आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
०५/११ लोक्स,नाही कळलं का
०५/११ लोक्स,नाही कळलं का कुणालाच ?
>>मारवाड्याचा भंवरलाल अन कुलकर्ण्यांची कमलिनी एकाच लॉ कॉलेजात शिकत होते. दोघांमध्ये विरोधभक्ती होती. कमलिनीला लग्न जमेपर्यंत शिकायची सक्ती होती.भंवरलालसाठी वकिली न जमली तर चहागल्लीतली वडिलांच्या दुकानाची गादी आरक्षित होती.
कमलला सौंदर्यप्रसाधनांची एजन्सी घेऊन माल खपवावा,थोडे पैसे मिळवावेसे वाटू लागले.भंवरलालच्या दुकानात छोटासा स्टॉक ठेवावा, गुपचूप जमेल तसा विकावा असे तिने भंवरलालला बोलून दाखवले.
त्यानेही चहागल्लीत सहज फेर्या टाकून आयलायनर लिपस्टिकची पार्सले घेऊन जात जा अशी प्रतिऑफर दिली.''अग ए आयलायनरवाली ! काळा बुरखा घालून ये हवे तर! '' असा विनोदही केला.
''मेल्या मारवाडी तू.माझ्या मालातलाही थोडा चोरून विकशील. तुझ्यावर भरवसा कुणी ठेवावा !'' असा प्रति-टोला हसत हसत कमलिनीने दिला.>>
ते दोघेही वरील संवाद गाण्यात कसे व्यक्त करतील ?
उत्तर-
)
तो- कभी चली आ आशिकोंकी गली ( आशिकोंकी गली- चहा (मराठी चाहणे) गल्ली
तू चुनर लेके काली अरी ओ काजलवाली (काली चुनर- काळा बुरखा ,काजल= आयलायनर )
ती-तू हैं भंवरा मैं हूं नाजुक कली (भंवरा- भंवरलाल, नाजुक कली- कमलिनी )
चुरा लेगा तू बैरी मेरे होठोंकी लाली ( लाली- लिप्स्टिक)
https://www.youtube.com/watch?v=olsKtFY5dd8
चित्रपट अभी तो जी ले (१९७७) ज्यात फक्त जया भादुरी हे एकच उल्लेखनीय नाव आहे कलाकारांमध्ये..
आशा किशोरदांचे हे गोड युगुलगीत, शब्द नक्श लायलपुरींचे, संगीत सपन जगमोहन यांचे.
भारती, गाणे ऐकलेले नाही,
भारती, गाणे ऐकलेले नाही, चित्रपट माहीत नाही.
भारतीताई, या चित्रपटातील " तू
भारतीताई, या चित्रपटातील " तू लाली है सवेरे वाली गगन रंग दे तु मेरे मन का" हे एकच गाणं (किशोर/आशा) माहिती होतं.
०५/१९
०५/१९
अमिताभ - मौशमीचा चित्रपट :
अमिताभ - मौशमीचा चित्रपट : मंजिल
मै हू झुमझुम झुमझुम झुमरू
मै हू झुमझुम झुमझुम झुमरू का?
त्यात 'मंजिल पे मेरी नजर..' वगैरे आहे.
भरत, मंझिल बरोबर श्रद्धा,
भरत, मंझिल बरोबर

श्रद्धा, नाही
०५/१९: क्लु: १. हिंदी
०५/१९:
क्लु:



१. हिंदी चित्रपटातील गाणे
२. गायिका लता मंगेशकर
३. चित्रपटात नायिकेवर चित्रित
४. पण पडद्यावर नायिका गात नाही
५. एक चित्र नीट पहा. उत्तर त्यातच दडलंय.
पाच घसघशीत क्लु दिलेत. चला पटापट ओळखा.
१,२,३ काय घसघशीत क्लू आहेत?
१,२,३ काय घसघशीत क्लू आहेत? त्यात बसणारी हजारांनी सापडतील गाणी...
श्रद्धा अजुन एक क्लु: या
श्रद्धा
अजुन एक क्लु: या गाण्यात नायिकेच्या कपाळावर पांढरी पट्टी आहे.

'बहारों की
'बहारों की मंझिल'मधलं
'निगाहें क्यूं भटकती है, कदम क्यूं डगमगाते है' हे का? पुढच्या ओळी आठवत नाहीत. शेवटी काहीतरी 'चले आओ, चले आओ' असं आहे.
कपाळाला पांढरी पट्टी म्हटल्यावर आधी मीनाकुमारीच आठवली. मग हा सिनेमा. (रहस्यमय सिनेमा असल्याने हा चांगलाच लक्षात आहे.)
सह्हिए श्रद्धा निगाहें क्यूं
सह्हिए श्रद्धा
निगाहें क्यूं भटकती है, कदम क्यूं डगमगाते है
हमी तक है हर इक मंझिल
चले आओ, चले आओ....चले आओ
सहाव्या क्लु नंतर गाणं ओळखल्या बद्दल नो बक्षिस

सहावा कसला? जेमतेम दुसरातिसरा
सहावा कसला? जेमतेम दुसरातिसरा क्लू आहे तो! आधीच्या क्लूंना काही अर्थ नाही. बक्षीस आण चल.
ते तू 'भटकंती' नाही, 'भटकती' लिहिलं आहेस हे मला गाणं आठवल्यावर लक्षात आलं. ओळखीचा शब्द दिसला की आपण सरावाने सहसा वाचून टाकतो, पण त्यात काही छोटे बदल असतील तर लक्ष देत नाही, त्याचा परिणाम!
श्रद्धा, तुमच्या चरणकमलांचे
श्रद्धा, तुमच्या चरणकमलांचे प्रकाशचित्र टाका.
हे गाणं मी कधी ऐकलेलं सुद्धा नाही.
बक्षीस आण चल.>>>ओक्के तुला
बक्षीस आण चल.>>>ओक्के
तुला थंडगार मटका कुल्फी 
ते तू 'भटकंती' नाही, 'भटकती' लिहिलं आहेस हे मला गाणं आठवल्यावर लक्षात आलं. ओळखीचा शब्द दिसला की आपण सरावाने सहसा वाचून टाकतो, पण त्यात काही छोटे बदल असतील तर लक्ष देत नाही, त्याचा परिणाम!>>>>अगदी अगदी. तो पाचवा क्लु त्यासाठीच होता.

हे गाणं मी कधी ऐकलेलं सुद्धा
हे गाणं मी कधी ऐकलेलं सुद्धा नाही.>>>>>भरत, खुप सुंदर गाणं आहे. नक्की ऐका.
वरच्या गाण्यावरून मला 'निकले
वरच्या गाण्यावरून मला 'निकले थे कहां जाने के लिए पहुंचे हैं कहां मालूम नहीं-
अब अपने भटकते कदमों को मंजिल के निशां मालूम नही' हे गाणं आठवलं.
हो आत्ता ऐकलं, यू ट्यूबवर
हो आत्ता ऐकलं, यू ट्यूबवर लताचा फोटुच आहे फक्त.
हो आत्ता ऐकलं, यू ट्यूबवर
हो आत्ता ऐकलं, यू ट्यूबवर लताचा फोटुच आहे फक्त.>>>>>आहे आहे, मूळ गाणंही आहे युट्युबवर. मीनाकुमारीवर चित्रित झालेलं.
धन्यवाद जिप्सी. भरत,
धन्यवाद जिप्सी.
भरत, यूट्यूबवर आहे. चांगलं आहे गाणं. मला ते मुळात सिनेम्यामुळे लक्षात आहे. मीनाकुमारीच्या मुलीची काहीतरी वाढदिवसाची पार्टी असते आणि ती चक्कर येऊन पडते की काहीतरी. मग ती उठते आणि आपली ओळख वेगळीच सांगते. तिच्यामते तिचा नवरा तिच्या बहिणीचा नवरा असतो आणि ती मुलगीही बहिणीची वगैरे. अर्थातच तिच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. धर्मेंद्र मात्र तिला मदत करत असतो, असं कथानक आहे. तिचा नवरा म्हणून तो रेहमान नावाचा नट आहे.
या सिनेमाचं नाव 'बहारों की मंझिल' का आहे, हे माझ्यासाठी अजूनही रहस्यच आहे.
मी हा चित्रपट पाहिला नाही, पण
मी हा चित्रपट पाहिला नाही, पण गाणं आवडीचं आहे.

रविवारी सकाळी दूरदर्शनवर रंगोलीवर (हो मी अजुनही जर सकाळी लवकर उठलो तर रंगोली बघतोच :फिदी:) मीनाकुमारीची गाणी दाखवली. त्यात हे गाणं होतं.
जिप्सी, मग पिक्चरपण पहा.
जिप्सी, मग पिक्चरपण पहा. चांगला आहे एकदा पहायला.
काल मीनाकुमारीचा स्मृतिदिन
काल मीनाकुमारीचा स्मृतिदिन होता.
नक्कीच काल मीनाकुमारीचा
नक्कीच
काल मीनाकुमारीचा स्मृतिदिन होता.>>>>ओक्के, म्हणुन रंगोलीमध्ये मीनाकुमारीची गाणी होती तर.
सिनेमात धर्मेंद्रचं नाव राजेश
सिनेमात धर्मेंद्रचं नाव राजेश खन्ना आहे (विकि)म्हणे!
रविवारी सकाळी दूरदर्शनवर
रविवारी सकाळी दूरदर्शनवर रंगोलीवर (हो मी अजुनही जर सकाळी लवकर उठलो तर रंगोली बघतोच ) >>>>> माझा नवरा रंगोलीसाठी रविवारीसुध्दा लवकर उठतो
काय कस्काय लोक्स???? जोरात
काय कस्काय लोक्स???? जोरात चाल्लीये गाडी.
राजेश खन्ना स्निग्धा,
राजेश खन्ना

स्निग्धा,
मामी, येलकम ब्यॅक
०५/०२० श्रीपाद आणि देवकी
०५/०२० श्रीपाद आणि देवकी काळेंच्या मुलाचं लग्न महत्प्रयासानं झालं. करियरच्या मागे लागलेल्या घनश्यामला वधुसंशोधन, लग्न, इ.साठी वेळच नव्हता (म्हणे). लग्न तर झालं. पण त्याच्या दोन काका-काकूंनी भेट म्हणून दिलेली केरळची मधुचंद्र ट्रिप काही त्याच्या नशिबात नव्हती. ऐनवेळी त्याचा कसलातरी प्रोजेक्ट उपटला. मग त्याच तिकिटांवर श्रीपाद आणि देवकी आरोग्य-पर्यटनासाठी गेले. एका आधुनिक निसर्गोपचार केंद्रात श्रीपादराव आपल्या हृदयविकारावर उपचार करून घेण्यासाठी दाखल झाले. देवकीबाईंना प्रकृतीची कोणतीही समस्या नव्हती. त्यांनी त्याच केंद्रातली नखशिखान्त-सौंदर्यवर्धन-उपचारमालिका आजमावायची ठरवली.
रंगीत पडदे, रंगीत दिवे यांद्वारे तिथे रंगोपचारही केले जात. केंद्रातील कडक नियमांमुळे दोघांनाही वेगवेगळ्या कुटिरांत राहावे लागत होते.
भ्रमणध्वनीही दिवसात दहा मिनिटांपेक्षा जास्त वापरता येत नसे. तो हाती आला की श्रीपाद आणि देवकी एकमेकांशीच बोलत. श्रीपादराव तेव्हा कोणते गाणे म्हणत असतील?
>>काल मीनाकुमारीचा स्मृतिदिन
>>काल मीनाकुमारीचा स्मृतिदिन होता
काल न्यूज २४ वर 'पचास अनसुनी कहानिया' तिच्यावर होता.
Pages