Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मध्य,न्तरी याच बीबीवर
मध्य,न्तरी याच बीबीवर सिलिकॉनच्या चमच्यांची वगैरे चर्चा झाली होती ना? http://www.goodlife.com/Smart-Cook/Smart-Cook-Spatula/121298/Product-Det... याप्रकारचा चमचा ऑर्डर करावा का? कितपत उपयोग होईल? दुकानांमधे पण याची प्राईस रेंज हीच आहे का?
मटेरियल नायलॉन लिहिलंय. ते
मटेरियल नायलॉन लिहिलंय. ते कितपत उअष्णता झेलू शकतं इ. उल्लेख नाहीयेत. हा मला तरी तितका योग्य वाटत नाही.
माझ्याकडे सिलिकॉनचा spatula
माझ्याकडे सिलिकॉनचा spatula आहे जो मी ५० रु.ला विकत घेतला होता. त्याचा वापर मी फक्त केकचे बॅटर फेटण्यासाठीच करते.
तो नायलॉन स्पॅट्युला दिसतोय.
तो नायलॉन स्पॅट्युला दिसतोय. त्याच साइट वर सिलिकॉन पण आहे
http://www.goodlife.com/Smart-Cook/Smart-Cook-Silicon-Spatula/121307/Pro...
नंदिनी, तुम्ही दिलेल्या लिंक
नंदिनी,
तुम्ही दिलेल्या लिंक मधील वस्तूबद्दल माहित नाही.
पण सिलिकॉन spatula खूप उपयोगी आहे. mixer , फूड processor मधल वाटण, लोणी वगैरे व्यवस्थित निपटून काढण्यासाठी.
आणि प्राचीने लिहिलंय तसाही.
मी गेले २ वर्ष इलेक्ट्रिक
मी गेले २ वर्ष इलेक्ट्रिक steamer वापरतीये. ह्याच बाफ वर अगदी सुरुवातीला कोणी लिहिलंय कि हा रोजच्या वापरला उपयुक्त नाही. पण मला तर रोजच्या स्वयंपाकात याचा खूप उपयोग होतो. कोणी घ्यायचा विचार करत असल्यास मी आवर्जून recommend करीन.
जुन्या हितगुज वर दिनेशदांनी दिलेलेया ' izzycook' वर हि त्याच्याबद्दल माहिती आहे. gas वाचतो आणि लक्ष द्यायचीही गरक नसते.
व्हॅक्युम क्लीनर बद्द्ल
व्हॅक्युम क्लीनर बद्द्ल लिहिल्य का कुणी? हा बाफ योग्य आहे का?
मला मोठ्ठ व्हॅक्युम नकोय. रोज वापरता येइल आणि जास्त जड नको, हाताळताना सोपे हवे.
खास करुन सोफा, मुलांचे टेबल आणि ड्रावर्स, बेड्स स्वच्छ करण्यासाठी हवे आहे.
कुणी सुचवु शकेल काय?
डॉसन ला पर्याय नाही. तू
डॉसन ला पर्याय नाही. तू सिंगापोरला आहेस ना? तिथेही मिळेल बहुदा.
http://www.dyson.com.sg/vacuums/ ह्या लिंकवर लोकल रिटेलर्सची लिस्ट मिळेल.
महाग आहेत हे व्हॅक्यूम पण व्हॅल्यू फॉर मनी आहे. गेली ५ वर्षं रेग्युलरली वापरूनही सक्शन जराही कमी झालेलं नाही.
धन्यवाद प्रॅडी! तू त्यातले
धन्यवाद प्रॅडी! तू त्यातले कुठले मॉडेल वापरते ?
माझ्याकडे DC33 आहे.
माझ्याकडे DC33 आहे.
इथेच कुठेतरी चांदीची भांडी
इथेच कुठेतरी चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी मोदीकेअरचे सोलुशन चांगले आहे असे वाचलेले. मोदीकेअरच्या साईटवर 'सिल्वर डीप' म्हणुन आहे तेच का ? लहान बाळाची चां भांदी त्यात स्वच्छ केली तर चालतील का? त्याचा पदार्थावर काही परिणाम होत नसेल ना?
मायक्रोवेव्ह कोणता घ्यावा
मायक्रोवेव्ह कोणता घ्यावा याबद्दल कुठे चर्चा आहे का?
माधवी-
माधवी- http://www.maayboli.com/node/12204
माझ्ज्या कडे अॅक्वागार्ड
माझ्ज्या कडे अॅक्वागार्ड आहे.. नविन घरी water pressure pro मुळे माळ्यावर टाकला आहे ..पण आता परत traditional steel चा फिल्टेर घ्यायचा विचार आहे ...त्यातल्या कोइल किती दिवसांनी बदल्याव्यात ? आणि त्याच्या व्यतिरिक्त अजुन काय पअर्याय आहेत ? मला स्टिल चाच हवा आहे .. ते नविन आलेले पउर इट वगैरे नको ...
त्या फिल्टरच्या कॅण्डल्स सहा
त्या फिल्टरच्या कॅण्डल्स सहा महिन्यांनी बदलाव्या लागतात असं ऐकलंय. प्युअर इट किंवा तत्सम प्युरिफायर्समधे बॅटरी, फिल्टर बदलायची वेळ झाली की पाणी येणंच थांबतं त्यामुळे अशुद्ध पाणी मिळतच नाही. स्टीलच्या फिल्टरला ती सोय नसते त्यामुळे लक्ष ठेवावंच लागतं.
वॉव पौर्णिमा! धन्स!
वॉव पौर्णिमा! धन्स!
thanks nidhipa....
thanks nidhipa....
कोणाच्या डिशवॉशरला चहा कॉफी
कोणाच्या डिशवॉशरला चहा कॉफी मग्स मधे बारीक रेती सारखं काहीतरी चिकटणे, प्लॅस्टीक स्टोरेज च्या डब्यांना पांढरे डाग येणे असं काही होतं का? हे कपात पावडर का जे काय आहे ते दर काही दिवसांनी होत राहातं. काय उपाय यावर? मी कास्केड चे टॅब्लेट वापरतेय. डिशवॉशर पूर्ण आतून साफ होईल असे काही सोल्युशन मिळते का?
डिशवॉशर स्वच्छ करण्यासाठी हे
डिशवॉशर स्वच्छ करण्यासाठी हे वापरता येईल.
डिशवॉशर मध्ये कॉपर बॉटम ची आणि अॅल्युमिनिअम ( प्रेशर कुकर ) चालतात का टाकून? माझ्या प्रेशर कुकरवर एक करडा लेयर जमा होतो टाकला की आणि कॉपर एकदम चकचकीत दिसते. म्हणून आता तो कधीच डिशवॉशर ला लावत नाही. मी पण कॅस्केड टॅब वापरतेय. काही रिअॅक्शन होते का?
मी रिलायंस रिकनेक्टचा ज्युसर
मी रिलायंस रिकनेक्टचा ज्युसर घेतलाय, जो दिसायला फिलिप्सच्या एचार १८५८ ची सेम टू सेम कॉपी आहे.
मी सहसा गाजराचा रस काढते आणि मला वाटते की फारतर ५०% रस निघतो. साधारण ७००-८०० ग्राम गाजरांचा एक मोठा ग्लास भरुन ज्युस निघतो. उरलेला चोथा जर चिमटीत घेऊन जरासा दाबला तरी त्यातुन रस निघतो.
गाजराचा रस काढल्यावर उरलेला चोथा मी चपात्यात घालते पण रोज रोज अशा चपात्या करायला लागले तर घरात कोणी खाणार नाही, भाजीत घातला तरी तेच, केशरी गाजराचा रस चांगला लागला तरी भाजीत बेक्कार लागतात.
इतर कंपन्यांच्या ज्युसरची चौकशी केलेली त्यात लिप्सचा ज्युसर साधारणपणे ८०-९०% पर्यंत रस देतो असे एका विक्रेत्याने सांगितलेले ण बहुतेक विक्रेत्यांना हे किती टक्के रस प्रकरण माहित नव्हते.
इतका कमी निघणारा ज्युस पाहुन आता वाटतेय रिकनेक्टचा ज्युसर घेऊन चूक केली. फिलिप्स घेतला असता तर बरे झाले असते.
इथे कोणी फिलिप्सचा ज्युसर वापरलाय काय? मागे इथेच कुठेतरी मंजुडीने फिलिप्सच्या ज्युसरबद्दल एक कमेंट टाकलेली. एचार १८५८ हा तोच ज्युसर आहे का? आणि असल्यास त्याच्याही चोथ्यात भरपुर रस शिल्लक राहतो का?
रिकनेक्टचा ज्युसर घेऊन केलेली चूक सुधारायची इच्छा आहे पण ही सुधारताना नविन चूक नको व्हायला
इथे मध्यंतरी कुणी तरी
इथे मध्यंतरी कुणी तरी मिस्टोचा ऑयल स्प्रे सुचवला होता. मी घेतला. एकदम मस्त आहे. भारतातल्या मंडळींसाठी ऑर्डर करणार आहे.
धन्यवाद तोषवी. हो
धन्यवाद तोषवी.
हो अॅल्युमिनीअमची भांडी खराब होतात... काळ्पट राप येतो ...
स्वानुभव आहे.
मिस्टोचा ऑयल स्प्रे >> काय
मिस्टोचा ऑयल स्प्रे >> काय आहे त्याची लिंक देशील का प्लिज?
--
गुगलवर हे मिळाला http://www.bedbathandbeyond.com/product.asp?sku=11318517&utm_source=goog...
हाच का तो? तेल टाकायचे हवे ते व स्प्रे करायचे?
इथे अॅमेझॉनवर आहे.
इथे अॅमेझॉनवर आहे.
तोच तो मग. आजच आणते. थँक्स
तोच तो मग. आजच आणते. थँक्स थँक्स.
इथे मध्यंतरी कुणी तरी
इथे मध्यंतरी कुणी तरी मिस्टोचा ऑयल स्प्रे सुचवला होता. मी घेतला. एकदम मस्त आहे. भारतातल्या मंडळींसाठी ऑर्डर करणार आहे.
>> येस्स. मी पण हा २ आठवड्यांपूर्वी कॉस्टकोतून घेतला. २ पॅक आहे, १ मला आणि १ बहिणीला देणार
साधना, आता वाटेल मी माझ्या लाडाच्या ब्लेंडरची जाहिरात करते आहे पण खरच हे असे सबंध फळांचे ज्यूस काढून चोथा वाया न जाण्यासाठी vitamix or blendtech ला पर्याय नाही.
भारतात हे मिळतात का नाही माहित नाही.
अॅमेझॉनवर मात्र आहेत हे.
साधना, आता वाटेल मी माझ्या
साधना, आता वाटेल मी माझ्या लाडाच्या ब्लेंडरची जाहिरात करते आहे पण खरच हे असे सबंध फळांचे ज्यूस काढून चोथा वाया न जाण्यासाठी vitamix or blendtech ला पर्याय नाही. >>>> +११११
माझ्याकडे आहे blendtech, मस्त आहे एकदम
सगळे ज्यूस, आपली इडली,डोसे पिठ, चटण्या, कोरडे मसाले, तांदुळाची पिठी, पिझ्झा वैगरे साठी मैदा पण मळता येतो. आणि हे सगळ करण्यासाठीच भांड एकच आहे, म्हणजे अडगळ कमी 
प्रचंड महाग वाटलेल घेताना पण नवराच विकत घेऊन आला नाही आवडल तर रिटन करता येईल म्हणाला.
एवढ सगळ त्यावर होत असल्यावर नाही आवडल अस झालच नाहीये.
तो ऑईल स्प्रे धुवायचा असेल तर
तो ऑईल स्प्रे धुवायचा असेल तर धुता येतो का आतून व्यवस्थित? का धुवायचाच नसतो तो (म्हणजे ती खालची बॉटल आतून)
मी पाहिला युट्युबवर. अगदी
मी पाहिला युट्युबवर. अगदी स्मुथली स्मुदी होत असल्याचे पाहुन लेक प्रेमात पडली त्याच्या. पण इथे मिळणार नाही आणि नेटवर एकाने लिहिल्याप्रमाणे ज्या किमतीत मिळेल त्या किंमतीत सेकंड हँड मारुती येईल..
एनीवेज, जोक्स अपार्ट, याच्यावर गाजर, दुधी वगैरे भाज्यांचे ज्युस निघतील काय? कारण मी जे प्रात्यक्षिक पाहिले त्यात बहुतेक सॉफ्ट फळे वापरलेली.
फिलिप्सची चर्चा ४१ व्या
फिलिप्सची चर्चा ४१ व्या पानावर आहे.
Pages