मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by रैना on 5 January, 2011 - 23:48
ठिकाण/पत्ता: 
लोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व

मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले

लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

लोकसत्तेतील बातमी.

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्र, इतर
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, January 6, 2011 - 21:00 to शनिवार, January 15, 2011 - 21:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रानडे रोडवर डिसिल्व्हा शाळेच्या पटांगणात आंबा महोत्सव चालू आहे. सकाळी १० ते रात्री १०.

"धुक्याच्या महाली"

महाराष्ट्र टाईम्स आयोजित, ग्रेस यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम.

२० एप्रिल २०१२. संध्याकाळी ५:३० वाजता

सहभाग - किशोर कदम, शंकर वैद्य, अशोक नायगावकर, सोनाली कुलकर्णी, प्रफुल्ल शिलेदार.

स्थळ - रुईया कॉलेज ऑडिटोरियम, तिसरा मजला,

१४ एप्रिल-१ मे, मुंबईत सुंदरबाई हॉल, न्यू मरिन लाईन्स, इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे, आशिष बुक सेन्टरचं पुस्तक प्रदर्शन भरलंय. सकाळी ९:३० ते रात्री ८:३०
>>>>>>>> हो हो. हे खरंच खुपच छान असतं. लहान मुलांची गोष्टींची कितीतरी सुंदर सुंदर पुस्तकं मी इथे अत्यंत फुटकळ किंमतीत विकत घेतलीयेत. मात्र भरपूर वेळ घेऊन जा. शोधाशोध करावी लागते. पण त्यातच तर खरी मजा येते. Happy

धन्यवाद स्वप्ना.

बेलापुरच्या अर्बन हाटमध्ये आजपासुन समर फेस्टीवल आहे. कोकणातला मेवा विक्रिसाठी उपलब्ध आहे असे वाचलेय. संध्याकाळी भेट देणार आहे.

मुंबईतील मत्स्यप्रदर्शन.

AQUA LIFE 2012 exhibition - Mumbai India
Beginning DateTime 23rd May 2012 Wednesday 22:30 (GMT-06:00) 24th 9:30 (GMT+05:00)
Finishing DateTime 27th May 2012 Sunday 8:30 (GMT-06:00) 27th 19:30 (GMT+05:00)
Location Ruia College Matunga, Mumbai
Contact
Description An exhibition of Tropical freshwater and marine fishes and planted tanks

24th to 27th may at Ruia College Matunga
10 am to 8 pm IST

Categories Asia,Exhibition & Shows

पिया बहरूपिया
शेक्सपियर च्या 'ट्वेल्थ नाइट'चे हिंदी रूपांतर.
नुकतेच 'द ग्लोब' येथील शेक्सपिअर फेस्टिव्हलमधे वर्णी लावून आलेले नाटक.
दिग्दर्शक: अतुल कुमार
२३ आणि २४ जून रंगशारदा, बान्द्रा येथे.

मी शनिवारी (२३ ला) जातेय. ऑनलाइन बुकींग केले. येणार का अजून कोणी? बुकमायशोडॉटकॉम वर आहेत तिकिटे.
तिकिट दर ३०० आणि ५०० आहे पण सलमान खानच्या पिच्चराला वारेमाप किमतीचे तिकीट काढण्यापेक्षा 'द ग्लोब' ची धूळ अंगावर घेऊन आलेले हे नाटक बघणे नक्कीच जास्त वर्थव्हाइल वगैरे.. Happy

२ ते २० ऑगस्ट, मुंबईत सुंदरबाई हॉलमध्ये, आशिष बुक सेन्टरचं पुस्तक प्रदर्शन भरलंय.

मामी, तुमच्या 'शोधाशोध करावी लागते. पण त्यातच तर खरी मजा येते.' ह्या वाक्याशी अगदी १००% सहमत. माझी लायब्ररी अक्षरशः ह्या प्रदर्शनातून उभी केली आहे मी.

नेहरू सायन्स सेन्टरच्या स्पेस ओडिसी च्या डोम थिएटरमध्ये 'अ‍ॅमेझोन' म्हणून ३५ मिनिटांचा आयमॅक्स मुव्ही लागलाय. तसंच सेन्टरमध्ये क्लायमेट चेंज वर नवं दालन उघडलंय. सायक्लोन कसं होतं ते दाखवणारा स्टॉल तर भारीच वाटला. अधिक माहिती http://www.nehrusciencecentre.org/exhi_gallery/Climate_Chng.htm

एनसीपीए - प्रतिबिंब - मराठी नाट्यमहोत्सव - ३ ते ७ ऑगस्ट

सध्या चर्चेत असलेल्या गो पु देशपांडे लिखित- अतुल पेठे दिग्दर्शित 'सत्यशोधक' आणि नंदु माधव दिग्दर्शित 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकांबरोबरच चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांवरून स्फुरलेले 'चित्रगोष्टी' आणि मनस्विनी लता रवींद्र लिखित दिग्दर्शित 'लख लख चंदेरी' या नाटकांचे मंचन होईल.

नी, "पिया बहरुपिया" बद्दल मी वाचले होते. मला नक्की आठवत नाही, की त्यात अतुल कुलकर्णीची बायको आहे का ते? तुला माहीत आहे का?

आशिष बुक सेंटर पुस्तक प्रदर्शन :

येस्स स्वप्ना. काल सक्काळी सक्काळीच तिथे पोहोचून भरपूर खरेदी केली मी. लहान मुलांची पुस्तकं इतकी सुंदर आणि अगदी रिझनेबल किंमतीत मिळतात तिथे. कालच्या शोधाशोधीत माझ्या हाती एक अमुल्य खजिना लागला. पानं सुटं झालेलं पुस्तक होतं - मुंबईचा इतिहास गोष्टीरूपात लहान मुलांकरता सांगणारं. समुद्राची एक लाट एका मुलाला मुंबईचा इतिहास सांगते त्यात. इतकं गोड आहे ना ते पुस्तक आणि त्याची एकच प्रत शिल्लक होती. समुंदरी सिटी - रश्मी पालखीवालानं लिहिलं आहे. बाहेर उपलब्ध आहे का बघायला पाहिजे. पण मला वाटतं की याच्या लिमिटेड कॉपीज असणार कारण कोणत्याही पब्लिकेशननं पब्लिश केलेलं नाहीये. लेखिकेनंच बहुधा प्रिंट करून घेतलंय. त्यामुळेच बाईंडिंग अगदीच गंडलेलं आहे. मी हे पुस्तक आता बाईंड करून घेईन.

हो त्या नाटकात गीतांजली कुलकर्णी आहे. ती रा ना वि मधून अभिनय प्रशिक्षण घेतलेली, प्रशिक्षित आणि उत्तम अभिनेत्री आहे. तिच्या स्वतःच्या बळावर तिने तिचे मुंबईतील नाट्यवर्तुळात स्थान मिळवले आहे. तिचा नवरा चित्रपटांतून अभिनय करत असतो. चित्रपटात असल्याने तो जास्त प्रसिद्ध आहे.
हा... आता बरे वाटले. Happy

हो. नक्कीच. तिचे कर्तुत्व वादातित च आहे. अतुल आमच्या सोलापुर चा, म्ह्णुन तसा उल्लेख केला. इतकेच.

ओके. मला समहाऊ 'अमुकची बायको' हा उल्लेख सार्वजनिक क्षेत्रात खटकतो. विशेषतः त्या बायकोचे कर्तुत्व, ओळख ही तिने स्वतः कष्ट करून, स्वतःच्या बळावर कमावलेली असते तेव्हा.

मनस्विनी लता रवींद्र लिखित दिग्दर्शित 'लख लख चंदेरी' या नाटकांचे मंचन होईल. <<<
उद्याचा प्रयोग हा या नाटकाचा शेवटचा प्रयोग आहे असं जाहिर झालं आहे. मी जाणारे. कोण येणारे का बघायला?

>>या नाटकांचे मंचन होईल

मंचन म्हणजे काय? प्रयोग का? हा शब्द मी प्रथमच ऐकतेय.

मामी, सह्हीच. मी नाही गेले अजून. "आणखी पुस्तकं आणलीस तर त्यांच्यासकट घराबाहेर बसावं लागेल" अशी धमकी मिळाली आहे. Happy

रच्याकने, ऑक्सफर्ड बुक स्टोअरचा मॉन्सून सेल लागलाय असं पेपरात वाचलं. पुस्तकं, डीव्हीडीज, सीडीज वर ५०% पर्यंत सवलत आहे. चर्चगेट, नेपच्युन मॉल आणि भांडूप पश्चिम इथल्या त्यांच्या स्टोअरमध्ये. पेपरात तारीख आणि वेळ मात्र दिली नव्हती.

stage = मंच. to stage = प्रयोग करणे, रंगभूमीवर आणणे = मंचन असा प्रयोग असावा. अनेकदा वाचनात आलाय.

ओक्के धन्यवाद भरत आणि नीधप! रविन्द्र नाट्यमंदीरच्या पु.ल.देशपांडे सभागृहात सिल्क एक्स्पो आहे १५ ऑगस्टपर्यंत. कोणाला माहिती हवी असेल तर पेपरात बघून नक्की तारीख आणि वेळ टाकेन इथे.

ठाण्याच्या होप (Here on Project Encvironment ) या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने १८ आणि १९ ऑगस्ट दरम्यान रानफुले या विषयावरील छायाचित्रांचे एक प्रदर्शन आयोजित केले आहे . डॉ . श्रीकांत इंगळहळ्ळीकर , डॉ . श्रीश क्षीरसागर , आदेश शिवकर , केदार भाट , गिरीश वझे , डॉ . अमोल पटवर्धन , युवराज गुर्जर अशा चाळीसहून अधिक नामांकित नेचर फोटोग्राफर्सनी काढलेली ४२५ छायाचित्रे या प्रदर्शनात निसर्गप्रेमींना पहायला मिळणार आहेत . यात अनेक दुर्मिळ रानफुलांचे फोटो असून प्रत्येक फोटोसोबत त्या फुलाविषयीची माहितीही देण्यात येणार आहे . राम मारूती रोडजवळच्या सहयोग मंदिरात सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहील .

या प्रदर्शनाचं आणखी एक आकर्षण म्हणजे , ज्येष्ठ निसर्गतज्ज्ञ डॉ . श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांची दोन पुस्तकेही या प्रदर्शनाच्या उद्घाटनादिवशी , १८ ऑगस्ट रोजी प्रकाशन होणार आहे . सह्याद्री पर्वतरांगांतील रानफुलांच्या विश्वाची जवळून ओळख करून देणाऱ्या ' फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री ' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती २००३ साली प्रकाशित झाली होती . त्यानंतरच्या काळामध्ये इंगळहळ्ळीकरांनी या विषयामध्ये केलेल्या कामाचा समावेश या दिवशी प्रकाशित होणा ऱ्या या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीमध्ये असणार आहे . अगोदरच्या ५०० फुलांबरोबरच अजून १०० प्रकारच्या नव्या फुलांची माहिती व छायाचित्रांचा समावेश त्यात करण्यात आला आहे . त्याचबरोबर ' नवा आसमंत ' या त्यांच्या वृत्तपत्रातील लिखाणाचा संग्रहसुद्धा यावेळी प्रकाशित होईल .
संपर्क : ९९६९०३६६१९

माहिती साभार : म.टा.

मायबोलीतील फोटोग्राफर आणि इतर सर्वांकरताही :

जहांगिर आर्ट गॅलरीत दिनांक १८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरच्या दरम्यान (वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पर्यंत), 'सँड-स्केप' हे फोटोंच प्रदर्शन भरत आहे. फोटोग्राफर आहेत श्री उमेश साळगावकर.

श्री उमेश साळगावकर हे वाळूच्या किनार्‍यांची प्रचि काढतात. त्यांना फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०११ ला तर त्यांना गोल्ड मेडल मिळालं आहे. आतापर्यंत त्यांनी काढलेल्या फोटोंची अनेक ठिकाणी प्रदर्शनं झाली आहेत.

१८ तारखेला ५ वाजता त्यांच्या प्रदर्शनाचे उदघाटन होत आहे.

माझ्याकडे आलेल्या पॅप्लेटमधली त्यांची वाळूची प्रचि केवळ अप्रतिम आहेत.
त्यांची वेबसाईट आहे : www.sandscapephoto.com

मुंबईत सध्या दोन महत्वाची चित्र प्रदर्शने चालु आहेत.
http://mumbaiboss.com/2012/11/28/s-h-raza-comes-in-full-circle/
Jehangir Art Gallery: Tuesday, November 27 to Monday, December 3
रझा हे बॉम्बे प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे (http://en.wikipedia.org/wiki/Bombay_Progressive_Artists'_Group)शेवटचे जीवीत सदस्य असल्याने त्यांच्या या प्रदर्शनास खास महत्व आहे.
ईंडिया आर्ट फेस्टीवल
http://www.indiaartfestival.com/aboutus.htm
http://zeenews.india.com/entertainment/art-and-theatre/india-art-festiva...
BKC येथे हे प्रदर्शन गेल्या वर्षी पर्यंत नेहरु सेंटर येथे भरत होते , यंदा ते BKC ला शिफ्ट केलेय यावरुन त्याची व्याप्ती लक्षात यावी.
मी उद्या दोन्ही प्रदर्शनाना भेट देणार आहे त्यामुळे चित्रांबद्दल काही माहिट नाही पण गेल्या वर्षी काही सुंदर कलाकृती/ ईन्स्टॉलेशन्स बघाय्ला मीळाली होती.

मी जाऊन आले का इंडीया आर्ट फेस्ट ला.
विशाल सोनावळची पेंटींग्ज, विनायक रामपुरेचे घोडे आणि त्याच्याच स्टॉलमधली त्याच्या बहिणीची अ‍ॅब्स्ट्रॅक्टस आणि अजून एका मित्राची कलर पेन्सिल्स ऑन कॅनव्हास अशी रिअलिस्टीक पेंटींग्ज नक्की बघणे.
बेंगलोरचे एक आर्टिस्ट आहे महन म्हणून त्यांची मेटल स्कल्प्चर्स, ताम्रपट
ललिता लाझमींची एचिंग्ज, वूड कट वर्क
मस्ट सी.

दिल्लीच्या एका आर्ट गॅलरीच्या स्टॉलमधली प्रितम समथिंग असे नाव असलेल्या ओरिसाच्या पेंटर मुलाची पेंटींग्ज पण. त्या आर्ट गॅलरीचं नेमकं नाव विसरले. आणि कार्ड पण नाहीये घेतलेलं. पण स्टॉलवर गॅलरी चालवणारा उंचापुरा आणि केसांचा पोनी असलेला आणि किंचित सुभाष अवचट वाटेल असा माणूस असतो. Happy

Pages