मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by रैना on 5 January, 2011 - 23:48
ठिकाण/पत्ता: 
लोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व

मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले

लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

लोकसत्तेतील बातमी.

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्र, इतर
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, January 6, 2011 - 21:00 to शनिवार, January 15, 2011 - 21:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभादेवीच्या पु.ल. देशपांडे अ‍ॅकेडमी मध्ये ओरिगामी कलाकृतींचं छान प्रदर्शन भरलंय. मी आज जाऊन आले. वर्कशॉप्ससुध्दा आहेत. अधिक माहिती इथे. हे प्रदर्शन तळमजल्यावर आहे.

पहिल्या मजल्यावर सिल्क आणि कॉटन एक्स्पो तसंच गार्डन वरेलीचा साड्या आणि ड्रेस मटेरियलचा सेल लागलाय.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात इजिप्तवर प्रदर्शन, वर्कशॉप्स आणि लेक्चर्स आहेत. अधिक माहिती इथे.

वांद्र्यात मेहबूब स्टूडिओमध्ये टाइम्स लिटररी कार्निव्हल ७-८-९ चालू आहे. भरगच्च कार्यक्रम,चर्चा परिसंवाद आहेत.. आज सुकेतू मेहतांना अन कॅथरीन बूंना मॅक्सिमम सिटी ( मुंबई अन न्यूयॉर्क मुख्यत्वे ) वर बोलताना थोडा वेळ ऐकले.. साहित्यातील व वास्तवातील मुंबई ,पुराणकथांवर पॉवरपॉइंट असे अनेकविध कार्यक्रम होते
उद्या शेवटच्या दिवशी चेतन भगत, जावेद अक्ख्तर. मीरा नायर अन अनेक मंडळी आहेत. प्रवेश विनामूल्य.मेहबूब स्टूडिओचे नेपथ्य प्रेक्षणीय.

सोमवारी मुंबई विद्यापिठाच्या बहि:शाल विभागातर्फे प्रा.संकलियांच्या स्मरणार्थ पुरातत्त्व दिवस साजरा होणारेय कलीना कँपसमध्ये.. प्रवेश विनामूल्य इथेही.

प्रभादेवीच्या रविन्द्र नाट्यमंदिर नाट्यसंकुलात थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव. अधिक माहिती इथे.

उद्या शिवाजी मंदीर, दादर ला संध्याकाळी ८ वाजता "आयुष्यावर बोलू काही" चा ९०० वा प्रयोग!! तिकिटे कशी मिळवायची??

शिवाजी पार्कवर ह्या विकांताला येताहेत लष्कराचे जवान. अधिक माहिती इथे.

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मध्ये काश्मिर फेस्टिव्हल - १२ ते १७ डिसेंबर, सकाळी १०:३० ते रात्री ८:३०

ही सुरांची बिल्वपत्रे
वाहतो मी भक्तिभावे
दे मला सामर्थ्य ऐसे
वेदनेचे गीत व्हावे..

भैरवीच्या सुरांनी या सुंदर मैफलीची सांगता झाली आणि अवघे सभागृह भारुन गेले..

निमित्त होते फाईन आर्ट्स सोसायटी चेंबूर येथील हिंदुस्थानी संगितोत्सवाचे...

पंडित संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने काल दिनांक २१ डिसेंबर संध्याकाळी सुरुवात झाली. राग शुद्ध कल्याण ने मैफिलीची सुरुवात झाली. आपल्या सुश्राव्य गायनाने पं संजीवजींनी समस्त श्रोतुवर्गाची मने केव्हांच जिंकली.
राग चंद्रकंस मधिल बंदिश.., मेघ मल्हार मधील मीरा भजन.., रामदास स्वामींचे एक गोड भजन आणि शेवटी
पुण्याच्या संगिता जोशी रचित आणि केदार पंदित यांनी संगीत दिलेले..
ही सूराची बिल्वपत्रे.. हे अतिशय सुंदर भक्तिभावगीत पंडितजींनी सादर केले..

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे..

शनिवार २२ डिसेंबर.. पं. सतीश व्यास... संतूर
रविवार २३ डिसेंबर.. श्री चिराग कट्टी..सतार वादन
सोमवार २४ डिसेंबर..श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे...गायन
बुधवारी २६ डिसेंबर..श्रीमती धनश्री पंडित राय गायन..
गुरुवारी २७ डिसेंबर श्रीमती देवकी पंडित..गायन
शनिवार २९ डिसेंबर पं अजय पोहनकर..गायन

असे कार्यक्रम आहेत.
स्थळ शिवस्वामी ऑडिटोरीयम, चेंबूर
संपर्कः फाईन आर्ट्सः २५२२२९८८

सर्वांना हार्दिक आमंत्रण Happy

अंजली, तुम्ही ह्या कार्यक्रमांना जाणार असलात तर प्लीज वृ टाकाल का?

शब्द गप्पा आणि पुस्तक प्रदर्शन : बोरिवली : : चिंतामणी ट्रस्ट उद्यान, शिंपोली टेलिप्फोन एक्स्चेंजजवळ, लिंक रोड, बोरिवली पश्चिम.
२८ डिसेंबर २०१२ : नीलेश मोहरीर
२९ डिसेंबर : रेणू गावस्कर
३१ डिसेंबर : द्वारकानाथ संझगिरी
१ जानेवारी २०१३ : नागनाथ कोतापल्ले
२ जानेवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार
३ जानेवारी : सुरेखा पुणेकर
४ जानेवारी : चर्चासत्र : निमित्त दिल्ली गँगरेप
५ जानेवारी : चर्चासत्र : फेसबुक : अभिव्यक्ती स्वातंत्र्य
६ जानेवारी : चर्चासत्र : रेडिव्हलपमेंट

शोभिवंत मासे आणि पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन

सिल्क आणि कॉटन हातमाग प्रदर्शन, अर्बन हाट, बेलापूर, नवी मुंबई - २६ डिसेंबर ते ८ जानेवारी, दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत.

अरविंद देशपांडे स्मृती नाट्यमहोत्सव, ३ ते १० जानेवारी, साठ्ये महाविद्यालय ऑडिटोरियम, विलेपार्ले पूर्व.
शंभर मी - ३ जानेवारी, संध्याकाळी ७ (लेखक श्याम मनोहर)
चाफा - ४ जानेवारी, संध्याकाळी ७:३० (खानोलकरांच्या कादंबरीवर आधारित)
मधल्या भिंती - ६ जानेवारी, संध्याकाळी ७:३० (लेखक विजय तेंडुलकर)
मंकू माकडे - ७ जानेवारी, संध्याकाळी ७:३० (नाट्यशाला मुंबई निर्मित बालनाट्य, लेखन डॉ विजया वाड)
दान्तॉ - ८ जानेवारी, संध्याकाळी ७:३० (लेखक अरुण नाईक)
अभिजात जंतू - ९ जानेवारी, संध्याकाळी ७:३० (लेखक प्रेमानंद गज्वी)
फ्रेग्नन्सेस - १० जानेवारी, संध्याकाळी ७:३० (रविन्द्रनाथ टागोर यांच्या कविता, कथा ह्यावर आधारित नृत्याविष्कार)

विद्याधर गोखले नाट्यमहोत्सव - ४ ते ६ जानेवारी, यशवंत नाट्यसंकुल, माटुंगा
४ जानेवारी, दुपारी ४. सरगम, सुयोग निर्मित, सुरेश खरे लिखित, विक्रम गोखले दिग्दर्शित
५ जानेवारी, दुपारी ३:३०, संगीत ययाति आणि देवयानी - भरत नाट्य संशोधन निर्मित, वि.वा. शिरवाडकर लिखित, रविन्द्र खरे दिग्दर्शित
६ जानेवारी, दुपारी ३:३०, मराठी रंगभूमी निर्मित, काकासाहेब खाडिलकर लिखित संगीत स्वयंवर

जाणता राजा, ५ ते १० जानेवारी, रोज संध्याकाळी ६:४५ वाजता, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व

तिकिट विक्री - सावित्रीबाई फुले नाट्यगृह, आचार्य अत्रे रंगमंदिर, गडकरी रंगायतन, र्‍हिदम हाऊस, महाराष्ट्र वॉच कंपनी, गॅलॉप डोंबिवली पश्चिम, कडोंमपा बुकिंग कार्यालय डोंबिवली पूर्व स्टेशनजवळ, कुलकर्णी ब्रदर्स डोंबिवली पश्चिम

दर ५०० (कुशन खुर्ची), २०० (प्लास्टिक खुर्ची), १५० बाल्कनी

ह्रदयेश फेस्टिव्हल २०१३, साठ्ये महाविद्यालय प्रांगण, विलेपार्ले पूर्व

१२ जानेवारी, संध्याकाळी ५:३० - शौनक अभिषेकी (गायन), श्रीमती मालिनी राजूरकर (गायन), पं हरिप्रसाद चौरासिया (बासरी)

१३ जानेवारी पहाटे ६ वाजता - उस्ताद अमजद अली खान (सरोद)
१३ जानेवारी संध्याकाळी ५:३० वाजता - उस्ताद शाहिद परवेज (सतार), बेगम परवीन सुलताना (गायन), पं बिरजू महाराज (कथ्थक)

१४ जानेवारी संध्याकाळी ६:३० - राहुल शर्मा (संतूर), उस्ताद राशिद खान (गायन)

नमस्कार! नविन वर्श्याच्या शुभेचा
मी पण मॅरॅथॉन प्रेमी आहे. म्हणजे मी सुध्दा मॅरॅथॉन मधे भाग घेत असतो. अनुभव नंतर कधी तरी सांगेन.
आता येत्या रविवारी दि. ६ जाने. २०१३ रोजी नवी मुंबई ट्रफीक पोलिसांच्या वतीने पामबीच मॅरॅथॉन १० के मॅरॅथॉन आयोजित केली आहे. मॅरॅथॉन ही पामबीच नेरुळ सिग्नल झामा स्वीट, किग्ज एलेट्रोनिक पासुन चालु होनार आहे. वेळ सकाळी ६.३० वा.
रजिस्टट्रशन साठी पुढील प्रमाणे लिंक देत आहोत.
http://www.roadsafetynm.com/
तसेच आयोजना मधे आमची कंपनी सुध्दा आहे. अधिक माहिती साठी मला संपर्क करु शकता. 9819707573
(मी सुध्दा भाग घेतला आहे.)

नवीन वर्श्याची चांगली सुरुवात...
(प्रीय अ‍ॅडमिन, फोन नंबर टाकला तर चालतो का? नसेल चालत तर माफ करणे , फोन नंबर काढुन पोस्ट टाकणे.)

ग्लोबल कोकण महोत्सव २०१३ - ४ ते ७ जानेवारी, नेल्को कॉम्प्लेक्स, मुंबई एक्झिबिशन सेन्टर, गोरेगाव पूर्व. अधिक माहितीसाठी इथे पहा

१. महालक्ष्मी सरस मेळा २०१३, १८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी, सकाळी १० ते रात्री १०, म्हाडा मैदान, लिलावती हॉस्पिटलच्या समोर, वान्द्रा रेक्लेमेशन, हॅन्डीक्राफ्ट आणि हॅन्डलूम्सच्या वस्तू तसंच खाद्यदालन

२. मृगनयनी, मध्य प्रदेश क्राफ्ट फेस्टिवल, १८ ते २७ जानेवारी, पुल देशपांडे ऑडिटोरियम, रविन्द्र नाट्य मंदिर

सुंदराबाईला स्ट्रँडचा पुस्तक महोत्सव २४ जानेवारीपासून सुरू होतोय.>>
Mumbai Annual Strand Book Festival
24 Jan- 10 Feb
10 am-8 pm

अधिक माहीतीसाठी :
http://strandbookstall.com

कुठल्याही फेस्टीवल्स, एक्झीबिशनची माहीती म्हणजे कधीपासून कधीपर्यंत यांच्या तारखा, स्थळाचा संपूर्ण पत्ता असेल तर जाऊ इच्छीणार्‍यांना सोयीस्कर पडेल. संपूर्ण माहीती द्यावी ही विनंती!
स्वप्ना, खूप छान माहीती देत आहेस. अतिशय उपयुक्त धागा आहे.

धन्स ड्रीमगर्ल

कश्मिर फेस्टिव्हल
१ ते ६ फेब्रुवारी, १०:३०-८. पु.ल.देशपांडे कला अकादमी,रविन्द्र नाट्य मंदिर आणि वाशी तामिळ संघम हॉल, प्लॉट नं २-सी-१, वाशी बस डेपोजवळ
कला, हस्तकला, पश्मिना शाल, स्टोल्स, ड्रेस मटेरियल, बॅग्ज, सिल्क, क्रेप, जॉर्जेट, प्रिन्टेड साड्या

नॅशनल सिल्क एक्स्पो
१ ते ९ फेब्रुवारी, वर्ल्ड ट्रेड सेन्टर, कफ परेड, सकाळी ११ पासून सुरु.

सुप्रसिद्ध चित्रकार श्री वासुदेव कामथ यांचे "कालिदासानुरुपम - Resonance Kalidasa " हे चित्रप्रदर्शन १२ ते १८ फेब वेळ ११ ते ७ , नेहरु सेंटर आर्ट गॅलरी . १२ तारखेला सं ५.३० वाजता डॉ. विजया मेहता यांच्या हस्ते उद्घाटन.

आज दुपारी १२ वाजताच्या चांदण्यात ठाणे कला भवन मध्ये (जिथे आपल्या जिप्सीच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरतं) ठाणे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन पाहून आले. बरीचशी चित्रं विद्यार्थ्यांनी काढलेली वाटतच नव्हती, प्रोफेशनल्सनी काढल्यासारखी सुंदर होती. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे कुणीही फोटो काढू शकत होतं आणि ते नेटवर टाकायला परवानगी आहे असं मला तिथे हजर असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. प्रोफेशनल्सच्या चित्रांचे फोटो काढायला परवानगी नाही.

Photo0128.JPGPhoto0129.JPG

चित्रकार : रोहन चव्हाण (हंसपक्ष्याचं माणसामध्ये मॉडिफिकेशन अशी थीम आहे ह्या चित्राची) अर्थात हे मला विचारल्यावर कळलं Wink
photo rohan.jpg

चित्रकार : निलेश सुतार
Photo0123.JPG

चित्रकार : नमिता कानडे
photo.JPG

Pages