ये विरोधभक्ती होती. कमलिनीला लग्न जमेपर्यंत शिकायची सक्ती होती.भंवरलालसाठी वकिली न जमली तर चहागल्लीतली वडिलांच्या दुकानाची गादी आरक्षित होती.
कमलला सौंदर्यप्रसाधनांची एजन्सी घेऊन माल खपवावा,थोडे पैसे मिळवावेसे वाटू लागले.भंवरलालच्या दुकानात छोटासा स्टॉक ठेवावा, गुपचूप जमेल तसा विकावा असे तिने भंवरलालला बोलून दाखवले.

त्यानेही चहागल्लीत सहज फेर्‍या टाकून आयलायनर लिपस्टिकची पार्सले घेऊन जात जा अशी प्रतिऑफर दिली.''अग ए आयलायनरवाली ! काळा बुरखा घालून ये हवे तर! '' असा विनोदही केला.
''मेल्या मारवाडी तू.माझ्या मालातलाही थोडा चोरून विकशील. तुझ्यावर भरवसा कुणी ठेवावा !'' असा प्रति-टोला हसत हसत कमलिनीने दिला.

ते दोघेही वरील संवाद गाण्यात कसे व्यक्त करतील ?

नाही स्निग्धा.
क्लू १- हे संवादस्वरुपातलं युगुलगीत आहे. फार गोड आहे ग गाणं. हलकंफुलकं.
माधव,
क्लू २- सर्व कलाकार सुमार,एका अभिनेत्रीचा अपवाद वगळता.चित्रपटही.
क्लू ३-संगीतकारांच्या नावावर काही फार सुंदर रचना १९६०-८० च्या दशकांमध्ये असूनही तुलनेने नाव कमीच घेतले जाते.

माधव, त्या गाण्यात एका शब्दावर शब्दच्छल आहे. हे गाणं हिन्दी चित्रपटसृष्टीतल्या प्रसिध्द घराण्यातली एक व्यक्ती आणि एक सौंदर्यखणी ह्यांच्यावर चित्रित आहे.

०५/००९>>>

आई ग आई ग ..आईग ये क्या हो गया
मै सोचतीथी तुम्हे कभी देखु भी नही
पर क्या करु ये दिल फिदा हो गया...

शम्मि + मधुबला

नाही मोकीमी

०५/००९

'सरिता? सरिता देसाई ना तू?' रस्त्यात थांबून दिनकररावांनी विचारलं.
'दिन्या? अरे, किती वर्षांनी भेटतोयस?' सरिता म्हणाली. 'आणि माझं आडनाव आता कामत आहे बरं का'
'माहित आहे मला. पण तरी जुन्या नावानेच हाक मारली.' दिनकररावांच्या स्वरात खिन्नता होती.
'जाऊ दे रे दिन्या. तू कधी लग्न केलंस?'
'तुझ्या लग्नानंतर ५ वर्षांनी' दिनकरराव अजूनही उदास होतेस.
'अरे, मग आता आजोबाही झाला असशील.' सरिता म्हणाली. दोघे जुन्या गप्पात रंगले.
'इथे कशी?' दिनकररावांनी विचारलं.
'अरे, मिस्टरांची इथे बदली झाली आहे. भाड्याचं घर शोधतोय.'
'असं होय. अग मग माझ्या सुनेने आणि मुलाने इन्व्हेस्टमेन्ट म्हणून २ घरं घेतली आहेत ह्या शहरात. सुनेचं घर आहे हिन्जवडीला. आणि मुलाचं पाषाणला. दोन्ही पहाणार का? दोन्ही घरांसाठी भाडेकरू शोधतोय.'
'हिन्जवडीचं बघू यात का?मिस्टरांना ऑफिस जवळ पडेल तिथून.' सरिता म्हणाली.

घर बघून ती फार खूश झाली. चांगलं २ बेडरूम्चं प्रशस्त घर, मार्बल फ्लोअरिंग, मॉड्युलर किचन.
'काय? आवडलं का घर?' दिनकररावांनी विचारलं.

मिश्किल हसत सरिताने उत्तर दिलं एका जुन्या हिंदी गाण्याच्या रुपात. ओळखा ते गाणं.

उत्तरः

हिरविनः
तेरे दिलका मकान सैय्या बडा आलिशान
बोलो बोलो मेरी जान है किराया कितना

हिरो:
खाली दिलका मकान बनके आजा मेहमान
ये ना पुछो मेरी जान है किराया कितना

दिल = daughter-in-law = सून

चित्रपट: दो उस्ताद (१९५९). पडद्यावर राज कपूर आणि मधुबाला
इथे पहाता येईल.

फुस्स्स्स्स्स!!!

फुगा फुटला.... बुरा ना मानो होली है...

सगळ्या गाणे बहद्दरांना होळीच्या शुभेच्छा !!!! पाणी वापरु नका... चांगले रंग वापरा... प्रत्यक्षात रंग दाखवण्या पेक्षा माबो वर नवी नवी गाणी ओळखुन आपले रंग दाखवा !!!

Pages