Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
याच्यावर गाजर, दुधी वगैरे
याच्यावर गाजर, दुधी वगैरे भाज्यांचे ज्युस निघतील काय?>> होय. मी ते पित नाही पण माझ्याकडे माझे सासु-सासरे होते दोनेक महिने तर ते रोज गाजर + दुधी+टोमॅटो असा ज्यूस ब्लेंदटेक वर काढून प्यायचे आणि ते पण त्या ब्लेंडरच्या प्रेमात पडले
अनु३, मिस्टोचा स्प्रे
अनु३, मिस्टोचा स्प्रे व्यवस्थित धुता येतो. मी गेली ४-५ वर्षे वापरतेय.
vitamix च्या प्रेमी मंडळींना
vitamix च्या प्रेमी मंडळींना प्रश्न. माझ्या देशी सुमीत मिक्सरने राम म्हटलय सध्या. vitamix त्याला पर्याय होऊ शकेल का? माझ्याकडे बाकी फुड प्रॉसेसर, स्टिक ब्लेंडर, मॅजिक बुलेट आहे. पण यातल्या कशातच थोडीशीच आलं लसुण पेस्ट, हिरवी चटणी, ओलं वाटण गुळगुळीत वाटणं, कोरडी चटणी नीट (सुमीत सारखी) होत नाही. स्पेशली आलं लसुण पेस्ट, त्यात पाणी घालावं लागतं. vitamix चा जार बराच मोठा वाटतोय, सुमीत सारखं छोटं भांड नाहीये ना छोटी वाटणं करायला? मग कसा वापरता तुम्ही त्याला?
तुमचं म्हणणं बरोबर आहे
तुमचं म्हणणं बरोबर आहे सोनुली. व्हायटॅमिक्स चा उपयोग अशा थोड्याश्या क्वांटिटीसाठी नाही होणार.
मी हिरव्या चटण्या दीपच्या विकतच आणते.
कोरडी चटणी जास्त प्रमाणात करते त्यामुळे त्यासाठी वापरता येतो vitamix
ओलं वाटण बरच असेल तर करते त्यात.
हं म्हणजे कुठूनतरी सुमीतच
हं म्हणजे कुठूनतरी सुमीतच मिळवावा लागेल तर!
थोडीशीच पण छान चटणी हवी असेल
थोडीशीच पण छान चटणी हवी असेल तर बेला रॉकेट ब्लेंडर बेस्ट्..आणि डिशवॉशर सेफ पण्..ओली , किंवा कोरडी, कशीही...
स्वाती२ >>>> बर झाल सांगितलस,
स्वाती२ >>>> बर झाल सांगितलस, मागवला आहे अॅमेझॉन वरुन.
अंजली१२, तुमच्याकडचं पाणी जड
अंजली१२, तुमच्याकडचं पाणी जड (क्षारयुक्त / हार्ड वॉटर) आहे का? त्यामुळे ते पांढरे डाग पडतात.
इथेच मागे सीमाने सुचवलेलं 'लेम्मी शाइन' वापरून पहा.
मिस्टोचा स्प्रे व्यवस्थित
मिस्टोचा स्प्रे व्यवस्थित धुता येतो >>> +१
स्नेहा१ -- धन्यावाद, पण हे
स्नेहा१ -- धन्यावाद, पण हे मॅजिक बुलेट सारखच दिसतय दिसायला, होते का या आलं लसूण पेस्ट एकदम बारीक? माझ्या बुलेट मधे नाही होत म्हणून विचारतेय हं...
सानुली, मी अजून आले लसूण
सानुली, मी अजून आले लसूण पेस्ट नाही केली कधी..पण मिरची कोथिंबीरीची चटणी,दाण्याची सुकी चटणी अगदी छान झाली..मॅजिक बुलेटमधे कॉफी दळून होते का?बेलाचे जे छोटे भांडे कॉफीसाठी वापरतात त्यातच मी ह्या चटण्या करते..
अंजली१२, तुमच्याकडचं पाणी जड
अंजली१२, तुमच्याकडचं पाणी जड (क्षारयुक्त / हार्ड वॉटर) आहे का?>>> माहित नाही पण ते कसं ओळखायचं?
लेम्मी शाइन वापरून डाग गेले
लेम्मी शाइन वापरून डाग गेले तर पाणी हार्ड.

सहसा हे डाग त्यामुळेच पडतात. एरवीही शॉवर स्टॉल किंवा भांडी वाळत घालायच्या ट्रेमधे जिथे पाणी निथळून सुकून जातं तिथे असे डाग दिसत असतील.
डिशवॉशर डिटर्जन्ट आणि हे अर्धं अर्धं घालायचं.
हो कॉफी दळून होते, पण त्या
हो कॉफी दळून होते, पण त्या ब्लेडने ड्रायच गोष्टी नीट होतात बारीक, ओल्या नाही. म्हणजे हे जरा वेगळं दिसतय.
रेवेल चा छोटा ब्लेन्डर
रेवेल चा छोटा ब्लेन्डर मिळतो,त्यात बारिक(कमी प्रमाणातले वाटण छान होतात..
माझ्याकडे गेल्या ५ वर्षापासुन आहे, अगदी छान बारिक वाटण होतात..मी आमच्याकडच्या ई.ग्रो मधुन घेतला होता..
http://www.buy.com/prod/revel-ccm104-white-wet-n-dry-coffee-spice-grinde...
स्वातीताई खूपच धन्यवाद. आजच
स्वातीताई खूपच धन्यवाद. आजच आणते.
टार्गेटमधून घ्या. १२ औंसांची
टार्गेटमधून घ्या. १२ औंसांची बाटली साडेतीन डॉलरला पाहिली आहे. अॅमेझॉनवर महाग दिसली. आणखी कुठे मिळत असेल तर कल्पना नाही.
walmart मधे पण मिळते त्याच
walmart मधे पण मिळते त्याच किंमतीत.
धन्यु प्राजक्ता! अगं मी
धन्यु प्राजक्ता! अगं मी मुग्धा. आपल्याला फोनवर बोलायला होत नाही. इथेच बोलत जाऊ
चालेल की! फोन पण कर ना
चालेल की! फोन पण कर ना कधीतरी
बाकी रेवेल मधे चटण्या, पाणी न घालता करायची वाटण चान्गली होतात पण जार छोटा आहे फार..
हो मी वॉलमार्ट मधूनच आणीन ते
हो मी वॉलमार्ट मधूनच आणीन ते जवळ आहे.
अवांतरः माबोवर खूप पटकन आणि मोलाचे सल्ले मिळतात...लव यू माबो आणि माबोकर्स
मला वाटतं आणि एकही असा विषय नाही की जो माबोवर मिळणार नाही 
साधना, तुम्ही ओमेगा घ्या.
साधना, तुम्ही ओमेगा घ्या. international version खूप छान आहे. माझी आई वापरते. साईट वरून ऑर्डर करु शकता.
बाकी, भारतातले ज्युसर एकदम बंडल आहेत. फिलिप्स होता आईकडे. बंडल वाटला(तिला.. ).
तुम्ही सगळ्या इथे अमेरिकेत
तुम्ही सगळ्या इथे अमेरिकेत चॉपिंग बोर्ड कोणता वापरता?प्लास्टिकचा लवकर खराब होतो.लाकडाचा डिशवॉशर मधे घालता येत नाही. आणि कोणी त्या फ्लेक्सिबल कटिंग मॅट्स वापरून बघितल्या आहेत का?
फ्लेक्सिबल कटींग मॅट पण काही
फ्लेक्सिबल कटींग मॅट पण काही दिवसांनी फेकावी लागते. मी लाकडाचा शाकाहारासाठी आणि मांसाहारासाठी डिश वॉशर्प्रुफ घेते. मग काही महिन्यांनी ते फेकून नवीन आणते.
कुणी AMC COKWARE भांडी
कुणी AMC COKWARE भांडी वापरलीत काय? एका मैत्रीणिचा फोन आला होता तिने बहुतेक एजंसी घेतलि आहे
बरच काहि सांगत होती , २ थेंब तेलात भाजी होते वैगरे वैगरे , कुणाला काहि माहिती असल्यास सांगा ना
ऑइल स्प्रेचा नक्की उपयोग काय
ऑइल स्प्रेचा नक्की उपयोग काय होतो? भारतात पुण्यात कुठे मिळेल का?
.
.
थंड, मी वापरते. मला आवडली ती
थंड, मी वापरते. मला आवडली ती भांडी. घेणार असाल तर त्यांचे डेमॉन्स्ट्रेशन असते ते आधी पहा. त्याचे तंत्र नीट समजून घ्या. वापरताना दिलेल्या सूचना पाळा. नाहीतर त्यातही नेहमीसारखाच स्वयंपाक होईल. फरक कळणार नाही. आख्खा सेट घ्यायची गरज नाही, सुट्टी १-२ भांडीही घेता येतात.
दक्षिणा, पॅनमध्ये stir- fry करायचे असल्यास कमी तेल पूर्ण पॅनमध्ये स्प्रे होते, बेकिंग पॅन्स इ. वर स्प्रे (coat) करण्यासाठी. मायक्रोवेवमध्ये पापड भाजण्यापूर्वी त्यावर.
हेच असेल तर अजून माहिती इथे मिळेल - http://www.pamcookingspray.com/grilling-and-baking-tips/
डोसे, धिरडी वगैरेंसाठी ऑइल
डोसे, धिरडी वगैरेंसाठी ऑइल स्प्रे उत्तम.
चमच्याने तव्यावर ओतून पसरवणे किंवा नारळाच्या किशीने पसरवणे यामधे खूप तेल लागते.
नारळ खोवण्यासाठी काय वापरावे?
नारळ खोवण्यासाठी काय वापरावे? माझ्याकडे विळी नाही.
अंजली चे नारळ खोवण्याचे जे यंत्र आहे त्याचे air locking सारखे खराब होते.
दुसरा काहीतरी चांगला उपाय सुचवा
Pages