Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेधा, आईंची तवा मॅनेजमेंट
मेधा, आईंची तवा मॅनेजमेंट परफेक्ट आहे. आमलेट्चा तवा वेगळा असल्याने आमलेटचा वास इतर चीजांना लागत नाही.
मेधा, माझ्याकडे पण पोळीचा तवा
मेधा, माझ्याकडे पण पोळीचा तवा वेगळा, थालिपीठाचा/भाकरीचा खोलगट लोखंडी तवा, डोश्याचा वेगळा नॉन्स्टिक तवा आणि ऑम्लेटसाठी वेगळा पॅन आहे.
मला आता चपातीसाठी नॉनस्टिकचा तवा नको आहे. फ्युचुराचे तवे ऑनलाईन चेक करते आता.
माझीही तवा मॅनेजमेंट सेम आहे
माझीही तवा मॅनेजमेंट सेम आहे
नंदिनी फ्युचुरा बेस्ट आहे एकदम !!
माझ्याकडे पण पोळीचा तवा वेगळा
माझ्याकडे पण पोळीचा तवा वेगळा आहे. आणि बाकी तमाम कामासाठी नुकताच एक अगदी पसरट तवा घेतलाय. जरा मोठ्ठाच आहे. पण टिचकी थालीपीठे / डोसे लावत बसण्यापेक्षा एकदाच दणदणीत द्यायचे लावून!
मुलींनो, तव्यासाठी वेगळा धागा
मुलींनो, तव्यासाठी वेगळा धागा आहे तिथे टाका ना हे प्लीज.
हाय , मला नवीन मिक्सर
हाय , मला नवीन मिक्सर घ्यायचा आहे. इथली चर्चा वाचुन प्रीतीचा / प्रिथीचा घ्यायला गेले तर दुकानदाराने फिलिप्सचा नवीन मॉडेल दाखवला. ज्यात ज्युसर जार आहे त्यात रस वेगळा आणि चोथा वेगळा होतो . मला दोन्ही आवडले आहेत पण प्रिथीचा स्वस्त आहे. फिलिप्सच्या या नव्या मिक्सर्चा कुणाला अनुभव आहे ़ का? प्लीज उत्तर द्या
पुंटे, दोन्ही ब्रॅण्डस्
पुंटे, दोन्ही ब्रॅण्डस् चांगलेच आहेत ग.
प्रिन्सेस, प्रितीमधे पण
प्रिन्सेस, प्रितीमधे पण ज्युसरचा रस व चोथा वेगळा होणारे भांडे आहे. मी ६ महिन्यांपूर्वीच घेतला प्रिती.
धन्यवाद प्राची अन सुमेधा !
धन्यवाद प्राची अन सुमेधा ! कदाचित दुकानदाराला फिलिप्सच खपवायचा असावा असे वाटते कारण पॉवर दोघांचेही सारखी असलीए तरी जुस जार फक्त फिलिप्सचाच दाखवला. उद्या पुन्हा बघते.
काल फूड चॅनेलवर मी एक वेगळे
काल फूड चॅनेलवर मी एक वेगळे सलाद स्पिनर बघितले. मोठा पारदर्शक बोल, आत एक जाळीदार बोल आणि त्यावर नॉब असलेले झाकण. तो नॉब हाताने दोन तीनदा दाबल्यावर, आतला जाळीदार बोल, वॉशिंग मशीनमधला ड्रायर फिरतो, तसा फिरायला लागला. सोपे पण उपयुक्त दिसले ते स्पिनर. मला नीट दिसले नाही पण बहुतेक वीजेवर चालणारे नव्हते. भारतात तसे कुणी बघितले आहे का ? पालेभाज्या, मोडाचे कडधान्य वगैरे
धुवून निथळायला, छान उपयोगी पडेल. अर्थात जर वीजेवर चालणारे नसेल, तर आतल्या बोलमधे, फार वजन टाकून चालणार नाही.
http://www.amazon.com/OXO-Goo
http://www.amazon.com/OXO-Good-Grips-Salad-Spinner/dp/B00004OCKR
इथे दिसला तो !
दिनेशदा, माझ्याकडे आहे अशा
दिनेशदा, माझ्याकडे आहे अशा प्रकारचा सॅलड स्पिनर. नॉब ऐवजी दोरी आहे. खुप उपयुक्त आहे.
वत्सला, छान आहे ना हि कल्पना.
वत्सला, छान आहे ना हि कल्पना. आपल्याकडे कुणीतरी निर्माण करायला हवा... चक्का, पातळ झालेले पुरण घट्ट.. करण्यासाठी पण वापरता येईल
सावली रोनाल्ड सध्या तरी एकदम
सावली रोनाल्ड सध्या तरी एकदम उत्तम.( मध्ये मध्ये त्याचे डोके फिरले की काहीतरी होते, पण बंद पडला तरी कंपनी दुसरा बदलुन देते, आमच्याकडे २ झालेत तसे, इतका मोठा प्रॉब्लेम नाहीच.)
भाज्या चिरणे, वेफर्स बनवणे, बटाटा किस करणे ( आतापर्यंत जवळ जवळ दरवर्षी २० ते ३० किलोचा किस बनवलाय त्यावर), कणिक मळणे, नारळ खवणे ( वेगळी attachment आहे त्याला, पण धारदार असते जरा जपुन)
मात्र मोठे वाटण असेल तर फिलीप्स सारखा दर्जेदार मिक्सर दुसरा कुठलाच नाही, कारण सुमीत बंद पडला. मी फिलीप्स दणकुन वापरलाय मासे, चिकन साठी मसाला वाटणाला, तसेच बाकी कामाला सुद्धा.
फुड प्रोसेसर बरोबर दुसरा
फुड प्रोसेसर बरोबर दुसरा मिक्सर हवाच, त्यामुळे त्या प्रोसेसर वर लोड येत नाही. असे माझे वैयक्तीक मत आहे.
धागा हजारावर गेलाय, त्यामुळे
धागा हजारावर गेलाय, त्यामुळे बाकी मागचे जास्त वाचले नाही. पण मी मागच्या वर्षी शिसमचा पोळपाट घेतला तुळशीबागेतुन, मस्त आहे.
मी लिहिलं असणार आधी, राजसमंदी
मी लिहिलं असणार आधी, राजसमंदी नावाचे एक गाव, उदयपूर पासून जवळ आहे ( तिथे संगमरवराच्या खाणी आहेत ) तिथून मी रंगीत संगमरवराचे पोलपाट आणले होते. आमच्या घरी १० वर्षे वापरात आहे. फक्त त्यावर सुरीने काही कापायचे नाही, अशी सक्त ताकीद आहे माझी.. दिसतोही छान आणि अजूनही गुळगुळीत
राहिलाय. त्यावेळी तिथे काय २५/३० रुपयांनाच मिळाले होते.
या धाग्यावर प्रितीबद्दल वाचुन
या धाग्यावर प्रितीबद्दल वाचुन मीही क्रोमातुन प्रिती ब्लु लिफ विकत घेतला. वर्ष झाले. मला दुर्दैवाने बेक्कार पिस मिळाला. सुरवातीला दोनेक महिने चांगला चालला, माझे वाटण आठवड्यातुन एकदा आणि तेही छोटा जार एवढेच. पण तरीही दोन महिन्यानी त्याचे मधले चक्र ज्यावर आपण भांडे बसवतो ते निघाले. फोन केल्यावर सर्विससेंटर्मधुन माणुस आला आणि त्याने ते परत बसवुन दिले. पण ते नंतर निघतच राहिले. मध्यम जार लावला की ते निघायचे म्हणुन तो जार लावणे सोडुन दिले. कंपनीचा माणुस परत एकदा आला आणि नंतर त्याने माझे फोन घ्यायचेही सोडुन दिले. शेवटी मी मिक्सर लोकल माणसाकडुन रिपेर करुन घेतला. त्याने अजुन आतले काहीतरी गेले म्हणुन सांगितले आणि ४०० रुपयाला फोडणी घालुन मिक्सर फायनल रिपेर करुन दिला. आता मी तो आहे तसा वापरते. सुरवातीला अजिबात आवाज करत नसे. आता मस्त मोठ्ठा आवाज करतो. मी दुर्लक्ष करते आणि वापरते. अजुन चालु आहे.
पण त्याला बदलावे असा मोह वारंवार होत असतो जो मी वारंवार टाळते.
हल्ली डिएनए मध्ये दर बुधवारी इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे रिवु येतात त्यात पॅनॉसॉनिक ला चांगले मार्क होते.
दिनेशदा, तुम्ही लिहिलय तसा
दिनेशदा, तुम्ही लिहिलय तसा मिक्सर (सलाद स्पिनर नाही) होमशोप१८ channel वर सारखा दाखवतात.
(( मोठा पारदर्शक बाउल आणि त्यावर नॉब असलेले झाकण. तो नॉब हाताने दोन तीनदा दाबल्यावर, आतला बाउल, वॉशिंग मशीनमधला ड्रायर फिरतो, तसा फिरतो )) १२०० रु . ला आहे.
पण amazon च्या वेबसाइट वर दाखवलय तसा गोल नाहीये, उभट आहे आणि जाळीदार बाउल नाहीये.
फ़ूड प्रोसेसर पेक्षा लहान size आहे.
हो चैत्राली, मग तिच आयडीया.
हो चैत्राली, मग तिच आयडीया. त्यात वाटण नाही व्हायचे. कि होते ?
वरच्या लिंकमधल्यासारखा सलाद
वरच्या लिंकमधल्यासारखा सलाद स्पिनर मी दिल्लीतल्या एका हायएंड मॉलमधल्या डिझायनर शॉपमध्ये बघितला. एका मैत्रिणीने घेतलाय तो. फक्त त्या डिझायनर सलाद स्पिनरचा बोल पारदर्शक नाहीयच, चिनी मातीचा आहे. वापरुन बघितला नाही पण दिसायला खूपच छान होता.
दिनेशदा, तो सॅलडसाठीच वापरता
दिनेशदा, तो सॅलडसाठीच वापरता येतो. फारतर द्राक्षे, चेरीज अशे फळे धुण्यासाठी. वाटण/श्रीखंड/पुरणासाठी अजिबातच नाही.
मोठा स्वयंपाक (२५-३० लोकं) करताना एक्स्ट्रॉ शेगडी म्हणुन कँपिंगचा स्टोव्ह वापरल्यास खुप उपयुक्त ठरतो. माझ्याकडच्या कुकिंग रेंजमध्ये चार शेगड्या आहेत पण खुप जवळ जवळ असल्याने मोठी भांडी वापरतांना दोनच शेगड्या वापरता येतात! त्यावेळी हा स्टोव्ह खुप उपयोगी ठरतो!
दिनेशदा, अहो तो मिक्सर आहे,
दिनेशदा, अहो तो मिक्सर आहे, मग वाटन होणारच ना? फक्त concept तुम्ही लिहिली आहे तशी नॉब आणि बाउल ची, म्हणून मी इथे लिहिल.
इथे बघा ग्लेन मिनी चॉपर,
http://glenindia.com/shop/mini-chopper?tid=17
इथे इंडक्शन कुकर ची चर्चा
इथे इंडक्शन कुकर ची चर्चा झाली आहे का ?
प्राइस मधे एव्हढा फरक का , बजाज , प्रेस्टीज आणि इतर कंपन्यां मधे ?
500 ते 1000 रु चा फरक आहे.
चैत्रालि, छान वाटतोय तो.
चैत्रालि, छान वाटतोय तो. कापाकापी करायला तर फारच सोयीचा दिसतोय.
इंडक्शन कुकरसाठी वेगळा धागा
इंडक्शन कुकरसाठी वेगळा धागा आहे याच ग्रुपात.
http://www.ushainternational.
http://www.ushainternational.com/home-appliances/index.html#top
असा अव्हन कोणी वापरलाय का?
नंदिनी, फुलके करत असशील तर
नंदिनी, फुलके करत असशील तर हार्ड आयो. तवा हातात उचलून पहा घेताना. आईकडे हा.आ. तव्यावर फुलके चांगले झाले पण हात गळून आला. कदाचित त्यांचे थोडे हल्के (वजनाने) तवे सुध्दा मिळत असतील.
पोळ्यासाठी मी लो.त. च वापरते. ३/४ वर्षांनी तोही बदलावा लागतोच.
पराठ्यांना फक्त लो.त. वर तेल लावते. बाकी रोजच्या फुलक्यांना गरज नाही. निर्लेप पोळ्यांसाठी वापरून कंटाळले. लो.त. जास्त तापू देऊन चालत नाही फु. करताना एवढ खरे. 
चांगला भारतीय ओटीजी किंवा
चांगला भारतीय ओटीजी किंवा कन्वेक्षन अवन कुठला आहे? मला फक्त बेकिंग साठी हवा आहे.
मावे मध्ये इतर सर्व स्वयंपाक व बेकिंग पण होते. पण केक्स व कुकीज साठी कन्वेन्शनल बेकिंग मस्त वाट्ते.
अ मा, राउंड अवन सगळ्यात
अ मा, राउंड अवन सगळ्यात चांगला बेकिंगसाठी.
Pages