Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कणिक मळायला हवंय का योडे
कणिक मळायला हवंय का योडे तुला
>>
कणिक मळायलाच.
मंजु, तेच बघितलं मीपण. बघु आता वीकेंडला वगैरे जाऊन बघुन येईन भांड्यांच्या दुकानात.
सालकढणं हवंय, पण अगदी पातळ
सालकढणं हवंय, पण अगदी पातळ आणि झटकन साल निघाली पाहिजे कशाचीही (म्हणजे भाजीची..
)
माझ्याकडे ३ आहेत ऑलरेडी. पण एका सोलाण्याने निम्मी भाजीपण निघून येते इतकी साल जाड निघते. पण त्याने भराभर साल निघते हेही खरं. दुसरं आहे ते दोन्ही बाबती मध्यमगती आहे. तिसरं फार गुणी आहे, जास्त साल काढत नाही, पण वेळ खूप काढतं. दोन्ही साधेल असं काहीतरी सुचवा.
प्रज्ञा, सोलाणं आणि लिंबाचा
प्रज्ञा, सोलाणं आणि लिंबाचा रस काढणं चांगलं मिळणं ही लॉटरी आहे. माझ्याकडे पण दोन सोलाणी आणि ३-४ रसकाढणी आहेत. एक सोलाणं पातळ साल काढतं आणि पटापटा काढतं त्यामुळे मी ते सोन्याच्या सोलाण्यासारखं जपते. नजरेआड होऊ देत नाही
दुसरं जाड आणि फताड्या साली काढतं. पण तेही जाड सालवाल्या भाज्या किंवा कैरी सोलायला उपयोगी पडतं. लिंबाचा रस काढणं उपकरण मात्र कितीही महागातलं, ब्रँडेड, स्वस्तातलं, गावठी घ्या.... ते रस फुकट घालवतंच. हातच बरा त्यापेक्षा.
केश्वि मला हवंच्च आहे पण
केश्वि
मला हवंच्च आहे पण सोलाणं. जाड साली काढायला आहे की माझ्याकडेपण एक जाडू सोलाणं. पण काकडीपण निम्मी निघून येते. त्यामुळे काकडी, दोडका अशा सडसडीत भाज्या सोलायला नवीनच सोलाणं घ्यायचंय.
मला इकडे तसं मिळालं तर पाठवेन
मला इकडे तसं मिळालं तर पाठवेन तुला
ओह! हाऊ नाईस ऑफ यू! थँक्स!
ओह! हाऊ नाईस ऑफ यू! थँक्स!
मी जाईन नीलम दुकानात किंवा तुळशीबागेत तेव्हाही शोधणार आहे.
माझ्याकडचं एक होतं ते फारच
माझ्याकडचं एक होतं ते फारच जाड सालं काढायचं. गेल्या आठवड्यात कस माहीत नाही पण ते माझ्याकडुन हरवलं. नवीन आणलंय ते फारच मस्त आहे एकदम. प्रज्ञा, तु सोलाणं घेशील ना तेव्हा ती धार असलेली बाजु आणि पुढची बाजु ह्यात अंतर कमी असलेलं घे म्हणजे साल पातळ निघते.
ओके योडी. लक्षात ठेवते.
ओके योडी. लक्षात ठेवते.
मिक्सर+फु.प्रो. आहे
मिक्सर+फु.प्रो. आहे माझ्याकडे. पण फु.प्रो. च्या न लागणार्या अॅटेचमेंट ठेवायला जागा नाहीये. (त्यामुळे त्या लॉफ्ट वर ठेवल्या आहेत. पण त्यामुळेच जास्त वापरल्या जात नाहीत.) . तुम्ही या अॅटेचमेंट्स कुठे ठेवता ?
फुप्रोखालच्या कपाटामध्ये.
फुप्रोखालच्या कपाटामध्ये.
पण अगदी पातळ आणि झटकन साल
पण अगदी पातळ आणि झटकन साल निघाली पाहिजे कशाचीही >>प्रज्ञा, टपरवेअर मध्ये आहे.
अबोल अणि अविगा, ते मसाल्याचे
अबोल अणि अविगा, ते मसाल्याचे सिंगल लेवलवाले आहे माझ्याकडे. माझे थोडे वेगळे आहे. त्यातून एकावेळी १/४ टीस्पून मसाला बाहेर पडतो त्यामुळे मला लेकाला स्वयंपाक शिकवताना फार उपयोगी पडले. शिवाय चमच्याने मसाले घालताना घाईत मुलं फार सांडलवंड करतात तेही होत नाही.
ए माझ्याकडे पण तसलं मसाल्याचं
ए माझ्याकडे पण तसलं मसाल्याचं भांडं आहे. फक्त माझी भांडी तशी लटकवलेली नाही आहेत. ती ठेवायला सेपरेट तळ आहे. त्यात असं मोजणीने मसाला काढतात हे माहितच नव्हतं गं स्वाती मला. मला ते सगळे मसाले एकत्र काउंटरवर ठेवायला सोपं पडतं, दिसायला पण बरं दिसतं बाहेर असलं तरी आणि कुणीही स्वयंपाक करीत असेल (ज्ये ना, का ना इ.इ.) तर त्यांना सारखं सारखं किचन समजावत बसायला लागत नाही हा मुख्य फायदा वाटतो. नेमकं माझी इंडिव्हुज्युअल भांडी काचेची आहेत त्यामुळॅ मला धुवायला डीशवॉशरमध्ये टाकायला पण सोयीचं पडतं. शिवाय आजकाल प्ल्~अस्टिक टाळणं सुरू आहे त्यामुळे ते आपसूक क्लिक होऊन गेलं. जेव्हा मी ते घेतलं तेव्हा माझ्याकडे मसाल्याचा भारतातला डब्बा नव्हता हे कारण होतं. पण आता इतकी वर्षे वापरून माझ्याकडे येणार्ञांना पण त्यातून मसाले वापरायची सवय झाली आहे.
माझं रेकमेंडेशन ती काचेची भांडी असल्यास जरूर घेणे. पुष्कळ टिकतं. माझं निदान ६-७ वर्षांपुर्वीचं आहे.
योडी तुझं ते पीठ मळायचं यंत्र माझ्या आईने कधीतरी वापरलं होतं.. तिचं म्हणणं ते घरातल्या पुरूष मंडळींकडून पीठ मळून घ्यायला, ताकत लावायला चांगलं आहे. तिने ते नंतर रद्द का केलं मला नीट आठवत नाही. पण तुला घरातल्यांकडून पीठ मळून घ्यायचा हा एक फायदा होईल
वेका, माझ्याकडे आहेत त्याला
वेका, माझ्याकडे आहेत त्याला वरती झाकण आहे ते खाली-वर करता येते. जास्त प्रमाणात मसाला टाकायचा असेल तर या झाकणाला असलेल्या स्लॉटमधून मसाला टाकता येतो. त्या शिवाय बेसला गोल फिरणारे झाकण आहे. ते पेपर मिल सारखे फिरवले की त्यातून दर खटक्याला १/४ टीस्पून मसाला बाहेर पडतो. माझा नवरा शीडी आणायला हार्डवेअर स्टोअरमधे गेला होता. तिथे बार्बेक्यु सप्लाईजमधे दिसले म्हणून घेऊन आला.
स्वाती मस्त...मध्ये मध्ये
स्वाती मस्त...मध्ये मध्ये नवर्^याला हार्डवेअर स्टोअरमधे पाठवत जा..लवकरच तो तुझं किचन एकदम अल्टिमेट गोष्टींनी भरून टाकेल.
माझं नेहमीचं फक्त गोल फिरवायचं झाकण असतं नं. तसं आहे. एक मोठं भोक वालं आणि दुसरी तीन छोटी असं. पण मला आता फोडणीच्या गोष्टी त्यातून डायरेक्ट टाकायची सवय झाली आहे. माझी आई काही वेळा मोहरी / जिरं हातावर घेऊन मग टाकते पण सगळं एकाच ठिकाणी गोल फिरवल्यावर मिळतं म्हणून तिला आवडतं. मला त्यानिमित्ताने सगळे दुनियाभरचे आणलेले मसाले वापरले पण जातात असं वाटतं. माझं चार मजली सोळा भांडी असतात तसं आहे.
वरच्या मजल्यावर फोडणीचं. खाली मसाले, धणे पावडर जीरे पावडर काळा गोडा अमक्या मावशीचा तमकीने भारतात दिलेला असे सगळे मसाले एका ठिकाणी नांदतात.एखादा मजला थोडे मिक्स खडे मसाले, हर्ब्ज असं पण ठेवावं. बरं असतं मध्येच कुठेही काहीही आठवलं की टाकता येतं. नाहीतर रेडिमेड मसाले काहीवेळा फ्रीजमधून काढेपर्यंत भाजी पोटात गेलेली असते इतकं अगम्य कुकिंग करते मी...फक्त विकेंडला नीट प्लान करता येतं. इतर दिवशी हे सोळा डब्बे जिंदाबाद.
ईथे युएस मधे सिंगल चाकु घेण
ईथे युएस मधे सिंगल चाकु घेण ठिक की पुरा सेट? मला चांगला शार्प चाकु हवा आहे. भाज्या/ फळे/ चिकन वैगरे कापायला हवा आहे. मी एक सिंगल चाकु घेवुन बघितला पण त्याला अजिबात धार नाही. कुणी चांगला ब्रँड सुचवेल काय?
रचु, माझ्याकडे वुस्तॉफ (?) ची
रचु, माझ्याकडे वुस्तॉफ (?) ची एक शेफस नाईफ आणि एक पेअरिंग नाईफ आहे. मला आवडते. लेकाने दिली म्हणून अधीक आवडते. त्या आधी देशातून आणलेल्या सुर्या वापरायचे.
मी पण अजुन देशातून आणलेल्या
मी पण अजुन देशातून आणलेल्या सुर्याच वापरत आहे पण आता त्यांची धार खुप कमी झाली आहे म्हणुन मग नविन घेतली तर तीला धारच नाही.
wusthof knife का?
Victorinox चे सगळे चांगले
Victorinox चे सगळे चांगले आहेत, स्वस्त आणि मस्त. अजून Henckel आणि शिकागो कटलरी.
याबरोबरच AccuSharp चे शार्पनर घे. कात्रीसाठीही मिळतो. cooksillustrated च्या इक्विपमेन्ट रिव्ह्यू मध्ये हे सगळे रेकमेन्ड केले होते. Victorinox चा शेफ नाइफ माझ्याकडे आहे, चांगला आहे.
हा मैत्रिणीकडे पाहिलेला आवडला
हा मैत्रिणीकडे पाहिलेला आवडला होता -
http://www.amazon.com/Pure-Komachi-Series-Chefs-Fuchsia/dp/B0029XHQXK/re...
रचु तुमच्याकडे काय काय कापलं
रचु तुमच्याकडे काय काय कापलं जातं त्यावर तुला एक(च) चाकू पुरे का हे तुलाच ठरवता येईल. पण सगळा सेट लागतोच असं नाही. शिकागो कटलरी चांगले निघालेत. एक छोटा (पटपट कापायच्या गोष्टी बिन्स्,सलाड इ.) एक मिडीयम (कांदे भोपळा वगैरे) आणि एक मोठा (नॉनव्हेज साठी) इतकं तरी आमच्याक्डे लागतं.
..आणि एक ब्रेड कापायला. असे
..आणि एक ब्रेड कापायला. असे टोटल ४ लागतात.
मला पण ३/४ चाकू लागतीलच
मला पण ३/४ चाकू लागतीलच

बरेच ब्रँड मिळाले, victorinox चा शेफ नाइफ चांगला वाटतो आहे. धन्सं सगळ्यांना.
लोला Komachi चा मला ही आवडला
अविगा .. ते मला. असच आमच्या
अविगा .. ते मला. असच आमच्या ईथल्या स्टोर मध्ये दिसल..
मला खुप उपयोगी वाटल... आणी स्वाती वेका म्हणतात तसे सगळे दुनियाभरचे आणलेले मसाले वापरले जात नाहित असे च कुठे तरि कोपर्यात राहतात... ते या मुळे वापरात येवु लागलेत...
रचु माझ्याकडे हा आहे. ५
रचु माझ्याकडे हा आहे. ५ वर्ष झाली घेवून. अजुन चांगला आहे. त्यात त्यांनी धार लावण्याचे टुल दिले आहे. पण ते तंत्र अजुन मला जमले नाही.
सेपरेट चाकुसाठी , कॉस्टको मध्ये चार कलरचा सेट मिळतो तो छान आहे एकदम.
मातीचं स्वैपाकाचं भांड
मातीचं स्वैपाकाचं भांड पुण्यात कुठे मिळेल?
राखी , कुंभारवाड्यात (कँपला
राखी , कुंभारवाड्यात (कँपला जाताना) मिळत.
धन्यवाद सीमा
धन्यवाद सीमा
इथे वॉशिन्ग मशीनबद्दल काही
इथे वॉशिन्ग मशीनबद्दल काही धागा आहे का? भारतात घरी घ्यायचे आहे. फ्रंट लोडर मध्ये बरेच सायकल ऑप्शन आहेत असं कळलंय.
ज्ञाती, वॉशिंग मशीनसाठी
ज्ञाती, वॉशिंग मशीनसाठी http://www.maayboli.com/node/33876
Pages