केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पांढरे केस करडे जरी झाले तरी आनंदच होईल मला.

केस करडे होऊ शकतात का? एकतर काळे नाहीतर पांढरे हे दोनच ऑप्शन्स भारतीयांना उपलब्ध आहेत ना? Happy

काही जणांचे केस एकदम सगळे पांढरे होत नाहीत. एक केस काळा, बाजुचा पांढरा असे कॉम्बो बनत जाते. अशा वेळी त्या काळ्यापांढ-या केसांना एक करडा लुक येतो. पण मुळात त्यातले केस एक पुर्ण काळा आणि एक पांढरा असाच असतो.

मला तर आवळ्यामुळे केस एकदम कोरडे होण्याचा अनुभव आहे

ज्यांचे केस कोरडे आहेत त्यांनी लिंबु, आवळा इत्यादी आम्लधर्मिय पदार्थ केसांना लावणे टाळलेले बरे. (केस तेलकट असतील तर मात्र लावा, केस कोरडे होतील Happy )

एकवेळ आवळा पत्करला पण लिंबामुळे मात्र कोरड्या केसांना फाटे फुटतात. अगदीच लावायचे असेल तर लावुन केस धुतल्यावर लगेच तेलाने मालिश करावे.

केस काळे करण्यासाठी उर्जिता जैन चे ग्रेनिल कोणी वापरून पाहिले आहे का? कोणी वापरले असल्यास प्लीज आपले अनुभव इथे लिहा.

मी वापरते ना हल्ली ग्रेनिल. एकदम मस्त आहेत. मेंदी लावलावुन माझे केस खुप कोरडे झालेले, हाताला कसेतरीच लागायचे. त्यांचा पोतही आता सुधारतोय, मऊपणा परततोय.

अनुसया हाडे मजबुत करा म्हणजे calcium वाढवा. जे दुध, दही, ताक, अंजीर, नाचणी, अननस, केळी वगैरेत असते. लोणचे टाळणे शक्य नसेल तर रोज एक केळ खा, मीठाची पातळी समान रहाते.>>>काय लाख मोलाचा सल्ला दिलास...मला लोणच टाळण खरंच अशक्य आहे... Sad हे नक्की अमलात आणेन मी Happy धन्स Happy

मी आज आवळा तेल बनवण्याचा उद्योग हाती घेतलाय. दोन लिटर पाण्यात १२५ ग्र. आवळा पावडर मंदाग्नीवर उकळत ठेवलीय. दोन्-अडिच तास झालेत, अजुन अर्धा-पाव लिटर वाफ उडुन जायला हवीय.>>>
साधना
व्रषाला फक्त सहा सिलेंडर आहेत.पुरतिल क्से?

माधवी सध्या बाजारात मिळणारे सर्वच रंग चांगले आहेत असं मला माझ्या केसाच्या डॉकनी सांगितलं.
त्यातल्या त्यात लॉ'रियल, मॅट्रिक्स हे उत्तम. गार्नियर आणि स्ट्रिक्स च्या वाट्याला मी जात नाही. फक्त एकदा मी गार्नियर लावला होता. त्यानंतर लॉ'रियल वर शिफ्ट झाले, अजून तिथेच कायम आहे.
मॅट्रिक्स ही ट्राय केला पण एक दोन केसधुणी होईपर्यंत त्याचा जो काही वास येतो त्याने मला यक्क होते, म्हणून मी मॅट्रिक्सवर फुली मारली.

<विषयांतर होईल, पण एक लांबचे काका आत्ता भारतवारीत भेटले. मला आठवतय तेव्हा पासून त्यांचे केस अतिशय दाट, पण संपूर्ण पांढरेच होते. मात्र यावेळी salt and pepper! ते म्हणाले अग ब्रम्हविद्या ने शिकवलेले प्राणायाम करायला लागलो आणि हा effect! संशोधनाचा विषय होईल. कुणाला माहित आहे का ब्रम्हविद्या? वेगळा बीबी उघडला पाहिजे!>

नुसत्या प्राणायामांनी? मी ब्रह्मविद्येचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पण आम्हाला काही क्लासमध्ये, पांढर्‍याचे काळे होतील म्हणून सांगितले नव्हते. एका शिक्षकांचाच रुपेरी मुकुट होता. आमचा गेली पावणेदोन वर्षे ब्रह्मविद्येच्या आध्यात्मिक श्वसनप्रकारांचा नियमित अभ्यास सुरू आहे. पण केस पिकण्याचे प्रमाण वाढतच जाते आहे.
एक श्वसनप्रकार यौवनदायक असाही आहे. तसेच शरीरातील ग्रंथींना अधिक कार्यक्षम करणारा एक ध्यानपाठही आहे. कदाचित 'त्या' काकांची आत्मशक्ती/मनशक्ती चांगलीच प्रबळ झाली असावी.

ग्रेनील चा खुप चान्गला अनुभव आहे. पण त्यात केमिकल्स आहेत असे वाटते

त्यात केमिकल्स नाहीत असे पॅकवर लिहिलेय. मेंदी आणि इंडिगो पावडर आहे. पण ब्राऊन आणि डार्क ह्या दोन शेड्स कशा काय मिळवतात माहित नाही. बहुतेक डार्कमध्ये इंडिगो पावडर जास्त असावी आणि ब्राऊनमध्ये मेंदी जास्त असावी. पण इतर केमिकल्स नक्कीच नाहीयेत.

साधना,
कुठले ग्रेनील वापरत आहात? काळे का?
आणि त्यात आवळ पावडर्+रिठा+शिकेकाई ही घालता का? साध्या मेंदीने केस ज्जाम कोरडे होतात, म्हणून विचारते आहे

मेंदी लावण्याच्या जस्ट आधी त्या मिश्रणात ऑलीव्ह ऑईल २ टीस्पून घातले तर मात्र नरमपणा राहतो, फार कोरडे होत नाहीत केस (पण ते एखादवेळी विसरले, की कोरडेठाक केस)

मीही डार्क शेड वापरते. मी मेंदी लावताना त्यात उर्जिताच्याच मोतिया रोशा तेलाचे दोन्-चार थेंब टाकते.
ग्रेनिलमध्ये मेंदी, नीळ पावडर आणि सोफिया तेल आहे. बाकी शिकेकाई बगैरे काही नाही. केस खुपच पांढरे (जसे माझे आहेत) असतील तर आवळा पावडर टाकावी. उर्जिताने तिच्या लिविंग विथ हर्ब्समध्ये पांढ-या केसांसाठी मेंदी+आवळा पावडरीची शिफारस केलीय.

ग्रेनिलमुळे माझ्या केसांचा मऊपणा परततोय. आधी नुपुर आणि त्याआधी साधीमेंदी लावायचे त्यामुळे केस खुप कडक झालेले. नुपुर इतर मेंदीपेक्षा बरी आहे पण त्यामध्येही केमिकल्स आहेत. सध्यातरी ग्रेनिल इज द बेस्ट.

नारळाचे दुध लावायला जमले तर सोने पे सुहागा.....

सध्या घरी केलेल्या आवळा तेलाने मसाज करुन मगच केस धुतेय. केस हाताला खुप सॉफ्ट लाग्तात.

लेक ओरडत होती माझ्यावर, केस इतके सुळसुळीत होताहेत की वेणीपण सुटून जातेय. आता तिला रोज सागरवेणी घालुन देतेय...... Happy

थोडे पाणी घालावेच लागेल.
>>
पाणी नाही घातलं तरीही येतं दुध. नवीनच फोडलेला नारळ असायला हवा पण.

हो पण किसून काढायचे?
>>
किसुन कितपत आणि कसे दुध येईल ते माहीत नाही मला.नारळ खवुन घ्यायचा विळीवर. तो सगळा चव लाडु वळतात तसा मुठी धरुन पिळुन घ्यायचा. स्वच्छ रुमालात बांधुन पिळलात तर जास्त येईल दुध. दुध काढुन झालेला चव भाजीत टाकायचा.

मी एक प्रयोग केला. कोरफडीच्या पानात मेथीचे दाणे पेरुन त्याल कोंब आल्यावर ते वाटुन तेल तयार केलं घरीच. त्यात ८-१० जास्वंदीची फुलही वाटुन उकळवली. ते तेल दोनदाच लावलं असेल. भरीस भर म्हणुन, साधारण ३ आठवड्यापासुन रोज एक मीठाच्या पाण्यात मुरवलेला आवळा खातेय.
केसांचं पोत सुधारलं, केस दाट आणि हेल्दी झालेत. भुरकट केस चक्क काळे झालेत. आता बघुया पांढर्या केसांवर काही परिणाम होतोय का!

Pages