दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंडीत रविशंकर ह्यांना विजयकुमार देशपांडे ह्यांनी वाहिलेली ही काव्य श्रद्धांजली
गेला रवी तो अस्ताला
झंकारत हृदयी सतारीला
वंदन त्या भारत रत्नाला
दिड दा दिड दा सूरमणीला

आणि माझी ही स्वरांजली.
http://www.divshare.com/download/21409902-201

दूरदर्शनवर लागणार्‍या बजे सरगम गाण्यातली देश राग वाजवणारी त्यांची सतार आणि द्रुतलयीतली झणकार... पं. रविशंकर यांना श्रद्धांजली Sad

Sad

>>>दूरदर्शनवर लागणार्‍या बजे सरगम गाण्यातली देश राग वाजवणारी त्यांची सतार आणि द्रुतलयीतली झणकार.>>>>>> बातमी वाचताना हीच धून मनात येत होती. आणि त्या धूनच्या शेवटी पंडीतजी अलगद डोळे उघडून तृप्त भावनेने समोर बघतात. ते प्रसन्न हसू आठवलं!! जबरदस्त कलाकार!!

भावपूर्ण श्रद्धांजली.

आताच सीएनएन वर पाहिलं. कनेक्टिकट मधल्या शाळेत २७ जण ठार झालेत - १८ लहान मुले. Sad प्राथमिक शाळेतल्या मुलांना मारण्याइतका राग!!! या देशात गन कंट्रोल हा एक जोक आहे.
ठार झालेल्या मुलांच्या पालकांना हे दु:ख सोसण्याचे देव बळ देवो हीच प्रार्थना.

वाईट घटना घडलि. किति लहान निरागस मुले गेलि. आणि जी जिवंत आहेत त्यांना सुद्धा किति दिवस हे आठवत राहिल! देव त्यांच्या पालकांना बळ देवो! Sad

अमेरिकेत आज एका अज्ञात व्यक्तीने प्रायमरी स्कुल मध्ये अंधाधुंद गोळीबार करुन २७ जणांना ठार मारले. त्यात २० लहान मुले होती. स्वतः मारेकरी याने आत्महत्याही केली.

निष्पाप जीवांना श्रध्दांजली !

खरंच अघोरी कृत्य . निष्पाप , निरागस, अजाण मुले, खरोखरच मन सुन्न झाले बातमी ऐकुन . धिक्कार या अमानुष प्रवृत्तीचा .
त्या बालकाना सदगती मिळो , ही श्रद्धांजली.

खरंय.....विकृतीची परमावधीच होय. आत्ताच वाचले की हा विशीतील मारेकरी युवक त्याच शाळेचा माजी विद्यार्थी होता.

त्या निष्पाप जीवांना श्रद्धांजली.

या घटनेबद्दल संताप व्यक्त करावा की दुख: समजत नाही. खरे तर अशा घटनाच वाचवत नाहीत आणी त्यावर प्रतीक्रिया पण काय द्याव्या तेही कळत नाही. देव करो आणी अशा घटना परत न घडो. त्या बाळांना श्रद्धांजली आणी त्यांच्या आईबाबांच्या दुखा:त सहभागी.:अरेरे:

नुस्तं आपलं मूल धडपडलं, त्याला लागलं तर किती कासाविस होतो आपण... त्या मुलांच्या पालकांची अवस्था... कल्पनाही करवत नाही.
इतकं दु:ख त्यांच्या झोळीत टाकलच आहेस तर ते भोगण्याचं धैर्यही देच, देवा...

अत्यंत वाईट बातमी.
अत्यंत संयमित अशा राष्ट्राध्यक्षांचेही या घटनेने डोळे भरून आले. Sad

सर्व victims ना श्रद्धांजली . खरेच अत्यंत वाईट बातमी.

white house च्या संस्थलावर we the people लिंक आहे. तेथे जाउन gun control petition sign करा ज्यांना शक्य त्यांनी. अनेक petition चालु आहेत सध्या. हि एक लिंक.

https://petitions.whitehouse.gov/petition/immediately-address-issue-gun-...

शाळांना सुट्ट्या सुरु होतील ४ दिवसात. x'mas चे आनंदी दिवस सुरु होतील. पण सर्व आनंद सोडुन निघुन गेलाय ह्या घटनेनंतर. कशातही उत्साह राहिला नाही. भेटेल त्यातली कोणतीही व्यक्ती दु:खी नाहीये, रडली नाहीये असे होतच नाहिये. Sad

हिरकणी,

गन कंट्रोल पिटीशनवर सही करून काय साध्य होणार? जो खुनी आहे, तो अधिकृत हत्यार घेऊन थोडाच येणार आहे? वाटल्यास चर्चेसाठी वेगळा बाफ उघडूया.

ईश्वर मृतांच्या आत्म्यांस शांती देवो.

आ.न.,
-गा.पै.

त्या पालकांचे चेहरे बघवत नाहीत. श्रद्धांजली हा शब्दही निरर्थक वाटायला लागलाय. यापुढे कधीही अशा घटना घडू नयेत, असेच वाटतेय.

Pages