अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला, बोली लावा तारखांची. ठिकाण ही येऊ द्यात.

५ एक सहज तारीख घेतली. बोलीनुसार बदलणेत येइल पुढे.

दणक्यात लिहायचे राहिले बुवा Lol

तसेच तारिख्/वेळ्/जागा वगैरे साठी पन्नास साठ पर्याय द्यायचे राहून गेले आहेत Wink

सुट्ट्या संपवून लगेच नको >>> +१

यंदा जानेवारीत एक पण रिलीज नसल्याने (खरं तर कशाचीच शास्वती नसल्याने :फिदी:) बाकी कुठली पण तारीख चालेल.

च्च ! बारा गटगला असं वेगळं 'दणक्यात' लिहावं लागत नाही.

हं तर मी काय म्हणते....पुरण पोळ्या की उकडीचे मोदक ? Proud

अरे वा वा..
आलं का नवीन वर्षाचं एविएठी...शेभेच्छा:)

( येत्या शनिवारी बी एम एम -अधिवेशनाच्या कार्यकर्त्यांची सभा आहे..त्यात बोस्टन्चे माबोकर भेट तीलच....
बघुया बोस्टन च्या बशीचं काही ठरतं का Happy

बारा / तेरा किंवा २६/२७ चा वीकेंड मला जमेल.
फिलीला येणार का मंडळी ? आमच्याकडे जमेल .

वेदर चांगली असेल तर ग्रिल देखील करता येईल
सिंडे, संक्रांतीच्या आसपास असेल तर गूळपोळ्याच कर की Happy

ह्याला म्हंतेत आपुलकी! Happy
गटग ची चर्चा सुरु झाली की आपलं घर खुलं करुन देतात. नुसतं नावाला नाही १०० पोस्टी आणि दणक्यात गटग होत इथे! Wink
काय शोनू, इत्ता नाही मालूम? त्या नेहमी सारख्या बोलाल्या कढीला उत आणत आहेत.

बुवा बस कुठे कुठे फिरणार .. म्हणजे लांबचा पल्ला की कसं? लांबचा म्हणजे ५-६ हजार माईल्स् जाऊ शकेल काय?

Biggrin

<<<< एक पॅसेंजर कार थांबली की रडतात. मनाची (आणि कानांची) तयारी करून या.

बस / कारमधले हलते फिरते गटग करा की Wink

वा वा बाफ तर सुरु झाला! १२-१३ किंवा २६-२७ जमेल - म्हणजे जमवेन Happy मला क्रिस्मस च्या सुट्टीत म्ह्टलं असतं तरी जमलं असतं यावर्षी Happy

Pages