पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे पिकलेल्या बरक्या फणसाचे गरे आहेत बरेच [दोन दिवसन्पासुन शितकपाटात पडुन आहेत Sad ] . ते बरके असम्यामुळे कोणीच खात नाहीये. Sad

काय छानसं करता येईल त्यांच???
कोणी सांगू शकेल का??

दिनेशदा???
.................................................................................

शहाण्‍याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्‍यांच्‍यामागे वेडे....!!

अगं मनिषा, बरके गरे आवडत नाहीत??? (मला पाठवून दे Wink )

दोन दिवस ते फ्रिजमध्ये तू कशी काय ठेवू शकलीस?? Sad

त्याची सांदणं करता येतील(आवडत असतील तर) . ते गरे चाळणीत ठेवून खाली एक भांडं घेऊन हाताने दाबून त्याचा रस काढ. आठळ्या चाळणीत राहतील आणि त्याचा गर खालच्या भांड्यात जमा होईल. मग त्यात मावेल तेवढं तांदूळाचां पीठ घाल. केशर, वेलची घाल आणि इडलीसारखं उकडवून घे. आणि नारळाच्या दुधाबरोबर खायला दे.

पण बरके गरे आवडत नसतील तर हा पदार्थ कितपत आवडेल जरा शंकाच आहे. त्यातून तुला स्टंट्स करायचे असतील तर करून आणि खाऊन नक्की बघ... Happy

सॉरी मनिषा अती वाटेल पण बरके गर्‍याचे सांदणं अहाहा. हे कोणाला आवडू शकत नाही असे होत नाही असा माझा भ्रम होता. काश मला इथे बरके गरे मिळाले असते. Happy
काय घमघमात येतो तो केसर, गरे नी गूळाच्या वासाचा.

अरे हो, गूळ घाल हे सांगायचं राहिलंच......

मनू, जरा सविस्तर लिही की सांदणांचि रेसिपी.

अग मला जामच आवडतात
पण मी एकटीच खाते आहे.
मनु जरा सविस्तर कृती लिही ग
मी आजप्र्यन्त कधी सांदण खाल्लीच नाहीयेत चक्क :९ आणि केलीही नाहीयेत.
आज करुन बघते . कृती मिळाल्यावर Happy
.................................................................................

शहाण्‍याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्‍यांच्‍यामागे वेडे....!!

अगं मी वर लिहिलंय तसंच, फक्त त्या गर्‍यांच्या रसात चवीप्रमाणे गूळ घाल. आणि चाळणीवर ते गरे फेसवायचे... तांदूळाचं रवाळ पीठ मिळालं तर उत्तम, नाहीतर घरात असेल ते पीठ चालेल. नाहीतर तांदूळ धुवून टाकून थोड्याश्या तुपावर भाजून मिक्सरमधून बारीक करून घे, चागलं रवाळ पीठ मिळेल.

मंजु आणि मनु दोघीनाही धन्स ग.
आजच करुन बघते आणि उद्या सांगते. Happy

किती शिट्ट्या करायच्या कुकरच्या किंवा मग इडलीच्या भाण्ड्यात ठेवल तर किती वेळ मोठ्या व कित्ती वेळ बारीक गैसवर ठेवायच??
रस मिक्सरमधे फिरवुन काढला तर??

आणि हो जाता जाता आठळ्यांच्याही पाककृती सांगा. मी नुसत्याच ऊकडुन खाते आणि भाजी करते . पण आणखीन काय करत येईल?

.................................................................................

शहाण्‍याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्‍यांच्‍यामागे वेडे....!!

सांदण इडलीप्रमाणेच पंधरा मिनिटात उकडून होतात. त्या पिठात नारळाचे दूध वा ओले खोबरे घातले तर उत्तम चव येते. तसेच वरतून साजूक तूप घालून खायचे. हे थंड झाले तरी खाता येतात.
आठळ्या वांग्याच्या, गवारीच्या, तोंडलीच्या वा इतर कडधान्याच्या भाजीत घालता येतात. नेहमीच्या डाळीच्या आमटीत घालता येतात.
तसेच उकडून सोलुन, तुप,मिरची जिर्‍याच्या फोडणीवर घालून भाजी करता येते. त्यात खोबरे व दाण्याचे कूट घालायचे. हि भाजी उपासाला चालते.

दिनेशदानी उत्तर दिलेच पण तू सांदणं केलीस की इथे पाठव थोडी. Happy
हो, ओले खोबरे किसून टाक मस्त लागते. नाहीतर ओल्या नारळाचा रस ही टाक. पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटतेय की काश मला आजच बरका फणस मिळाला असता. गावाहून एक छोटा गोल बरका फणस यायचा. त्यात भरपूर गरे नी साखर/गूळ तर अजीबात लागणार नाही इतका गोड, रंग एकदम पिवळा धम्मक. त्यात केशराचा वास नी जुन्या बासमतीचा रवा मस्त लागतो. गरम गरम सांदणं वरून शुद्ध तूप केळीच्या पानावर काढून डायनिंग टेबलवर आई रविवारी सकाळी आणून ठेवायची. मी स्वतः नारळाच्या रसात सुद्धा बुडवून खायची. खावून पहा अशी. दुपारी मग अठळांची भाजी ,आमरस पुरी,रायतं जेवणात हमखास. मे महिन्यात अश्या पदार्थांची चंगळ. अह्हाहा.

अठळ्याची नुसती भाजी सुद्धा छान लागते. ओल्या असतील तरी मस्त. सुख्य असतील तर ठेव्चून कांदा खोबर्‍याचे वाटण घालून मटणाला मागे काढेल अशी भाजी बनते.

मिक्सीत रस कधी काढला नाही. पण हाताने काढ कारण गर्‍यात एक टोकाची जाड साल जरा चरबरीत लागेल. हाताने काढ गं, व्यायाम होइल. Happy
एक स्पेशल लाकडी चाळण असते गावाकडे वापरतात. नाही तर स्टीलचे घे नी काढ.

P5170905_0.jpg

घे ग मनु तुझ्यासाठी खास. सांदणं आणि नारळाचं दुधही.
मंजु, मनु आणि दिनेशदा आजच केली सांदणं आणि मस्त झाली होती तुम्हाला तिघाम्नाही धन्यवाद!!
आणि मंजुनी तर मला फोनवरुनही बरंच मार्गदर्शन केलं आणि चक्क माझा पहिलाच प्रयोग यशस्वी!! Happy

हा फोटु बघुन सांगा की अशीच असतात ना??
.................................................................................

शहाण्‍याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्‍यांच्‍यामागे वेडे....!!

मनिषा,
केसर नी नारळाचे दूध टाकले होतेस की नाही गं? हो हो अशेच दिसतात्. फुलली आहेत ना?(आता ही सांदणं चवीला तशीच मी करते त्याच्या सारखीच लागतात का ते सांगू शकत नाही ना पण.:)) गम्मत करतेय गं.
तुला नी घरच्यांना आवडली का मं? (हे नाही समजले).
मजूंला मुंबईत असेल तर ट्रीट मिळाली नाही का?
असो. थँक्स एवढ्या प्रेमाने सांगितलेस. Happy

मनु आवडली ग सगळ्यांना घरात . मस्तच झाली होती. छान फुलली होती.. मी आपलं ब्रेड बटर तयार ठेवलच होतं म्ह्टल फसला प्रयोग तर उगीच कटकट नको. पण एकदम यशस्वी. भरपुर काजू आणि भरपुर केशर लोटून दिलं होतं मी. [म्हणुनच रंग असा आला असेल का???]

मंजुला बोलावलं होतं ग पण तिच्याकडे पाहुणे येणार होते त्यामुळे ती वाचली माझ्या या प्रयोगाच्या तावडीतुन Proud
पण खरच मस्त झाली होती. जाम आवडली. आणि भरपुर नारळाच दुध . . फक्त मिळालं नाही ते केळीच पान Sad
.................................................................................

शहाण्‍याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्‍यांच्‍यामागे वेडे....!!

मनिषा, एकदम सक्सेस्फुल झालाय तुझा प्रयोग... दिसताहेत पण छान. रंग असाच येतो, गर्‍यांचा रंग असतो तो, केशराचा फक्त स्वाद उतरतो, मधूनच एखादी केशरी काडी दिसते. हलकी झाली होती ना सांदणं?

अरे वा, अगदी आजीच्या आठवणी जागा झाल्या. कोकणात, अगदी थोडे घटक वापरुन चवदार पदार्थ करायची पद्धत आहे. कलिंगडाच्या आतला पांढरा भाग किसून पण त्याचे धोंडस करायची आजी.

छान हलकी झाली होती ग

दिनेशदा मग त्यचीपण कृती द्या ना इथे
.................................................................................

शहाण्‍याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्‍यांच्‍यामागे वेडे....!!

इथे जसे काकडीचे धोंडस आहेत ना तसेच. फक्त काडीच्या जागी कलिंगडाचा पांढरा भाग वापरायचा. पूर्वी जी कलिंगडे मिळायची त्यात पांढरा भाग एक इंच जाड असायच्या. आता तो भाग कमीत कमी असतो.

धोंडस... कसली आठवण जागी झाली. पुर्वी गावावरुन अगदी हातभर लांब मोठी जाडजुड, पिकुन पिवळसर झालेली काकडी यायची, सोबत तांदळाचे जाडसर पिठ. आजी पाठवायची आणि मग आई इतके मस्त धोंडस करायची त्याचे.... आता आठवणीने तोंडात तर पाणी येतयंच, सोबत डोळेही भरुन आले....त्या काकड्याही गेल्या, आणि ते दिवसही.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

साधना, मिळतात कि तवशे आपल्या मुंबईत. दादरला, रानडे रोड वर श्रावणात हमखास मिळतात. आजीची माया मात्र नाही कुठे मिळत !!!

नवरा आत्ताच ताज्या लिचीज घेवुन आलाय... नुसत्या खाण्याव्यतिरिक्त अजुन काही करता येईल का?

अल्पना- लिची आईस्क्रीम, ज्युस.

ज्युस नको..आईसक्रीम करुन बघता येईल्..पण कसं करायचं..त्या शहाळ्याच्या आईसक्रीमसारखं केलं तर चालेल?

ए मी पण शोधतेय.. खुप मस्त आयडिया दिलीयेस

मला एका पार्टीला "शाकाहारी मेडिटेरियन राईस" करुन न्यायचा आहे पण काहीही माहिती नाही कसा करु. नेटवर नीट काही सापडत नाहीये. कोणाला माहित असेल सोपी कृती तर लिहा ना प्लिज..

सुनिधी, त्या भागात चीज घालून भात करायची पद्धत आहे. तो हवाय का ?
ईरानमधे केशर घालून साधा भात करतात, ( ना गोड ना तिखट ) तो हवाय का ?

मी आणखी ३/४ तासानी लिहिन.

केशर्,पुदिना,पार्सले अस काहिसे घालुन करतात तसा हवा आहे दिनेश.. जरूर लिहा... आधीच धन्यवाद.

पर्शियन राईस, स्पॅनिश राईस आणि रिसोटो असे ३ प्रकार लिहिले आहेत. ( मायबोलीच्या भाषेत, नवीन पाककृति तयार आहे !!! )

दिनेशदा, जुन्या माबोवर लिहिलेले मुर्गे का सफेद माछ बनवतांना खसखस नसली तर चालेल का?

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

Pages