Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एअर फ्रायर कुणी वापरुन
एअर फ्रायर कुणी वापरुन बघितलाच नाही का ? अगदी ओली भजी / वडे नाही तळले जायची. पण चिप्स, चिकन, समोसे वगैरे होतील असे वाटतेय.
मिल्क बॉयलर वापरण्याचा कुणाला
मिल्क बॉयलर वापरण्याचा कुणाला अनुभव आहे का?
या चित्राततल्या सारखा एक मिल्क बॉयलर / कुकर आणला होता
पण पहील्या दिवशी त्याच्या शिट्टी मधुन वाफे बरोबरच पाणीपण बाहेर पडत होतं. पण वाफ कमी आणि पाणी जास्त होत. आणि शिटी सुद्धा नीट झाली नाही.
नंतरच्या दिवशी दुध तापवुन झाल्यानंतर दिवसभर या कुकर मधेच ठेवल होत ते नासल.
हा कुकर / बॉयलर वापरण्याची योग्य पद्धत कोणती? किती पाणी टाकावे? आता नवीन पाणी टाकावे लागेल हे कसे कळते? या कुकर मधे ठेवलेले दुध का नासते?
अभिजित, कुठे मिळाला हा कूकर ?
अभिजित, कुठे मिळाला हा कूकर ? २५ वर्षांपुर्वी लग्नात आहेर द्यायला म्हणून छान असायचा. त्याबद्दल मुख्य आक्षेप म्हणजे त्यात तापवलेल्या दूधावर साय जमत नसे. बहुतेक जून्या घरात तो अडगळीत पडलेला असेल.
तूमचा कूकर जर टेक्निकली ठीक असेल, तर तूम्ही त्यात जास्त पाणी भरताय. तेच उसळून बाहेर येतेय.
आतल्या पाण्यामूळे दूधाचे नेमके तपमान गाठले जात नाही. आणि त्यामूळे ते नासते. दूध गरम करायला, जाड स्टीलचे पातेले ( ठोक्याचे मिळाले तर चांगले ) वापरा. नेहमी दूध घेत असाल त्यापेक्षा जरा मोठे घ्या म्हणजे दूध वर येताना दिसले कि गॅस बंद करायला, काही सेकंद वेळ मिळतो.
या कूकरचा काहिही उपयोग होत नाही.
@अभिजित नवले : माझ्याकडे बरीच
@अभिजित नवले : माझ्याकडे बरीच वर्ष हा मिल्क कुकर आहे ... दोनदा दुध तापवलं तर नासत नाही. याचा फायदा / उपयोग म्हणजे दूध ऊतू जात नाही, सारखं बघत बसावं लागत नाही.
पाणी बाहेर येतंय म्हणजे जास्त पाणी झालंय ... साधारण अर्ध्या पेक्षा थोडंस्सं कमी पाणी भरायचं मग मस्स्त दणदणीत शिट्टी होते !
आणि या कुकरात तापवलेल्या
आणि या कुकरात तापवलेल्या दुधाचा चहाही नीट होत नाही...
कारण - दूध फक्त वाफेवर तापतं... (सॉर्ट ऑफ- उकडतं?)...
मनिमाऊ, आज कोबी कापुन पाहिला.
मनिमाऊ,
आज कोबी कापुन पाहिला. मस्तच कापला जातो एका मिनीटात.
थँक्यु
आता इतर भाज्याही कापुन पाहीन.
केक / ब्रेड चे बॅटरपण चांगले होईल ना यात. करुन पहायला हवे.
@दिनेशदा हा कळंबोलीत मिळाला.
@दिनेशदा हा कळंबोलीत मिळाला. आम्ही एक विषिश्ट प्रकारचा डिझायनर पिण्याच्या पाण्याचा स्टिलचा पिंप शोधत फिरत होतो. तो शोधता शोधता कळंबोलीत पोहोचलो आणि हा कुकर घेउन आलो. :स्मितः
आम्ही पण असा कुकर पहील्यांदाच पाहीला. कन्सेप्ट आवडली म्हणुन घेतला. दुध उतू जाउ नये म्हणुन सारख लक्ष ठेवाव लागत नाही आणि शिटी झाल्यावर कळते. पण नंतर लक्षात आले की काहीही उपयोगाचा नाही. आमच्या एका परिचीतांना सुद्धा असाच अनुभव आला.
आता आम्हीपण तो कुकर अडगळीत टाकला आहे.
@चमकी हो कमी पाणी टाकुन परत कधितरी प्रयोग करुन बघेन
@योगेश मी चहा घेत नसल्यामुळे समजल नाही पण काही विषेश फरक जाणवला नाही. दोनच दिवस वापरल्यामुळे असेल.
मिल्क कुकरः आयुष्याची ८ वर्षे
मिल्क कुकरः
आयुष्याची ८ वर्षे हा वापरलेला आहे. होस्टेलभर.
दुधाचा उत्कलन बिंदू पाण्यापेक्षा कमी आहे. पाणी उकळले, की दूध निर्जंतुक होते. सायही धरते, पण जास्त नाही. अशीही होस्टेलला ती फेकूनच द्यावी लागे.
एकदाही दूध नासलेले नाही.
तुम्ही पाणी जरा जास्तच भरत आहात.
@इब्लिस पण किती पाणी भरले
@इब्लिस पण किती पाणी भरले म्हणजे जास्त/ मध्यम / कमी हे कसे कळणार कारण दिसत तर नाही?
नेहमीच्या भाताच्या कुकर मधे किती पाणी आहे ते दिसते.
तुम्ही नक्की किती पाणी टाकत होता. आम्ही हा २ लिटर चा कुकर आणला आहे. प्रत्येक वेळी दिड लिटर तरी दुध असतेच.
दुध तापत असताना ते झाकण ठेवायच असत की नसत? त्याने काही फरक पडतो का?
अरेच्या हा मी रोजच वापरते
अरेच्या हा मी रोजच वापरते बिनधास्त अगदी.. साय कमी येते मान्य पण बघावे लागत नाही आणी स्टीलच भांडं करपले की घासताना होणारा ताप ही वाचतोय. जरासा भिजवुन पाणी भरुन ठेवले की लगेच निघते हे भांडे. दूध पहिल्यांदा तापवताना फुल्ल शिटी आणायची .. नंतर थोडी आणली तरी चालते. पाणी माझे पण बाहेर सांडते पण ते पहिल्या वेळेसच..
अभिजीत, पाणी पूर्ण भरा, अन मग
अभिजीत, पाणी पूर्ण भरा, अन मग थोडे सांडून टाका
बुडाच्या ग्यापमधे मात्र पूर्ण हवे. साईडच्यात नाही आले तरी चालेल. कुकर आणला त्या डब्यावर लिहिलेलं नाहियेका काही? थोडं ट्रायल & एररने येईल लक्षात. सुमारे अर्धा-पाऊण ग्लास पाणी लागत असावं.
माझ्या आईकडेही असा मिल्क कुकर
माझ्या आईकडेही असा मिल्क कुकर आहे जो मला कळत असल्यापासुन तरी कडधान्ये भरुन ठेवण्यासाठी वापरला जातो.
फुप्रो मध्ये पिठ मळताना पाणि
फुप्रो मध्ये पिठ मळताना पाणि आणि पिठाचे प्रमाण किति घ्यायचे?
पायरेक्सचा स्टोरेज सेट आणी
पायरेक्सचा स्टोरेज सेट आणी कु.न्कि.न्ग सेत असे वेगवेगळे येत्तत का?
अमृता, असे पाण्याचे प्रमाण
अमृता, असे पाण्याचे प्रमाण नक्की सांगता येणार नाही. पीठाचे प्रमाणे, प्रकार आणि तुला किती घट्ट कणीक हवी आहे यावर पाणी किती घालायचं ते ठरेल.
मी फुप्रोमधे कणीक, तेल, मीठ घालून एकदा सर्रकन फिरवून घेते. मग लागेल तसे पाणी हळू हळू घालत फिरवायचे. एकदम भस्सकन पाणी ओतून द्यायचे नाही. सुरूवातीला अंदाज येइपर्यंत अगदी चमचाचमचाभर पाणी घाल. पाणी घातल्यावर कणीक चांगली फिरू देत. म्हणजे त्याचा गोळा व्हायला लागेल. असा गोळा व्हायला लागला की पाणी घालणे थांबव, मग कणीक पूर्ण एकजीव होऊन एकच गोळा बनेल. आता फुप्रोमधून कणकेचा गोळा बाहेर काढ. तेलाचा हात लावून एकदा मळून घे.
रोजच्यारोज अशी कणीक भिजवलीस तर पाण्याचा अंदाज तुला आपोआप यायला लागेल. कणकेचा ब्रॅंड बदललास किंवा गव्हाचा प्रकार बदललास तर अंदाज घेऊनच पाणी घालत जा.
नंदिनी, << मी
नंदिनी,
<< मी फुप्रोमधे कणीक, तेल, मीठ घालून एकदा सर्रकन फिरवून घेते. मग लागेल तसे पाणी हळू हळू घालत फिरवायचे. एकदम भस्सकन पाणी ओतून द्यायचे नाही. सुरूवातीला अंदाज येइपर्यंत अगदी चमचाचमचाभर पाणी घाल. पाणी घातल्यावर कणीक चांगली फिरू देत. म्हणजे त्याचा गोळा व्हायला लागेल. असा गोळा व्हायला लागला की पाणी घालणे थांबव, मग कणीक पूर्ण एकजीव होऊन एकच गोळा बनेल. आता फुप्रोमधून कणकेचा गोळा बाहेर काढ. तेलाचा हात लावून एकदा मळून घे. >>
अगदी बरोबर, मी exactly असच करते तू लिहिलयस तस.
कोणी ईलेक्ट्रीक तन्दूर वापरला
कोणी ईलेक्ट्रीक तन्दूर वापरला आहे का?
चिंगी अग पाणी घालताना
चिंगी अग पाणी घालताना पहिल्यांदा एखादे ग्लास घेऊन त्यातले पाणी थोडे थोडे घालून बघ. पीठ ही मापाने घे. एकदा प्रमाण नक्की झाले की मग पुन्हा पुन्हा अंदाजे घ्यावे लागत नाही .
माझे पाण्यासाठी मापाचे ग्लास , प्लास्टीक चा चमचा पिठासाठी आणि छोटा चमचा मीठासाठी हे प्रमाण पक्के ठरले आहे. त्यामुळे विचार न करता लगेच पीठ मळता येते आणि नवर्याला वैगरे ही कधी सांगता येते. कारण एकदा प्रमाण नक्की झाले की चुकायचे चान्सेस नसतात.
पीठ चिकट झाले नाही तर भांड्यालाही लागत नाही आणि भांडे स्वछ करायला त्रास होत नाही.
धनश्री..मी ईलेक्ट्रीक तन्दूर बद्दल मगे विचारले होते पण कोणाचा रीप्लाय आला नाही.
बर्ज चा डेमो बघून मी एक्दम इम्प्रेस झाले होते ...पण चौकशी केल्यावर कळले की त्याचा तेवढा उपयोग होत नाही आणि तन्दूर लवकर खराब होतो म्हणून प्लान कॅन्सल केला.
मोस्टली जेवढे पिठ त्याच्या
मोस्टली जेवढे पिठ त्याच्या बरोबर निम्मे पाणी हे प्रमाण कणिक मध्यम सैलसर भिजायला अगदी बरोबर बसते. फुप्रोमध्ये मळले तर ५ मि. झाकुन ठेवायचीही गरज पडत नाही. लगेच चपात्या करायला घेतल्या तरी चांगल्या होतात.
इलेक्ट्रिक तंदुर मीही पाहिला, बेक्कार आहे.
@ सावली & मनिमाउ बजाज फुप्रो
@ सावली & मनिमाउ
बजाज फुप्रो चे मॉडेल कोणते घेतले ?
फुप्रोच्या फीडरट्युबमधून
फुप्रोच्या फीडरट्युबमधून पाण्याची बारीक धार धरायची, पिठाचा गोळा व्हायला लागेपर्यंत.
साधना, सामी बरे झाले
साधना, सामी बरे झाले सान्गीतलेत. मी पण ईम्प्रेस झाले होते.
जेम्स, बघायला लागेल. मला
जेम्स, बघायला लागेल. मला बजाज एवढंच माहित आहे. घरी बघुन लिहेन.
भरत, येस्स मी पण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच फीडरट्युबमधुन पाणी टाकत टाकत एकसारखा स्मुथ बॉल होइपर्यंत फिरवत रहाते. एकदम पाणी टाकलं कि अंदाज हमखास चुकतो.
धनश्री, जागा आणि उत्साह असेल
धनश्री, जागा आणि उत्साह असेल तर कोल तंदुर आण. यावर चिकन/वेज बार्बेक्यु फार मस्त होते. फक्त झंझट म्हणजे नंतरची साफसफाई. शिवाय लार्ज क्वांटिटी असेल तरच ते कोल पेटवणं बरं पडतं. माझ्याकडे वेबरचा आहे. मित्रमंडळी आली तर फार उत्साहाने वापरला जातो, इतरवेळेस असुन अडचण.
एकदम भस्सकन पाणी ओतून द्यायचे
एकदम भस्सकन पाणी ओतून द्यायचे नाही>>>>पस्तावलेय मी आधी... पण आता ठरलेलं प्रमाण, ठरलेल्या गव्हाचं दळण आणि मला लागते त्या किंचित सैल कणकेचं नजरेला बसलेलं टेक्श्चर यांमुळे मी घाईच्या वेळी अंदाजाने पण बरोबर भस्कनच ओतते पाणी! :).
जेम्स, बघायला लागेल. मला बजाज
जेम्स, बघायला लागेल. मला बजाज एवढंच माहित आहे. घरी बघुन लिहेन. >>> ममा, FX10 किंवा FX11 असेल. माझ्याकडे FX10 आहे. ७ वर्ष झाली वापरते आहे विनातक्रार
http://www.flipkart.com/bajaj
http://www.flipkart.com/bajaj-fx11-food-factory-processor/p/itmd7yzryzst...
हा तर नाही ना ?
जेम्स, माझ्याकडे FX10 आहे.
जेम्स,
माझ्याकडे FX10 आहे.
होय, हा FX11 आहे. माझ्याकडे
होय, हा FX11 आहे. माझ्याकडे FX10 आहे.
धन्यवाद. एफेक्स ११ घ्यावा का
धन्यवाद.
एफेक्स ११ घ्यावा का ?
Pages