केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागचे प्रतिसाद वाचुन काल एरन्डेल तेलाचा प्रयोग केला एकदाचा Happy
रात्री आवळा तेल आणि एरन्डेल तेल एकत्र करुन लावले...चोळले बराच वेळ्...सकाळी उठुन कोरफडीचा भरपुर गर लावला...(माझ्या बागेत खुप कोरफड आहे)...आणि मग तासाभराने केशकान्तीने केस धुतले... मस्त मऊ झालेत केस Happy

अन्ड आणि नारळाच्या दुधाचा प्रयोग अजुन करायचाय...

आणि हो...कोरड्या केसान्साठी माझ्यासाठी उपयोगी ठरलेला उपायः loreal intense smoothing serum...
केस धुतल्यावर २-३ थेम्ब लावायचे सगळ्या केसान्ना...माझे एकदम झाडुसारखे असणारे केस आता थोडे मऊ व्हायला लागलेत... Happy

माझ्या केसात चाई झालि आहे काय करु सागा ना>>>>>> कोरफडीचा गर लावुन बघ.. रोज.. २-३ महिने लागतील पण आज्जीने केला होता हा प्रयोग, तिला तरी फरक पडलेला.

मी माझ्या २ वर्षाच्या लेकी च्या डोक्याला [केसांना]मउ आणि छान
वाढ होण्या साठी तिळाचे तेल लावते आणि अंघोळीला बेबी श्याम्पु
मागच्या महिन्यात सगळे केस काढल्यामुळे मला तिचे केस लवकर वाढावे असे वाटते
अजुन काय उपाय करयला हवा

मी नारळाचे वाटीभर दुध काढले अगदी घट्ट निघाले. मग ते केसान्ना रात्रभर लावले. नारळाचे दुध लावले की त्यातून केवढे तरी तेल बाहेर निघते हे पाहून जीव घाबरला!!!

>>>त्यातून केवढे तरी तेल बाहेर निघते हे पाहून जीव घाबरला!>>><<

जीव कशाला घाबरला? तेल वाटील काढायचे ना मग. Happy

मस्त धागा. अजून वाचते आहे म्हणजे.
मला एक शन्का आहे. इथे कुठेतरी नीधपने तेल लावल्यावर नॉर्मल ब्रँडचे शॅम्पू लावा असे लिहीलेय त्यापुढे कुणीतरी डबल वॉश घेऊ नका असे लिहीले आहे. पण मग तेल पूर्ण जाण्यासाठी काय करावे?

नाही जात यार माझे Sad मग मी काही तरी चुकीचे करतेय. जास्त तेल लावते किंवा शॅम्पू चुकीच्या पद्धतीने लावते Sad

मग मुळात शॅम्पू कमी घेतेस का? तुझ्या केसांच्या क्वांटिटिवर अवलंबून आहे शांपूचे प्रमाण.
शांपूचा फेस स्काल्पवर कधी खसखसवायचा नाही पण भरपूर तेल असेल तर केस खसखसवायचे.

टु द पॉइंट नीधप. थॅन्क्स. ते शॅम्पू खसखसवायचा प्रकार मी करते स्कॅल्पवर. Sad
पण प्रमाण कमी हे कसे कळावे? जाउ देत फार बोर नाही करत. ट्राय करून बघते यावेळी नेहमी पेक्षा जास्त घेऊन.

मागचे सगळे प्रतिसाद वाचून एरन्डेल तेल आणि जास्वन्द तेल एकत्र करून लावले. सकाळी केस धुतले. मस्त मऊ झालेत आणि गळायचे प्रमाण पण कमी वाटतेय. Thank you very much.

मेथीचे दाणे आदल्या रात्री भिजत ठेवणे त्याची next morning मिक्सरमध्ये पेस्ट करुन त्यामध्ये नारळाच दुध मिक्स करणे व केसांच्या मुळांना ,टोकांना नीट लावुन २०/२५ मिनिट ठेवुन मग पाण्याने केस धुऊण टाकणे केस सुकुन झाल्यावर त्यानंतर केसाना तेलाने मसाज करुन next day केस shampo, conditioner ने धुणे याने केसातील कोंडा कमी होऊन केस मजबूत व smooth ,shin राहतात हा माझा अनुभव आहे

कोरफडीला मधे एक चिर देउन ती उघडायची आणि सालाच्या बाजुने हातात पकडुन डोक्यावर घासायची त्याने,
१. हात चिकट होत नाही
२. सगळा गर थेट त्वचेला लागतो
३. डोक्याला मसाज होतो.
पण...... मनःस्विनी सांगितल्या प्रमाणे
पाने असतील तर तुला नेमका तो सफेद transfparent असा गर नीट जमायला पाहिजे काढायला. तो कडेचा दुसरा चिकट चीक नाही चांगला.

confuse.........

नीधप, आता जाते तेल एका वॉशमधे. मागे लिहीले आहे तसं शॅम्पूत पाणी मिसळून लावलं. थॅंक्स Happy

माझ्या केसात चाई झालि आहे काय करु सागा ना
>>> योगिता जमालगोट्याचे बी लिम्बुरसात उगाळून सात दिवस लाव्.सुकेपर्यंत ठेव नंतर धुवुन टाक्,लगेच फरक पडतो आणि फरक नाहि पडल्यास ती चाई नसुन वेगळे काहि असेल त्यासाठी विश्वास असेल तर होमिओपथी घेउन पहा.

ज्यांचे केस फारच गळतात, त्यांनी केसांना वाफ द्यावी. उकळत्या पाण्यात टॉवेल भिजवून घट्ट पिळून तो तेल लावलेल्या डोक्‍यावर गुंडाळावा आणि काही मिनिटे ठेवावा. असे 2-3 वेळेस करावे. त्यानंतर केस धुवावे.

अस ऐकल आहे पण उकळत्या पाण्याचा टॉवेल हातात कसा घेणार? Happy

माझी लेक ८ वर्षाची आहे. तिच्यासाठी कोण्ता शाम्पु वापरु?
जॉन्सन अ‍ॅ जॉन्सन वापरत होते पण तिचे केस वाढलेत आणि जाड ही आहेत म्हणुन जॉन्सन ने एका धुण्यात स्वच्छ होत नाहीत आणि भरपुर शाम्पु ओतावा लागतो.

Pages