समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

या चर्चेच्या निमित्ताने एक प्रश्न पडला आहे, त्याचा काही वेळा ओझरता उल्लेख देखील झाला होता.
येथे जे लोक या असल्या प्रकारांना सपोर्ट करत आहेत त्यांनी कृपया उत्तर द्यावे (आग्रह नाहीये)
समलैंगिकता मान्य आहे तर बहुपत्नित्व / बहुपतित्व का मान्य नाही ???
समजा एखाद्याला किंवा एखादीला एक पत्नी/पती असताना दुसरा विवाह करावासा वाटला आणि याला त्या तिघांचीही सम्मती असेल तर असे करणे योग्य / नॉर्मल / नैसर्गिक / कायदेशीर आहे की नाही ?
(मुस्लिम धर्माव्यतिरिक्त इतर सर्व धर्मांसाठी कायदा आणि समाजमान्यता काय आहे ? आणि तशी का आहे ?)>>तुला खरच चर्चा हवी असेल नि उगाच फाटे फोडणे हा हेतू नसेल तर नवीन बाफ उघड ना.

काही ड्युआयडींनी आता धाग्याची वाट लावायला सुरुवात केलीच आहे तेव्हा थांबावे हे उत्तम. >> मला वाटतं जे सदस्य व्यवस्थीत चर्चा करतायत किंवा ज्यांना करायची आहे त्यांनी असल्या खोडसाळ प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावं. सर्वजनीक फोरम असल्याने या गोष्टी पूर्णपणे टाळणं कठीण. पण अश्यांना मुद्दाम प्रतिसाद किंवा लक्ष देउन कोलीत देऊ नये Happy

>>तुला खरच चर्चा हवी असेल नि उगाच फाटे फोडणे हा हेतू नसेल तर नवीन बाफ उघड ना.
देअर यू आर. मला पण पोस्टल्यानंतर लक्षात आले की यासाठी वेगळा धागा असला पाहिजे.

<मी धाग्यावर येथेच मान्य करतो की शास्त्रीय आधारावर सद्द्यस्थितीत समलैंगिकता नैसर्गिक आहे आणि माणूसकीच्या आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने समलैंगिकाना समाजात सामावून घेतले पाहिजे आणि बाकीना जे-जे हक्क आहेत ते सर्व ( लग्न, कायदेशीर हक्क, मुले) मिळायला हवेत.

काही गोष्टी पटत नाहीत. पण मान्य कराव्या लागतात कारण बहुदा त्या बरोबर असतात. इथल्यांचे arguments तितकेसे convincing नव्हते पण त्याना काय म्हणायचे होते ते मला समजले. >
सुलु, अभिनंदन आणि धन्यवाद.
पुन्हा जेव्हा कधी अशी चर्चा उद्भवेल, तेव्हा 'या' बाजूने येऊन कन्व्हिन्सिंग ऑर्ग्युमेंट्स कराल अशी आशा आहे.

vaiyaktik sherebaji, uphasamak ani akrastalya posts delete vhavyat.

आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने समलैंगिकाना समाजात सामावून घेतले पाहिजे>>>>> समजाची उन्नती ? समलैंगिकाना समाजात सामावून घेतले तर समाजाची उन्नती कशी होणार हे जरा सांगता का समजाउन ?

मी आधीच पोस्ट केलेले परत करतो - शास्त्रीय माहिती आहे . Offspring inherit traits from both parents. This means that sex results in the creation of genetic variation and thus offers living things a way to change over time—it provides a means of biological evolution.

आता समलैंगिक संबंधातुन समाजाची उन्नती (evolution) कसे होणार हे सांगाच!

ज्यांना समलैगिक संबंध मान्य आहेत त्यांना हा प्रश्न आहे - जर कोणी bisexual असेल तर ?
तर तुम्हि त्याला किंवा तिला दोन लग्न करायची परवानगी देणार का ? आणी त्याची पत्नी किंवा पती देखील bisexual असेल तर ? तोहि दोन लग्न करु शकतो का ? मग कोणी कोणाच्या घरी रहायाचे ? का अशा ५०-६० जणांनी एकत्रच रहायचे ? आणी त्यांच्या मुलांचे काय ? त्यांनी कोणाचे नाव लावायचे ? कायदा कसा बनवायचा ? आणी त्यांना दोन लग्न करायला परवानगी तर मग सरळ ( straight) माणसांना एकच तर मग समान नागरी कायद्याचे काय ? जर गे लोकांना त्यांच्या orientation प्रमाणे लग्नाची परवानगी मिळत असेल तर bi लोकांनाही त्यांच्या orientation प्रमाणे लग्नाची परवानगी द्यावी लागेल !

सिरियस प्रश्न आहे.

बाकि या त्रिखंडात पहिले जे कोणी नर आणी मादि जन्माला आले ( जीवस्रुष्टितील जो कोण पहिला प्राणी असेल) ते जर समलिंगी असते तर काय झाले असते याचा विचार समलिंगी संबध नैसर्गिक आहे हे म्हणणार्या लोकांनी करावा!>>> तुमच्या बेसिकमधे राडा आहे तो आधी नीट करा.
कोणत्याही स्पेशीजचे 'एकच जोडी' नर-मादी असे कधीच तयार होत नसतात. त्यामुळे लाखो जोड्यांपैकी काही समलिंगी असल्या तरी फरक पडत नाही.
आणि जीवसृष्टीतील प्राण्यात समलिंगीच काय पण हर्माफ्रोडाईट (एकच प्राणी नर आणि मादीही), पर्यावरणाच्या सिग्नल्सप्रमाणे लिंगबदल करु शकणारे असे अनेक प्रकार आहेत.
मुळात मानवी लिंगभेद हा शाळेत शिकवतात तसा फक्त 'XX'-'XY' पेक्षा कितीतरी जास्त गुंतागुंतीचा प्रकार आहे त्यामुळे त्यात समलैगिकता तयार होणे नैसर्गिक आहे.

कोणत्याही स्पेशीजचे 'एकच जोडी' नर-मादी असे कधीच तयार होत नसतात>> मग काय तयार होतात ? दोन समलिंगी ? आणी ते दोन straight ना जन्माला घालतात ? फारच इनोदी बूवा !

मुळात मानवी लिंगभेद हा शाळेत शिकवतात तसा फक्त 'XX'-'XY' पेक्षा कितीतरी जास्त गुंतागुंतीचा प्रकार आहे त्यामुळे त्यात समलैगिकता तयार होणे नैसर्गिक आहे. >>>> फारच इनोदी बूवा !

लिंगभेद, XX-XY chromosomes , समलैगिक orientation ! तुम्हाला नक्किच नोबेल मिळणार संशोधनातील तीहि दोन दोन एकाच वर्षात! . मी screen shot पाठवला आहे नोबेल समितीकडे! Proud

असो तुमच्या बेसिकमधे राडाच नाहि तर राडारोडा आहे तो आधी नीट करा. Biggrin

भारतीय, माझं विधान तुम्ही वापरलत म्हणून तुमच्याशी बोलतोय. सुलू परमेश्वर नाही. म्हणून अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी त्यांना मुद्दा का पटला याचं स्पष्ट विवेचन केलय. ज्यांना नाही पटत त्यांनी तो पटवून घ्यायलाच हवा म्हणून कोणी त्यांचा दारात धरणं धरलं नाही.
तुम्ही मांडलेले मुद्दे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत. प्रत्येक अंगाची उपअंगे असतातच. त्यामुळे त्यावर साधकबाधक चर्चा करायला हरकत नाही. चर्चा करण्यासाठी हे मुद्दे पुढे आणत असाल तर नक्कीच चर्चा करता येईल. पण वाद घालण्यासाठी, फाटे फोडण्यासाठी किंवा इतरांना मुर्ख ठरवण्यासाठी हे करत असाल तर मग यावर बोलण्यात अर्थ नाही.
समलैंगिकतेवर मी माझं मत मांडलं याचा अर्थ नक्कीच हा होत नाही की मी उद्या त्यांचे झेंडे घेऊन त्यांच्या कोणत्याही अवास्तव मागणीसाठी धावत सुटेन. इथे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने मत नोंदवावं अशी अपेक्षा आहे. कुणाचही मतपरिवर्तन व्हावं किंवा त्याने सामुहीक शपथा घ्यावा असा कुणाचा अट्टाहास नाही. असा प्रकार असला तर मग 'वांग्याची भाजी खावी की खावू नये' हा बाफ आणि 'समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता असावी की नसावी हा बाफ'... दोन्ही एकाच पातळीवर येतात.

भारतीय, माझं विधान तुम्ही वापरलत म्हणून तुमच्याशी बोलतोय. सुलू परमेश्वर नाही. म्हणून अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी त्यांना मुद्दा का पटला याचं स्पष्ट विवेचन केलय>>>>>> त्यांनी तो मुद्दा का पटलाय याचे काहिच विवेचन केले नाहि, ना त्यांनी मी विचारलेल्या लोजिकल प्रश्नाचे उत्तर अजुन दिले आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात काय उद्देश आहे ते मला अजुनहि कळत नाहि. केवळ तुमचा समलैगिकतेला पाठींबा आहे आणी त्या तुमच्या कंपुत सामील झाल्या म्हणुन त्यांचे अभिनंदन करणे हा मला बालिशपणा वाटतो. त्यामुळे जे समलिंगकतेबद्दल विरोधाचे मुद्दे मांडत आहेत त्यांना मुर्ख ठरवण्यासाठी हे करत असाल तर बोलण्यात काहि अर्थ नाहि.

असा प्रकार असला तर मग 'वांग्याची भाजी खावी की खावू नये' हा बाफ आणि 'समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता असावी की नसावी हा बाफ'... दोन्ही एकाच पातळीवर येतात.>>>
बेसिक मध्येच राडा आहे
वांग्याची भाजी खावी की खावू नये ह्या बाफची पातळी कितीतरी वरची आहे कारण त्यात स्वताहात बदल होउ शकतो.
कितीहि कोणीहि इथे कितीही च्रर्चा केली , आदळाअपट केली तरी समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता असावी की नसावी या इथल्या चर्चेचा निर्णय घेणार्या लोकांवर काडिचाहि फरक पडणार नाहि.

भारतीय, तुम्ही त्यांना काय प्रश्न विचारलाय तो मला माहीत नाही. अभिनंदन यासाठी नाही की ते कंपुत आले वगैरे.. यासाठी की त्यांना मुद्दा पटला असल्याच त्यांनी इथेच जाहीर केलं आणि महत्त्वाचं म्हणजे समाजात होणारे बदल स्वीकारार्ह आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी पुर्वग्रहपिडीत मनाची कवाडं किंचित किलकिली करून पाहणेही सोपे नाही.
समलैंगिकतेच्या विरोधात मुद्दे मांडणारे मुर्ख आहेत अस मी कधीच म्हणालो नाही. तुम्ही जो मुद्धा मांडत आहात त्याला काहीतर पाया असणार. जसा तुमचा मघासचा मुद्दा मला पटला आहे. त्यावर चर्चा करता येईल असही माझ स्पष्ट मत आहे.

दुसरं म्हणजे वांग्याच उदाहरण यासाठी होत की दोन्ही बाफवर कितीही वाद घातला तरी जे 'होय' गटात आहेत ते तिथेच राहतील आणि 'नाही' वाले नाहीमधेच. हा त्यातला बेसिक थॉट.

जर निर्णय घेणार्‍यांना काहीच फरक पडत नसेल तर आपण इथे चर्चा करून आपला वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. हो ना ?

माझ्यापुरता या चर्चेचा संबंध इतकाच आहे की उद्या कायद्याने ओपिनियन पोल घेतला तर माझं मत मी मला हव्या त्या पारड्यात टाकू शकेन. कारण इथल्या चर्चेमुळे निदान मला हे कळलय की 'समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता असावी' हे माझं मत चूक नाही. हा मला झालेला साक्षात्कार आहे आणि तो माझ्यापुरता मर्यादित राहीला तरी गैर नाही. त्याच्या उपअंगावर किंवा त्यामुळे होणार्‍या परिणामांवर जर आपण चर्चा केली तर त्यामुळे काहीतरी चांगलच निष्पन्न होईल. हमरीतुमरीवर येऊन, एकमेकांच्या अकलेंच दिवाळं काढून तर कुणालाच काही साध्य होणार नाही.

तर त्यामुळे काहीतरी चांगलच निष्पन्न होईल. हमरीतुमरीवर येऊन, एकमेकांच्या अकलेंच दिवाळं काढून तर कुणालाच काही साध्य होणार नाही.>>> हे त्या आयड्यांना सांगावे हि विनंती.

जर निर्णय घेणार्‍यांना काहीच फरक पडत नसेल तर आपण इथे चर्चा करून आपला वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. हो ना ?>>>> तरीहि काहि लोक सुधारतील, जागे होतील, लोजिकल विचार करतील हि आशा असते म्हणुन मी माझा वेळ वाया घालवतो. Happy

>>तर त्यामुळे काहीतरी चांगलच निष्पन्न होईल. हमरीतुमरीवर येऊन, एकमेकांच्या अकलेंच दिवाळं काढून तर कुणालाच काही साध्य होणार नाही.>>> हे त्या आयड्यांना सांगावे हि विनंती.

अगदी अगदी पुर्णपणे अनुमोदन ! काय तर म्हणे मुद्देसूद आणि शास्त्रीय कारणे देत नाहीत विरोध करणारे.
फक्त सपोर्ट करणारे तेवढे चांगले बोलत होते आणि बाकीचे मुर्ख होते असाच सूर होता अनेकांचा. Angry

फक्त सपोर्ट करणारे तेवढे चांगले बोलत होते आणि बाकीचे मुर्ख होते असाच सूर होता अनेकांचा,
<<
बरोबर आहे तुमचे. तस सूर हवाच. सहमत.

सुलुभाऊंनी मुद्दा पटला म्हणून सांगितलं त्याच्याही आधी त्यांचं अभिनंदन (पान ११ आणि १६ वर) करण्यात आलं आहे. आणि ते अभिनंदन त्यांच्या मुद्द्यांबद्दल नसून, स्वतःच्या मुद्द्यांबद्दल पूर्वग्रह न बाळगता होता दुसरी बाजू समजून घेण्याचा जो प्रयत्न ते करत होते, याबद्दल होतं.

मुद्दा पटला या त्यांच्या प्रतिक्रियेनंतरच्या (पान १९ वर) स्वाती_आंबोळे आणि नीधपच्या प्रतिक्रियेत त्यांनी काय म्हटलंय ते ही वाचा.

'पिफ'ला काल 'द परेड' नावाचा अप्रतिम सर्बियन चित्रपट पाहिला. समलैंगिकांना मानवी हक्क नकोत म्हणणार्‍यांनी, परेडबद्दल गैरसमज असणार्‍यांनी तो जरूर बघावा.

अंड्या लहान आहे या चर्चेसाठी मात्र एवढे सांगू शकतो की प्रत्येक माणसाला त्याच्या आवडीनुसार जगायचा हक्क तोपर्यंत तरी नक्कीच असावा जोपर्यंत त्याचा इतर समाजाला त्रास होत नाही.

एखाद्या स्त्रीवर वाईट नजर ठेवणार्‍या पुरुषापेक्षा जोडीदाराच्या मर्जीने समलिंगी संबंध ठेवण्याची इच्छा बाळगणारा काय वाईट?

सार्वजनिक जागेत अश्लील चाळे करणार्‍या प्रेमी युगुलांपेक्षा चार भिंतीआड कोणी आपल्या आवड जपत असेल तर आपण का त्याचा त्रास करून घ्यावा.... उगाचच...

खरेच.. अक्षरशा निरर्थक आहे हा वाद.. जे या मताचे आहेत त्यांनी सरळ दुर्लक्ष करा.. इतरांनी आपापले कीबोर्ड झिझवत बसा.. जय राम जी की..!!!

समलैंगिकांना मानवी हक्क नकोत म्हणणार्‍यांनी, परेडबद्दल गैरसमज असणार्‍यांनी तो जरूर बघावा.>>>>>

तुम्हि कोठुन कोठे नेताय! समलैंगिकांना मानवी हक्क नकोत असे कोण म्हणाले ??? मी तरी नाहि म्हणालो. आणी इथले इतर लोक जे समलैगिकतेला विरोध करत आहेत त्यापैकीदेखील कोणी असे म्हणले असेल असे मला वाटत नाहि.

माझे म्हणणे आहे समलैंगिकता नैसर्गिक नाहि. आणी उगाचच भांडुन, वादावादी करुन, परेड काढुन समलैंगिकता नैसर्गिक आहे असा डिंडोरा पिटण्याएवजी, ती नैसर्गिक नाहि हे समजुन घेउन त्यावर काय उपचार करता येतील यावर संशोधन करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.
उदा. उद्या एखाद्या माणसाला जर शेण खायला आवडले - तर शेण खाणेदेखील कसे नैसर्गिक आहे ह्याबद्दल भांडाभांडी करण्यापेक्षा ते नैसर्गिक नाहि हे मान्य करुन ती मानसिकता बदलण्यासाठी काय उपचार करता येतील हे पाहणे महत्वाचे आहे.

एखाद्या स्त्रीवर वाईट नजर ठेवणार्‍या पुरुषापेक्षा जोडीदाराच्या मर्जीने समलिंगी संबंध ठेवण्याची इच्छा बाळगणारा काय वाईट?>>>>>>>
सार्वजनिक जागेत अश्लील चाळे करणार्‍या प्रेमी युगुलांपेक्षा चार भिंतीआड कोणी आपल्या आवड जपत असेल तर आपण का त्याचा त्रास करून घ्यावा....>>>>

परत बेसिक मध्येच राडा!
एखाद्या स्त्रीवर वाईट नजर ठेवणार्‍या पुरुषाची तुलना तुम्हि एखाद्या पुरुषावर वाईट नजर ठेवणार्‍या पुरुषाची करा. - दोन्हिहि वाइटच आहे.

काहिहि काय जोडताय!

जोडीदाराच्या मर्जीने सरळ संबंध ठेवण्याची इच्छा बाळगणे आणी जोडीदाराच्या मर्जीने समलिंगी संबंध ठेवण्याची इच्छा बाळगणे ह्याची तुलना करा - दोन्हित काहिहि वाइट नाहि पण पहिले नैसर्गिक आहे आणी दुसरे नाहि हा सरळ स्पष्ट फरक आहे.

वैयक्तिक शेरेबाजी कि़वा आडमुठ्या युक्तिवादांचा ( जे दोन्ही बाजूने होताहेत) विचार न करता या चर्चेतले सर्वमान्य होण्यासारखे मुद्दे आधी पाहू. ( इकडे किंवा तिकडे याव्यतिरिक्त आणखी बाजू असू शकते याचा विचार व्हावा ).

माझे आधीचे मुद्दे बाफच्या विषयाप्प्रमाणे कायदेशीर मान्यतेसंदर्भात असल्याने तेव्हढीच चर्चा व्हावी असे आग्रह धरणारे होते. जे कौतुक शिरोडकर यांच्या मताप्रमाणे अप्रस्तुत ठरतात. त्यांमुळे तो आग्रह मागे घेत आहे.

१. समलैंगिक जोडप्यांना मानवतेच्या आधारावर स्विकारले जावे. ( सध्या त्यांना विरोध होत आहे किंवा सामाजिक दृष्ट्या काही त्रास आहे याबद्दल अनभिज्ञता आहे ).

२. समलैंगिक आकर्षण हे पाप नाही. हा हार्मोनल इमबॅलन्स आहे. ( या संबंधी अभ्यासास अजूनही पुरेसा वेळ मिळालेला नाही. मात्र, हा मुद्दा पटण्यास अशा अभ्यासाची गरज वाटली नाही. पहिल्यापासून ही भूमिका कायम आहे).

३. अशा जोडप्यांना नैसर्गिक दृष्ट्या अपत्यप्राप्ती शक्य नाही. अपत्यप्राप्ती हा दृष्टीकोण नसेल तर काहीच बिघडत नाही. पण इतर मार्गाने मूल झाल्यास किंवा दत्तक वगैरे घेतल्यास त्याला कायदेशीर अधिकार मिळावेत. ( इथे हे मूल निव्वळ समलैंगिक संबंधातून निर्माण होईल किंवा कसे याबद्दल शंका आहे. कारण भिन्नलिंगी व्यक्तीचे सहकार्य त्यात आवश्यक वाटते. प्रयोगशाळेत अशा सहकार्याशिवाय मानव बनवणे हे कितपत नैतिक याबाबत चर्चा चालू आहे पण या श़ंकानिरसनाने पुन्हा फाटे फुटू नयेत. )

४. बंद दाराआड कोण काय करतं हा चर्चेचा विषय असू नये. ( लैंगिक आनंदाबाबत). ( इथे ही भूमिका फक्त अशा व्यक्तींबाबत मर्यादीत ठेवता येईल का ही देखील शंका आहेच).

खटकलेले मुद्दे

१. प्राण्यांमधे आहे म्हणून किंवा नैसर्गिक आहे म्हणून मान्यता द्यावी : याबद्दल विस्तृत भूमिका मांडलेली आहे.

२. लैंगिक आचरण कायद्याने रेग्युलेट होऊ नये - यातून काय उद्भवेल याची साक्ष दुसरा बाफ देतो आहे. दोन सज्ञान व्यक्तींमधे असलेले वेश्याव्यवसाय किंवा अनैतिक संबंध हे देखील रेग्युलेट करता येणार नाहीत.

३. नसैर्गिक उर्मी ( अनैतिक या शब्दाची व्याख्या तर यामुळे बादच ठरेल).

४. सामाजिक अस्वस्थता अयोग्य आहे. हा मुद्दा खटकण्यासारखाच आहे. कारण ज्याप्रमाणे छुपे अनैतिक संबंध, छुपा वेश्याव्यवसाय हा छुपा राहत नाही, च्रार भिंतींच्या आत काय होत असेल याबाबत समाजात आणि वयात येणा-या मुलांमधे चर्चा होत राहते त्यामुळे आपल्यासारख्या समाजात ( जिथे लैंगिक संबंधाबाबत चर्चा, शिक्षण याबद्दल निव्वळ भीती आणि गोंधळाचे वातावरण आहे) त्यात अस्वस्थता निर्माण होणार. इथे माझ्या किंवा इतरांच्या वैयक्तिक मताला किंमत राहत नाही. समाजाने असे संबंध स्विकारण्यासाठी मुळात समाजात प्रगल्भता हवी. ती यावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. केवळ मला कसे कळाले आहे आणि ज्यांना कळाले नाही ते कसे सेन्सिबल नाहीत असा दृष्टीकोण स्विकारून चालणार नाही. कायद्याने स्विकारलेल्या अनेक क्रांतिकारी बदलांना अद्याप सामाजिक मान्यता नाही यावरून काय ते समजावे.

५. समलैंगिक जोडप्याचे सहजीवन हा मान्य व्हायला किंवा स्विकारला जायला अडचणीचा भाग नसावा. पण त्यांचे लैंगिक संबंध नैसर्गिक आहेत हे अजूनही झेपत नाही. याबद्दल स्पष्ट लिहीण्याचे टाळल्याने मुद्दे अस्पर्शित राहून गेले खरे. समाज ज्ञा संबंधावर उभा आहे ते स्त्री-पुरूष लैंगिक संबंध. लग्न ही संस्था या संबंधांना सामाजिक/ नैतिक / कायदेशीर मान्यता देते. अर्थातच बळजबरी अशा संबंधात देखील "कायद्याने" मान्य नाही. दोन समलिंगी संबंधांच्या व्यक्तिंना त्यांच्यामधे असलेल्या केमिकल / किंवा हार्मोनल इमबॅलन्समुळे वैवाहीक दर्जाचा देण्यात यावा यात कायद्याने अडचण येईल असे वाटत नाही. थोड्या जागृतीने समाज देखील स्विकारेलच. (सध्या शहरातून अशी जोडपी असतीलच, त्यांना त्रास झाला किंवा कसे ? ).

याच मुद्द्याचा उपमुद्दा असा कि या जोडप्यांचे लैंगिक संबंधासंबंधी आचरण नैसर्गिक मानले जावे हे झेपत नाही. कारण निसर्गाने अशी कोणतीही व्यवस्था मानवी शरीरात केली नाही. मैथुनाआधीच्या क्रिया इतपतच ते शक्य आहे. प्रत्यक्ष दमन होण्यासाठी जी काही साधने वापरली जातील किंवा जे मार्ग वापरले जातील ते आजच्या समाजात निषिद्ध आहे, अनैतिक आहे. अशा प्रकारच्या संबंधात , (उदा. गे व्यक्तींच्या बाबत) दमन करून घेणा-याला आनंद मिळत असावा , त्याच्या जोडीदारास त्यातून नैसर्गिक आनंद मिळतो किंवा कसे याबद्दल शंका आहेत.

इतर मुद्दे
* वेश्याव्यसाय कादेशीर असावा का हा बाफ ग्रुपपुरता मर्यादीत ठेवण्यात आलेला आहे. यामागचे कारण कळू शकले नाही.

* नॉर्मल या शब्दावरून झालेल्या गोंधळाबाबत डॉ अभय बंग यांचा हवाला दिलेला आहे. त्यांना काय अभिप्रेत आहे हे पहावे ही विनंती. इब्लीस यांना हा मुद्दा क्लिअर झालेला असावा. ( याबाबतीत ते अधिकारी व्यक्ती आहेत).

* १९७३ पर्यंत अमेरिकन मानसशास्त्रज्ञांच्या सोसायटीतर्फे समलैंगिक संबंधांना मेण्टल डिसऑर्डर समजले जात होते. २००९ च्या एका लेखात याबद्दल वाचले होते. आज त्यांच्यातर्फे याबाबतीत जागृती होऊन योग्य ते बदल करण्यात आलेले आहेत.

* समलैंगितकता शारीरिक व्यंग किंवा वंध्यत्वाप्रमाणे समजले जावे याबद्दल चर्चा झालेल्या आहेत.

* हार्मोनल किंवा केमिकल इम्बॅलन्स ही संज्ञा मान्य झालेली आहे.

यापुढे काय संशोधन झालेले आहे याबद्दल चिनूक्सने आणि इतरांनी दिलेल्या लिंक्स वेळ मिळाल्यावर पाहू शकेन. त्यामुळे ब-याच शंकांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे अशी आशा वाटते.

* न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली आहे हा मुद्दा गोंधळात टाकणारा आहे. न्यायालय कायदेशीर मान्यता देऊ शकते का ही शंका आहे. मुळात न्यायालयाला कायदा बनवण्याचा अधिकार आहे का याबद्दलच शंका आहेत. न्यायायल संसदेला आदेश देते हे देखील न समजणारे आहे. न्यायालयाने अशा खटल्यासंदर्भात मत व्यक्त करणे आणि अशा मताचा आदर करीत त्याप्रमाणे कायदा बनवण्यासाठी संसदेने पुढाकार घेणे हे जास्त योग्य होईल का ? शेवटी कायदा संसदेतल्या चर्चेने जसा होईल तसाच बनेल (न्यायालयाचे मत बहुसंख्य सदस्यांना पटल्यास) असे वाटते. चुभूदेघे.

* अशा प्रकारच्या चर्चांमधे का भाग घ्यावा याबाबत कौतुक शिरोडकर यांचे निवेदन आवडले. आपली मतं घासून पुसून स्वच्छ होण्यास मदत होते हे खरंच. त्याचबरोबर काही बाबतीतल्या मतभेदांबाबत आदर ठेवला पाहीजे असही वाटतं.

अवांतर : इथे विषय उपस्थित झाला म्हणून. माझ्या मते अशा चर्चांमधे मत कोण मांडतं यापेक्षा काय मांडतं याला महत्व असलं पाहीजे. माझ्या मते इथे सर्व आयडी आहेत. फेक कि खरे हे महत्वाचं नाही. एखादं फेक प्रोफाईल संयमितपणे चर्चा करत असेल तर कुणाला आक्षेप असावा का ? त्याचप्रमाणे एखादं प्रोफाईल खरी व्यक्ती आहे म्हणून त्याला वाट्टेल तसं वागायचा परवाना असू शकेल का इतकच प्रश्न आहे. याबाबतीत नेटसभ्यता म्हणून प्रत्येक जण एक आयडी आहे असं ज्ञानेशने म्हटल्याचं आठवतं. अर्थात पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना हे ही आहेच.

धन्यवाद.

१ बेसिक प्रश्न - एखाद्याला समलिंगसंबंधांवर इतके भरभरून लिहावेसे का वाटावे ?

कोणीही वैयक्तिक घेऊ नये.

नक्कीच.... तूफान चालणार्‍या प्रत्येक बाफवर ... आणि तिथे तुफान लिहिणार्‍याने याचे उत्तर इतरांना नाही तर स्वताला प्रामाणिकपणे देणे अपेक्षित...

आता अंड्या मावळायला जातो.. अन उद्या उत्तराच्या प्रतिक्षेत पुन्हा उगवतो... शुभरात्री शब्बाखैर टाटा बाय बाय गोड गोड नाईट.. Happy

Pages