..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

०५/०२६:

इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणार्‍या एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने इनसाईडर ट्रेडिंग केल्याचं उघडकीस आलं. बराच गदारोळ झाला. कंपनीचे शेअर्सचे भाव खाली येऊ लागले. ह्या प्रकरणाची चौकशी सुरु होताच कंपनीने त्या अधिकार्‍याला बडतर्फ केलं - त्याची अनेक वर्षांची उत्तम सर्व्हिस असताना. आपल्या गुन्ह्याची कबूली देत त्या अधिकार्‍याने कंपनीची जाहिर माफी मागितली. हेच त्याला एक जुनं हिंदी गाणं म्हणून करता आलं असतं. ओळखा ते गाणं.

०५/२६:
अच्छा कहो, चाहे बुरा कहो
झूठा कहो, चाहे सच्चा कहो
हमको सब कबूल..
हमसे भूल हो गई, हमका माफी दई दो..

०५/०२७:

चित्रा गेले काही दिवस अगदी बेचैन होती. तिला अजिबात बरं वाटत नव्हतं. सकाळी उठल्यावर अगदी अस्वस्थ वाटायचं. दिवस जाईल तसतशी बेचैनी वाढायची. आणि संध्याकाळनंतर तर सारखी हुरहुर लागायची. सगळ्या फिजिकल तपासण्या झाल्या पण काही निष्पन्न होईना. तिचा नवरा चिन्मय प्रतिथयश मानसोपचारतज्ञ. त्याच्या सल्ल्यावरून तिने त्याही चाचण्या केल्या. पण कसलंच निदान होईना.

एके दिवशी संध्याकाळी चिन्मय घरी आला तेव्हा चित्रा उदास होऊन खिडकीजवळ बसलेली होती. त्याला कसंतरीच झालं. बायकोला नक्की होतंय काय ह्याचं निदान न झाल्याने तोही तसा अस्वस्थच होता. 'नको काळजी करू चित्रा. सगळं ठीक होईल' असं तो म्हणाला खरा. पण त्याच्या आवाजात विश्वास नव्हता. चित्राने त्याच्याकडे पाहिलं आणि एकच प्रश्न विचारला. ओळखा ते गाणं.

०५/०२८:

अतिशय नावाजलेल्या बिझनेस स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन मिळाल्याने अक्षय अगदी खूश होता. मन लावून अभ्यास करून चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवायची असं त्याने ठरवलं होतं. पण पहिल्याच दिवशी त्याच्या ह्या बेताला सुरुंग लागला. त्याची स्वप्नाशी ओळख झाली. ही वर्षभर आपल्या वर्गात असताना आपला अभ्यास होणार कसा ह्याची त्याला काळजी वाटू लागली. पहिल्या सेमिस्टरमध्ये कॉमन विषय असल्याने दोघे एकाच डिव्हिजन मध्ये होते. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. अक्षयला ती फार आवडू लागली. आणि त्याच्या नशिबाने नेमकी पेंड खाल्ली. तिसर्या सेमिस्टरपासून दोघांचे विषय वेगळे झाले. आणि त्याबरोबरच डिव्हिजनसुद्धा. अक्षयला ए डिव्हिजन मिळाली तर तिला मिळाली बी. अक्षय कोणतं गाणं म्हणून आपली अवस्था सांगेल?

०५/२८:
मेरा सुंदर सपना (स्वप्ना) 'बी'त गया..

२६मध्ये इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या नावावरून काही आहे का?

येस्स श्रध्दा....:-)

०५/०२८:

अतिशय नावाजलेल्या बिझनेस स्कूलमध्ये अ‍ॅडमिशन मिळाल्याने अक्षय अगदी खूश होता. मन लावून अभ्यास करून चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवायची असं त्याने ठरवलं होतं. पण पहिल्याच दिवशी त्याच्या ह्या बेताला सुरुंग लागला. त्याची स्वप्नाशी ओळख झाली. ही वर्षभर आपल्या वर्गात असताना आपला अभ्यास होणार कसा ह्याची त्याला काळजी वाटू लागली. पहिल्या सेमिस्टरमध्ये कॉमन विषय असल्याने दोघे एकाच डिव्हिजन मध्ये होते. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. अक्षयला ती फार आवडू लागली. आणि त्याच्या नशिबाने नेमकी पेंड खाल्ली. तिसर्या सेमिस्टरपासून दोघांचे विषय वेगळे झाले. आणि त्याबरोबरच डिव्हिजनसुद्धा. अक्षयला ए डिव्हिजन मिळाली तर तिला मिळाली बी. अक्षय कोणतं गाणं म्हणून आपली अवस्था सांगेल?

उत्तरः
मेरा सुंदर सपना 'बी'त गया

>>२६मध्ये इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या नावावरून काही आहे का?

येस्स...आता सोपं आहे. सांग बघू पटकन

येस्स...आता सोपं आहे. सांग बघू पटकन
<<<< तेवढं त्या कंपनीचं नाव सांगून टाक बघू. Wink लगेच गाणं लिहिते.

जिप्सी बरोबर Happy

०५/०२६:

इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणार्‍या एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने इनसाईडर ट्रेडिंग केल्याचं उघडकीस आलं. बराच गदारोळ झाला. कंपनीचे शेअर्सचे भाव खाली येऊ लागले. ह्या प्रकरणाची चौकशी सुरु होताच कंपनीने त्या अधिकार्‍याला बडतर्फ केलं - त्याची अनेक वर्षांची उत्तम सर्व्हिस असताना. आपल्या गुन्ह्याची कबूली देत त्या अधिकार्‍याने कंपनीची जाहिर माफी मागितली. हेच त्याला एक जुनं हिंदी गाणं म्हणून करता आलं असतं. ओळखा ते गाणं.

उत्तरः
मेरी सोनी मेरी तमन्ना झूठ नही है मेरा प्यार
दिवाने से हो गयी गलती जाने दो यार

एवढे बाफ झाल्यानंतर माझ्याकडून आज हे पहिलंच कोडं. (मला नीट कोडी रचता येत नाहीत. सोप्पंच आहे.)

०५/२९:
'दो दूनी चार' सिनेम्यातले मि. दुग्गल आणि त्यांची मुलगी पायल यांचं भांडण चालू होतं. पायलला मैत्रिणीचं पाहून कॉल सेंटर जॉइन करून कमावतं व्हावं, असं वाटत होतं. त्याउलट मि. दुग्गलांना कॉल सेंटर अजिबातच पटत नव्हतं. रात्रीबेरात्रीच्या शिफ्ट असलेली जीवनशैली, काही कॉलसेंटरांच्या ड्रायव्हरांनी केलेले गुन्हे, वगैरे बाबींमुळे त्यांना त्या गोष्टीची चीडच होती. एकदा या नोकरीच्या मोहात अडकली की पायल एमबीए वगैरे उच्चशिक्षण घेणार नाही, तिचं करीयर भरकटेल, वगैरे चिंताही त्यांना वाटत होती. पण पायल हटून बसली होती. झटपट इंटरव्ह्यू नि लगेच ऑफर लेटर आणि भलाभक्कम पगार हे सगळं तिला खुणावत होतं. शेवटी एका रात्री गाडी काढून बापलेक निघाले. एका कॉलसेंटरापाशी आले. शिफ्ट सुरू व्हायची होती, त्यामुळे ठिकठिकाणी जमून तरुण मुलामुलींचे घोळके मजेत खातपीत होते, हास्यविनोद करत होते. 'पहा, किती मजा चालली आहे ती. तुम्ही उगीचच विरोध करताय' पायल म्हणाली. तिला आपला मुद्दा समजावायला मि. दुग्गलांनी कोणतं गाणं म्हटलं असेल?

१. मि. दुग्गलांचं कॉलसेंटरांबद्दल असलेलं मत ध्यानात घेता ते पायलला कॉलसेंटरांची त्यांच्यामते असलेली वस्तुस्थिती कशी समजावून सांगतील?
२. गाणं जुनं नाही.

नसली तरी काही फरक पडणार नाही. ते फक्त कोडं रचण्यासाठी घेतलंय. त्यांना कॉलसेंटरं आवडत नाहीत, एवढाच मुख्य मुद्दा आहे.

Pages