Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद स्वाती!!!
धन्यवाद स्वाती!!!
Consumer reports ranks
Consumer reports ranks Zwilling Twin professional,Zwilling profection, Wustoff trident , Wustoff classic and Ginsu Chikara in top 5. Ginsu Chikara is rated best buy .
My friend has Zwilling twin professional set for last 15 years it was his first big purchase after getting a job. He uses the chef's knife and paring knives regularly.
The bread knife in that series is also great.
I have a Ginsu Chikara set with a 7 inch Santoku knife and a 9 inch शेफs knife. I have used it for 3-4 years now and works great. Use these for vegetables, fish, chicken, mutton regularly.
I use Smith's knife-scissor sharpener to sharpen the knives and the honing steel that came with the set.
I would recommend a 7 inch Santoku, oशेफ knife and one or two paring knives at least.
छान सेट आहे सीमा माझ्याकडे
छान सेट आहे सीमा

माझ्याकडे ऑलरेडी ३/४ सुर्या आहेत म्हणुन लालू नी सुचवलेला शार्पनर ट्राय करीन म्ह्णते, सुर्यांना धार आली तर ठिक नाहीतर खरेदी आहेच
धन्यवाद मेधा, बरेच ऑप्शन्स मिळाले.
रचू महागातला अगदी पूर्ण सेट
रचू महागातला अगदी पूर्ण सेट नसेल घ्यायचा ईतक्यात तर किचनेड च्या सिरॅमिक सुर्या पण बेस्ट आहेत.
http://www.amazon.com/KitchenAid-Piece-Gourmet-Ceramic-Covers/dp/B00AKJWUUO
मध्यंतरी कॉस्टको मधे पण होता हा सेट. फार महाग नाही आणी अप्रतीम धार आहे. त्या सेट मधलं सोलाणं पण छान आहे. वॉलमार्ट, क्रोगर मधे ह्यातली एखादी सुरी पण घेता येईल.OXO ब्रँड पण चांगला आहे सुर्यांसाठी. पण अर्थात लगोलग एकटी दुकटी सुरी हवी असेल तर विचार करा. पूर्वी पण एका धाग्यावर सुर्यांची बरीच चर्चा झाली होती. मिळाला तर देईन लिंक.(ह्याच धाग्यावर पान क्र. २ पहा.)
माझ्याकडे हा एक सेट आहे.
http://www.amazon.com/FOREVER-SHARP-Profesional-Service-SURGICAL/dp/B006...
गेली ५ वर्षं रेग्युलरली वापरात आहे. आणी नावाप्रमाणे फॉरएव्हर शार्प. ह्यांचे बरेचदा वॉलमार्ट, सॅम्स्,कॉस्टको मधे डेमोज पण होतात. आणी चांगली डील्स मिळतात. मला बाय वन गेट वन फ्री मिळाला होता.
कुजिन आर्ट चे stainless steel
कुजिन आर्ट चे stainless steel cookware कुणी वापरलेय का ?
सुर्यांना आयत्या वेळी धार
सुर्यांना आयत्या वेळी धार करायची असेल तर - सिरॅमिकचे कप/ मग / बाऊलच्या खालच्या भागात जी जराशी खरखरीत कड असते त्यावर ओली सुरी घासायची. खरोखरच छान धार होते ( सुरी पकडताना धार करणारा कसा पकडतो तशी आडवी पण किंचित तिरकी करुन पकडायची. असे केल्याने नेमका धार असलेला भाग कपावर घासला जातो )
ज्ञाती, चांगली कंपनी आहे.
ज्ञाती, चांगली कंपनी आहे. बिंधास्त घेउन टाक. मी स्टील ची भांडी कोणत्याही ब्रँडची वापरत १०/१८ चे असल्याशी कारण.
सिलिकॉनचे ऑईल ब्रश्(बेकींग
सिलिकॉनचे ऑईल ब्रश्(बेकींग वगैरेसाठी वापरतात ते, मी अजुन वापरले नाहीय) रोजच्या नॉनस्टीक किंवा बीडाच्या तव्यावर वापरता येतील का? आंबोळ्या, डोसे, घावने ई. टाकायच्या आधी तेल लावण्यासाठी, पसरवण्यासाठी. नारळाची शेंडी किंवा कांदा वापरतात तसे.
सिलिकॉनचे ऑईल ब्रश् -मला पण
सिलिकॉनचे ऑईल ब्रश् -मला पण हवे आहेत . पुण्यात किंवा नेट वर कुठे मिळतील.
तसेच OIL SPRAY पण हवा आहे
साक्षीमी वापरायला हरकत नसावी.
साक्षीमी वापरायला हरकत नसावी. माझ्याकडे तसा एक स्पॅच्युला होता. मी प्रचंड वापरला. चुकून तुटला तो माझ्याकडून. अब तुने याद दिलाही दि है तो बझार जाना ही पडेगा
साक्षीमी, बहुतेक सिलीकॉन ब्रश
साक्षीमी, बहुतेक सिलीकॉन ब्रश ५००-६०० फॅ रेंज (ब्रॅन्ड वर अवलंबून) मधले असतात. तेव्हा तेल लावायला वापरता येइल. फक्त किती तापमानासाठी आहे ते बघून घ्यायचा.
धन्स वेका आणि
धन्स वेका आणि स्वाती२
होमशॉप१८ च्या साईटवर आहेत ब्रश आणी स्पॅच्युला. तिथेच 'to spread butter on hot pans' असंही लिहिलंय म्हणजे तेलासाठीही चालेल असे दिसतंय, बघते आता घेऊनच.
उषाचा हॅलोजन ओवन इंटरेस्टींग
उषाचा हॅलोजन ओवन इंटरेस्टींग वाटला. कोणी वापरलाय का इथे?
http://www.chipak.com/product/Usha-Halogen-Oven-HO3212.html
प्रेशर कुकरसाठी वेगळा धागा
प्रेशर कुकरसाठी वेगळा धागा दिसला नाही. म्हणून इथेच लिहीते.
हार्डअॅनोडाइज्ड प्रेशर कुकरमध्ये डायरेक्ट अन्न शिजवले तर चालते का? कारण, ते शेवटी प्रोसेस्ड अॅल्युमिनिअमच असते ना?
हार्डअॅनोडाइज्ड आणि स्टेनलेसस्टील असे दोन ऑप्शन्स असतील तर काय निवडावे?
प्रेशर हंडी आणि कुकरमध्ये काय फरक असतो?
प्रेस्टीजचे दोन कुकर आहेत माझ्याकडे पण अनुभव चांगला नाही. विशेषतः हॅण्डल्स लगेच खराब होतात. स्क्रू सारखे टाइट करावे लागतात (हॅण्डल्सचे :फिदी:) कोणाला तसा अनुभव आहे का की माझेच काही चुकते आहे?
हॉकिन्सचे दोन कुकर आहेत ज्यांचा अनुभव चांगला आहे हॅण्डल्ससकट.
प्राची, स्टेनलेस
प्राची, स्टेनलेस स्टील.
म्हणजे मला तरी ते बरे वाटते. विशेषत: तुमचा स्वैपाक आणि भांडी घासणे हे बायकांच्या हातात असताना स्टीलच बरे.
त्या हॅण्डल्सच्या स्क्रूचे प्रकरण कुठल्याही कंपनीचे होते. फक्त प्रेस्टीजचेच नाही गं.
ओ.के. थँक्यू नी.
ओ.के. थँक्यू नी.
halli kahi pressure pans
halli kahi pressure pans induction cooking sathi yogya ase pan yetat. te gas sathihi chalatat. tasa ghetlas tar kadhi induction vaparyachi vel aali tari problem yenar nahi.
प्राची, जर थेट कूकरमधे
प्राची, जर थेट कूकरमधे शिजवणार नसाल तर, अॅल्यूमियमची कूकर बॉडी आणि स्टेनलेस स्टीलचे डब्बे, हे कॉम्बिनेशन योग्य आहे. ( अॅल्यूमिनियम लवकर तापते, ते आवश्यक कूकरसाठी आवश्यक असते. )
हार्ड अॅनोडाइज्ड कूकरमधे अन्न थेट शिजवले तरी चालते. पण त्यात आणि एरवीही कूकरमधे थेट शिजवलेले पदार्थ, कधीही त्यात ठेवू नयेत. लगेच दुसर्या भांड्यात काढावेत. स्टेनलेस स्टीलच्या डब्यात मात्र शिजवलेले पदार्थ, ठेवले तरी चालतील.
प्रेस्टीजचे स्क्रू ढीले होतातच. रोज कूकरचे झाकण लावण्याआधी ते घट्ट आहेत कि नाहीत ते बघायची सवय असली तर चांगले. हॉकिन्समधे मात्र सहसा हँडलचा प्रश्न येत नाही. उघडताना त्याचे हँडल आत जात असल्याने अनेकांना त्यात कमी जागा आहे असे वाटते. पण योग्य तो कोन राखल्यास पदार्थांना योग्य तेवढी जागा मिळतेच.
कूकर घासताना आपटायचा नाही, तसेच त्याच्या काठावर देखील चमचे आपटायचे नाहीत. त्यात कधीही तळण करायचे नाही, आणि कुणीही सांगितलेले असले ( प्रख्यात पाकक्रिया लेखकांनी देखील ) तरी त्यात केक वगैरे बेक करायचा नाही. कूकर धुतल्यानंतर पुसून ठेवणे आवश्यक आहे. रिंग, वेंट वेट ( शिट्टी ) काढून ठेवली तर जास्त चांगले. अशी काळजी घेतल्यास, कूकर वर्षानुवर्षे उत्तम सेवा देतो.
मला इथे मिळालेली शेगडी. वांगी
मला इथे मिळालेली शेगडी. वांगी / रताळी / कांदे / बटाटे / बाट्या मस्त भाजून होतात. फक्त जास्त रुंद तोंडाची असल्याने भांडे ठेवता येत नाही. नायजेरीयात अशीच पण चौकोनी आकाराची असायची. त्याच्या चार वाजूला "व्ही" आकारातल्या कड्या असायच्या. त्या आतल्या बाजूला वळवल्या कि त्यावर भांडे वगैरे ठेवता यायचे.
मस्त दिसतेय. यात कोळसे टाकून
मस्त दिसतेय. यात कोळसे टाकून पेटवतात का?
मागच्या आठवड्यात आयकियाचा हा WOK घेतला आहे. अजून सिझन केला नाहीये पण वापरेन लवकरच.
मी नुकताच पुट्टु मेकर घेतलाय.
मी नुकताच पुट्टु मेकर घेतलाय. माटुंगा मार्केटमध्ये रु. ३२५ ला मिळाला. आता लवकरच पुट्टु-कडला करीचा ब्रेकफास्ट होईल.
http://110vappliances.com/index.php?route=product/product&product_id=134
हो वेका, कोळसे घालूनच.
हो वेका, कोळसे घालूनच. आफ्रिकेत शहरातही कोळसे वापरायची पद्धत आहे. मुबलक आणि स्वस्त असतात.
मामी, खरे पुट्टू बांबूमधे करतात ना ?
हो दिनेशदा. बांबूमध्ये करतात.
हो दिनेशदा. बांबूमध्ये करतात.
स्टीलचा पोळपाट वापरतं का
स्टीलचा पोळपाट वापरतं का कोणी? काय अनुभव आहे? हलका असल्याने पोळ्या करताना तोही फिरतो का?
पोळी चिकटते का? वै वै प्रश्न आहेत.
माझ्याकडे लाकडाचा पोळपाट आहे. तोच बदलायचा आहे.
स्टीलच्या पोळपाटाचा अनुभव
स्टीलच्या पोळपाटाचा अनुभव नाहीये पण दगडी पोळपाट मस्त असतात. स्पेशली ग्रॅनाइटचे आणि जे सलग दगडात बनवलेले असतात ते (पाय वेगळे चिटकवलेले नसतात असे)
पोळी चिकटत नाही पण पोळ्या
पोळी चिकटत नाही पण पोळ्या लाटताना थोडा फिरतो. पोळपाटाच्या खाली पेपर ठेवला तर नो प्रोब्लेम.
अल्पना, असे पोळपाट सर्रास
अल्पना, असे पोळपाट सर्रास मिळतात का?
सलग पाय! ह्म्म. माझा पोळपाट ऑलरेडी एका पायाने लंगडा झालाय आणि दुसराही हलायला लागला आहे. लाकूड असल्याने धुतल्यावर पाणी मुरून हळूहळू ते पाय सुटे होतातच
पोळपाटाच्या खाली पेपर ठेवला तर नो प्रोब्लेम.>> हे करता येण्यासारखं आहे. धन्यवाद गीतान्जली.
स्टील चा माहीत नाही; पण
स्टील चा माहीत नाही; पण अॅल्युमिनियम चा होता माझ्याकडे. तो फिरायचा पोळ्या करताना. पोळ्या हलक्या हाताने लाटणे वगैरे करावे लागायचे.
इथे नॉर्थ मध्ये सहज अगदी
इथे नॉर्थ मध्ये सहज अगदी आठवडी बाजारात पण मिळतात. अगदी १००-१२५ रुपयांपासुन २००-२५० पर्यंत वेगवेगळ्या रेंजमध्ये.
माझ्याकडचा १०-१२ वर्ष जुना ग्रॅनाइटचा पोळपाट कामवाल्याबाईकडून अशातच चूकून खाली पडून दोन तुकडे झाले होते. नविन घेताना मी ग्रॅनाइट, मार्बल आणि लाकडी तिन्ही बघितले आणि शेवटी ग्रॅनाइटचाच घेतला.
ग्रॅनाइट/ मार्बल बेस्ट
ग्रॅनाइट/ मार्बल बेस्ट पोळपाट. लाटताना कणीकही कमी लागते.
मी आमच्या घराचा ओटा बनवताना पोळपाटही बनवून घेतला
पूनम, तुझ्या आसपास कोणाकडे ओटा किंवा खिडक्यांच्या चौकटी बसवण्याचं काम चालू आहे का याचा कसून शोध घे
तात्पुरता उपाय म्हणून गीतान्जलीने सुचवल्याप्रमाणे पेपर किंवा जुना टॉवेल ओला करून ठेव. पोळ्या लाटताना आजूबाजूला उडालेलं पीठ पुसण्याचे कष्टही थोडे कमी होतील.
Pages