समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

याला तुम्ही मागासलेले विचार म्हणा, बुरसटलेली मनोवृत्ती म्हणा काहीही म्हणा, पण हे जे काही घडत आहे ते चांगले नक्कीच नाही. >>
मागासलेले, बुरसट ...... अजून बरंच काही.. म्हणलं..
आता चांगलं नाही म्हणजे नक्की काय ते स्पष्ट करा.. आणि तुम्ही याला विरोध कसा करणार आहात ते पण सांगा.

चांगली चर्चा. भरत मयेकरांच्या दोन्ही पोस्ट्स पटल्या. 'नॅचरल गे' असा वेगळा उप-गट तयार करून चर्चा त्याबद्दल घोटाळत राहू नये असं वाटतं. धनंजय यांनी लिहिलेला हा लेख (दुवा दुसर्‍या संकेतस्थळावर जातो) या संदर्भात नक्की वाचनीय आहे. त्याच लेखकाचं हे स्फुटही मननीय.

बाय द वे, पौगंडावस्थेत समलैंगिक संबंधांकडे वळलेली मुले नंतर 'सरळ' झाली हे वाचलं. याला बिहेवियरली होमोसेक्शूअल्स म्हणतात. तात्पुरती इच्छा पूर्ण करण्यासाठी असे मार्ग तुरूंगात/ किम्वा दिवसच्या दिवस घरापासून लांब रहाणारे ट्रक ड्रायव्हर्स किंवा तत्सम लोक अवलंबतात.

महेश यांच्या पोस्टी म्हणजे कुठल्याही विधानाला कसलाही शास्त्रीय आधार नाही. मी म्हणतो म्हणून हे वाईट आहे यापलिकडे काही नाही. करमणूक करून घ्या नाहीतर सोडून द्या त्यांना... कमी का आहेत पालथे घडे माबोवर?

थोडं अवांतर: सुलूभाऊंना वर बऱ्याच जणांनी "स्वीकारणार नाही म्हणजे काय करणार" असे पुन्हा पुन्हा विचारले आहे. आणि त्यांनी याचे उत्तर "मी स्वीकारणार नाही म्हणजे काय हे मलाही नक्की माहित नाही" असे दिले आहे.

बहुतेक ते स्वीकारणार नाहीत याचा अर्थ त्यांच्या नात्यात किंवा मुलांमध्ये समलैंगिकता आहे असे आढळून आल्यास ते (सुलूभाऊ) हि गोष्ट स्वीकारू शकणार नाहीत. किंवा त्यांना पाठींबा देणार नाहीत. किंवा परावृत्त करायचा/ मतपरिवर्तन करायचा त्यांच्या परीने प्रयत्न करतील असे काहीसे त्यांना म्हणायचे असावे. (हा केवळ माझा अंदाज आहे. सुलूदादा, तुमच्या विषयी कोणताही वैयक्तिक आकस किंवा पूर्वग्रह नाही. मी तुम्हाला ओळखत नाही).

आणि कदाचित यासाठीच त्यांना समलैंगिकता कायदेशीर होणे नकोय. कारण मग मुले कायद्याचा आधार घेऊन परस्पर संमतीने लग्न करून टाकतील. कदाचित एक पालक म्हणून peer प्रेशर ची सुद्धा भीती वाटत असेल.

कदाचित अशी भीती "१८ वर्षावरील सज्ञान व्यक्तीने परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यास" कायद्याने परवानगी दिली तेव्हाही त्या काळच्या पालकांनाही वाटली असेल नाही? (म्हणून मग या भीतीपोटी मुलांना अजूनही योग्य लैंगिक शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. ज्याचे परिणाम आज आपण पाहतोच आहोत :()

पूर्वी जेव्हा आंतरजातीय विवाह व्हायचे (ज्या काळी ते वाईट समजले जायचे) तेव्हा मुद्दाम समाज अश्या जोडप्यांविषयी उघडपणे वाईट बोलायचा. त्यामागचा हेतू हा होता कि आपल्या मुला-बाळांच्या मनावर ही गोष्ट वाईट आहे हे ठसावे आणि त्यांनी या मार्गाने जाऊ नये.

ज्या पालकांना समलैंगिकतेला कायद्याचे पाठबळ मिळाल्यास असे संबंध सरसकट ठेवले जातील असे वाटते त्यांनी आंतरजातीय विवाहांचे उदाहरण पाहावे. आज समाजाने पूर्वीसारखे अश्या जोडप्यांना वाळीत टाकणे बंद केले म्हणून १००% मुले-मुली काही असे विवाह करत नाहीत. ज्यांना करायचेय ते करतात.. त्याची जबाबदारी स्वीकारतात आणि पुढे जातात. एक तरुण वर्ग असाही आहे कि ज्याला घरून आंतरजातीय विवाहाची पूर्ण परवानगी असूनही त्यांचा कल मात्र स्वजातीय मुला/मुलीशी लग्न करण्याकडेच आहे. म्हणजेच एखादी गोष्ट समाजाने (म्हणजे शेवटी तुम्ही-आम्ही) मान्य केली म्हणून पुढची पिढी त्या मार्गाने जाईलच असे नाही. त्यामुळे काळजीचे कारण नसावे (असे मला वाटते).

चर्चा चांगली सुरु आहे.
बहुतांश सामान्य लोकांप्रमाणे मी अजुनही समलैंगिकते बद्दल माझी काय भुमिका असावी याब्द्दल गोंधळलेली आहे.
माझ्या ओळखीत आसपास कुणीच तसे नसल्यामुळे असे कुणी अचानक संपर्कात आले तर मी कशी वागेन याबद्दल सध्या तरे काहीही कळत नाही.

असो

पण सातीच्या पोस्ट्स पटल्या. माझी भुमिका निश्चित तिच्या विचारांच्या आसपास असेल असे वाटते.

खूप वेळापासून शोधतेय (पाटील यांची पोस्ट वाचल्यापासून) पण जुन्या माबोतली एक लिंक मिळाली नाही.
मला एक निश्चित आठवते की अशी चर्चा पूर्वी झाली होती.
हिरिरीने समलैंगतेबद्दल अशीच चर्चा केली गेली होती पण त्यावेळी एक (की दोन)गे त्याबाजुने लिहित होता/ होते.
इथली चर्चा वाचुन बरीच मते जाणुन घेता आली. चर्चा छान चाललीये.

*अरे देवा ! पोस्ट् लिहुन पोस्टेपर्यंत २० पोस्टी ! :)*

एक जरा अवांतर आणि तरीही विषयाशी संबंधित असल्याने इथे लिहीत आहे.

गोल्डन कंपसच्या ट्रिलॉजीतील तिसरे पुस्तक आहे अ‍ॅम्बर स्पायग्लास. या पुस्तकात दोन पुरुष एंजल्सची जोडी आणि त्यांचे एकमेकांवरचे अगाध प्रेम, त्यांच्यातलं एक खूप सुंदर नातं रंगवलं आहे. वाचताना आपल्यालाच ते इतकं भावतं ना! शेवटी दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम, विश्वास, सुरेख नातं असणं हे महत्त्वाचं. त्या व्यक्तींचं लिंग काय आहे हे दुय्यम असावं, नाही का?

शेवटी दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम, विश्वास, सुरेख नातं असणं हे महत्त्वाचं. त्या व्यक्तींचं लिंग काय आहे हे दुय्यम असावं, नाही का? >> मामी बिंगो.. Irrespective of Gender, love is love.

>>करमणूक करून घ्या नाहीतर सोडून द्या त्यांना... कमी का आहेत पालथे घडे माबोवर?
कृपया ही असली वैयक्तिक शेरेबाजी करू नये ही विनंती. तुमच्यासह सर्वजण हिरीरीने समर्थन करत आहेत म्हणुन मी कोणाचेही नाव घेऊन कमेन्ट्स केलेल्या नाहीत. आशा आहे की प्रतिसाद संपादित कराल.
तुमच्या मतांच्या विरोधी कोणी काही लिहिले तर त्याला अशा पातळीला जाऊन लिहिणे अतिशय चुकीचे आहे.

>>शेवटी दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम, विश्वास, सुरेख नातं असणं हे महत्त्वाचं. त्या व्यक्तींचं लिंग काय आहे हे दुय्यम असावं, नाही का?
अशा नात्याला मैत्री, प्लॅटॉनिक रिलेशन, इ. म्हणता येईल पण त्यामधे लैंगिकता असण्याचे कारण नाही.

>>शेवटी दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम, विश्वास, सुरेख नातं असणं हे महत्त्वाचं. त्या व्यक्तींचं लिंग काय आहे हे दुय्यम असावं, नाही का?
अशा नात्याला मैत्री, प्लॅटॉनिक रिलेशन, इ. म्हणता येईल पण त्यामधे लैंगिकता असण्याचे कारण नाही.
>>>>>>> हे ठरवणारे आपण कोण?

<अशा नात्याला मैत्री, प्लॅटॉनिक रिलेशन, इ. म्हणता येईल पण त्यामधे लैंगिकता असण्याचे कारण नाही>

का? तो त्या व्यक्तींचा खाजगी मामला नाही का?

>>का? तो त्या व्यक्तींचा खाजगी मामला नाही का?
असावा ना, पण या गोष्टी जगजाहीर करून त्याला रीतसर कायदेशीर, सामाजिक मान्यता मिळविणे चुकीचे आहे.

<असावा ना, पण या गोष्टी जगजाहीर करून त्याला रीतसर कायदेशीर, सामाजिक मान्यता मिळविणे चुकीचे आहे.>

का? त्यांना जर एकत्र राहायचं असेल तर? त्यांनाही एकमेकांच्या पश्चात संपत्तीत वाटा हवा असेल तर? या नात्याला नाव द्यावंसं वाटत असेल तर? आणि मुख्य म्हणजे लपून प्रेम करायचं नसेल तर?

पण या गोष्टी जगजाहीर करून त्याला रीतसर कायदेशीर, सामाजिक मान्यता मिळविणे चुकीचे आहे <<<
चूक बरोबर ठरवायचा अधिकार कोणाचा?

>>त्यांना जर एकत्र राहायचं असेल तर?
एकत्र रहाण्याला कोणाचाच विरोध नाहीये.

>>त्यांनाही एकमेकांच्या पश्चात संपत्तीत वाटा हवा असेल तर?
यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत, त्यासाठी लग्नाची गरज असते असे नाही.

>>या नात्याला नाव द्यावंसं वाटत असेल तर?
मैत्री, गाढ मैत्री, इ.

>>आणि मुख्य म्हणजे लपून प्रेम करायचं नसेल तर?
तेच तर जाहीर मान्यता मिळविण्याचा अट्टाहास कशासाठी ?

मैत्री, गाढ मैत्री, इ. <<
तुम्ही ठरवाल तीच नावं त्यांनी द्यायची का?

बाकी त्यांनी कायद्याची मान्यता मिळवूच नये या अट्टाहासालाही काही बेसिस दिसत नाहीये.

>>चूक बरोबर ठरवायचा अधिकार कोणाचा?
समाजाचा. अशा समाजाचा की ज्यामधे नैसर्गिक आणि समाजाच्या आरोग्याच्या हिताच्या गोष्टी घडतात. आणि ज्याचे प्रमाण फार म्हणजे फार आहे. म्हणजे ९९% किंवा जास्त लोक.
वर कोणी म्हणाले तसे उद्या जर हेच प्रमाण बदलले आणि समलैंगिकांची संख्या फार वाढली तर माझ्या सारखा विरोध करणार्‍यांचा जोर क्षीण होईल, पण आज तरी तसे नाहीये.

<यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत, त्यासाठी लग्नाची गरज असते असे नाही.>

नाही, अशा तरतुदी नाहीत.

<मैत्री, गाढ मैत्री, इ.>

हे कोणी ठरवलं? गाढ मैत्रीच्या पलीकडचं नातं असलं तर?

एकत्र रहाण्याला कोणाचाच विरोध नाहीये.
>> म्हणजे एकत्र रहा, हवं ते करा पण त्याला समाजात एक ओळख निर्माण करू देऊ नका.. अस्सं का?

यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत, त्यासाठी लग्नाची गरज असते असे नाही.
>> मग हेट्रोसेक्शूअल्सनी ही लग्न करू नये. if marriage is all about this. Uhoh

तेच तर जाहीर मान्यता मिळविण्याचा अट्टाहास कशासाठी ?>> मान्यता हवीये कुणाला? तो त्यांचा अधिकार आहे. तुम्ही स्विकारा किंवा नका स्विकारू..

थोडक्यात काय, तर उडत जा...

<अशा समाजाचा की ज्यामधे नैसर्गिक आणि समाजाच्या आरोग्याच्या हिताच्या गोष्टी घडतात. आणि ज्याचे प्रमाण फार म्हणजे फार आहे. म्हणजे ९९% किंवा जास्त लोक.>

समाजात किमान १०% लोक समलिंगी असावेत असा अंदाज आहेत. अमेरिकेत निदान सहा लाख समलिंगी कुटुंबं आहेत.

< समलैंगिकांची संख्या फार वाढली तर माझ्या सारखा विरोध करणार्‍यांचा जोर क्षीण होईल, पण आज तरी तसे नाहीये.>

हल्ली कोणाला फारसं काही याबद्दल वाटत नाही.

बाकी भारतीय संस्कृती म्हणून बोंब मारलं गेलेलं जे प्रकरण आहे त्यात अनेक गोष्टी अनैसर्गिकच आहेत. तरी त्या चालतात आम्हाला...

<यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत, त्यासाठी लग्नाची गरज असते असे नाही.>
>>नाही, अशा तरतुदी नाहीत.
काय बोलताय ? कायद्याच्या मदतीने नाते नसलेल्या माणसाला कोणी काहीच देऊ शकत नाही संपत्ती किंव स्थावर मालमत्तेमधले ? दान, बक्षिस, दत्तक, मृत्युपत्र इ. अनेक मार्ग आहेत. कोणत्याही सर्वसामान्य वकिलाला विचारा तो अजुन मार्ग सांगेल.

कायदे बियदे चुलित घाला.
माणसाच्या नैसर्गिक उर्मीकडे लक्ष द्या आधी. ते अ‍ॅड्रेस करा पहिल्यांदा.

Pages