आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रवास चालला आहे रोहनच्या या धाग्याचा. कोणत्याही प्रकारचा वाद आणि कटुताही निर्माण झालेली नाही....अगदी नाबाद द्विशतक ठोकल्यानंतरही....हे आणखीन् एक स्वागतार्ह विशेष.

धाग्याच्या सुरुवातीलास पेशवेकाळापासून व्यक्ती ही त्याच्या व्यवसायावरून ओळखली जाऊ लागली असा उल्लेख केला गेला आहेच. एकच नाव अनेकजणांसाठी घेतले जात असल्याने साहजिकच आडनाव असणे नितांत गरजेचे भासू लागले. वतनदार, कामदार, बलुतेदार, देवकर्म करणारे असे काही ठराविक लोक सोडले तरी उरलेल्या मोठ्या समाजालाही आडनावे देण्याची आवश्यकता होती. ती पुरविली गेली पेशव्यांच्या काळात झालेल्या पुण्याच्या भरभराटीने. ते कसे ते या प्रतिसादात पाहू या.

मुसलमानी आणि मुघल सत्तेच्या काळात [त्यांच्या दृष्टीने] "पुणे" हे एक लष्करी ठाणे म्हणूनच ओळखले जात होते. प्रशासकीय दृष्टीकोणातून त्यानी 'कसबा पुणे' वसविले त्यात कासारली पुनकवाडी [आणखीन् दोनतीन गावे होती] भागांचा समावेश होता. "कसबा = हरहुन्नरी" असा अर्थ होतो, म्हणजेच या पेठेतून अशा कारागिरांच्या उद्योगक्षमतेला कलागुणांना वाव दिला जात होता जो त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करणाराही ठरला. या कारागिरांनी आपापल्या क्षेत्रात मिळविलेल्या प्राविण्यामुळे त्याच अनुषंगाने त्यांची आडनावे अस्तित्वात आली...जसे "तांबोळी...कासार...जिनगर...धनगर....गुजर...बागवान....गवंडी... गाडीवान....रंगारी....साळी....दारुवाले...बांगडीवाले....तांबट....सोनार..." आदी अनेक.

कसब्यातील उपपेठांची निगराणी राखणे, महसूल गोळा करणे आदी प्रशासकीय कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकार्‍यास साहजिकच 'पेठकर...पेटकर" असे आडनाव प्राप्त झाले. तर एखाद्या नव्या कारागिराने कसब्यात उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज केला तर त्या अर्जावर विचार करून त्यास मंजुरी देणार्‍या अधिकार्‍यास 'शेटकर' [अर्जदाराच्या नजरेत तो अधिकारी म्हणजे 'शेठ...मालक' या अर्थामुळे] असे नाम प्राप्त झाले. पुढे त्यास 'शेटे, शेट्ये' असे आडनाव मिळाले. त्याच्याकडे असलेल्या महसुल हिशोब कारकूनास 'महाजन' असे आडनाव प्राप्त झाले.

बाकी कोतवाल, खाजगीवाले, तुळशीबागवाले आदी आडनावे कशी पडले असतील हे त्या नावावरूनच इथल्या वाचकांना समजून येईल.

अशोक पाटील

छान विषय आणि उपयुक्त चर्चा!
गुर्जर आडनावावरून गुजरातशी संबंधित वाटते. पण आमचे(सासर) पूर्वज कोकणातलेच. माझ्या मुलाला त्याच्या एक सरांनी सांगितलं होतं की गुरांशी संबधित असलेला व्यवसाय तुझे पूर्वज करत असतील.
हे सर आय आय टी त प्रोफेसर आहेत आणि खरंच विद्वान आहेत.
....काय वाटतं या अंदाजाबद्दल?
तसे आम्ही गुर्जरपाध्ये. काही लोक फक्त पाध्ये लावतात काही गुर्जर. पाध्ये आडनावावरून वाटतं की उपाध्याय (भटजी) हा व्यवसाय असू शकतो पण गुर्जर?????????

आपला एक माबोकर, मिपाकर आहे त्याचे आडनाव कार्यकर्ते. बरेच दिवस मी हा त्याचा घेतलेला आयडी समजत होते. मग त्याने एकदा खुलासा केला. तोवर कार्यकर्ते हे आडनाव मी ऐकलेलं नव्हतं. Happy

विनार्च तुमची पोस्ट वाचून मी पुढ्चा प्रश्न विचारणार होतेच इतक्यात भाऊ नमस्कार यांन्चा किस्सा वाचला. प्रश्न हाच होता की "बागवे" मसुरयाचे का ? . माझ्या आईचे माहेरचे नाव "साटम". "साटम" हे सगळीकडे आढ्ळत नाहीत. ठरावीक गावातच आढ्ळतात. नवर्याचे आजोळ कोल्हापूर चे "निंबाळकर". . याबद्दल कोणाला माहित आहे का?

वर म्हंटली आहेत त्या प्रमाणे गमतीशीर आडनावे खुप असतात. स्पेशली देशास्थ लोकात. माझ्या आजीची एक मैत्रिण आहे तिचं आडनाव "शौचे", तसेच "डेहड्राय", "टुमणे", " मुंगी", "कावळे", अशा अनेक आडनावांच्या लोकांशी ओळख / नातं आहे. ( डेहड्राय ना तर मी नेहेमी "हेयरड्रायर" च म्हणायचे)

एकदा दाते पंचांग उघडुन बघा. मागे देब्रा, कोब्रा, कब्रा, व इतर आडनावे दिलेली असतात व त्यांची गोत्र सुध्धा. खुप मजा येते वाचताना.

सारस्वतात पण मजेशीर आडनावे वाचली आहेत "तगडपल्लेवार" "उंटवाले" माझ्या सेक्रेटरीचं आडनाव " कुन्नुमल" आहे ती केरळी आहे.

आंबोळे नाव आधी शाळेत असताना ऐकले आहे. माझ्याच बरोबर शिकणारा " अजय आंबोळे" होता. स्वाती तुमच्या रीलेशन मधे आहे का?

"डेहड्राय", >>>>>>>>>> ते देहाडराय असावं मोकिमी. माझ्या परिचयाचेआहेत.
आणि नगरात हैद्राबदकडची विणकर/पद्मसाळी मंडळींची आडनावं पहा........... बिज्जा, सल्ला, बोज्जा, येनगंदूल, मुथ्थ्याल, बत्तिन, गुंडू. एका शाळेचं नाव एका व्यक्तीने डोनेशन दिल्यावर "श्री. बत्तिन पोट्ट्यन्ना विद्यालय" असं आहे.

मानुषी....

'गुर्जर' संदर्भात थोडेसे...

महाराष्ट्र शासनाने जेव्हा 'गुर्जर' जमातीला ओ.बी.सी. कॅटेगरीचा दर्जा दिला त्यावेळी जे ब्राह्मण 'गुर्जर' आडनाव लावीत होते त्यांच्याकडून त्यावर फेरविचार व्हावा अशा प्रकारची निवेदने शासनदप्तरी जमा झाली होती. साहजिकच पुनर्विचारासाठी एक समितीही नियुक्त झाली...संशोधनही घडले...त्यातून असे निष्पण्ण झाले की 'गुर्जर' जमातीचे मूळ अफगाणिस्थान असून ते व्यापारउदिमासाठी खुश्कीमार्गे हिंदुस्थानात आले, इथेच वसले....डोंगराळ भागात वस्त्या झाल्या...त्यामुळे आजही काश्मिर तसेच हिमाचल प्रदेश, हरियाणाचा काही भाग इथे 'गुर्जर' याना शेड्युल्ड ट्राईबचा दर्जा आणि शासकीय सवलती मिळतात. इथे कायमचे वसाहतस्थान करणारे हे 'गुर्जर' बांधव स्वतःला क्षत्रीय सूर्यवंशी [सन वर्शिपर्स] समजत असत. आजही गुर्जर समाजात 'सूर्यदेवते'लाच पूजनीय मानले जाते.

"हूण" काळातील पडझडीनंतर बरेचसे गुर्जर मग भारतातील विविध प्रांतात जाऊन वसले आणि तिथल्या संस्कृतीचाच भाग झाले. त्यांच्या भटकंतीचाच मुद्दा शासनाने मान्य करून त्याना अभिप्रेत असलेल्या शासकीय सवलती प्रदान केल्या.

तुम्ही 'गुर्जरपाध्ये' या आडनावाचा उल्लेख केला आहे. त्याबद्दल इतकेच म्हणता येईल की ज्या ब्राह्मण कुटुंबियांचा 'गुर्जर = एस.टी...ओबीसी' कॅटेगरीला तत्वतः विरोध होता त्यानीच मग आपल्या व्यवसायनिर्देशकतेचा वापर करून 'गुर्जरपाध्ये' हे आडनाव स्वीकारले असावे.

अशोक पाटील

शौचे कोब्रा आडनाव आहे मोकिमी>>>> नाही नी... त्या आजी पक्क्या देशास्थ आहेत धुळ्याच्या !!! माझ्या आजीची जिवलग मैत्रिण. तसेच माझी आई माहेरची दिक्षीत, देशास्थ यजुर्वेदी. धुळे - जळगाव ला हे नाव देशास्थात आहे.

मानुषी... ते "डेहड्रायच" आहेत. देहदराय नाही. कारण वर्षानु वर्ष त्यांच्या नावाची मराठीतली पाटी वाचते आहे.

आई च्या ऑफिसात एक कांबळे मॅडम होत्या त्या देशास्थ ब्राम्हण आहेत. त्यामुळे सेम आडनावं अनेक प्रांतात आढळतात.

माझ्या आजीचं माहेरचं आडनाव "पिले" आहे. पिल्ले नही. ती पण भुसावळची देशास्थ.

सामी...

"निंबाळकर" यांच्याविषयी इतकेच सांगू शकतो की, मराठा घराण्यातील हे एक प्रतिष्ठित असे आडनाव समजले जाते. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये असलेल्या 'निंबाळ' गावचे हे मूळचे रहिवासी जे शेतीकामापेक्षा 'युद्धवीर' म्हणून साम्राज्यात परिचित होते. साहजिकच राजघराण्याशीच यांचा संबंध. "सरदार घराणे" म्हणून आजही निंबाळकरांची ओळख आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम पत्नी सईबाई ह्या निंबाळकर घराण्यातील तर महाराजांच्या आजोबांची पत्नी दीपाबाई ह्यादेखील निंबाळकर.

खुद्द महाराजांनी आपली कन्या सखुबाई हिचा विवाह फलटणच्या महादजी निंबाळकर यांच्याशी करून दिला होता.

अशोक पाटील

'गुर्जर' व 'गुजर' यांतही कांहीशी गल्लत होत असावी. गुजरातमधील बरीच 'गुजर' कुटूंबं महाराष्ट्रात गावोगावीं पिढ्यानपिढ्या स्थायिक आहेत व त्यांचं 'मराठीकरण'ही झालं आहे. त्या कुटूंबातील जुनी माणसं मराठी -गुजरातीचं जें मिश्रण बोलताना वापरत त्यावरूनच ' धेडगुजरी' शब्द आला असावा.

असेल. पण शौचे हे आडनाव चित्पावन लिस्टीत आहे. एका बहिणीला स्थळ आलं होतं (कोब्राच्च यावर ठाम असणारी होती). आडनाव बघून तिने नकार दिला होता. Wink
मी या आडनावाच्या एकाही व्यक्तीला (देब्रा, कोब्रा वगैरे) भेटलेली नाही.

आमच्या office मधील accounts आणि finance सांभाळणार्‍याचे आडनाव "धनावडे" आहे. आम्ही त्याला चिडवतो की तू "धन आवडे" आहेस. Proud

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये असलेल्या 'निंबाळ' गावचे हे मूळचे रहिवासी>>>>>> निंबाळ की निंबळक??? आजवर घरच्यांच्या तोंडुन निंबळक ऐकलं आहे

मस्तच चाललय! एकेक मजेदार नावांविषयी कळतय.

माझ्या एका 'गोस्वामी' मैत्रीणीने सांगितलेला त्याच्या भटक्या जमातीचा उल्लेख.
गिरी, पुरी, गोसावी, गोस्वामी ... हे एकच.
गिरी म्हण्जे डोंगरदर्‍यात फिरणारे. पुरी म्हणजे शहरात फिरणारे/ शहरवासी गोसावी.

फार पुर्वी मी एक पूस्तक वाचलं होतं त्यात कर्‍हाडे ब्राम्हण हे पुर्वी मांसाहारी सारस्वत ब्राम्हण होते व बहुतेक गोवा साईड्ला रहाणारे होते. पण काही परकिय चक्र आलं आणि त्यांना गोवा/कोकण सोडुन देशावर जावे लागले. तिकडे ते राजाच्या आश्रयी गेल्यावर त्यांना राजाने आश्रय दिला पण मांसाहार सोडुन भिक्षुकी व मुख्यत्वे मार्तिकाची कामे करण्यास फर्मावले. राजाज्ञा मानुन त्यांनी किरवंताची कामे घेतली. व मांसाहार सोडुन एक नवी उप शाखा निर्माण झाली ती कर्‍हाडे ब्राम्हण. त्या मुळे बहुतेक कर्‍हाडे ब्राम्हणां चे कुलदैवत एकतर शांतादुर्गा आहे नाहीतर मग कोल्हापुरची अंबाबाई. त्यांची नावं पण बहुतेक "....कर" अशी असतात उदा. जावडेकर, मावळंकर, माईणकर आर्थात प्रभुदेसाई, सरदेसाई, सप्रे, आहेतचपंडिउत, आठल्ये, पाध्ये ही ही आहेतच

ह्या वरील पुस्तकातिल माहितीत खुप गॅप्स वाटतात. कोणाला नक्की माहिती आहे का? अशोक मामा, वरदा ह्यावर काही टिप्पणी?

जगताप - आडनावाचा उगम माहित नाहिये पण आम्ही मजेने जगाला ताप देणारे असं म्हणतो Wink
घरच्यांच्या सांगण्यावरुन जगताप मुळचे राजस्थानचे, राजस्थानमधल्या कोणत्यातरी गावात आजही या आडनावाने एक गादी चालु आहे म्हणे.. बाकी कोणाला याबद्दल माहिती असेल तर द्या.. भावकीतले जे कोणी राजस्थानला जाउन माहिती काढुन आलते ते आता हयात नाहियेत, अन त्यांनी कुठे लिहुनही ठेवलेलं नाहिये, त्यामुळे ही माहिती कितपत खरी आहे तेही सांगता येणार नाही..

माझ्या माहेरच्या आडनावावरुन मला ही कित्येक वेळेस चिडवले गेले होते. माहेरचे आडनाव 'वानखेडे'.
आमच्याकडे विशिष्ट देवकार्यात 'भाट' लोकांना बोलावले जाते. त्यांच्याकडे आमच्या कुटुंबाचा पुर्ण इतिहास असतो म्हणे....अगदी मुळपुरुषापासुन. त्यांच्या चोपडीनुसार आम्ही मुळचे चितोडगडचे 'देव'.
मुळपुरुषः अर्जुन देव. नंतरच्या २-३ पिढ्यांनंतर हे लोक इंदोरमार्गे महाराष्ट्रात स्थायिक झाले.
सोनारी काम करु लागले. म्हणुन अहिर सुवर्णकार हे क्षत्रिय सोनार असतात.
त्यात म्हणे कुणी बाईने एकदा संक्रातीला वाण देतांना हिर्‍याचे खडे दिले. तेव्हापासुन वाणखडे/ वानखडे नंतर वानखेडे नाव झालं असं आई सांगते. खखोदेजा.

चिमुरी, माझे मामेकुळ 'जगताप' आहे. त्यांचाही इतिहास राजस्थानातलाच आहे. Happy

'दिक्षित' आडनाव आमच्यात पांचाळ सोनारांमधे आहे.

देव हे आडनाव पण राजस्थानातिल आहे असे म्हणतात ( संदर्भ रमेश देव - सीमा देव मुलाखत ) पण देव हे आडनाव मी मराठी देशास्थात ही पाहिले आहे व कर्‍हाडे ब्राम्हणातही.

तसेच एकदा सॉलिड गंडले होते. एका बँक ऑफिसर जो "देव" आडनावाचा होता त्याला भेटायला गेले. मला वाटलं मराठी असेल, तर कसचं काय तो तर नैनितालचा गढवाली निघाला!!!!!

तिकडे ते राजाच्या आश्रयी गेल्यावर त्यांना राजाने आश्रय दिला पण मांसाहार सोडुन भिक्षुकी व मुख्यत्वे मार्तिकाची कामे करण्यास फर्मावले. >>> हे खरं असावं. पुण्यातले मोघे किती प्रसिद्ध आहेत. Monopoly आहे त्यांची. Wink

त्या मुळे बहुतेक कर्‍हाडे ब्राम्हणां चे कुलदैवत एकतर शांतादुर्गा आहे नाहीतर मग कोल्हापुरची अंबाबाई. त्यांची नावं पण बहुतेक "....कर" >>> नाही नाही, आमचं कुलदैवत कोकणात आहे. आणि आडनाव ही 'कर' वालं नाही. Happy

@अशोकमामा ---
नागपूर, लातूर, निलंगा भागात आडनावाच्या शेवटी "वार" येते त्याचा अर्थ काय ? हे लोक मुळ मराठी की आंध्रचे ? हेडगेवार, वझलवार, सोमलवार, मुत्तेमवार, वडेट्टीवार, इ.

मो कि मी
पेणला खूप देव लोक आहेत. सगळे कोब्रा. यशवंत देव पेणच्या देवांपैकी.

देव आडनाव पंजाब्यांच्यात पण ऐकलंय.

Pages