समलिंगी संबंध - एक धोका

Submitted by manojprabhakar999 on 28 July, 2009 - 02:16

भारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.
न्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.
खर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.
समलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.
ह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.
ड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.
न्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार ?
न्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का ? यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.
कदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.
खरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ? ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

राज म्हणतायत तो प्रकार आणखीन ८०,९० वर्षांनी कॉमन असेल कदाचित पण तेव्हा आपण नसू आणि ह्या बीबीचा विषयही नाही तेव्हा काळजीचं कारण नाही.
बायदवे, तशी हेल्मेट्स आपल्या देशात आत्ता मिळायला लागली तर बलात्काराचं प्रमाण कमी होईल का?

आता जर सगळिकडे समलिंगी संबंध नॅचरल असल्याचे ढोल असेच पिटले गेले तर ती बिचारी व्यक्ती या अवस्थेतून बाहेर येईल की तोच वे ऑफ लाईफ मानून त्यात अधिकाधिक गुरफटत जाईल?>>> सातीच्या ह्या मतामध्ये दम आहे असं वाटलं.
मुळातच भारतात लैंगिकतेचा बाउ केलाय. सर्व गोष्टी क्लीअर असतील तर कन्फ्युज व्यक्ती स्वतः कुठे आहे हे पाहु शकेल. पण भारतात हे जरा अवघडच आहे सध्यस्थितीत तरी.
बाकी ही चर्चा खुप छान सुरुय. माबो मुळे विचारकक्षा रुंदावतात. वेगळा विचार वाचायला मिळतो.
ओपनली बघता येतं, शिकता येतं. नवीन गोष्टी एक्सप्लोअर होतात. हे ह्या बीबी मुळे सिद्ध होतय.
माबोचे आभार आणि सर्व प्रतिसादकांचेही.

बरेच नवीन मुद्दे आलेत. Happy

<त्या काँप्लेक्सचंच म्हणतेय मी. पौंगंडावस्थेतल्य समलिंगी आकर्षणानंतर नॅचरली भिन्नलिंगी आकर्षण सुरू होतं.आता जर सगळिकडे समलिंगी संबंध नॅचरल असल्याचे ढोल असेच पिटले गेले तर ती बिचारी व्यक्ती या अवस्थेतून बाहेर येईल की तोच वे ऑफ लाईफ मानून त्यात अधिकाधिक गुरफटत जाईल?>

साती, बायसेक्स्युअल्सना पौगंडावस्थेत आपली लैंगिक भूक शमन करण्यासाठी कदाचित समलैंगिक संबंध सोयीचे पडत असतील. एकदा समलैंगिक संबंध झाले की मग भिन्नलैंगिक संबंधात रस उरणार नाही अशी शंका येत असेल. अशावेळी कौन्सेलिंग उपयुक्त ठरू शकते.

सद्य स्थिती मात्र याच्या उलट आहे . (शुद्ध?)समलैंगिक (जे बायसेक्स्युअल नाहीत) व्यक्तींना मात्र आपल्याला जाणवणारे आकर्षण, सामान्यतः आजूबाजूला जे होते आहे, त्यापेक्षा वेगळे आहे; त्यामुळे अपराधीपणाची, न्यूनत्वाची भावना सामान्यतः कुरतडत असते. त्यांना योग्य कौन्सेलिंग मिळेलच , ते मिळवायचे धैर्य, संधी मिळेल याची खात्री नसते. उलट 'गे क्युअर थेरपी'ला ही बळी पडावे लागू शकते. (समलैंगिक पुरुषाला पुरुषांची उद्दीपक चित्रे दाखवून उत्तेजनेचे दमन कराण्यासाठी सोबत विजेचे झटके देऊन 'क्युअर' करण्याचे आश्वासन देणारे डॉक्टर्स भारतात(ही) आहेत.)

समलैंगिकता नैसर्गिक का तर ती निसर्गतः येते. कोणा स्ट्रेट व्यक्तीला कन्व्हर्ट करून गे करता येत नाही, तसेच गे व्यक्तीला कन्व्हर्ट करून स्ट्रेट करता येत नाही.
यात गोंधळाचा भाग हा की प्युअरे समलैंगिकांची संख्या/प्रमाण फारच कमी असले तरी बायसेक्स्युअलची संख्या मात्र लक्षणीय आहे.

समलैंगिक संबंधांना सामाजिक/कायदेशीर मान्यता मिळाली तर त्यांनाही मोनोगॅमस रिलेशन्स ठेवता येतील, स्थैर्य लाभेल. मान्यता मिळत नाही तोवर अनेक समलैंगिक सामाजिक दडपणाखाली लग्न करून आपल्या जोडीदाराला फसवत राहतील. स्वतःबरोबर त्याचेही आयुष्य वाया घालवतील.

शेवटचे : होमोसेक्स्युअलिटी इज नॉट जस्ट अबाउट सेक्स. इट इज अ‍ॅज मच अबाउट फीलिंग्ज अँड लव्ह.

(समलैंगिक पुरुषाला पुरुषांची उद्दीपक चित्रे दाखवून उत्तेजनेचे दमन कराण्यासाठी सोबत विजेचे झटके देऊन 'क्युअर' करण्याचे आश्वासन देणारे डॉक्टर्स भारतात(ही) आहेत>> ही जुनी आउटडेटेड पद्धत होती अस वाचलय कुठेतरी.

होमोसेक्स्युअलिटी इज नॉट जस्ट अबाउट सेक्स. इट इज अ‍ॅज मच अबाउट फीलिंग्ज अँड लव्ह. >> मयेकरजी हजारदा अनुमोदन.

समलैंगिक लोक, त्यांची अपत्य, ते चार भिंतीमागे काय करतात फक्त याच पॉईंटस बद्दल बोलणार्‍यांची मला तरी किव करावीशी वाटतेय. अशा हेट्रोसेक्शूअल लोकांसाठी मॅरेज हे रिलेशनशीप नसून फक्त 'सेक्स' आहे असंच वाटतंय एकूणात.
समलैंगिक लोकांची भावना, किंवा त्यांची मानसिक गरज कुणिच लक्षात घेत नाहिये.

<मूळात अ‍ॅनॉटॉमिकली रेक्टम आणि व्हजायना यांचे स्ट्रक्चर स्टडी केले तरी रेक्टम हे फक्त शरीरातून शरीराबाहेर काही जावे म्हणुन बनले आहे आणि व्हजायना आवकजावक दोन्हींसाठि बनले आहे हे कळेल.>
सगळेच होमोसेक्स्युअल्स अ‍ॅनल इंटरकोर्स करत नाहीत. लेस्बियन्सची बाब आणखीनच वेगळी.

(गंमतीची गोष्ट म्हणजे कलम ३७७ नुसार मेल होमोसेक्स्युअलिटी [सोडोमी]ही गुन्हा आहे/होता तसेच हेट्रोसेक्श्युअल सेक्समधील काही क्रियाही अननॅचरल म्हणुन गुन्हा आहेत, मात्र फिमेल होमोसेक्स्युअलिटी गुन्हा ठरत नाही!)

मूळात अ‍ॅनॉटॉमिकली रेक्टम आणि व्हजायना यांचे स्ट्रक्चर स्टडी केले तरी रेक्टम हे फक्त शरीरातून शरीराबाहेर काही जावे म्हणुन बनले आहे आणि व्हजायना आवकजावक दोन्हींसाठि बनले आहे हे कळेल.<<<

हे विधान कोणाच्या प्रतिसादात आहे हे सापडत नाही आहे.

मायबोली चे ११ लाख+ सभासद आहेत . त्यातले कितीजण नॅचरली गे / लेस्बीयन आहेत? मायबोलीवर तरी कुणी स्वतः उघडपणे तसे सांगीतलेले मला तरी आठवत नाही. माझे जे तीन/चार मित्र जे गे आहेत ते नॅचरली गे नसुन त्यांच्या पुर्वायुष्यामुळे (पौंगडावस्थेतील काही घटनांमुळे) झालेले आहेत. अर्थात ते गे असल्याने मैत्रीत काही फरक पडत नाही पण मुद्दा असा की अजुनतरी नॅचरली गे असलेली व्यक्ती मला भेटलेली नाही.
जो पर्यंत गे लोकांचा त्रास होत नाही तो पर्यंत ठीक , मात्र समोरचा स्ट्रेट आहे हे माहीत असुन सुद्धा लगट करायचा प्रयत्न करणार्‍यांची मात्र घृणा वाटते. कायदेशीर मान्यतेनंतर अशी लगट करायचे प्रकार वाढले तर मात्र ताप होईल.

पाटील महोदय,
पहिल्या प्यारेग्राफशी सहमत. समजा माबोवर आपण विचारलेच, तरी अशा सर्वेतून काही विश्वासार्ह विदा भारतात तरी सापडेल असे वाटत नाही.
दुसर्‍या प्यारेग्राफ मधून थोडा वेगळा चष्मा लावल तर मुलींना काय सहन करावे लागते याची थोडी कल्पना यावी. (लगट करणे) पण ते बाफच्या विषयाशी अवांतर आहे.

***

दक्षिणा महोदया,

>>अशा हेट्रोसेक्शूअल लोकांसाठी मॅरेज हे रिलेशनशीप नसून फक्त 'सेक्स' आहे असंच वाटतंय एकूणात.<<

चर्चा समलिंगी संबंध ठेवणे याबद्दल आहे. त्यात सेक्सुअल रिलेशनशिप हा भाग येतोच असे वाटते. उगा प्लॅटॉनिक समलैंगी 'संबंध' असतील तर त्याला जिवलग मैत्री असे सोप्पे सरळ नाव आहे.

>>समलैंगिक लोकांची भावना, किंवा त्यांची मानसिक गरज कुणिच लक्षात घेत नाहिये.<<
तेच समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मला तर हेटेरोसेक्सुअल मॅरेज मधेही, -रिलेशन नाही- भावना/मानसिक गरज इ. कुठे येतात ते सापडत नाही अनेकदा. पण यापुढे जाऊन याप्रकारच्या संबंधांना व विवाहांनाहि समाजमान्यता मिळाली तर पुढचे चित्र कसे असेल याचीही कल्पना या चर्चेतून येईल असे वाटते आहे.

मात्र समोरचा स्ट्रेट आहे हे माहीत असुन सुद्धा लगट करायचा प्रयत्न करणार्‍यांची मात्र घृणा वाटते. <<<
हे असले प्रकार हेटरो्सेक्श्युअल व्यक्ती करत नाहीत?
निदान १०० उदाहरणे स्वत:च्या आणि मैत्रिणींच्या अनुभवातून देऊ शकेन समोरच्याला इच्छा नाही हे माहित असूनही लगट करायचे प्रयत्न केलेली...

दुसर्‍या प्यारेग्राफ मधून थोडा वेगळा चष्मा लावल तर मुलींना काय सहन करावे लागते याची थोडी कल्पना यावी. (लगट करणे) पण ते बाफच्या विषयाशी अवांतर आहे. <<<
+१००००००

उत्तम चर्चा. सगळ्यांचेच न्सगळे नाही तरी बर्‍याच जणांचे बरेच मुद्दे पटले.

तूर्तास एव्हढेच

अशा लोकांची घ्रूणा वाटते आणि कायदेशीर झाल्यावर जास्त उघड्पणे होतील येव्हढेच लिहलेय मी. त्याच पोस्ट्मधे माझे तिनचार मित्र गे असल्याचेही लिहलेय त्यामुळे सगळ्या गे कम्युनिटिबद्दल मला प्रॉब्लेम आहे असेही नाही.

पाटील, इब्लिस,
तुम्ही नैसर्गिक गे व्यक्ती बघितली नाही, म्हणजे ती नाहीच, असं नाही. 'लहानपणापासून मला असंच आकर्षण वाटतं', हे सांगणारे माझे मित्र आहेत. मी चित्रा पालेकरांचा लेख वाचा, हे सांगितलं, याचं कारण हेच. त्यांची मुलगी काही पौगंडावस्थेततल्या 'चुकां'मुळे समलैंगिक झाली नाही. आपल्याकडे मुळातच सामाजिक दडपणामुळे आपला लैंगिक कल लपवण्याची वृत्ती असते. त्यात 'मी जन्मतः असाच' हे कोण सांगणार? मुळात जगभरात झालेलं संशोधन चूक, हे कशावरून?

चिनूक्स,
व्यक्तिशः माझा स्वतःचा प्रेफरन्स जरी 'सरळ' असला, तरी मला इतर प्रेफरन्स असणार्‍या लोकांबद्दल घृणा वगैरे अजिबात नाही. संशोधन चुकीचे आहे असेही माझे म्हणणे नाही. कृपया गैरसमज नसावा.

मला भारतातील समलैंगिक संबंध ठेवणारे काही पुरुष ठाऊक आहेत, व त्यांच्या निवडीबाबत मला काहीही त्रास नाही. पण त्याच लोकांशी चर्चा करून, त्यांचे कौटुंबिक आयुष्य पाहूनही मी हे सांगू शकतो की ते प्युअर गे नाहीत तर बायसेक्सुअल आहेत. व हेटेरोसेक्सुअल संबंधही एन्जॉय करू शकतात, परफॉर्म करू शकतात. यात एका जोडीतील दोन्ही पुरुष आपापल्या आपत्यांचे (पत्नीपासून झालेल्या) बायोलॉजिकल पिताही आहेत.

बरे, सेक्सुअल प्लेझरमधे 'चेंज' हवे म्हणून हे लोक होमोसेक्सुअ‍ॅलिटीकडे वळले असे म्हणावे तर विवाहाआधीही यांनी थोड्याफार प्रमाणात समलैंगी संबंध ठेवलेच होते.

या पार्श्वभूमीवर नॅचरल गे हा प्रकार कसा? हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. त्या गे जीन च्या रिसर्चबरोबर, सेक्सुअल प्रेफरन्सेस विकसित होण्यापाठी सोशल कंडिशनिंगचा भाग किती असा काही रिसर्च आहे का? हेही जाणून घ्यायची इच्छा आहे.

ता.क.
तो लेख मला उपलब्ध नाही. लिंक इ. देणे शक्य होईल का?

.

ईब्ळीस भाऊ
अहो मी कुठे म्हणाले की समलैंगिक हे प्लॅटोनिक टाईप रीलेशन असायला हवे म्हणून? तेच सांगतेय... जे लोक हेट्रोसेक्शूअल आहेत आणि मॅरिड आहेत ते लग्नाकडे फक्त शरिराची गरज्/शारिरिक नातं म्हणून पहातात (सगळेच नाही, पण बर्‍याच प्रमाणात) त्यामुळे गल्लत होतेय सगळी. पण हेट्रोसेक्शूअल लग्न हे समाजाने, संस्कृतीने मान्य झालेले असल्याने त्यात कितीही वास्तविक चूका काढल्या तरिही त्यावर उपाय काहिच नाही. लोक करतातच. म्हणून समलैंगिक नात्यात पण ते शोधत बसायचं? आणि ते चूक ठरवायचं?
कोणती गोष्ट १००% बरोबर आहे आज?

मात्र समोरचा स्ट्रेट आहे हे माहीत असुन सुद्धा लगट करायचा प्रयत्न करणार्‍यांची मात्र घृणा वाटते. कायदेशीर मान्यतेनंतर अशी लगट करायचे प्रकार वाढले तर मात्र ताप होईल.>> सॉरी टू से, पण हे वाक्य अत्यंत हास्यास्पद आहे.

जी व्यक्ती स्वत:च्या ओरिएंटेशनविषयी इतकी जागरूक असेल आणि त्यासाठी लढा देऊन बसली असेल, अशी व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या ओरिएंटेशनशी कशी खेळेल? लगट करून त्याचा अपमान कशी करेल? चला धरून चालू काही थोडे लोक असतीलही तसे, मग ज्यांना त्रास होतो त्यांचे हात आहेत ना शाबूत? द्याव्यात ठेवून २-४.

आणि हे भविष्यातलं आहे हो, इतकी चिंता बरी नव्हे.

चांगली बांधली गेलेली समाजव्यवस्था उधळून लावली जाणार आहे या असल्या भुक्कड प्रकारांनी Angry
मला माहित आहे की यावर लगेच प्रतिसाद येतील की आत्ताची भिन्नलैंगिक लग्नव्यवस्था तरी कुठे पुर्णपणे चांगली आहे ?
अगदी परिपुर्ण नसली तरी ती नैसर्गिक तत्वांवर प्रजोत्पादनासाठी केली गेलेली व्यवस्था आहे.
वर जी उदाहरणे दिली आहेत (एम्ब्रिओ, इ.) तसल्या अनैसर्गिक तत्वांवर मुले जन्माला घालायची काही एक गरज नाही आहे. हे सारे निसर्गाच्या विरूद्ध जाणे आहे.
एकतर आधीच काहीतरी अनैसर्गिक मार्गाने जायचे आणि मग मुले पाहिजेत म्हणुन अजुनच अनैसर्गिक मार्गाने ती जन्माला घालायची ? सगळा वेड्यांचा बाजार आहे.
एकवेळ दत्तक घेतली मुले तर ठीक आहे, पण विज्ञानाने शक्य आहे म्हणुन काहीही करायचे ???
तसे तर क्लोन करता येणे पण शक्य असेल, किंवा मानवी शरिराच्या कोणत्याही घटकाशिवाय (स्पर्मस, इ.) नविन मानव तयार करणे शक्य असेल, म्हणुन तसे करायचे का लगेच ?
याला तुम्ही मागासलेले विचार म्हणा, बुरसटलेली मनोवृत्ती म्हणा काहीही म्हणा, पण हे जे काही घडत आहे ते चांगले नक्कीच नाही.

अगदी परिपुर्ण नसली तरी ती नैसर्गिक तत्वांवर प्रजोत्पादनासाठी केली गेलेली व्यवस्था आहे.
>> फक्त प्रजोत्पादनासाठीच का? Uhoh इतर काही गरजा नसतात माणूस म्हणून?
बाकी वैज्ञानिक प्रगती ही तिथेच राहू देत. काही गोष्टी अस्तित्वात आल्यात त्या माणसाला मदत म्हणून हे ही लक्षात ठेवा. क्लोन वगैरे बनवता येत असले तरिही त्याला कायद्याने बंधने आहेत, उठसूठ कोणिही विज्ञानाचा हवा तसा उपयोग नाही करून घेऊ शकत. त्यामुळे तुम्ही जिथे तिथे विज्ञानाचं उदा देऊन चर्चा भरकटवताय.
स्पर्मशिवाय बाळ बनल्याचं मी तरी ऐकलं नाही अजून.

तसल्या अनैसर्गिक तत्वांवर मुले जन्माला घालायची काही एक गरज नाही आहे. हे सारे निसर्गाच्या विरूद्ध जाणे आहे.
एकतर आधीच काहीतरी अनैसर्गिक मार्गाने जायचे आणि मग मुले पाहिजेत म्हणुन अजुनच अनैसर्गिक मार्गाने ती जन्माला घालायची ? >> Lol अती झालं आणि हसू आलं...

अहो, माणसं समलैंगिक असली तरी त्यांच्या आई बाप होण्याच्या भावना बदलत नाहीत ना? मग या ना त्या मार्गाने ते आई बाप झाले तर तुमचं काय जातय? उलट मी तर म्हणेन समलैंगिक जोडप्यांची मूलं अधिक सोशिक आणि ओपन होतील, कारण सामाजिक व्यवस्थेबद्दल (या असल्या) त्यांना लहानपणापासूनच बाळकडू मिळेल.

Pages