स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेचेल रे चा हार्ड अ‍ॅनोडाइज कुकवेअर सेट कोणी वापरलाय का?
किंवा अजून कोणता चांगला सेट आहे अ‍ॅमेझॉन वर वगैरे...

माझ्याकडे Inalsa चा Maxi cream coffee maker आहे. आधी खुप छान कॉफी व्हायची. अजुनही कॉफी छान होते पण coffee maker च्या खाली पाण्याचे तळे झालेले असते. आधी अगदी काही थेंब पाणी खाली जमा व्हायचे. हे पाणी कुठुन येते ते समजत नाही. जवळजवळ ३ कप पाणी maker मधे घातले तर १/२ कप पाणी बाहेर येते. कुणाला माहीत आहे का की असे का होते आणी काय केल्याने हा problem थांबेल?

ईथे पहा : http://appliances.pricedekho.com/coffee-maker/inalsa/inalsa-maxi-cream-c...

मला भारतातील फ्रीजमध्ये ठेवायला पाण्याच्या बाटल्या सुचवा ना?

ज्या चांगल्या ब्रँडच्या आहेत व फूड सेफ मटेरिअल वापरून केलेल्या आहेत.
सध्या स्टिलच्या वापरतात.
रोज घासायला स्वच्छ अश्या सुचवा.... ब्रँड आणि लिंक असेल तर द्या.

झंपीला चिमटा. मलाही फ्रिजच्या बॉटल्स बदलायच्या आहेत. आत हात घालुन घासता वगैरे येतील अशा बॉटल्स आहेत का मार्केटमध्ये? ब्रशने तितक्याशा साफ निघत नाहीत बॉटल्स.

टपर वेअर ल पर्याय नाही. पण फार महाग वाटत असतील तर लॉक लॉक चे जार्स किंवा बॉटल्स चांगला पर्याय आहे. तळाशी त्रिकोणात ५ आकडा पाहून घ्या.
योडे तुला हे आत हात घालून सहज घासता सुद्धा येतील. आणि फार किंमत नसल्याने दर ६ महिन्याला बदलू सुद्धा शकतो.

HPL735-Lock-Lock-Water-Jug-2L-1.jpg428deff8c2d217a54fd2f13e88614bed_ra,w403,h403_pa,w403,h403.jpg

आता उन्हाळ्याचे खरंतर माठच वापरता येतील की! कोणत्याच बाटल्या भरून फ्रीजमधे ठेवायला नको..
लागेल तसे गारेगार पाणी तांब्यात भरून वापरायचे!

फ्रिजमधून पाण्याच्या बाटल्या काढण्यासाठी बराचवेळा उघडला जातो आणि त्यामूळे वीज जास्त खर्च होते.
त्यापेक्षा एखाद्या मोठ्या फ्लास्क मधे ( आता वरुन प्रेस करायचे फ्लास्क मिळतात ) एकदाच थंड पाणी भरुन ठेवले तर वीजेची बचत होते.

मी लॉक लॉक चे डबे कडधान्ये फ्रीज मध्ये ठेवायला वापरली आहेत. पण त्यांना १ वर्षातच चिरा पडल्या & अपारदर्शकपण झाले. पण मी कोरडे धान्य ठेवले होते.

त्या लॉक लॉकमधेच बराचसा माल डुप्लिकेट असतो. नीट चांगल्या सुपर मार्केट अथवा दुकानातून घ्यायला हवा.

अर्थात माझे मत टप्परवेअरलाच! पुरेपूर पैसावसूल होतो.

त्या लॉक लॉकमधेच बराचसा माल डुप्लिकेट असतो. नीट चांगल्या सुपर मार्केट अथवा दुकानातून घ्यायला हवा. >>>>>>
बहुदा मला डुप्लिकेट माल मिळालेला दिसतोय

नताशा, मला अद्याप कंटाळा आलेला नाही. Happy पण ड्राय स्टोरेजचे डबे मला इथल्या दमट हवेत पण चांगले उपयोगी पडत आहेत.

स्टेनलेस स्टीलचा कुकवेएर सेट कोणता चांगला आहे? कुणी वापरला असल्यास नॉनस्टिक आणि स्टील सेट पैकी कशात भारतीय स्वैंपाक चांगला होतो ते सांगाल का प्लीज Happy
चपाती/फुलक्यांसाठी हा तवा चांगला आहे का? भारतात स्वस्त मिळेल का?

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/135932.html?1225461203
रामी ईथे पहा. कोणे एके काळी स्टेनलेस स्टीलच्या कुकवेअर बद्दल ईथे चर्चा झाली होती. मी स्वतः कॅल्फलान स्टील वापरते. नॉनस्टिक हद्दपार करायचं म्हणून ह्यात ईन्व्हेस्टमेंट केली. पण टोटली वर्थ द मनी स्पेंट. पण कार्लं , बटाटा इत्यादी काचर्‍या भाज्या लागतात ह्यात सो तेवढ्यापुरतं एक नॉनस्टिक भांडं ठेवलंय अजून वापरात.

ः कॅल्फलान स्टील >> खूप छान आहेत ही भांडी. जरी भाजी वगैरे लागली तरी गरम पाणी घालून ठेवलं तर लगेच लख्ख निघतात. Happy पण खूपच जड असल्याने कधी कधी वापरायचा कंटाळा केला जातो.

मी ब्रँडनेम विचारात न घेता स्टीलची भांडी घेते फक्त जाड आहेत ना ते बघून. १८/१० लिहिलेलं असतं त्यावर पण त्याचा अर्थ काय ते मला माहित नाही.
एक आयकिया मधलं स्टील चं भांड आहे पसरट(१० इंची) आणि झाकण असलेलं. ते मला फार आवडतं.
महत्वाचा फायदा म्हणजे डिशवॉशरला लावू शकते. नॉन्स्टिक हाताने धुवावी लागतात. माझ्याकडे नॉनस्टिक मोजून २ भांडी आणि १ तवा आहे. बाकी सर्व स्टील!

मी पण जे आवडेल ते, जमेल तसं असं करीत भांडी (स्टीलची) जमवत आहे. सेट मधली एकाच टाईपची नकोयेत म्हणून.

आटा मेकर घ्यायचाय मला. कोणत्या कंपनीचा चांगला आहे?? ऑटोमॅटीक नकोय मला. पीठ चांगलं मळलं जातं का त्यात??

Pages