Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
हं अशोकजी. एक शांत व
हं अशोकजी.
एक शांत व सुस्वभावी पंतप्रधान. फारसे कुणाच्या आठवणीत नसलेले..
श्रद्धांजली
भारताचे माजी पंतप्रधान,
भारताचे माजी पंतप्रधान, इन्द्रकुमार गुजराल यांना श्रद्धांजली
एक्झॅक्टली डॉक्टर......यू सेड
एक्झॅक्टली डॉक्टर......यू सेड इट...."शांत, सुस्वभावी". दोन्ही भाऊ {इन्द्रकुमार आणि सतिश गुजराल....यांचेही आज ८६ वय झाले आहे} दोघेही कलाप्रेमी. सतिशजी म्यूरल, स्क्लप्टिंग, पेन्टिंगमध्ये आकंठ बुडाले तर उर्दू भाषेवर नितांत प्रेम करणारे ज्येष्ठ बंधू इन्दरकुमार {असाच त्यांच्या नावाचा उल्लेख उत्तर भारतात केला जातो} यानी राजकारण जवळचे मानले. सुसंस्कृत तसेच सरकारमधील कोणत्याही खात्याचे मंत्री असले तरी 'मंत्रेपदाचा' कधीही डौल न दाखविणारी व्यक्ती अशीच त्यांच्या प्रतिमा सर्वत्र होती. हे आजकाल दुर्मिळ झाले आहे.
इंदर कुमार गुजराल यांना
इंदर कुमार गुजराल यांना श्रद्धांजली, हिंदूमधे आज आलेला त्यांच्यावरचा लेख खूप चांगला आहे.
"हिंदु" मधील विद्या
"हिंदु" मधील विद्या सुब्रह्मण्यम यांचा लेख म्हणता का तुम्ही नंदिनी ? तोच असेल तर वाचला आहे मी. त्यात सोनिया गांधी यानी कै.गुजराल यांच्यासंबंधी नरेश याना पाठविलेल्या पत्रातील “…the late leader had the ability to win goodwill and friendship across the political spectrum...." हे वाक्य खूप भावले.
अशोक पाटील
आपल्या लेखणीने वाचकांना
आपल्या लेखणीने वाचकांना खिळवून ठेवणारे प्रसिद्ध लेखक विजय देवधर यांचे शुक्रवारी (ता. 30) अल्पशा आजाराने चिंचवड येथे निधन झाले - सकाळ मध्ये आज आलीये हि बातमी.
barmooda triangle, memories ऑफ midnight पुस्तकांचा अनुवाद करणारे लेखक.
प्रसिद्ध लेखक विजय देवधर
प्रसिद्ध लेखक विजय देवधर .........ओह......

नंदिनी आणि अशोक., तुम्ही हा
नंदिनी आणि अशोक.,
तुम्ही हा लेख म्हणतायसं दिसतंय.
http://www.thehindu.com/todays-paper/ik-gujral-author-of-key-foreign-pol...
दिवंगत गुजराल यांचा पूर्ण आदर ठेऊनही एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. ती म्हणजे कै. गुजराल यांच्याविषयी भारतीय गुप्तचरखात्यांचं मत फारसं चांगलं नाही. पाकिस्तानातील भारतीय हस्तकांचे बरेच मोठे जाळे कै. गुजराल यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत नष्ट झाले. वरील लेखातली शेवटची ओळ बरंच काही सांगते.
माझा मुद्दा मांडण्यासाठी हा बाफ योग्य नाही याची मला जाणीव आहे. याबद्दल सर्व वाचकांची क्षमा मागतो. केवळ भारताच्या हितास सर्वोच्च प्राधान्य असावं म्हणून जिथल्या तिथे खुलासा केला. अधिक चर्चा (करायची झाली तर) वेगळ्या मार्गे करूया.
आ.न.,
-गा.पै.
गापै, सुरळीच्या वड्या अशी नवी
गापै,
पोटाचं हित पहिलं पाहिजे. नाही का? भारताचं नंतर पाहू.
सुरळीच्या वड्या अशी नवी पाकृ वाचली अत्ताच. चला तिकडे जाऊ आपण दोघे सुरळ्या करायला
तुम्ही मॅनरलेस आहात असे सुचवितो.
सतारवादक पंडीत रविशंकर.
सतारवादक पंडीत रविशंकर.
पं. रविशंकर
पं. रविशंकर
पं रवी शंकर यांना
पं रवी शंकर यांना श्रद्धांजली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17581081.cms
पंडीत रवीशंकर???? विश्वास
पंडीत रवीशंकर????
विश्वास बसत नाहीये.
विनम्र श्रद्धांजली.
सतारवादक पंडीत रविशंकर -
सतारवादक पंडीत रविशंकर - भारतीय संगीत परंपरेचे निष्ठावान पाईक आणि महान प्रसारक....देव त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो...
भारतरत्न पंडीत श्री रविशंकर
भारतरत्न पंडीत श्री रविशंकर यांना श्रध्दांजली
ओ.... सतार अबोल झाली....
ओ.... सतार अबोल झाली.... श्रद्धांजली ___/\___
श्रध्दांजली
श्रध्दांजली
(No subject)
भारतरत्न पंडीत श्री रविशंकर
भारतरत्न पंडीत श्री रविशंकर यांना श्रध्दांजली
२०१२ हे खरंच एक वाईट वर्ष ठरलं आहे.... खुप चांगली चांगली लोकं आपण या वर्षात गमावली आहेत...
पंडित रवीशंकर यांचे
पंडित रवीशंकर यांचे निधन.
स्वरांचा पोशिंदा गेला.
एक एक दिग्गज निजधामी जात आहेत. आमच्या हयाती त्यांनी समृध्द केल्या.
http://www.divshare.com/download/launch/20662968-7a4
धक्कादायक बातमी २०१२ मध्ये
जुन्या पिढीतील क्रिकेटपटू
जुन्या पिढीतील क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर यांचे निधन
Published: Wednesday, December 12, 2012
भारतीय क्रिकेटविश्वात 'विक्रमांचा बादशाह' म्हणून ओळखले जाणारे कॅप्टन भाऊसाहेब निंबाळकर यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी विख्यात असणारा क्रिकेटपटू हरपल्यामुळे महाराष्ट्राच्या क्रिकेटवर शोककळा पसरली.
भाऊसाहेब निंबाळकर यांच्या घराण्यात क्रिकेटची प्रदीर्घ परंपरा आहे. त्यांच्या कुटुंबातील चार पिढय़ा क्रिकेटमध्ये रमल्या. भाऊसाहेब निंबाळकर यांची प्रदीर्घ कारकीर्द क्रिकेटमध्ये विक्रमांचे डोंगर रचत राहिली. १९३९ ते १९६५ अशी २५ वर्षे ते क्रिकेटचे मैदान गाजवीत राहिले. १९४८-४९साली महाराष्ट्र विरुद्ध काठीयावाड यांच्यात पुण्यात रणजी सामना झाला. तेव्हा महाराष्ट्राकडून खेळताना निंबाळकर यांनी नाबाद ४४३ धावांचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. उपाहाराला महाराष्ट्रने ४ बाद ८२६ केल्या होत्या. हा सामना काठीयावाड संघाने सोडला नसता तर भाऊसाहेब निंबाळकर यांनी सर डॉन ब्रॅडमन यांचा प्रथमश्रेणी सामन्यातील नाबाद ४५२ धावांचा विक्रम मोडला असता. पण नंतर ब्रॅडमन यांनी निंबाळकर यांना एक पत्र पाठवून त्यांची खेळी ही आपल्या खेळीपेक्षा अधिक चांगली असल्याचे कौतुक केले होते. सध्या जागतिक प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये निंबाळकर यांची ती ऐतिहासिक खेळी चौथ्या स्थानावर आहे.
भाऊसाहेब निंबाळकर यांनी महाराष्ट्र, बडोदा, होळकर, मध्य भारत व रेल्वे अशा संघांकडून रणजी सामन्यात प्रतिनिधित्व केले. ८० सामन्यांमध्ये त्यांनी ५६.७२ धावांची सरासरी राखत ४,८४१ धावा केल्या होत्या. त्यामध्ये १२ शतके व २२ अर्धशतकांचा समावेश होता. निंबाळकर हे उत्तम मध्यमगती गोलंदाजही होते. त्यांनी ४०.२२ धावांची सरासरी राखत ५८ फलंदाजांना बाद केले होते. फलंदाजी व गोलंदाजीबरोबर यष्टीरक्षण करताना १० फलंदाजांना यष्टीचित केले होते. त्यांनी ४७ झेलही पकडले. रणजी सामन्यांमध्ये ते प्रदीर्घ काळ खेळले तरी कसोटी मात्र ते खेळू शकले नाहीत. १९४९ साली राष्ट्रकुल सामन्यात त्यांची निवड झाली होती.
क्रिकेटशी त्यांचे नाते अखेरपर्यंत जोडले गेले होते. पतियाळा येथील राष्ट्रीय क्रिकेट शिबिरास ते प्रशिक्षक म्हणून निवडले गेले होते. त्यांना सी.के.नायडू हा क्रिकेटमधील मानाचा पुरस्कारही प्राप्त झाला होता. कोल्हापूरच्या क्रिकेट जगताला उंचीवर नेण्याचे काम केल्याने त्यांना कोल्हापूर महापालिकेने १९९९ साली 'कोल्हापूरभूषण' पुरस्कार दिला होता. सहकार प्रबोधन गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. कोल्हापूरच्या क्रिकेटपटूंनी क्रिकेटमध्ये नाव कमवावे, यासाठी त्यांचे सदोदित प्रयत्न सुरू होते. त्यांचे सुपुत्र सूर्याजी हेसुध्दा महाराष्ट्र व रेल्वे संघाकडून क्रिकेट खेळत होते.
ज्येष्ठ क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या निवासस्थानी सर्व स्तरातील नागरिकांनी गर्दी केली होती. पंचगंगा नदीघाटावर अंत्यविधी झाला. त्यांचे पुत्र नेताजी यांनी अग्नी दिला.
खूप धक्कादायक बातमी. पंडित
पंडित रविशंकर यांना विनम्र श्रद्धांजली
२०१२ मध्ये आपण खूप दिग्गजांना मुकलो.>>>>>>>>>>>खरच, खूप वाईट गेल हे वर्ष
ज्येष्ठ क्रिकेटपटू भाऊसाहेब
ज्येष्ठ क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर यांना श्रद्धांजली
पंडित रविशंकर गेले? कसं शक्य
पंडित रविशंकर गेले? कसं शक्य आहे? ... ते तर अजरामर आहेत!!!
पंडित रविशंकर यांना
पंडित रविशंकर यांना श्रद्धांजली.
पंडित रविशंकर यांना
पंडित रविशंकर यांना श्रद्धांजली. सतार आज खरंच अबोल झाली.
भाऊसाहेब निंबाळकर यांना श्रद्धांजली.
भारतरत्न पंडीत श्री रविशंकर
भारतरत्न पंडीत श्री रविशंकर यांना श्रध्दांजली
भाऊसाहेब निंबाळकर यांना श्रद्धांजली
पंडित रविशंकर आणि भाऊसाहेब
पंडित रविशंकर आणि भाऊसाहेब निंबाळकर यांना विनम्र श्रद्धांजली!
सतार आज खरंच अबोल झाली.
सतार आज खरंच अबोल झाली. >>>>>>.त्यांची सतार वाजवताना, तल्लीन झालेली मूर्ती डोळ्यासमोर आली.
Pages