आडनावांचा इतिहास...

Submitted by सेनापती... on 26 December, 2012 - 20:45

नमस्कार...

येथे विविध आडनावे, त्यांची उत्पत्ती / व्युत्पत्ती आणि इतिहास याबद्दल माहिती संकलीत व्हावी अशी इच्छा आहे.

पुर्वी आडनावे नव्हती असे दिसुन येते. ती कधी पासून वापरात येउ लागली, कशी तयार होत गेली याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

अनेकांना स्वतःच्या आडनावांचा इतिहास / अर्थ माहित नसतो ते ही कदाचीत येउन माहित होउन जाईल.

कृपया... या धाग्यावर एखाद्या आडनावाविषयी माहिती विचारण्याआधी खाली दिलेल्या पानांवरील आडनावे वाचून बघा.

उल्लेख / माहिती असलेली आडनावे -

पान १ : देशपांडे, देशमुख, पाटील, चौधरी, परजणे, गायकवाड, भारती, कुलकर्णी, उपाध्ये / उपाध्याय, सकळकळे, देव, पटवर्धन, सावंत, सामंत, मराठे

पान २ : जोशी, कोंडे-कोंढे, चव्हाण-चौहान, शिंदे, पाठक-वेदपाठक, जुन्नरकर

पान ३ : सहारे, खंडाळकर, गाडगिळ, पवार, रावण, अशोकदा यांची पोस्ट, वाघमारे आणि प्राणिवाचक आडनावे, देसाई - नंदिनी यांची पोस्ट, केंभावी, चौधरी - प्रिंसेस यांची पोस्ट

पान ४ : गांधी-नेहरु, बच्चन, देसाई - अधिक माहिती, कुलकर्णी, नाडकर्णी, जगदाळे, साबळे, दहातोंडे, 'आडनाव' वा 'कुळनाम' - अशोकदा यांची पोस्ट, यामादा-हायाशी-कोबायाशी - जपानी आडनावे, राजे, राजेशिर्के, पंदेरे, खताते, भुरण, काते, चिले

पान ५: शिंदे, किर्लोसकर, देसाई - अशोकदा यांची पोस्ट, इनामदार, जाधव, यादव, तांबोळी, मणियार-मण्यार, पारकर, दिक्षित

पान ६ : भारतातील-परदेशातील स्थलांतरीत मराठी आडनावे, मोकाशी, खेर, चौगुले

पान ७ : धामणे, शिलाहार-शेलार, भट, देवधर, गोडबोले, प्रभु-देसाई, भिडे, आंबोळे, वालावलकर

पान ८ : ठाकूर-ठाकरे-ठाकेर, बागवे - भाऊंची पोस्ट, थोरात, बडवे, किंकर, राउत, साळवे-साळवी, कदम-कदंब, चुरी

पान ९ : पेठकर-पेटकर, गुर्जर, पाध्ये, निंबाळकर, जगताप, वानखेडे, देव

पान १० : मुळे-मुळ्ये, 'वार'चा अर्थ, मुंबई परिसरातील आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट,

पान ११ : शिकलगार, अग्निहोत्री, हर्डिकर-अभिषेकी-मंगेशकर, सोनार, किहिमकर, वाघ, माळगावकर,

पान १२ : विविध क्षेत्रातली प्रसिद्ध आडनावे - दिनेशदा यांची पोस्ट, वणकुद्रे, सोळंकी, पारसी आडनावे, कुलवृत्तांत-मौखिक इतिहास - वरदा यांची पोस्ट, पांड-पांडे, राजस्थानी आडनावे

पान १३ : कर्णिक, गुप्ता-गुप्ते, सरदार, तेंडुलकर, बंगाली आणि विदर्भीय आडनावे, परांजपे

पान १४ : येल्लुर आणि गीर येथील आफ्रिकन वंशाचे सिद्दी, शेंडे-शेंड्ये, आडनाव लावण्याची प्रथा - चिनुक्स यांनी दिलेल्या लिंक्स, केळकर, साठे-साठ्ये, मठाधिकारी, धडाम

पान १५ : चित्पावन ब्राह्मण, गोत्रे, आडनावे व इतिहास, तंजावर मराठी आडनावे, भंडारी, पाटणकर

पान १६ : श्रोत्रिय, ठाकर, समर्थ, पाठारे प्रभु आडनावे, वाडवळ आडनावे, हातीवलेकर, धडाम, भाट, अधिक तंजावर मराठी आडनावे, विश्वासराव

पान १७ : पुणतांबेकर, घाटपांडे, प्राचीन मराठीचा शब्दकोश - चिनुक्स यांची पोस्ट, ठोमरे

पान १८ : ........ अपुर्ण...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाशिकच्या आदिवासी भागात 'सहारे' आड्नाव खूप आहे. ते लो़कं त्याची गोष्टच सांगतात

शिवाजी महाराज सुरतेवरुन लूट घेऊन येताना त्या भागातून आले. काही जखमी मराठे सैनिक तेथेच थांबले उपचाराला. त्यांना त्या डोंगरात राहणार्या लोकांनी 'सहारा' दिला, नीट सांभाळले. म्हणून त्यांना नाव पडले 'सहारे'
(सहारा देणारे)

कुळकर्णी आडनावाबद्द्ल मला माहीत असलेलं - हे सुद्धा एक पद होतं शिवाजी महाराजांच्या काळात. अजून माहीती असेल तर जाणून घ्यायला आवडेल...
अजून एक माझी पणजी मला सांगायची की आपलं आडनाव खंडाळकर म्हणून, पण मग कुळकर्णी केव्हापासून वापरतात ते काही नाही माहित !

माझा मुलाने मला हा प्रश्न विचारला होता कि मुलाचे नाव तर आत्या कानात सान्गते मग आड्नाव कोण सान्गत ?
आजपर्यन्त मी त्याला उत्तर काही देऊ शकलो नाही
कारण कोणत्याही एका नियमात आड्नावे बसतच् नाहीत
आम्ही मूळचे गाड्गीळ् पण पूर्वजान्पैकी कोणीतरी वैद्यकी केली तेव्हापसून वैद्य झालो
हुद्दा व्ययसाय रन्ग गाव अशी काही ढोबळ व्युत्पत्ती देता येते पण खालील अपवादान्ची यादी वाढत जाते
लेले, रानडे,अभ्यन्कर्,गाड्गीळ्,अत्रे,खिरे,तापस्,ढेरे,मुद्कवि आदि / अनन्त
तरीही या धाग्यातून काही नवीन माहिती मिळेल हे नक्की

माझी एक मैत्रिण आहे कोल्हापूरला, ती मूळची पवार. तिचं लग्न ठरलं त्या माणसाचं आडनाव 'रावण' होतं. मी म्हणलं बाई आडनावात मार खाल्ला बघ.

तिचं लग्नं झाल्यावर इतिहास कळाला.. तिचं आडनाव भोसले होतं, पण त्यांचे कित्तीतरी पुर्वज नाटकात कामं करायचे, आणि सगळे रावणाचीच भूमिका करत होते म्हणे, Uhoh म्हणून त्यांचं आडनाव रावण..

रोहन....

फार अभ्यासू धागा सिद्ध होऊ शकतो हा. विषयाची व्याप्ती चर्चेद्वारे जितकी वाढविता येईल तितकी वाढविली जाते. आमच्या शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयात तर या संबंधीचे एक विशेष दप्तर [रुमालही म्हणत] होते आणि आम्ही काही मित्र डॉ.गो.मा.पवार [त्या काळातील मराठी वि.प्रमुख] यांच्या मार्गदर्शनाखाली आडनाव व्युत्पत्तीचा धांडोळा घेत असू.....अर्थात त्यामागे 'अभ्यास' हा हेतू नसून एकप्रकारचे कुतूहलच होते असे म्हटले तरी चालेल.

त्या आठवणीच्या आधारे हा प्रतिसाद :

धाग्यात तुम्ही 'इतिहास' शब्दाचे प्रयोजन केले आहे. त्या अनुषंगाने लिहायचे झाल्यास आपले गलबत प्रथम साता समुद्रापल्याड इंग्रजी किनारपट्टीकडे नेले पाहिजे. आडनावांची प्रथा नक्की केव्हा सुरू झाली, हे अधिकारवाणीने सांगणे काहीसे कठीण आहे कारण त्याला ठोस असा लिखित पुरावा, ताम्रपट आदी तुम्ही मागितले तर मिळू शकत नाही. आपल्या संस्कृतीत मुळात आडनाव हा प्रकारच नव्हता, म्हणून जसे दादोबा पांडुरंग, भाऊ दाजी, जगन्नाथ शंकरशेठ, भिकाजी यमाजी अशाच अपत्य आणि बाप या जोडीने ती व्यक्ती ओळखली जात असे तद्वतच पूर्वी युरोप आणि अन्य आशियाई देशातील लोकांतहीआडनावाची पद्धत नव्हती. मात्र इंग्‍लंडमध्ये साम्राज्य विस्तारानंतर म्हणजेच अकराव्या-बाराव्या शतकांपासून कुलनामाचा/आडनावाचा वापर होऊ लागला, असे म्हटले जाते, त्याला कारण म्हणजे राणीच्या आदेशाच्या आधारे ज्या सेनापतीने ते विजय मिळविले त्या सेनापतीचा आदरसत्कार करायचा झाल्यास निव्वळ 'जॉन विल्यम्स' असा न करता {कारण जॉन, रॉबर्ट, विल्यम, जेम्स...अशी नावे हजारोनी असायचीच} त्याच्या कुळाचे नाव लावणे योग्य समजले गेले. उदा. जॉन विल्यम्स बार्न्स.... जेफर्सन, बेन्टिंक, लॉईड, बूथ इ. पुढे इंग्रजी साहित्य रचनेतही लेखकाचे केवळ नाव न देता त्याच्या आडनावाचा उल्लेख करणे त्या त्या काळातील प्रकाशकांनी योग्य मानले, जसे. मार्लो, शेक्सपीअर, कीट्स, शेली, बायरन इ.

इंग्रजाच्या साम्राज्यविस्तारानंतर त्याच्या संस्कृतीचाही त्या त्या काळात ठिकठिकाणी विस्तार होत जाणे क्रमप्राप्त होते. आपल्या महाराष्ट्रात त्या शतकात जरी इंग्रजी अंमल नव्हता तरी 'राम, कृष्ण, पांडुरंग, महादेव, मारुती, गणपती' अशा देवनामाचा सर्व जातीमध्ये सर्रास वापर होत गेल्यावर 'अमुक एक राम वा तमुक एक तुकाराम हा नेमका कुणाचा ?" हे ठरविण्यासाठी का होईना त्याच्या बलुतेदारी धंद्याचा उल्लेख नावासोबत करणे गरजेचे भासू लागले होते. साहजिकच ती सोय योग्य वाटल्याने मग एकच राम परंतु त्या नामाच्या शाखा गावात निघाल्या, उदा. राम भट, राम पुजारी, राम सुतार, राम गवंडी, राम सोनार, राम दरवान....आदी. ही म्हटली तर 'कुलनामे' म्हटली तर 'आडनावे'. त्यातही धंद्यामुळे, वतनदारीमुळे एखादी व्यक्ती तात्काळ ओळखणे खूपच सोईचे झाल्यावर 'पाटील, कुलकर्णी, देशपांडे, सुतार, भोई, पुजारी, गवंडी' ही आडनावे म्हणून जशीच्यातशी स्वीकारली गेली असा इतिहास सांगतो. अर्थात हेही तितकेच खरे की आडनावाचे महत्त्व खर्‍या अर्थाने पेशवाईत आणि नंतर इंग्रजी अंमलात वाढले....त्याला जातीय रंगही मिळू लागले, जे त्या काळाला अनुलक्षून सर्वच घटकांना सोईचेही झाले.

कोणत्याही शतकातील कुटुंब व्यवस्थेच्या मागोवा घेतल्यास आपणास आढळून येईल की, इथेच नव्हे तर युरोपीयन संस्कृतीदेखील 'पुरुषप्रधान' असल्याने कुमारी मुलगीला बापाच्या घराण्याचे आडनाव जन्मजात मिळत असले तरी ती विवाहित झाल्यावर तिला पतीच्या नावाने ओळखले जाऊ लागले. तारा (तिचे नाव) भर्ता रघुनाथ (पतीचे नाव) म्हणजे त्या पुरुषाची ती पत्‍नी, असे समजले जात असे. परंतु पुढे व्यक्तिनिर्देशाला ही पद्धतसुद्धा अपुरी पडू लागली, त्याचबरोबरीने 'जात तसेच आर्थिक' स्थितीवरून समाजात कुटुंबाचे महत्त्व वाढीस लागून प्रत्येक व्यक्ती ही तिच्या कुटुंबाच्या योगे ओळखली जाऊ लागली; त्यामुळे कुटुंबाच्या आडनावाची आवश्यकता भासली आणि मग पूर्वाश्रमीची कु.तारा जगन्नाथ बोकील आता 'सौ.तारा रघुनाथ गोखले' म्हणून ओळखू लागली. आडनावावरून सोयरिक ठरविणे सोपेही जाऊ लागले.

मात्र केवळ 'पित्या'चे घराणे यावरून वा कुलपुरुषावरून आडनावाची व्युत्पत्ती झाली असे मानण्यात अर्थ नाही. कुलपुरुषाचे जन्मस्थळ तसेच कार्यस्थळ यावरूनही आडनावे रुढ झाल्याचे दाखले आहेतच. उदा.. सदाशिव पुणेकर, अनुराधा औरंगाबादकर, सरू सातारकर....इ. शिवाय वर म्हटल्याप्रमाणे व्यवसायनिर्देशक आडनावेही रुढ झाली, उदा. जोशी, व्यास, पुराणिक, पाटील, देशमुख, चिटणीस, फडणीस....तसेच बारा बलुतेदार.

अजूनही खूप प्रकार येतात आडनाव व्युत्पत्तीसंदर्भात. पण हाच प्रतिसाद काहीसा मोठा झाल्याने इथेच थांबतो. वाचकांना आवडल्यास आणि शक्य झाल्यास पुढेही चर्चा चालू ठेवता येईल.

अशोक पाटील

मला नेहमी पडणारा प्रश्न आडनाव प्राण्यांवरुन का घेतली असतील.
वाघ , बकरे , कोल्हे , लांडगे , बोके , ससे , डुकरे ई.
आमच्या आडनावाबद्दल पण काहीच माहीती नाहीये. का? कधी? कोणी?

मला नेहमी पडणारा प्रश्न आडनाव प्राण्यांवरुन का घेतली असतील.
वाघ , बकरे , कोल्हे , लांडगे , बोके , ससे , डुकरे ई.>>
आणि त्याहून पुढे वाघमारे, वाघचौरे ई. ??

चला... धागा धन्य झाला.. >> +१००

इथेच थांबतो. >> थांबू नका.. रोहन ने मस्त धागा उघडलाय तेव्हा ज्ञानात भर पडणारच.. Happy

वाघमारे हे शिकारीशीच संबंधित असावे ना.
माझ्या बर्‍याच कातकरी मैत्रिणींची आडनावं वाघमारे आहेत. सह्याद्रीच्या डोंगरातलं एथनिक वसतिस्थान बघता आडनावाच्या अर्थाशी संबंध आहेच.

वाघ , बकरे , कोल्हे , लांडगे , बोके , ससे , डुकरे ई
>>>> बहूदा हे लोक त्या-त्या प्राण्यांशी संबंधीत व्यवसायात असावेत. म्हणजे मारणे, पाळणे वगैरे....

अशोक, नेहमीप्रमाणेच सुंदर पोस्ट.

आडनाव बदलाचे अगदी धोरणी उदाहरण म्हणजे फिरोज दारूवाला यांचे फिरोज गांधी होणे. सासरेबुवांनी अगदी योग्य सल्ला दिला ( का अट घातली ?) अजून फायदा मिळतोय, सर्व फॅमिलीला.

मराठीतल्या विद्यासागर, बुद्धिसागर, मनोहर आणि तत्सम आडनावांची व्युत्पत्ती कशी असेल याबद्दल जाम उत्सुकता आहे.

विद्यासागर, बुद्धिसागर
>>> हे कधीकाळी हुशार / तत्वज्ञ वगैरे असतील एखाद्या राजाच्या पदरी. त्यांना वृत्या दिल्या असतील तेंव्हा बहुदा.

देसाई आडनावाची फार गंमत असते. गुजराती ब्राह्मण, कोकणी मराठा, कर्नाटकी ब्राह्मण, ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांमधे मी देसाई आडनाव पाहिलेलं आहे. मुंबईत असताना तर देसाई म्हटलं की "तमे गुजराती" चालू व्हायचं मग मी कानडी आहे म्हणून सांगितलं की कोण आश्चर्य वाटायचं. कोकणी मुसलमानांमधे तर उपाध्ये, जोशी, पाटणकर, असली ब्राह्मणी आडनावं पण पाहिली आहेत. Happy

आम्ही बागलकोटमधल्या सात की सतरा गावचे देसाई. वरती लिहिलंय तसं देसाई हे तेव्हाचे पद असावे. तेव्हा अर्थात भरपूर शेतीवाडी वगैरे होती. कर्नाटकात ब्राह्मणांचे दोन प्रकार असतात. एक आचार्य (बोलीभाषेत आचार) म्हणजे पौरोहित्य करणारे. आणि दुसरे देसायर(यामधे देशपांडे पण आलेच) म्हणजे आमच्यासारखे शेती अथवा इतर व्यवसाय करणारे. आचार कधीपण आर्थिक स्थितीने कमी, पण सोवळेओवळ्याच्या बाबतीत महाकटकट. त्यामानाने देसायांकडे सोवळे ओवळे थोडे खुंटीला टांगलेले असते. पण आचारांकडे मुलगी देणं कमीपणाचं मी कोकणस्थाशी लग्न केल्यावर आमच्याकडे "आचार लग्ना माडकोंडी, यंग निगबेकू" हे ऐकून घ्यावं लागलं होतं. सासरकडचं सोवळं काय असतं हे सांगितलं असतं तर बहुतेकांचे डोळे पांढरे झाले असते Proud

आडनावे आणि जाती यांचा संबंध फार अलिकडचा असावा. कारण, कोकणामधे देसाई आडनावाचे लोक मराठा जातीचे असतात, आणि कर्नाटकात कित्येकदा पाटिल आडनावाचे लोक ब्राह्मण असतात.

आमच्याकडे केंभावी म्हणून एक आडनाव असतं. केंभावी मधे केंपू म्हणजे लाल, आणि बावी म्हणजे विहीर. नात्यातले एक कुटुंब जवळ्जवळ चाळीस वर्षापूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. तिथे त्यानी आडनाव बदलून "रेडवेल" असं करून घेतलंय हे गॉसिप आमच्याकडच्या कौटुंबिक कार्यक्रमात नित्याचंच. Proud

कोकणात मराठा आणि सारस्वत दोन्ही देसाई आहेत नंदे.

पाटील - मराठा आणि दे ब्रा
देशमुख - मराठा, सिकेपी आणि देब्रा
देशपांडे - सिकेपी, देब्रा
देसाई - मराठा, सारस्वत, देब्रा
कुलकर्णी - सिकेपी, देब्रा

असे आहे कारण ते हुद्दे आहेत.

ईथे माबोवर अनेक वर्षे पडीक असणार्यांची आडनावे भविष्यात मायबोले ,मायबोलीकर ,धागाकर्ते, रच्याकने, विपु, विपुले, विपुकर डुआयडे, डुडुआयडे, रिक्षाफिरवे अशी पडली किंवा बदलली तर ADMIN जबाबदार राहणार काय...

ईथे माबोवर अनेक वर्षे पडीक असणार्यांची आडनावे भविष्यात मायबोले ,मायबोलीकर ,धागाकर्ते, रच्याकने, विपु, विपुले, विपुकर डुआयडे, डुडुआयडे, रिक्षाफिरवे अशी पडली किंवा बदलली तर ADMIN जबाबदार राहणार काय...

कोकणी मुसलमानांमधे बरीच कोब्रा वा हिंदू आडनावे आहेत याचं कारण धर्मांतर आहे. अनेकांना आपण नक्की किती पिढ्यांपूर्वी मुसलमान झालो हे ही माहित असतं.

कोकणी मुसलमानांमधे बरीच कोब्रा वा हिंदू आडनावे आहेत याचं कारण धर्मांतर आहे. अनेकांना आपण नक्की किती पिढ्यांपूर्वी मुसलमान झालो हे ही माहित असतं.

>> होय. हेच वसई-आगाशी भागात. ह्यांची नावे सिद्धर्थ डि'सोझा, रतन डि'मेलो वगैरे... Uhoh पुर्ण हिंदु नाहीतर पुर्ण ख्रिस्ती नाव का घेत नसावेत?

तर आमच्या पूर्वजांना चौधरी पदवी कशी मिळाली त्याबद्दल
मूळचे आम्ही मध्यप्रदेशच्या सीमेवरच्या गावाचे पाटील होतो. तर त्या गावात दुष्काळ पडला म्हणुन सगळा गांव गोळा करुन माझे पणजोबा की खापर पणजोबा महाराष्ट्रात यायला निघाले. वाटेत दरोडेखोरांनी हल्ला केला तेव्हा त्यांनी शूरपणे लढा दिला आणि लोकांना वाचवले. (ही कथा खूप रंगवुनही सांगता येते :)) पण इथे संक्षिप्त लिहिते.

त्यावेळी तिथल्या राज्यकर्त्याने त्यांना चौधरी पदवी देऊन नावाजले. आणि त्या गावाची पाटीलकी बहाल करुन तिथेच बस्तान बसवायला सांगितले.
पण तो राजा कोण याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. अगदी महाराजांपासून मुघलांपर्यंत आणि पेशव्यांपासून इंग्रजांपर्यंत कुणीतरी दिली असे ऐकले आहे. Uhoh

दुसरी आख्यायिका अशी की महाराष्ट्र अन मध्यप्रदेशच्या सीमेवरच्या त्या गावात खूप वैर होते त्यांनी आपल्या चातुर्याने ते वैर नष्ट केले. लोकात बसवुन त्यांच्या समस्या (जमिनी ची भांडणे, रोटी बेटीच्या व्यवहारातल्या अडचणी ) जाणुन घेऊन निष्पक्ष न्यायनिवाडा केला. त्यानंतर त्या दोन गावातल्या लोकात वैर नष्ट व्हावे म्हणुन त्या बैठकीत आपल्या मुलीचा विवाह शेजारच्या गावातल्या मुलाशी लावला.
गावाचे पाटील आधीच होते नंतर न्यायनिवाडा केल्यामुळे राजाच्या दरबारात त्यांना महाराष्ट्रातल्या त्या गावाचे चौधरी घोषित करण्यात आले. (ही पण गोष्ट खूप रंगवुन सांगता येते Wink पण इथे एवढेच पूरे)

ही माहिती कुठल्याही इतिहास तज्ञाने सांगितलेली नाही. माझ्या मूळ गांवातल्या लोकांनी पिढ्यान्पिढ्या ऐकलेल्या गोष्टीच मला सांगितल्या आहेत. त्या कितपत खर्‍या खोट्या मला माहिती नाही.
माझ्यासारखेच सामान्य लोक ज्यांना जाणुन घेण्यात रस आहे पण कुठुन माहिती मिळेल हे कळत नसेल त्यांना इथे या धाग्यावर बरीच माहिती मिळेल, अशी आशा आहे.

रोहन, धागा छान आहे याबद्दल तुझे अभिनंदन ! तुझ्याकडील चौधरी नावाच्या माहितीबद्दल वाचायला आवडेल.
अशोक काकांच्या पोस्टस वाचायला आवडेल.

Pages