मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by रैना on 5 January, 2011 - 23:48
ठिकाण/पत्ता: 
लोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व

मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले

लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

लोकसत्तेतील बातमी.

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्र, इतर
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, January 6, 2011 - 21:00 to शनिवार, January 15, 2011 - 21:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो गं. नाव लिहून घ्यायला हवी होती. प्रदर्शन पुर्ण पाहून झाल्यावर हे मायबोलीवर टाकायचं डोक्यात आलं. नंतर "तुमचं कौतुक म्हणून हे नेटवर टाकू का? काही कॉपीराईट्स वगैरे असतात का?" असं विचारल्यावर तिथल्या मुलांनी मी आधीच्या पोस्ट मध्ये लिहिलेलं उत्तर सांगितलं आणि पुढे मुलं म्हणाली की फक्त अश्या अश्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा एक भाग म्हणून असलेल्या प्रदर्शनातली चित्रं एवढंच लिहिलंत तरी चालेल.

तरी मी नावं शोधून काढायचा प्रयत्न करते आणि मिळाली की चित्रांच्यावर लिहून टाकते. त्यातला एक मुलगा मला कधीतरी भेटू शकतो. त्याला माझ्या मोबाईलमधले फोटो दाखवून चित्रकारांची नावं विचारुन घेते. त्या कंदिलाच्या चित्राखाली काहीतरी "प्रकाश" असं नाव झुम केल्यावर दिसतंय.

फेसबुकावर तो मुलगा ऑनलाईन दिसला. त्याला माबोची लिंक दिली आणि नावं विचारली. २ नावं त्या मुलालाही माहित नाहित. जेवढी तो सांगू शकला तेवढी अपडेट केली आणि त्या मुलाचं (रोहन चव्हाण) चित्रही टाकलंय त्याला विचारुन.

वडापाव तर एकदम्म सह्ही सह्ही!! मला वाटलं पुन्हा कुठला तरी खाऊ मेळावा वगैरे आयोजित केला असावा मराठी भाषा दिनानिमित्त मराठी पदार्थ वगैरे ... Happy

रांतिकारकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि देशभरातील क्रांतिकारक यांच्या जीवनचरित्रावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे स्मृती संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयाच्या निधी संकलनासाठी प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी एक अनोखा उपक्रम राबवायचे ठरवले आहे. जी व्यक्ती या संग्रहालयासाठी एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देईल, त्याचे अर्कचित्र स्वत: सबनीस काढून देणार आहेत.

अधिक माहिती - http://www.loksatta.com/vruthanta-news/unique-project-from-vikas-sabnis-for-raising-fund-to-build-savarkar-memorial-83697/

रभादेवीच्या रवींद्र मिनी थिएटरमध्ये २४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता 'कळसूत्री' व 'अ‍ॅसिटेज-इंडिया' या संस्थांच्यावतीने विश्व बालरंगभूमी दिन व विश्व कळसूत्री दिन साजरा करण्यात येणार आहे.

अधिक माहिती - http://www.loksatta.com/vruthanta-news/special-program-on-child-theater-and-puppet-day-82183/

सतीश आळेकरांचं नवीन नाटक 'एक दिवस मठाकडे'
दिग्दर्शन - निपुण धर्माधिकारी
आज (२९.३.१३) संध्याकाळी ७ वाजता
रविंद्र मिनी थिएटर. प्रवेशमूल्य नाही.

अस्सल देशी भारूड
रंगपीठ प्रस्तुत
सादरकर्ते - भानुदास बैरागी मंडळी
पर्वा (३१.३.१३) संध्याकाळी ७ वाजता
रविंद्र मिनी थिएटर. प्रवेशमूल्य नाही.

मी आजच्या नाटकाला जाणारे नक्की. कोणी येणार असाल तर गटग होईल.

३१ मार्च, रविवार सं.६ वा. पार्ले टिळक पटांगणात आशा भोसलेंचा 'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रम आहे. मी जाणार आहे. अजून कुणी जाणार आहे का?

सुंदरबाई हॉल (इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे, एसएनडीटी कॉलेजच्या समोर, चर्चगेट) ला आशिष बुक सेन्टरचं पुस्तकांचं प्रदर्शन लागतंय. ११ एप्रिल ते १ मे, सकाळी १० ते रात्रौ ९.

यो, धन्यवाद. हेच लिहायला आलो होतो.

तसेच

झोरॉंग तर्फे

पाळीव मासे, पशू व पक्ष्यांचे प्रदर्शन १९ ते २१ एप्रिल २०१३

उत्तर भारतीय भवन, बाबू सत्यनारायण सिंग हॉल, टिचर्स कॉलनीच्या मागे, बान्द्रा (पू) मुंबई - ५१.

सुंदरबाई हॉल (इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे, एसएनडीटी कॉलेजच्या समोर, चर्चगेट) ला आशिष बुक सेन्टरचं पुस्तकांचं प्रदर्शन लागतंय. ११ एप्रिल ते १ मे, सकाळी १० ते रात्रौ ९.
>>> वा वा वा..... धन्यवाद, स्वप्ना. Happy

.

मामी, तुमच्या विपूत मेसेज टाकणारच होते. Happy पुल देपचांदे अ‍ॅकेडमीमध्ये कसलं तर एग्झिबिशन चालू आहे. उद्यापर्यंत असणार आहे.

नेहरू सायन्स सेन्टरमध्ये डोम थिएटरात नवा शो लागलाय - Caves वर. डायनॉसॉर्स वर थ्रीडी शो पण लागलाय एक.

उद्या, १४ एप्रिल रोजी रुईया कॉलेजमधे दुपारी ४:०० वाजता 'चार महानगरांतील माझे विश्व' या पुस्तकाच्या निमित्ताने जयंत नारळीकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आहे.

मी जाणार आहे. अजून कुणी येणार असल्यास कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटू.

बोरिवली (प.) येथील सावरकर उद्यानामध्ये रामनवमीपासून तीन दिवस (शुक्रवार, १९ ते रविवार २१ एप्रिल) गीतरामायण सादर होणार असून रसिकांना ते विनामूल्य अनुभवण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहिती इथे.

मुंबईतले अन्य कार्यक्रम

गुरुकुल स्कूल ऑफ आर्टचा आगळा उपक्रम - संस्थेचे सुमारे २०० विद्यार्थी शुक्रवारी लालबाग येथे पदपथावर बसून चित्रे रेखाटणार असून यातून जमा झालेल्या निधीत आपल्या खाऊच्या पैशांची भर टाकून सर्व रक्कम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला देणगी म्हणून देणार आहेत. अधिक माहिती इथे.

'पृथ्वी थिएटर'मध्ये सुप्रसिद्ध रॅम्बो सर्कसचे २० आणि २१ एप्रिल असे सलग दोन दिवस प्रत्येकी चार या प्रमाणे आठ खेळ होणार आहेत. अधिक माहिती इथे.

High Street Phoenix hosts a Book and Garage Sale in association with The Welfare of Stray Dogs.

The Welfare of Stray Dogs (WSD) is an animal welfare NGO that sterilizes and immunizes stray dogs. We also have an adoption program for abandoned pets and pariahs, an on-site first–aid program and an education and awareness program in schools, colleges, streets and slums. WSD has so far sterilized more than 46,500 stray dogs and impacted the lives of over a lakh and twenty thousand through first-aid, immunization and adoption.

WSD spends Rs 5,00,000 per month on the above activities and we depend on the largesse of donors to fund these activities.

One of the methods of raising funds to sustain our costs is our regular garage/jumble sales and we are having a BOOK and GARAGE SALE on May 10 and 11, 2013(Friday and Saturday) from 12 noon to 9 pm, hosted by High Street Phoenix ( Location – Opposite PVR Mall)

On Sale -Books, Vases, Crockery, Cutlery, Paintings,Kitchenware,Electrical appliances - ovens, mixies, hair dryers, Toys, Knick knacks,Artifact's,Glassware, Furniture, LPs, CDs,
DVDs, Gift Items, Paintings at Throw Away Prices.

Regular WSD products will also be sold at the venue!

You will find a treasure trove of BOOKS on various subjects including Children, Fiction, Non-fiction, Religion, Self-Help, Hobbies, Poetry and New Releases books at Special Prices.

The proceeds of the Garage Sale would be used to fund the above–mentioned programs.

मुंबईतले विकांताचे कार्यक्रम

शुक्रतारा मंदवारा' गाण्याचा सुवर्ण महोत्सव, अरुण दाते यांच्या वयाची पूर्ण झालेली ८० वर्षे आणि त्यांच्या गायन कारकिर्दीची पंचावन्न वर्षे या साऱ्याचा योग साधून अतुल थिएटर्सतर्फे येत्या १८ मे रोजी रात्री साडेआठ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर येथे 'शुक्रतारा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पहा

'दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट' तर्फे रविवार २३ जूनला ठाण्यातल्या शिवसमर्थ विद्यालयात दुर्ग अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. डेक्कन विद्यालयाच्या पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संशोधक सचिन जोशी आणि भारत इतिहास संशोधन मंडळाचे महेश तेंडुलकर मार्गदर्शन करणार आहेत. ही बातमी लोकसत्तात आली आहे आज. Happy

Pages