मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by रैना on 5 January, 2011 - 23:48
ठिकाण/पत्ता: 
लोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व

मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले

लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

लोकसत्तेतील बातमी.

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्र, इतर
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, January 6, 2011 - 21:00 to शनिवार, January 15, 2011 - 21:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वान्द्रे-सायन रस्त्यावर, धारावी बस डेपोसमोर, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, १ आणि २ फेब्रुवारी, सकाळी ९ ते संध्याकाळी ७, मुंबई रोझ सोसायटीतर्फे गुलाब प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

अधिक माहिती http://www.loksatta.com/vruthanta-news/indian-rose-exposition-360317/

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे आठवड्यातून एक दिवस शालेय विद्यार्थ्यांसाठी एलिमेन्टरी परिक्षेचे वर्ग, गृहिणींसाठी सकाळी तर नोकरी करणार्‍या महिलांसाठी संध्याकाळी छंद वर्ग आयोजित करण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी २४४६५८७७ येथे संपर्क साधावा.

१९ वे झाडे, फुले, फळे, भाज्या प्रदर्शन कार्यशाळा २०१४, उद्यान कलेच्या १५ वेगवेगळ्या विषयांवरील प्रशिक्षण, झाडांची विक्री आणि व्यावसायिक दुकाने. १४ फेब्रुवारी ते १६, सकाळी ८ ते रात्री ८. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान. ३ दिवसांचे प्रशिक्षण शुल्क ५०० रुपये.

संपर्क उद्यान अधिक्षक्/वृक्ष अधिकारी (बृ.मुं.म.पा)
२३७२३५७८, २३७२५७९९, २३७४२१६२

प्रवेश विनामूल्य

ghoshana riksha1.jpg

................................... 'मराठी भाषा दिवस' साजरा सर्व मिळूनी करूया रे..................................

................................... प्रचिती घेऊ म्हणीम्हणींची, चित्रकथा अन् लिहूया रे ................................

.................................. "बोलू मराठी, भाग्य लाभले आम्हांस" म्हणती अमराठी...........................

.................................. तिसरी घंटा पहा वाजली, सुरू जाहले नाटक रे .......................................

Bombay Talkies - Vikram Kapadia's play, 1 hour 50 minutes, 1st March 6-9pm, 2nd March 5-8pm, Prithvi Theatre (26149546). Tickets Rs 300 available on in.bookmyshow.com

Noises Off - a play within a play about an ambitious director and his troupe of mediocre actors. Written by Michael Frayn in 1980s. Adapted for stage. 2 hours. 4-7 March, 9pm. Prithvi Theatre. Tickets Rs 150 available on in.bookmyshow.com

वरळीच्या नेहरू सायन्स सेन्टरच्या डोम थिएटरमध्ये नवी आयमॅक्स मुव्ही आली आहे Adventures in Wild California. अधिक माहितीसाठी http://www.nehrusciencecentre.gov.in/InternalPage.aspx?Antispam=0rWq3HoXWYF&ShowsMoviesID=5&MyAntispam=dOifu9zVoVz

WSD is having a BOOK & GARAGE SALE from February 26, 2013 to March 1, 2014 (Wednesday to Saturday) from 10 am to 9 pm.

Venue : LAXMI BAUG HALL, Avantikabai Gokhale Road, (Auto Spare Parts Market Lane), Off Lamington Road, Near Opera House, Girgaum, Mumbai

On Sale -Books, Vases, Crockery, Cutlery, Paintings, Kitchenware, Toys, Knick knacks, Artefacts, Glassware,Clothes, LPs, CDs, DVDs, Gift Items at Throw Away Prices.

चौथे बोगनविला, बोन्साय आणि केक्टस् प्रदर्शन, बागकाम, रोपवाटिका साहित्याची विक्री, ७-९ मार्च, सकाळी ९ ते संध्याकाळी ७. महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था, वांद्रा-सायन जोडरस्ता, धारावी बस डेपोजवळ, मुंबई - १७. प्रवेश नि:शुल्क. दूरध्वनी २४०७ ९९३९/ २४०७ ७६४१

राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनी २०१४, २४ फेब्रुवारी - १६ मार्च, दुपारी २ ते रात्री ९, शनिवार व सुट्टीच्या दिवशी दुपारी १२ ते रात्री ९, वांद्रे रेक्लेमेशन ग्राउंड नंबर १, लीलावती हॉस्पिटलसमोर, बांद्रे (पश्चिम)
साड्या - पैठणी, सुंगडी, बालुचेरी, चंदेरी, जामदानी, पटोला, ईरा, मुगा सिल्क, टसर सिल्क,
ड्रेस मटेरियल, सलवार कमीझ, शाली, फर्निशिंग, सतरंज्या, पडदे, वॉल हेन्गिग, गालीचे वगैरे
प्रवेश नि:शुल्क.

जागतिक मोडी लिपी प्रसार समितीतर्फे दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मोडी लिपीचे वर्ग भरवण्यात येणार आहेत. ६ एप्रिल ते २२ जून पर्यंत हे वर्ग भरतील. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

आशिष बुक सेंटर पुस्तक प्रदर्शन, १८ एप्रिल ते ६ मे, ९:३० ते ८:३०. सुंदरबाई हॉल, इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे, चर्चगेट

हे नंदिनीच्या वतीने विचारते आहे. (तिला सध्या माबो अ‍ॅक्सेस नाहीये.)

१ मे ला दादरला सावरकरांवर एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला कुणी जाणार आहे का?

स्थळ शिवाजी पार्क दादर , वाशी रेल्वे स्थानक, ठाणे गडकरी रंगायतन
तारीख २० जुलै २०१४
वेळ ५-७ संध्याकाळ

अत्यंत महत्वाचा कार्यक्रम चुकवू नये असाच Proud

आशिष बुक सेन्टरचं पुस्तक प्रदर्शन, सुंदरबाई हॉल, इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे, एसएनडीटी कॉलेजच्या समोर, चर्चगेट, १-१९ ऑगस्ट, ९:३०-८:३०.

फोर्टातल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात १२-२३ ऑगस्टदरम्यान पारंपारिक कारागिर कला आणि हस्तकला वर्कशॉप आहे. दर दिवशी वेगवेगळ्या पारंपारिक कलेवर वर्कशॉप असेल ज्यात मिनिएचर पेंटींग, कलमकारी, वारली, पेपर मॅशे, कसुटी भरतकाम इत्यादी वेगवेगळे प्रकार शिकवले जाणार आहेत. दर दिवशीचे रेजिस्ट्रशन वेगळे करावे लागेल, ज्याचे शुल्क रु. ७५० प्रत्येकी आहे. तिथे दिलेल्या माहितीनुसार हे बहुतेक वार्षिक वर्कशॉप आहे.

http://csmvs.in/whats-on/eventdetail/41/-/paramparik-karigar-art-and-cra...

प्रत्येक वर्कशॉपसाठी फक्त २५ जागा आहेत.

ऐशूने कलमकारीसाठी रेजिस्ट्रेशन केले. तिचा नंबर २३सावा होता. Happy

अरे, २५ जागा म्हणजे फारच कमी आहेत Sad पण त्याही भरल्या हे वाचून खूप मस्त वाटलं. Happy ह्या शनिवारी जमणार नाहिये. वारली पेन्टींग शिकायला आवडलं असतं पण ते नेमकं बुधवारी आहे. रच्याकने, वारली पेन्टींग यायला चित्रकला चांगली असावी लागते वगैरे भानगड आहे काय? मग माझा पत्ता कट होईल आपोआप.

Pages