समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

त्याचं असं आहे स्वतःला समलिंगी संबंध ठेवण्ञामध्ये रस नाही म्हंटल्यावर बाकीच्यांच्या नावानी "विकृती!" म्हणून बोंब मारायचा परवानाच मिळतो.
माझ्या थोड्याफार केलेल्या वाचनात पुर्वी हस्तमैथुनाला सुद्धा विकॄतीच मानायचे. ती बोंबाबोंब कालांतराने का थांबली (त्यात वैयक्तिक फायदा नाही ही बाब पण असू शकते Proud )असावी ह्याचे ़कारण माहितगार सांगतीलच पण समलिंगी संबंधाबद्दल तरी असले बुरसटलेले विचार जाञला हे विचार जपणार्‍ञांच्या पुढच्या पिढीत जेव्हा एखादा/दी समलिंगी संबंध ठेवण्यास उत्सुक असेल तेव्हा डोकं ठिकाणावर येईल कदाचित.

कुणीही कितीही ओल्ड फॅशन्ड म्हणा, माझा समलैंगिकता भारतात कायदेशीर करण्यास विरोध आहे.
भारतात समलैंगिकता अजूनही कायदेशीर नाही फक्त ती एक विकृती नाही असे मनोविकारतज्ज्ञानी समजायला सुरूवात केली आहे.
प्राणिजगताचा हवाला दिला तर सगळ्या इनसेस्टही लििगलाईज होऊन जातील आणि मग सज्ञान मुलगा आणि त्याची सज्ञान आई आपल्या बेडरूममध्ये काय करतायत हा प्रश्नही कायदा आपल्याला पडू देणार नाही.
माझेही कित्येक मित्र पौंगंडावस्थेत समलिंगी होते जे आता भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर्‍ संसारात आहेत.
त्यांनी स्वतः हे खाजगीत कबुल केलंय की ती फक्त एक भरकटलेली अवस्था होती.
आत्तापर्यंत जितक्य समलैंगिक केसेस पाहिल्यात किंवा टिव्हीवर वैगेरे मुलाखतीत पाहिल्यात त्यात कुणीही आमचा एकच एक लाइफ पार्टनर सदैव होता असे म्हटलेले नाही.
एच आय वी वैगेरेचा संसर्ग समलिंगी संबंधातून होण्याची शक्यता किमान पुरूषांततरी जास्त आहे.
मूळात अ‍ॅनॉटॉमिकली रेक्टम आणि व्हजायना यांचे स्ट्रक्चर स्टडी केले तरी रेक्टम हे फक्त शरीरातून शरीराबाहेर काही जावे म्हणुन बनले आहे आणि व्हजायना आवकजावक दोन्हींसाठि बनले आहे हे कळेल.
बाकी मानसिक, भावनिक पातळिवर तुम्हाला पुरूष जवळचा वाटतो की स्त्री हा पूर्णपणे वेगळा इश्यू आहे.

साती,
इन-क्वेस्ट नाही. -सेस्ट.

सगळ्याच पौगंडावस्थेतील मुलामुलींत समलैंगिक आकर्षणाची एक पायरी आहे, हे जसे असतेच, तसेच त्या आधीच्या वयात भिन्नलिंगीच पण ऑथॉरिटी फिगर्सबाबत आकर्षण असते, अशी पायरीही आहेच. त्यामुळेच इडिपस काँप्लेक्स व इलेक्ट्रा काँप्लेक्स डिफाईन झालेले आहेत. इथे 'सोळावं लागल्या'नंतर परत भिन्नलिंगी आकर्षण सुरू होते, अन मग तो कोण आहे ते नाते/जात/धर्मा पलिकडे जाऊन येते हे ही आहेच.

असो.

राज,
इथे आपण ह्यूमन बिहेवियरबद्दल बोलत आहोत. मी कुठल्याच प्रवृत्तीचा पुरस्कार अथवा धिक्कार केलेला नाही. साती यांना फक्त अभ्यासक्रमातील काही गोष्टींची आठवण करून दिलेली आहे. कदाचित इथे अवांतरही असेल, पण हे ज्ञान विकीवर उपलब्ध आहे. electra complexoedipus complex असे शब्द विकीवर शोधल्यास अधिक माहिती उपलब्ध होते.
ढोल बडवणे या शब्दप्रयोगातून तुमचा पूर्वग्रह प्रदर्शित होतो असे सुचवितो Happy

राज, तसा ़ क्लेम कोणी केलाय का ईथे? मग तुम्ही उगाच काय मॉर्‍रल पोलिसींग चा ढोल बडवत आहात? उगाच शहाजोगपणा करायचा!

इब्लिस, यु आर गुड.

ओ बुवा, जरा धाग्याचा मुळ लेख वाचा आणि सगळ्या प्रतिक्रियाहि. आणि मग विचारा कोण शहाजोगपणा करतंय ते.

च्यायला, परत एकदा फुकटची धत्तींग!

साती ह्यांच्या पोस्टीत पहिल्यांदा इन्सेस्टचा उल्लेख आहे पण तिथे तरी त्यांनी थेट तसा क्लेम केलाय का? इब्लिस ह्यांची पोस्ट एडिपस काँप्लेक्स बद्दल आहे ज्यात लैंगिक आकर्शण कसे डेवलप होते हे दिलय. मग तुमचा क्लेम हा उगाच मारलेला उपरोधक शेरा ़ कसा नाहीये?

आत्तापर्यंत जितक्य समलैंगिक केसेस पाहिल्यात किंवा टिव्हीवर वैगेरे मुलाखतीत पाहिल्यात त्यात कुणीही आमचा एकच एक लाइफ पार्टनर सदैव होता असे म्हटलेले नाही. >> Interesting, but what was the norm for the heterosexuals in the same culture? How many partners they had or rather how many partners they had as admitted by them?? Would it be okay if a widow remarried a widower or a single guy in your opinion?

ओके, हा निराळा मुद्दा आहे. ज्या प्रकारच्या संबंधांतून अपत्यात जेनेटिक प्रॉब्लेम्स व्हायची शक्यता वाढते (म्हणजे जे जीवनाच्या विकासाला मारक आहेत) असे संबंध विकृत म्हणून इन्सेस्ट विकृत.

ज्या संबंधांतून बायोलॉजिकल अपत्यप्राप्तीची शक्यताच नाही ते का विकृत?

जळ्ळं चुकलं ते स्पेलिंग! धन्यवाद इब्लिस. इनक्वेस्ट तशीही लिगलच असते;)
त्या काँप्लेक्सचंच म्हणतेय मी. पौंगंडावस्थेतल्य समलिंगी आकर्षणानंतर नॅचरली भिन्नलिंगी आकर्षण सुरू होतं.
आता जर सगळिकडे समलिंगी संबंध नॅचरल असल्याचे ढोल असेच पिटले गेले तर ती बिचारी व्यक्ती या अवस्थेतून बाहेर येईल की तोच वे ऑफ लाईफ मानून त्यात अधिकाधिक गुरफटत जाईल?

बाकी विकीची कालपरवा भारत- पोरतुगाल युद्धात कशी वाट लागली माहित्येय ना? Happy

सुलू जोरदार अनुमोदन !!!

ज्यांना असले उद्योग करायचे असतील त्यांनी ते गुपचूप करावेत,
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राग एकाच गोष्टीचा येतो की
एकतर हे अनैसर्गिक असुनदेखील त्याला कायदेशीर सामाजिक मान्यता वगैरे हवी आहे ???
ठीक आहे, नियमाला अपवाद म्हणुन अशा गोष्टी असण्याला विरोध नाही,
पण त्याचे ग्लोरिफिकेशन ??? Angry

स्वाती,मग निसर्ग बाकी प्राण्यांत इनसेस्ट बरी खपवून घेतो? जेनेटिक डिफेक्ट व्हायची शक्यता असताना?
अशा जेनेटिक डिफेक्टनी क।ही प्राणी मरून पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये ठेवायची योजना पण निसर्गाचीच की!

साती, ढोल पिटून न पिटून काय फरक पडतो? पिटला म्हणून पौंगड आवस्थेतील मुले नॉर्‍ंमल पाथ सोडून समलिंगी होतील असा थेट संबंध ़कसा काय लावू शकतो आपण?

<<ज्या संबंधांतून बायोलॉजिकल अपत्यप्राप्तीची शक्यताच नाही ते का विकृत? >>
जास्त खोलात जात नाहि, वर कुठेतरी उल्लेख झाला आहे या अनैसर्गीक वृत्तीचा. परत एकदा हे वाक्य वाचा, उत्तर सापडेल.

>> स्वाती,मग निसर्ग बाकी प्राण्यांत इनसेस्ट बरी खपवून घेतो?
निसर्ग माणसातही खपवून घेतो की. आपण कायदा आणि तो पाळावा लागणारी माणसं यांच्याबद्दल बोलतोय. Happy

http://healthland.time.com/2012/12/13/new-insight-into-the-epigenetic-ro...

http://io9.com/5967426/scientists-confirm-that-homosexuality-is-not-gene...

साती,

पौगंडावस्थेत लैंगिक भुकेला वाट करून देण्यासाठी अनेकदा समलिंगी संबंध ठेवले जातात. होस्टेलांत हे प्रकार अनेकदा चालतात. मात्र केवळ लैंगिक ऊर्जेला मोकळी वाट करून देणं, आणि लैंगिक जाणिवा तयार झाल्यापासून समलिंगी आकर्षण असणं, यांत फरक आहे. आणि तेवढं शहाणपण प्रत्येकात असतं.

नॉर्मल पाथ सोडून समलिंगी होणार नाहीत पण वर इब्लिसनी सांगितलेल्या सेक्शुअल ओरिएंटेशनच्या प्रक्रियेत जे समलिंगी आकर्षणातून परत भिन्नालिंगी होतात त्याना कायम समलिंगी राहावेसे वाटू लागेल किंवा आपण जमतःच समलिंगि आहोत असे वाटू लागेल किंवा पुन्हा भिन्नलिंगी होताना आपण समाजाच्या दबावाखाली आणि स्वतःच्या नॉर्मल प्रेरणांविरूद्ध काहितरी करतोय असा आभास होईल.

हो पण कायदा म्हणताना आपण ओढून ताणु विकीवरची प्राण्यांमधल्य सो कॉल्ड नैसर्गिक समलिंगत्त्वाचि उदाहरणे देतोय.
बरे लोक्स नैसर्गिकतेला आणि कायद्याला स्वतःच्या म्हणण्यानुसार वळवताय Happy

साती,
विकी १००% रिलायेबल असे मी म्हणत नाहीच. पण तिथे बरेच रेफरन्सेस 'फुकट' उपलब्ध आहेत. विकत रेफरन्सेस पुरवणार्‍यांनी मुद्दाम विकी करपटवलेला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण ते अवांतर.

वे ऑफ लाईफ, अवस्थेतून बाहेर येणे इ. म्हटले तर अ‍ॅरेस्टेड ग्रोथ अन डिलेड माईलस्टोन्स आपल्याला ठाऊक आहेतच की.

पर्सनल चॉईस विचारला तर मी 'सरळ'मार्गी असल्याने सांगेन, की बाबाहो, निसर्गाने उत्क्रांतीचे टप्पे गाठत लाखो वर्षे खर्चून भिन्नलिंगी जीव उत्पन्न केले त्या हाय-उपस करण्यापाठी काही तरी महत्वाचे कारण असेलच. (आहेच. जेनेटिक पूल मिक्सिंग. याचसाठी इन्सेस्ट प्रजोत्पादनासाठी भिन्नलिंगी असली तरी आदर्श नाही) म्हणून सध्यातरी हेटेरोसेक्सुअलिटी 'नॉर्मल' म्हणावी.

पण म्हणून होमोसेक्सुअ‍ॅलिटी अ‍ॅबनॉर्मलच आहे असेही म्हणता येणार नाही. उत्क्रांतीच्या आजच्या टप्प्यावर मनुष्यप्राणी प्रजोत्पादन करण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी व इतर प्रकारांनी संभोगसुख/शरीरसुख घेतोच की! उदा. चुंबन.

मग कदाचित उत्क्रांतीच्या आजच्या स्टेजला, विजातीय संभोग व प्रजोत्पादन हेच विभक्त व्हायची सुरुवात होणार असेल, व कदाचित त्यातून नवी अधिक 'एफिशियंट' व्यवस्था उत्पन्न होणार असेल तर ते आपण आधीच ठरवणारे कोण? मनुष्यांनी त्यांच्या प्लेझर सेंटरच्या उद्दीपनासाठीच फक्त सेक्सचा वापर मर्यादित ठेवला, तर होमोसेक्सुअल उद्दीपन हे कदाचित 'एक्झॅक्ट गरजा ठाऊक असल्याने' उजवे ठरतही असेल?..

असो.
चर्चा छान सुरू आहे. धागा वर काढल्याचा फायदा होतोय.

>> बरे लोक्स नैसर्गिकतेला आणि कायद्याला स्वतःच्या म्हणण्यानुसार वळवताय
साती, प्लीज. वळवायचा प्रश्न कुठे येतो? निसर्गात इन्सेस्टही घडतो आणि समलिंगी संबंधही. इन्सेस्टमधून जनुकीय प्रॉब्लेम्स असणारी संतती होऊ शकते म्हणून त्याला विकृत मानलं गेलं आहे. समलिंगी संबंधांना विकृत का समजायचं?

साती, कायदेशीर मान्यता देणे म्हणजे सगळ्यांनी असेच संबंध ठेवा अशी सक्ती नव्हे. सुरुवातीच्या फेजेसमधून बाहेर आल्यावर जो तुमचा नैसर्गिक कल त्यावरच तुम्ही समलिंगी की भिन्नलिंगी हे ठरणार. मुलांशी संवाद साधणे, त्यांना शरीरविषयक गोष्टी शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगणे हे करण्याची गरज आपण मान्य केली आहे. तसे केले गेले तर तू मांडत असलेला प्रॉब्लेम येईल असे वाटत नाही.

>>म्हणजे गुपचुप करण्याला विरोध नाही. फक्त तुमच्या कानावर काही येता कामा नाही. दृष्टीआड सृष्टी म्हणतात तसं.
ह्म्म तस म्हणा हव तर, पण अगदी स्पष्टपणे लिहिले आहे की विरोध आहे तो उदात्तीकरणाला तरी तुम्ही असा अर्थ का काढलात काय की ? Uhoh

<तेवढे शहाणपण प्रथेकात नसतं हाच माझा मुख्य आक्षेप आहे.>
हे कशावरून? पौगंडावस्थेत ठेवलेले समलिंगी संबंध पुढेही सुरू राहत सतील, तर ती व्यक्ती समलिंगीच असणार.
आणि अगदी मान्य केलं, की त्यांना अकला नाहीत. त्याची शिक्षा समलिंगी आकर्षण असणार्‍यांना कशाला? त्यांना इतरांप्रमाणे हक्क हवे आहेत. त्यांच्या नात्यांना कायदेशीर मान्यता हवी आहे. चित्रा पालेकरांसारखे अनेक पालक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. कोर्टात त्यांच्या वतीने लढत आहेत.

तेवढे शहाणपण प्रथेकात नसतं हाच माझा मुख्य आक्षेप आहे.
<<
या वाक्याशी सहमत.

भारतात तरी मला भेटलेली अनेक तथाकथित 'गे' मुले मूलतः पौगंडावस्थेतील ओझरत्या होमोसेक्सुअ‍ॅलिटीच्या ओझ्याखाली दबून, प्लस, पर्फॉर्मन्स अ‍ॅन्क्झायटिमुळे स्वतःला न्यूनगंडातून आधी क्लीब व म्हणून गे समजत होती. रीसर्च पेपर्समधे सांगितलेत तसे जेनेटिक गे मला तरी कुणी आढळले नाहीत, अन असलेत तरी माझ्या तोकड्या ज्ञानामुळे ते नजरेतून सुटले असावेत.

इब्लिस जर तशी अवस्था येणार असेल तर मला आत्ताच परग्रहावर बुकिंग करून ठेवावं लागेल. Happy

बाकी त्या पोर्तुगीजांच्या युद्धात विकीवर सगळे रेफरंसहि फ्रॉड होते हे एकदा नमूद करते. Happy

इब्लिस त्या मी लिहिलेल्या अ‍ॅनॉटॉमीच्या मुद्द्यावर लिहा की तुमचे मत!

Pages