मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by रैना on 5 January, 2011 - 23:48
ठिकाण/पत्ता: 
लोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व

मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले

लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

लोकसत्तेतील बातमी.

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्र, इतर
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, January 6, 2011 - 21:00 to शनिवार, January 15, 2011 - 21:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केप्या खास फ्लेमिंगोसाठी मुंबईत येणार आहे आणि त्याप्रित्यर्थ गटग घाटतंय अशी बातमी मला काल मिळालीय Happy

केश्वे, जिप्सीच्या गुलाबांच्या फोटोवर त्याने लिहिलेय बघ..

प्रयत्न करेन ग अश्विनी. Happy
सही ग मंजू... फ्लेमिंगो आहेत काय मुंबईत. ह्य विकांताला बघते जमल तर जाउन येते. शिवडीला कुठे जायचं म्हणजे ते दिसतील?

२४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान भरणार आहे भव्य "ग्लोबल कोकण महोत्सव".

मला मिळालेल्या ब्रोशरमधील माहिती मायबोलीकरांकरीता इथे देत आहे.

"ग्लोबल कोकण"
कला/संस्कृती/खाद्य/पर्यटन महोत्सव
निसर्गसमृद्ध कोकणची माहिती जगासमोर नेणारा पहिला आंतरराष्ट्रीय महोत्सव......

१. पर्यटन व पर्यटनस्थळांची संपूर्ण माहिती — पर्यटन प्रदर्शन
२. उत्तुंग ते अथांग संपूर्ण कोकणचे दर्शन
३. नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारलेले प्रत्यक्ष कोकण
४. निसर्गरम्य कोकणच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
५. जगप्रसिद्ध कोकणी कलाकरांची आर्ट गॅलरी
६. जाखडी, पालखी, दशावतर कोकणी लोककला महोत्सव
७. कोकणी खाद्यसंस्कृती — खाद्य महोत्सव
८. जगावर प्रभाव टाकणारी माणसे — कोकण रत्न प्रदर्शन
९. पर्यटन सुविधांची संपूर्ण माहिती (२०० पर्यटन व्यवसायिक)
१०. फळप्रक्रिया, शेती, आयुर्वेद, कोकणी उद्योजक (३०० हून अधिक स्टॉल)
११. ग्रामिण संस्कृतीचे वैभव — कृषी पर्यटन
१२. भव्य ग्लोबल कोकण परिषद — (परिषदेला शुल्क आहे)
२५ फेब्रुवारी — पर्यटन
२६ फेब्रुवारी — पायाभूत सुविधा
२७ फेब्रुवारी — कृषी, फलोद्यान, मस्त्योद्योग
१३. भव्य पुरस्कार सोहळा — ग्लोबल पर्सनॅलिटी अ‍ॅवार्ड
१४. शासनाच्या विविध विभागांची माहिती — सी.डी.देशमुख दालन
१५. कोकणातील बंदर विकास — सरखेल कान्होजी आंग्रे दालन
१६. जगजीतसिंग, हरिहरन, वैशाली सामंत, राहूल वैद्य, स्वप्नील बांदोडकर या सेलिब्रीटीजच्या उपस्थितीत भव्य सांस्कृतीक कार्यक्रम (तिकिटे उपलब्ध)

दिनांक २४ ते २७ फेब्रुवारी २०११ दरम्यान
एम. एम. आर. डि. ए. ग्राऊंड, बान्द्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई.

अधिक माहितीकरीता संपर्क:
०२२-४४२१२३४५
www.globalkokan.com

तेंव्हा मायबोलीकरांनो पुढच्या आठवड्यातील आपला विकांत कोकण महोत्सवासाठी राखुन ठेवा. Happy

२. उत्तुंग ते अथांग संपूर्ण कोकणचे दर्शन
३. नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारलेले प्रत्यक्ष कोकण
४. निसर्गरम्य कोकणच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
५. जगप्रसिद्ध कोकणी कलाकरांची आर्ट गॅलरी
६. जाखडी, पालखी, दशावतर कोकणी लोककला महोत्सव
७. कोकणी खाद्यसंस्कृती — खाद्य महोत्सव
>> हम्म्म.. जाउकच व्हया मगे.. योगी, कधी जाउचा ता लिवूक कसा नाय ??

निसर्गप्रेमींनो, मुंबईत HSBC Mumbai Bird Race या २७ फेब्रुवारीला आहे. यात जवळ्जवळ २७ टीम्स असती. जास्तीत जास्त पक्षी बघून नोंदवणार्‍या टीमला विजेता घोषित केले जाईल. अधिक माहितीसाठी आजचा (गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी) टाइम्स ऑफ इंडिया (पान नं. ११) पहा. किंवा
http://birdrace.dhaatu.com/home/mumbai या ठिकाणी भेट द्या.

लोकसत्तामधील बातमी
मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १६ व्या झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन आणि उद्यान विद्याविषयक कार्यशाळेचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात होणार आहे.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत उद्यान विद्या या विषयाच्या अनुषंगाने विविध मुद्यांवरील कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी प्रात्यक्षिकासह व्याख्यान देणार आहेत. हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे

२४ ते २७ दरम्यानच्या कोकण महोत्सवाला कुणी येणार आहे का?

मी, माझा कॅमेरा, यो रॉक्स आणि त्याचा कॅमेरा असे चौघेजण Proud शनिवारी २६ फेब्रु.ला दुपारी जायचा बेत करत आहोते. (रविवारी गर्दी असणार :()

कोई और है क्या तय्यार Proud

कोकण महोत्स्ववाला जरुर भेट द्या. सगळीच दालनं चांगली आहेत आणि लोककलाकाराचे (दशावतार, कठपुतली, तलवार्/दांडप्ट्टा जगलींग इ.) कलाकारांचे मधे मधे चालु असलेले कार्यक्रमही चांगले आहेत. खासं म्हणजे चित्रकला, शिल्पकला प्रदर्शन. आचरेकर,संभाजी कदम, धोंड, प्रभाकर कोलते ते शार्दुल कदम अशा बर्‍याच कलाकारांच्या कलाकृती आहेत.
नेटके आयोजन. उद्या शेवटचा दिवस, गर्दी असेलच मात्र शक्य असेल तर जरुर भेट द्या.

एलिफंटा महोत्सव २०११
संगीत आणि नृत्य यांचा सोहळा

५ मार्च, २०११
डॉ. राजा आणि राधा रेड्डी
(कुचीपुडी नृत्य)

पंडित शिवकुमार शर्मा
संतुर वादन)

६ मार्च, २०११
गीता चंद्रन
(भरतनाट्यम्)

देवकी पंडित
(गायन)

स्थळ: एलिफंटा आयलंड
सायं. ६:३० पासुन
तिकिट दर (लाँच प्रवासाच्या खर्चासह) : ५०० रूपये (प्रतिदिवस)
(एलिफंटा येथुन रात्रौ. ९:३० नंतर परतीचा प्रवास. प्रवासाचा वेळ अंदाजे सव्वा तास)

आरक्षण विभाग: दूरध्वनी : २२८४५६७८
दादर (एमटिडीसी) : २४१४३२००
रविंद्र नाट्य मंदिर - २४३१२९५६/२४३६५९९७

कोणाला क्लासिकलची आवड असेल तर - ५-३-२०११ ला सायं. ६ वाजता.
बाल विकास संघ सभाग्रुह, चेंबूर - पं. पन्नालाल घोष जन्मशताब्दीनिमित्त - प्रातःस्वर - सायंस्वर
बासरी वादन - डॉ. विश्वास कुलकर्णी, अणुशक्ती नगर, मानखुर्द.
गायन - डॉ. मोहनकुमार दरेकर.
प्रवेश विनामुल्य.

BNHS तर्फे (sponsored by Godrej ) शनिवार, दि. १६ एप्रिल रोजी शिवडी जेट्टीवर "फ्लेमिंगो महोत्सव" आयोजित आहे. तरी इच्छुकांनी लाभ घ्यावा. Happy

वेळ: दुपारी २ वाजल्यापासुन सूर्यास्तापर्यंत.

शिवडी स्टेशन (पूर्व) ते शिवडी जेट्टी पर्यंत BNHS ने बसची सोय केली आहे.

अधिक माहितीकरीता संपर्क
०२२-२२८२१८११
किंवा
pro@bnhs.org

प्रायोगिक’च्या रसिकांसाठी ‘एक्स्प्रेशन्स’चा उपक्रम
दहिसर, बोरीवली, कांदिवली या भागातील रसिकांना प्रायोगिक रंगभूमीवरील दर्जेदार कलाकृती पाहाता याव्यात, यासाठी ‘एक्स्प्रेशन्स’ या संस्थेतर्फे विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़संकुलातील मिनी थिएटरमध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी रात्री साडेआठ वाजता उत्तमोत्तम नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत.
२४ एप्रिल या दिवशी रात्री साडेआठ वाजता चं. प्र. देशपांडे लिखित आणि रवी लाखे दिग्दर्शित ‘प्रेमच म्हणू याला हवं तर’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. विशेष म्हणजे या नाटकाचा हा रौप्यमहोत्सवी प्रयोग असेल. त्यानंतर मे महिन्याच्या २९ तारखेला रात्री साडेआठ वाजता अविष्कार निर्मित आणि महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘मौनराग’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. यात स्वत चंद्रकांत कुलकर्णी आणि सचिन खेडेकर भूमिका वठविणार आहेत.
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=150622:...

छत्रपती शिवाजी संग्रहालयात (जुने प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) ५ जून पर्यंत Treasures of Ancient China हे प्रदर्शन लागले आहे.

येणारे का कोणी ?

पारसी कॉलनीतल्या झाडांची ओळख
वेळः १२ जून २०११ सकाळी ८ वा.
जमायचे ठिकाणः टिळक पुलाजवळचा चंदू हलवाई

१ जुलै २०११. रात्री ८:३० वाजता, गडकरी रंगायतन, ठाणे
'बालगंधर्व' चित्रपटावर आधारित गप्पा, किस्से, गाणी असा कार्यक्रम आहे.
विशेष उपस्थिती - आनंद भाटे, सुबोध भावे, नितीन चंद्रकांत देसाई, रवि जाधव.

मी काल आमची तिकिटं काढली आहेत. पण आज पेपरमध्ये आलंय की ३-४ राजकारणीही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. चित्रपटाशी संबंधित काही प्रमुख लोकांचा सत्कार-बित्कार आहे. म्हणजे भाषणबाजी पण असणार Sad
त्या सगळ्यात मूळ कार्यक्रम झाकोळला न जावो म्हणजे मिळवली.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=169...

लोकसत्ता व बहि:शाल शिक्षण विभागाच्या नॅशनल पार्कमधील ‘सिटीवॉक’ला १६ जुलैपासून सुरुवात, नोंदणी सुरू

नोंदणी प्रक्रिया वैताग आहे. तेवढ्यासाठी इतक्या लांब जायचे? पण कार्यक्रम चांगला वाटतो आहे.
कोणी येणारे का?

P.S.

Naya Cinema Festival which was scheduled to begin in Mumbai on July 15 has been postponed due to the bomb explosions in the city Wednesday evening. The festival will now begin on July 22, 2011.

' नया सिनेमा' फिल्म फेस्टीवल १५ जुलै ते ३१ जुलै

Organized by Taj Enlighten Film Society, the festival will screen first or second films of directors who have made “path-breaking” cinema in India.

Gandu, directed by Kaushik Mukherjee will be the opening film of the festival. Two of Mani Kaul’s films will be screened at the festival as a homage to the filmmaker who died last week.

The other films to screen at the festival are Udaan, Do Dooni Chaar, Inshallah Football, Mirch Masala, Main Zinda Hoon, John and Jane, Albert Pinto Ko Gussa Kyon Aata Hai, Jaane Bhi Do Yaaron, Shor in the City, Oye Lucky! Lucky Oye!, Dil Chahta Hai, Hkhagoroloi Bohu Door, Ocean of an Old Man, Black Friday, Girni (short film), Vihir, Harishchandrachi Factory and 36 Chowrighee Lane.

Festival Passes are available for Rs 500. For passes, registration can be done at http://enlighten.co.in/frm​Registration.aspx

Festival Schedule:

Gandu Cinemax (versova) 15th July 7:30 pm
Udaan Edward theatre 16th July 4:00 pm
Do Dooni Chaar Edward theatre 16th July 7:00 pm
Inshallah Football Cinemax (versova) 17th July 12:00 noon
Mirch Masala NFDC auditorium 18th July 7:00 pm
Main Zinda Hoon NFDC auditorium 19th July 7:00 pm
John & Jane Mumbai times cafe 20th July 7:30 pm
Albert Pinto Ko Gussa Kyon Aata Hai NCPA- little theatre 21st July 6:30 pm
Jaane Bhi Do Yaaro NCPA- little theatre 22nd July 6:30 pm
Shor in the City Edward theatre 23rd July 4:00 pm
Oye lucky! lucky oye! Edward theatre 23rd July 4:00 pm
Dil Chahta Hai Cinemax (versova) 24th July 12:00 noon
Hkhagoroloi Bohu Door world school of media studies 25th July 4:00 pm
Ocean of an Old Man world school of media studies 25th July 6:00 pm
Black Friday world school of media studies 26th July 6:00 pm
36 Chowrighee Lane world school of media studies 27th July 6:00 pm
Girni (short film)

Vihir
mumbai times cafe 28th July 7:00 pm
Harishchandrachi Factory mumbai times cafe 29th July 7:00 pm
Mani Kaul homage Edward theatre 30th July 6:00 pm
Future view

screening of short film compitiion
Cinemax (versova) 31st July 12:00 noon

Pages