समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

महेश कालची आय बी एन लोकमत वरची चर्चा तुम्ही पाहिली असलीत तर चित्रा पालेकरांनी त्यात एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे की गर्भाची सेक्शुअ‍ॅलिटी ते गर्भात (पोटात) असतानाच निश्चित होते यावर रिसर्च सुरू आहे. तुम्ही म्हणताय तसं अमूक अमूक वयात हे होतं असं काही नाहिये, फक्त मुलाला/मुलिला ते विशिष्ट वयात जाणवू लागत जे सर्वांच्याच बाबतीत होतं. आणि तुम्ही म्हणता तसं एकवेळ गोडी गुलाबीने कुणीतरी अशा प्रकारचे संबंध ठेवायचा प्रयत्न केला तर मुलं आपोआप त्यापासून दूर जातील कारण ते त्यांच्यासाठी नैसर्गिक उर्मिप्रमाणे नाही.
काही दुर्गम भागात माणसं कच्चं मांस खातात, तुम्ही एखाद्यावेळेस ट्राय केलं किंवा तुम्हाला जबरदस्तीने/गोडीगुलाबीने खायला घालतं तर तुम्ही लग्गेच कच्चं मांस खाणारे व्हाल का?

तुम्ही जे म्हणत आहात की मुलाला/मुलीला ठरवू दे नॉर्मल आहे की नाही. मुळात यालाच माझा विरोध आहे.>> कळत्या वयातल्या मुलांच्या ईच्छेविरूध्द त्यांच्यावर पालकांनी जबरदस्ती केल्यास, ती मानसिक रूग्ण होण्याची (किंवा नैराश्यातून आत्महत्या करण्याची) शक्यता जास्त आहे.

>>तुम्ही जे म्हणत आहात की मुलाला/मुलीला ठरवू दे नॉर्मल आहे की नाही. मुळात यालाच माझा विरोध आहे.>> कळत्या वयातल्या मुलांच्या ईच्छेविरूध्द त्यांच्यावर पालकांनी जबरदस्ती केल्यास, ती मानसिक रूग्ण होण्याची (किंवा नैराश्यातून आत्महत्या करण्याची) शक्यता जास्त आहे.

असे होऊ नये ही मनोमन ईच्छा, पण जर झाले तर शक्य त्या मर्यादेपर्यंत प्रयत्न नक्की करेन मूल नॉर्मल होण्यासाठी (म्हणजे वैद्यकीय आणि मानसिक उपचारांच्या सहाय्याने) आणि त्याउपर देखील ही विकृती नाही बरी झाली तर पुर्णपणे संबंध तोडणे किंवा ते अगदी जुजबी आणि पाल्याला मदत या स्वरूपा इतकेच राहतील याची काळजी घेईन / घ्यावी / घेतलेली बरी.

Homosexuality is not a matter of choice. It is natural.

म्हणजे माणुस जन्माला येतानाच तो पुढे कसा होणार ते ठरलेले असते.

पण तरीही मला एक प्रश्न आहेच. मागे सत्यमेव जयते मध्ये मुलांच्या लैगिक शोषणावरच्या कार्यक्रमात हरिश या माणसाची मुलाखत होती; त्यात त्याचे लहानपणापासुनच कसे शोषण झालेले त्याबद्दल तो बोललेला. त्याचवेळी दुस-या एका कार्यक्रमात तो त्याच्या गे असण्याबद्दल बोलला. जर त्याचे असे शोषण झाले नसते तर तो चारचौघांसारखा झाला असता की शोषण असो वा नसो, तो पुढे जाऊन गेच झाला असता कारण त्याची नैसर्गिक उर्मी तीच होती? अर्थात अशा शोषणाला बळी पडलेली सगळीच मुले पुढे जाऊन समलिंगी झालीत असे मला म्हणायचे नाहीय पण ह्या गोष्टीचा मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो का?

महेश, ही विकृती आहे असे काही वर्षांपुर्वी समजत होते, आता नाही. पण जरी जे काय असेल ते, आपले मुल जर तसे असले तर त्याच्याशी संबंध का तोडायचे?

मानसिक विकृती असलेल्या तुमच्या मुलाला तुम्ही घराबाहेर काढणार का? कायमचे आजारी मुलाला घराबाहेर काढणार का? मग केवळ या बाबतीत त्यची मते तुमच्याशी जुळत नाहीत म्हणुन घराबाहेर काढणार?

आणि त्याउपर देखील ही विकृती नाही बरी झाली तर पुर्णपणे संबंध तोडणे किंवा ते अगदी जुजबी आणि पाल्याला मदत या स्वरूपा इतकेच राहतील याची काळजी घेईन / घ्यावी / घेतलेली बरी.>>> समलिंगी संबंध असो किंवा अगदी एखादा गून्हा असो मुलांशी संबंध हे चूक आहे.

बेबे
तो मूळातच गे होता. त्याची नैसर्गिक उर्मीच ती होती. आपल्याला पुर्ण माहिती नाही, पण कदाचित एखाद्या व्यक्तिला विश्वासाने त्याने ते सांगायचा प्रयत्न केला असेल आणि त्या व्यक्तिनेच त्याचे शोषण केले असेल असा माझा अंदाज आहे. एखाद्या हेट्रो स्त्रीवर बलात्कार होतो किंवा जर एखाद्या होमोसेक्शुअल व्यक्तिने जबरदस्ती केली (मग ती स्त्री असेल तरिही) तो बलात्कारच ठरतो आणि त्याचा मानसिकतेवर नक्कीच परिणाम होतो.

<(उमलत्या वयाच्या मुद्दाम म्हणत आहे कारण या वयातच ओरिएंटेशन बदलले जाण्याचा धोका जास्त असतो) मुलाला त्याच्या/तिच्या ध्यानीमनी नसताना जर अशा काही प्रसंगाचा (केवळ जबरदस्तीच नव्हे तर गोडीगुलाबीने जाळ्यात ओढणे देखील असू शकते) सामना करावा लागला आणि त्यामधे त्याचे/तिचे ओरिएंटेशन बदलले गेले किंवा इतर काही मानसिक परिणाम झाला तर ?> उमलत्या कशाला, कर्त्या सवरत्या मुलाला त्याचे ओरिंटेशन बदलण्यासाठी येनकेनप्रकारेण पालक मागे लागतात. जबरदस्तीने लग्न लावतात. मुलाचे लग्न लागले म्हणजे तो 'नॉर्मल' असल्याचा सामाजिक शिक्का त्याला लागला. आता त्याने घरात बायको आणि बाहेर बॉयफ्रेंड ठेवायला त्यांचा विरोध नसतो. (अनंत सामंत यांची कॉर्पोरेट मदर ही कादंबरी आठवली.)

<तुम्ही जे म्हणत आहात की मुलाला/मुलीला ठरवू दे नॉर्मल आहे की नाही. मुळात यालाच माझा विरोध आहे.> ओक्के.

एकतर टीनएजर्सना मिळणारे अतोनात वारेमाप स्वातंत्र्य आणि नको त्या वयात नको त्या गोष्टींची भरमसाठ माहिती मिळणे हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे : बर्बर. हे तुम्ही बीपी या चित्रपटाच्या संदर्भानेही लिहिलेले आठवले. ओक्केक्के

मघा वेळ होता म्हणून हा धागा पहिल्यापासून वाचायला घेतला. आता मांडलेले दांभिक मत महेश यांनी आधीही मांडलेले आहे.
आता पुन्हा तीच चर्चा नको असे कळवळून तेच सांगताहेत. मात्र काल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बातमी आल्यावर हा धागा त्यांनीच वर काढलाय.

हरिश अय्यरच्या ब्लॉगची लिंक सत्यमेव जयतेच्या त्या धाग्यावर दिली होती. त्याचे ठाम मत आहे की त्याच्या त्या अनुभवांमुळे तो गे झालेला नाही.

उमलत्या कशाला, कर्त्या सवरत्या मुलाला त्याचे ओरिंटेशन बदलण्यासाठी येनकेनप्रकारेण पालक मागे लागतात. जबरदस्तीने लग्न लावतात. मुलाचे लग्न लागले म्हणजे तो 'नॉर्मल' असल्याचा सामाजिक शिक्का त्याला लागला. आता त्याने घरात बायको आणि बाहेर बॉयफ्रेंड ठेवायला त्यांचा विरोध नसतो. (अनंत सामंत यांची कॉर्पोरेट मदर ही कादंबरी आठवली.) >> मयेकर जी +११११११११

सरकार वटहुकूम आणणार? रिव्ह्यु पिटिशनचाही विचार.

सोनिया गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

समलिंगी संबंध दूर राहिले, मुलांनी आपल्या आवडीच्या भिन्नलिंगी व्यक्तीशी लग्न करणे हे देखील अजूनही कित्येक पालकांना आवडत नाही. आपली मुले अल्लड मुर्ख असून त्यांना कुठल्याही बाबतीत कसलेच निर्णयस्वातंत्र्य असू नये असेच त्यांचे वागणे असते.
प्रेमविवाहाला मिळणारी समाजमान्यता दिवसेंदिवस वाढत आहे. मला आशा आहे की समलिंगी संबंधाना मिळणारी समाजमान्यता देखील हळूहळू वाढत जाईल.

आणि नैसर्गिक म्हणजे काय हे कोण ठरवणार? आपण जे कपडे घालतो किंवा ज्या प्रकारच्या घरांमध्ये रहातो ते नैसर्गिक आहे का?

>>
आणि त्याउपर देखील ही विकृती नाही बरी झाली तर पुर्णपणे संबंध तोडणे किंवा ते अगदी जुजबी आणि पाल्याला मदत या स्वरूपा इतकेच राहतील याची काळजी घेईन / घ्यावी / घेतलेली बरी.
<<

अहो, तुम्ही हे काय बोलताय?!

मयेकर, धन्यवाद योग्य निरिक्षणाबद्दल. माझी याबाबतीत ठाम मते आहेत (दांभिक असली तरीही).

>>आता पुन्हा तीच चर्चा नको असे कळवळून तेच सांगताहेत. मात्र काल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बातमी आल्यावर हा धागा त्यांनीच वर काढलाय.
मी ती बातमी येथे केवळ शेअर करण्याच्या उद्देशाने दिलेली होती. आणि आधीच झालेली चर्चा पुन्हा होऊ नये म्हणुन म्हणत होतो. पण काही मुद्दे अगदीच लिहावेसे वाटले म्हणुन मुद्दाम लिहिले.

>>अहो, तुम्ही हे काय बोलताय?!
पुर्ण विचार करूनच बोलतोय आणि ते माझे मत आहे, सर्वांनी असे करावे अशी कळकळ नक्कीच आहे दुराग्रह नाही.

खरेतर या विषयाशी माझा दुरान्वयेदेखील संबंध नाही, पण तरी देखील "बुडते हे जन न देखवे डोळा" असे कळकळीने वाटत आहे म्हणुन खुप लिहिले.

मला वाटते महेशंजीना जे बोलायचे आहे ते साधनाजीने उदादाखल सांगितले आहे... डॉ. सातीजीने पण एक लेख या माबो दिवाळी अंकात लिहिला होता..

महेशजी,
तुमची कळकळ खरी आहे पण अस्थानी आहे. स्त्रियांनी विकच्छ नेसायला सुरुवात केली तेव्हा, पहिला विधवा विवाह झाला तेव्हा, मुली शाळेत जाऊ लागल्या तेव्हा, पहिला आंतरजातीय विव्वह झाला तेव्हा अनेकांना 'बुडती हे जन..' असेच वाटले असेल.

प्रयत्न करूनही न सुधारलेला जुगारी किंवा दारुडा मुलगा असेल तर संबंध तोडने समजन्यासारखे आहे. केवळ गे आहे म्हणून असे करणे क्रूरपणा आहे. उलट त्यालाच जास्त सपोर्ट ची जरूरी असते. काही गे मुलांचे पालकही या खटल्यात वादी होते ही चांगली गोष्ट.

मागे टीव्हीवर एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री संभावना सेठ आणी रामदेव बाबा आमने सामने आले होते. संभावना प्रामाणिकपने हेच सांगत होती की तिचे काही मित्र गे आहेत आणी तीच त्यांची आयडेंटीटी आहे पण रामदेव बाबा अडेलतट्टू सरखे होते.

सोनिया गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल निराशा व्यक्त केली आहे

सलमान खुर्शीद यांनी दिलेली उपमा सार्थ आहे तर !

>>प्रयत्न करूनही न सुधारलेला जुगारी किंवा दारुडा मुलगा असेल तर संबंध तोडने समजन्यासारखे आहे. केवळ गे आहे म्हणून असे करणे क्रूरपणा आहे. उलट त्यालाच जास्त सपोर्ट ची जरूरी असते.

विकू, माफ करा पण तुम्ही ज्या दोन गोष्टी दिल्या आहेत (जुगारी किंवा दारुडा आणि गे) या दोन्ही प्रकारात माझे वरचे मत एकसारखेच आहे.

>>उलट त्यालाच जास्त सपोर्ट ची जरूरी असते.
मान्य, या प्रकारातुन बाहेर पडण्यासाठी सपोर्टची (जो हार्मफुल नाही असा) जरूरी आहेच की.
जुगारी किंवा दारुडा केसमधे सपोर्टची जरूरी कमी असते असे नाही.

मला वाटत बाल विवाह बंद झाल्यामुळे अशा गोष्टीकडे लोक वळत असावेत,

साधारण आजच्या पीढीचा पहिला समागम वयाच्या तीशीनंतर होत असेल तर तीशीपर्येंत निर्माण होणारे आकर्षण शमविण्याचा प्रयत्न होणे स्वाभाविक आहे, ते शमविण्यासाही उपलब्ध पर्यायाचाच प्रथमत: विचार केला जातो, शेवटी तो व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असल्याने त्याला गुन्हा ठरविणे योग्य नाही मात्र मागील चर्चेप्रमाणे, सार्वजनिक ठिकाणी किंवा जबरदस्तीने असे करणा-याला शासन आवश्यक आहेच.

उलट त्यालाच जास्त सपोर्ट ची जरूरी असते.
मान्य, या प्रकारातुन बाहेर पडण्यासाठी सपोर्टची (जो हार्मफुल नाही असा) जरूरी आहेच की. >> महेश तुमची समजून घेण्यात चूक झालिये. विकुंना इथे मुलांना त्यांची आयडेंटीटी जपण्यासाठी पालकांचा सपोर्ट हवा असतो.. असं म्हणायचं आहे, आयडेंटिटितून बाहेर पडण्यासाठी नव्हे.

>>मला वाटत बाल विवाह बंद झाल्यामुळे अशा गोष्टीकडे लोक वळत असावेत,
हा तर अजुन एक वेगळाच वादाचा विषय आहे. Happy

>>विकुंना इथे मुलांना त्यांची आयडेंटीटी जपण्यासाठी पालकांचा सपोर्ट हवा असतो.. असं म्हणायचं आहे, आयडेंटिटितून बाहेर पडण्यासाठी नव्हे.
पण माझे मत असेच आहे की असली आयडेंटीटी जपण्यापेक्षा त्यातुन बाहेर पडायला मदत केली जावी.
असो, पुन्हा पुन्हा तेच मुद्दे येत आहेत. म्हणुनच परत चर्चा नको असे म्हणत होतो.
वर एक नवा मुद्दा आला आहे, पण तो या धाग्याचा विषय नसल्याने त्यावरही चर्चा नाही करणार.

बाकी कोणत्याही विभागात धागा हलवला तरीही त्याचा सिरिअसनेस कमी होणार नाही.
फार तर सारे मुद्दे बोलून झाले असे म्हणता येईल.

वरदा तुला मोदक.... Lol Rofl
मी धन्यवाद, आवरा वगैरे शब्द आधी लिहिणार होते, पण विनोद ग्रुपात हलवणे जास्त वर्थ आहे Rofl

Pages