..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सह्हिए मीरा Happy उत्तर ओळखल्याबद्दल दोन ग्लास थंडगार पियुष Happy

०५/०२३:
अबके ना सावन बरसे
अबके बरस तो
बरसेंगी अखियां...

कुठे गेले सगळे?
क्लु :
हिंदी चित्रपटांतले दोन सर्वात सुंदर चेहरे असलेलं गाणं
अमराठी गायकाने गायलेले मराठी गाणं.

०५/०२५>>

एक राधा एक मीरा
दोनो ने शाम को चाहा
अंतर क्या दोनो की चाह मे बोलो...

नाहीतर

सांवरे की बन्सी पुकारे राधा नाम
लोग करे मीरा को युंही बदनाम

शके १९३४ संपायच्या आत गाणी ओळखणार्‍यांस एकेक वाडगा आम्रखंड दिले जाईल.
तारकर्लीला कशासाठी जातात? कासला कशासाठी जातात? फोटो कशाचे काढतात? ते कुठे असते? (एक प्रसिद्ध इंग्रजी वाक्य)

जर गाणं ओळखलं नाही तर खरे तर मी जिंकेन. तरीही मला बरं बुवा मी हरलो असे म्हणावे लागेल. हे वाक्यही क्लु असू शकतो.

जर गाणं ओळखलं नाही तर खरे तर मी जिंकेन. तरीही मला बरं बुवा मी हरलो असे म्हणावे लागेल. हे वाक्यही क्लु असू शकतो.
<<<< हा हिंदी गाण्याचा क्लू आहे का? २५साठी?
अच्छाजी(यावर शब्दच्छलही होऊ शकतो, अच्छा आजी असा. पहिल्या वाक्यात चौथ्या पिढीची चाहूल असा उल्लेख आहे) मै हारी चलो मान जाओ ना..
देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना.. (हे शोभाबाई नक्कीच म्हणू शकतील)

किंवा मग
दादीअम्मा दादीअम्मा मान जाओ असेल.

तारकर्लीला कशासाठी जातात? कासला कशासाठी जातात? फोटो कशाचे काढतात? ते कुठे असते? (एक प्रसिद्ध इंग्रजी वाक्य)<~<<
हे वाक्य 'beauty lies in the eyes of beholder' असणार. गाणं आठवावं लागेल याला फिट बसणारं.

श्रद्धा, आम्रखंडाचा एक वाडगा तुमचा झालेला आहे.दुसरा वाडगाही तुमच्या आवाक्यात आहे. दुसरं गाणं मराठी. पहिल्या दोन प्रश्नांची उत्तर शोधा.गायक महेंद्र कपूर नाही.

मी जलवंती मी फुलवंती, तुझी नजर लागंल मला
काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात जाईजुईच्या फुला रं ??
(गायक शैलेन्द्र सिंग ??? )

०५/०२४ : मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पा वाचून उषाताईंना निसर्गपर्यटनाची हुक्की आली. त्यांनी तारकर्ली आणि त्यानंतर कासचे पठार अशा दोन ट्रिप्स लगोलग करायच्या ठरवल्या. या दोन्ही ठिकाणी गेल्यावर छायाचित्रण तर केलेच पाहिजे. मस्त मस्त फोटो कसे काढावेत यासाठी टिप्स घेण्यासाठी त्या जिप्सीला भेटल्या. जिप्सीला उद्देशून त्यांनी कोणते मराठी गाणे म्हटले असेल?
मी जलवंती मी फ़ुलवंती
तुझी नजर लागल मला
गायक शैलेंद्र सिंग-अनुराधा, पडद्यावर उषा चव्हाण, चित्रपट - नाव मोठ लक्षण खोट (मराठीतला इन्तकाम)

०५/०२५ देशमुखांकडे संयुक्त कुटुंबपद्धती अजूनही टिकून होती.तीन पिढ्यांच्या घरात चौथ्या पिढीच्या बाळपावलांची चाहूल लागली होती. 'हम दो हमारे दो'चा संदेश त्यांच्या मागच्या काही पिढ्यांनी अंमलात आणल्याने कुटुंब काही फार मोठे नव्हते. मुली लग्न होऊन सासरी गेल्याने कुतुंबात आता आरतीबाईंच्या दोन सुना - सुवर्णा आणि शोभा आणि त्यांच्याही सुना , अनुक्रमे राधा आणि मीरा. देशमुखांचे संयुक्त कुटुंब असले तरी देशमुख मंडळी खुल्या विचारांची होती. सगळे निर्णय शक्यतो सर्वसहमतीने व्हायचे. गावची सरपंचकी लोकशाही परंपरेनुसार देशमुखांच्या घराण्यातच होती. थोरल्या देशमुखांच्या स्वर्गारोहणानंतर आरतीबाईंना विरक्तीची ओढ लागली होती. त्यातच महिला आरक्षणाचा फेरा देशमुखांच्या बाभुळगावावर पडला.सरपंच कोण असावा यावर चर्चा, प्लानिंगही होऊ लागले. शोभा ही थोरली सून असली तरी सुवर्णा ही अधिक कर्तबगार, समंजस असल्याने तिलाच सरपंच करावे असा बहुमताचा कौल होता. पण शोभाताईंना हे खपले नाही आणि त्यांनी चक्क वेगळी चूल मांडायचा विचार चालवला. पण त्यांना अगदी त्यांच्या यजमान, मुलगा, सून यातल्याही कोणी मनापासून साथ न दिल्याने त्या चांगल्याच खट्टू झाल्या. यावर सुवर्णाबाईंनी शोभाबाईंची सून मीरालाच कुटुंबप्रमुख करावे असा धोबीपछाड टाकून आणखी वाहवाही लुटली.
सगळे झाल्यावर सुवर्णाबाई शोभाबाईंची समजूत काढायला गेल्या- एक हिंदी?गाणं म्हणत. शोभाबाईंच्या मन:स्थितीलाही ते गाणं फिट्ट बसत होतं. कोणते ते गाणं?
(टीव्हीमालिकांच्या परंपरेला जागून कोड्यातील पुरुषपात्रांचा अनुल्लेख करण्यात आला आहे.)
अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना
देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना
पडद्यावर देव-मधुबाला
यात शब्दच्छल/चलाखी नव्हती. संपूर्णपणे प्रसंगनिष्ठ कोडं होतं.

०५/०२५ : मागच्यावेळी मी पेंचला गेले तेव्हा भरपूर वाघ दृष्टीस पडले होते. वाघांचच गाव ते, तेव्हा बरेच वाघ असणारच त्यात काही नवल नाही. पण त्यातल्यात्यात एक अतिशयच देखणा, राजबिंडा वाघ अगदी लक्षात राहिला. आता या वेळी गेले तेव्हा तोच वाघ पुन्हा बघण्याची खूप इच्छा होती. यावेळीही बाकीचे अनेक वाघ दिसले पण तो काही दिसेना. पण शेवटच्या फेरीत अखेरीस 'तो' दिसलाच. तस्साच देखणा. बघून अगदी धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं आणि एक गाणंच म्हणावसं वाटलं........

मामी, दिसला गं बाई दिसला ? (वाघ गालात हसताना कसा दिसत असेल? असा विचार करणारा बाहुला)
>>> मला वाटलंच हे गाणं लग्गेच कोणीतरी लिहिणार.

माधव, वाघ आपल्याकडे बघून हसला बिसला तर काय होईल माहित आहे ना???? त्यामुळे हे गाणं नाहीये.

अSSSSSSSSSल्ं डुर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र............................ ओळखा की गाणं!

तुला 'शेर' शब्द अपेक्षीत असेल तर अभयारण्य बदल. <<<< आणि प्राणीसुद्धा. Happy

मी तर -
देखा तुझे तो हो गई दीवानी..
पा लूं (किंवा पालू) तुझे तो मर न जाऊ कही.. हे टाकणार होते आधी. 'कोयला'मधलं! Proud
(मॉरल ऑफ द स्टोरी: वाघ लांबूनच पहावा.)

'शेर' आणि 'शहर' असा काही शब्दच्छल आहे का?

शेर म्हणजेच वाघ आणि सिंहाला बब्बर शेर म्हणतात.

'शेर' आणि 'शहर' असा काही शब्दच्छल आहे का? >>>> हो हो.

जाऊ द्यात. बहुतेक गंडलंय माझं कोडं तर उत्तरच सांगते.

०५/०२५ : मागच्यावेळी मी पेंचला गेले तेव्हा भरपूर वाघ दृष्टीस पडले होते. वाघांचच गाव ते, तेव्हा बरेच वाघ असणारच त्यात काही नवल नाही. पण त्यातल्यात्यात एक अतिशयच देखणा, राजबिंडा वाघ अगदी लक्षात राहिला. आता या वेळी गेले तेव्हा तोच वाघ पुन्हा बघण्याची खूप इच्छा होती. यावेळीही बाकीचे अनेक वाघ दिसले पण तो काही दिसेना. पण शेवटच्या फेरीत अखेरीस 'तो' दिसलाच. तस्साच देखणा. बघून अगदी धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं आणि एक गाणंच म्हणावसं वाटलं........

उत्तर : सारे शेर में आपसा, कोई नही कोई नही

Pages