आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तरेत नैनीताल वगैरे भागातले पहाडी किंवा कुमाऊनी लोक आहेत ते म्हणतात की कुठल्या तरी युद्धाच्या वेळेला ते महाराष्ट्रातून पळून जाऊन तिकडे सेटल झाले.

>>> हे नव्याने ऐकतोय. पानिपतच्या वेळीच असतील का? Uhoh असेलही.

रोहन, अशी स्थलांतरे इतर कारणांनी पण झालीत. असम मधे मराठवाड्यातले देशमुख परंपरेने पुजारी आहेत.

कल्पना नाही. मी पण पहिल्यांदाच ऐकले हे.
दिल्लीतल्या त्या लग्नात टिपिकल उत्तरेचा बडेजाव, चमचम इत्यादी काही नव्हते. तेव्हा आमची लग्न साधीच असतात. आमचं मूळ महाराष्ट्रातच असं सांगण्यात आलं.
यापलिकडे जास्त माहिती नाही पण.

रोहन,

> > एक पारकर आडनाव सोडले तर अजून दुसरे कुठले इंग्रजी आडनाव मलातरी अजुन लक्ष्यात येत नाहिये.

काणे Kane, दाते Date, सुळे Sule. Happy

आ.न.,
-गा.पै.

@केदार जाधव,

यादव पासून जाधव झाले असावे ...जाधवराव,जाधवर,जाधव,यादव,सोळसकर(यादव) वगैरे

@रोहन

देशमुखांना तटबंदी असलेल्या गढ्या,वाडे उभारण्यास मनाई होती.स्वतः चे पगारी सैन्य ठेवण्यास मनाई होती, न्यायदान आणि शिक्षा सुन्यावण्याचे अधिकार सीमित करण्यात आले होते,आधीच्या काळात स्वतः करवसुली करता येत असे व त्यातील काही भाग सुलतान घेत असे नवीन करप्रणाली व्यवस्थेत एक दुवा म्हणूनच यांचा उपयोग होत असे.

बाकी चौगुला,मोकदम,चौधरी,मोकाशी,पाटील,देशमुख,सरनौबत,अधिकारी,सरनाईक,नाईक,इनामदार,देसाई हि आडनावे पदावरून
तर
झुंझारराव,सूर्यराव,रणपिसे इ . आडनावे किताबा वरून झाली असावीत वाटते...रोहन अजून भर टाका

नानासाहेब पेशव्यांबरोबर बरीच कुटुंबे उत्तरेत गेलेली तिथलीच झालेली आहेत.

बनारसला काही ब्राह्मण कुटुंबे आहेत जी पूर्णपणे उत्तरप्रदेशी रितीरिवाजांमधे मिसळून गेलेली आहेत पण घरात तोडकं मोडकं तेलुगु बोलतात आणि त्यांचं मूळ आंध्रातलं आहे.

आपल्याला वाटतं आंतरराष्ट्रीय स्थलांतरात सगळ्यात जुने गुजराथी व्यापारी. पण वेस्ट इंडीज आणि त्या पट्ट्यात २०० वर्षांपूर्वी बरीच उत्तर प्रदेशी, बिहारी मंडळी गुलाम म्हणून नेली ब्रिटीशांनी. बहुतेक सगळ्यांचे आडनाव प्रशाद असते. आमचा एक मित्र आहे त्याला हिंदी लिहिता, वाचता, बोलता येत नाही पण हिंदी स्तोत्रे, हनुमान चालिसा सगळं टिपिकल उत्तरेच्या लहेज्यात म्हणू शकतो. तुलसी रामायण पाठ आहे त्याला. आजीच्या शेजारी बसून लहानपणी पाठ केलंय.

स्थलांतराची गंमत असते... Happy

नीधप,

स्थलांतरितांचा विषय काढल्याबद्दल धन्यवाद! Happy

त्यावरून आठवलं की इंग्रजांनी मॉरिशसमध्ये जे मजूर पकडून नेले त्यात बहुसंख्य मराठी आणि बिहारी होते. मॉरिशसमध्ये पोहोचलेल्यांची कागदोपत्री नोंद करतांना आडनावे मात्र जाणीवपूर्वक वगळली. त्यामुळे तिथे आज जे भारतीय वंशाचे लोक आहेत त्यांची मूळभाषा ही एकमेव ओळख राहिली आहे.

आ.न.,
-गा.पै.

अशीच मजेदार कथा कामत आडनावाबद्दल.
राजाच्या दरबारी सल्लागाराच काम करणारे हे लोक. निर्णय घेताना राजा ह्याना 'काय मत ?' असे विचारत असे त्यावरून हे झाले कामत.
(अर्थात ह्यात इतिहासापेक्षा कथा जास्त आहे असं वाटतं . )

मालीजीराव.. चौगुले चा अर्थ ठावूक असल्यास देणे. बाकी देशमुखीबद्दल तुम्ही लिहिलेले मान्य.

नीरजा.. माझ्या आधीच्या कंपनीत वेस्ट - ईंडीज इथल्या २ मुली होत्या. आडनावे - रामचरित्र आणि रामप्रसाद.

पुर्वी इंग्रजांनी गुलाम म्हणुन खुपच भारतीय सर्वत्र नेले.

ते लोक पूर्णपणे तिथल्या संस्कृतीत मिळून गेलेले आहेत. घराबाहेरचं सामाजिक आयुष्य तिथल्यांसारखंच आहे.
मात्र घरात काही हिंदू चालिरीती आणि प्रार्थना इत्यादी आहेत.

मालोजीरावांच्या आदल्या एका पोस्ट मध्ये 'मोकासा देणे' असा उल्लेख आलेला आहे. मोकासा किंवा पोट मोकासा देणे यावरुन मोकासी - मोकाशी हे आडनाव आलय. पुर्वी ह्या लोकांकडे कुठल्या ना कुठ्ल्या भागाचा अधिकार असणार. Happy

'बागवे' नावाबद्दल काहि माहीती आहे का? बाबा म्हणतात कि मूळ नाव सिसोदीया, राजस्थान मधून महाराष्ट्रात आले . त्याचे बागवे कसे झाले माहीती नाही.

माझी एक पंजाबी मैत्रीण आहे, आडनाव 'डांगे'. पानीपत ची आहे. तीच्या आडनावाचे सुरवातीला खूप आश्चर्य वाटले होते.

नंदिनी, खेर आडनाव माझ्या माहितीप्रमाणे कोकणात आणि काश्मिरात प्रचलित आहे. उत्तरप्रदेशातले खेर मराठ्यांबरोबर स्थलांतरित झालेले वा काश्मिरातून आलेले असावेत. चूभूदेघे.
आ.न.,
-गा.पै.

टिल्लू हे कोब्रा आडनाव काश्मिरी वाटतं (टापलू, टिक्कू, मट्टू याप्रमाणे). पण मला या नावाचा कोणी काश्मिरी माणूस आढळला नाहीये. दोडामार्ग हे स्थान गुलमर्ग, खिलमर्ग या काश्मिरी गावांसारखं वाटतं, पण प्रत्यक्षात हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक तालुक्याचं ठिकाण आहे.

खेर, टिल्लू अशी आडनावे, दोडामार्गसारखी स्थाने यावरून कोकण आणि काश्मिराचा काहीतरी घनदाट संबंध असावासं वाटतं.

-गा.पै.

@रोहन
चौगुला म्हणजे पाटलाचा तैनाती प्रमुख माणूस,
चार चौघे गोळा करणारा ,चाहु बाजूने गोळा (कर,सारा) करणारा ,जातपंचायत बोलावणारा,बलुतेदार अलुतेदारांना एकत्र आणणारा त्यांच्या नेमणुका करणारा.
बारा बलुतेदारा मधील पहिला

शिंदे हे आडनाव बरेचदा काहींना "दिले गेले". उच्च लोकांच्या ( उदा राजे / पेशवे / दरकदार) शरीरसंबंधातून जन्मलेल्या व्यक्तींना शिंदे हे नाव पण दिले आहे असे देखील वाचनात आले आहे. अर्थात सर्वच शिंदे असे आहेत असे नाही. मला शिंदेंची व्युत्पत्ती माहिती नाही, काही पुस्तकातून वाचलेली ही माहिती आहे.

-
अरेच्चा हे नाव मुसलमानात पण (आणि ख्रिश्चनात पण आहे) असे अनेकदा आढळले, पण ते कन्वर्ट असतात. आधीची हिंदू वागणूक सोडवता येत नाही पण नवीन धर्मही मिळालेला असतो. (बळजबरी कारण ऐच्छिक मध्ये नाव स्वतःच बदलून घेता येईल) मग ते आडनाव तसेच ठेवले गेले.

आणखी एक गोष्ट. भारतीय मुसलमानात एक कुंकू सोडले तर बांगड्या, जोडवी, मंगळसुत्र हे देखील लग्नात असते.

उत्तर भारतात अनेक घडामोडींमुळे (युद्ध, राज्यविस्तार) मराठी लोक स्थलांतरीत झाली. ग्वालेर, जबलपुर, दिल्लीचा भाग, इंदोर, उज्जेन्, काशी, मथुरा इत्यादी भागात ही लोक आढळतील.

इथे भाषेवरच्या पोस्टी पाहिल्या. एक मी ही टाकतो. Happy

भाषेवरून आढळले, इराण ते पूर्व युरोप मध्ये संस्कृत बोली शब्द असणारे पण भारताशी संबंध नसणार्‍या काही टोळ्या राहतात, त्यांच्या भाषेवर रिसर्च चालू आहे. (त्या पेपरचे नक्की नाव आत्ता आठवत नाही) असे मानले जाते की त्या हिंदूकुश पर्वत रांगेतील तत्कालिन भारतीय टोळ्या आहेत. हिंदू कुह म्हणजे हिंदूंची कत्तल, त्याचा भ्रंश कुश ही रांग अफगाण मध्ये आहे. हीच रांग अफगाणला हेलमंड पासून तोडते. म्हणजे पूर्वीची सरस्वती नदी असे काही विद्वान मानत. अर्थात हेलमंड कशी सरस्वती नाही हे पुराव्यासहित आता मांडले गेले आहे. पण गंमत म्हणजे हे जे लोक परागंदा झाले ते त्यांची भाषा / संस्कृती ही तपासून पाहिली जात आहे, काय सांगावे एखादा दुवा मिळायचा.

आपल्याला शहरात वेगेवेगळ्या आडनावांची माणसे शेजारी शेजारी दिसतात. पण महाराष्ट्रातल्या काही छोट्या गावात एखादी गल्ली (आळी) किंवा पूर्ण गावच एकाच आडनावाचे असते. माझ्या आजोळी आमच्या आळीत सगळे भोसलेच !

थोरातांची कमळा , मोहित्यांची मंजुळा असे केवळ चित्रपटच नव्हते तर असे उल्लेख आजही होतात.

हो दिनेशदा.... आमच्या गावाला देखील आम्ही सोडले तर बाकी सर्व सावे.

माझे पणजोबा गावातल्या दुसर्‍या आळीतून येउन इथे नव्याने घर विकत घेउन स्थिरस्थावर झालेले.

Pages