केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योडे तुझ्या घरी वॉटर प्युरिफायर आहे का?
फक्त डोकं धुवायला तेव्हढं प्यायचं पाणी वापरायचं, थोडे कष्ट पडतात पण इलाज नाही.

वॉटर प्युरिफायर आहे का?
>>
नाहीय. वोही तो रोना है.

डोकं धुवायला तेव्हढं प्यायचं पाणी वापरायचं.
>>
प्यायचं पाणी फक्त १/२ तास येतं सकाळचं ८ वाजता. त्यामुळे ते डोकं धुवायला वापरणं नाही जमणार.

मी गेले ५-६ वर्ष केसाला कलर करतिये. मी लोरिअल किंवा वेल्ला च वापरते. पण तरी गेले काही दिवस मला असं जाणवतय की माझ्या केसांचा मुळचा पोत पार गेलाय. काही होऊ शकेल का ? केस ब-यापैकी पांढरे आहेत मेंदी आजिबात सुट होत नाही . लावली की असं वाटत की टक्कल करावं इतका कोंडा होतो.
आणि केस पुन्हा पांढरे दिसायला लागले की पुन्हा कलर करण्याशिवाय पर्याय राहत नाही. काही दुसरा ऑप्शन आहे का?

माझ्या डोक्यात खुप खाज होते आहे. मला थंडी मध्ये कोंड्यामुळे होतो हा त्रास पण केसात कोंडा नाही आहे. सारखी नाही पण अशक्य खाज होतेय. काय करु? प्लिज उपाय सुचवा

मी हा संपुर्ण बाफ अगदी मन लावून वाचला खुप आवडला.बाफ वाचुन मी एक रुटीन ठरवले आहे त्यावर मला सल्ला हवाय.
माझा तसा मेजर काही प्रॉब्लेम नाही ५/६ केस व्हाईट झाले आहेत फक्त त्यांची संख्या वाढू नये इतकच.
लेक वय वर्ष ५ केस खुप छान आहेत ते तसेच रहावेत.
तर रुटीन असे आहे
शुक्रवारी एरंडेल तेल ,खोबरेम तेल, ऑलीव्ह ऑईल मिक्स करुन मालीश करणे.(मी,लेक्,मुलगा,नवरा)
शनीवारी सकाळी नारळाच दूध लावणे.(१ तास ठेवणे)
माइल्ड शांपूने केस धुवून घेणें. नंतर जास्वंद जेल लावून केस धूणे.

नारळाचे दूध १५ दिवसातून एकदा आणि मेंदी महिन्यातून एकदा लावणे.(त्यावेळी माइल्ड शांपू लावणे)
बाकी दिवस शिकेकाईने केस धूणे.
लेकीसाठी कायम शिकेकाई वापरली तर चालेल का?
नवरयाचे माथ्यावरचे केस थोडे विरळ झाले आहेत त्यासाठी आणखी काय करता येईल.
बापरे खुप विचारले आहे का?

@ सायली : कुठच्याही कलरने केस कोरडे होतातच ... शांपू केल्यावर कंडीशनर लावुन ठेवायचा निदान अर्धा तास तरी ... त्याने छान सुळसुळीत होतात आणि कोरडे दिसत नाहीत .
अजुन उत्साह असेल तर कलर केल्याच्या रात्री तेल लावुन दुसरया दिवशी पुन्हा शांपु + कंडीशनर किंवा दुसरया दिवशी नारळाचं दूध / जास्वंद जेल / कोरफड जेल / मेथी भिजवुन, वाटून लावुन .. शांपू न करता नुसत्याच पाण्याने केस स्वच्छ करायचे.

निरजा मुलीसाठीच काय इतरांसाठी देखील शिकेकाई+रीठा+आवळापावडर्+नागरमोथा+गव्हलाकचोरा असे मिश्रण वापर. केसांना धुण्याआधी कोमट तेलाने मालीश( आदल्या रात्री.) आणी मग नारळाचे दूध वगैरे लावावे.

नहाण्या आधी टर्किश टॉवेल गरम पाण्यात बुडवुन, तो पिळुन डोक्याला पूर्ण गुंडाळावा, त्याने केसांची रुक्षता कमी होऊन त्वचेला वाफ बसेल. म्हणजे केसांची मूळे मोकळी होतील( कोंड्याचे प्रमाण कमी होते याने)

साधना, मला सगळ सामान आणायचे आहे अजुन काही अ‍ॅड करु का ते सांग.
टुनटुन नारळाचे दूध लावल्यावर केस माइल्ड शांपूने धुवावे लागतात नाहीतर चिपकु होतात अस इथे वाचल होत म्हणून शांपू ..(शिकेकाईने केस मोकळे होतील का नारळाचे दूध लावल्यावर)
जास्वंद जेल, एरंडेल तेल इथे दुबईत कुठे मिळेल?

निरजा दुबईत आहेस होय. नारळाचे दूध लावल्यानंतर धुतांना क्लिनिकसारखा शांपु चालेल, तो थोडा माईल्ड आहे. पण शिकेकाईबरोबर रीठा वापरलास तर केस चिपकु होणार नाहीत.

आणी केस्टर ऑईल या नावाने एरंडेल तेल शोध सुपर मार्केटला कदाचीत मिळेल तिथे. नाहीतर कुणी भारतातुन येणार असेल तर बघ. जास्वंद जेल भारताबाहेर मिळायची शक्यता कमी. पण उर्जिता जैनची साईट शोध गुगलवर. एक्स्पोर्ट होत असतील बाहेर तर मिळेल कदाचीत.

मी सध्या रोज एक दिवस आड भृंगराजाच्या पानांचा रस डोक्याला लावत आहे. अगदी कुठेही मिळणारी ही वनस्पती इतकी प्रभावी असते असे वाटले नव्हते. मला तरी केसांमधे फरक पडलेला दिसत आहे.

खरे तर आपण जेंव्हा २५ च्या आत असतो तेंव्हा हे सगळे उपाय प्रभावी ठरत असतील पण नंतर इतका उशीर होतो की एकदा करडे केस आलेत की ते करडेच राहत असावेत.

मी कैक उपाय करुन पाहिलेत पण माझा अनुभव असा आहे मी माझे केस दाट झालेत. जे काळे होते ते आणखी काळे झालेत. केसांचे पोत मऊ झाले. पण करडे केस काळे होऊ शकले नाही.

असो जे आहेत तेच टिकवून ठेवावे असा आता निश्चय केला आहे.

मी सध्या पुण्यात आहे... केस खुपच गळत आहेत..इतके की मला केस धुवायला नको वाटत आहे..मेंहदी २ महिन्यातुन एकदा लावते
मी ड्वचा शाम्पु नि कंडिनशनर वापरतेय तरीही केस एकच दिवस चांगले राहतात नंतर परत कोरडे Sad
प्लीज उपाय सुचवा..

धन्स दक्षिणा,चमकी , मी कंडिशनर अगदी रेग्युलर वापरते . लॉरिएलचा च . पण १/२ तास वगैरे नाही ठेवत. ५-६ मिनिटचं ठेवते. आता ठेवुन बघेन . आणि चमकी तु सांगितलेला दुसरा उपाय पण करुन बघेन. कंडिशनर ने केस अगदी चांगले दिसतात हे मान्य . पण मुळचा पोत गेलाच का आता केसांचा ?

@सायली : हो ..नियमीत कलर करत असशील तर पोत गेल्यात जमा आहे ! कलर केल्याच्या दुसरया दिवशी, कानापासुन खालचे केस ओले करुन, कंडीशनर लावून ठेवायचा, कमीत्कमी अर्धा तास आणि दुसरी कामे उरकायची ! मग फक्त पाण्याने स्वच्छ करायचे, याने केस छान दिसतात.. सुळसुळीत होतात.

केसांना खुप फाटे फुटताहेत सध्या.ते कमी कसे करता येइल? माझ्या केसांचा लेयर कट आहे. केसांना वाढ आहे पण केस कापल्यानंतर दोन महीन्यांनी फाटे दिसु लागतात. मग परत केस कापावे लागतात.

कंडीशनर लावताना केसांच्या मुळांमधे चोळायचेच पण टोकांपर्यंतही लावायचे.>>>>>>>>>> Uhoh
कंडीशनर(घरगुती नाही) मुळाना लावल्यास उलट केसगळती वाढते ना त्यातल्या केमिकल मुळे ????

कुठच्याही कलरने केस कोरडे होतातच ... शांपू केल्यावर कंडीशनर लावुन ठेवायचा निदान अर्धा तास तरी ... त्याने छान सुळसुळीत होतात आणि कोरडे दिसत नाहीत . >>>> बाप रे ! म्हणजे आंघोळ करताना अर्धा तास बाथरुममधे बसुन रहायचं काहीही न करता? ते ही ओलं? Happy

इव्हन प्रत्येक कंडीशनवर "अप्लाय टू लेन्थ" (नॉट स्कॅल्प) अशी इन्स्ट्रक्शन असतेच ना? मग मूळांना कंडीशनर कसे लावावे Uhoh

बाप रे ! म्हणजे आंघोळ करताना अर्धा तास बाथरुममधे बसुन रहायचं काहीही न करता? ते ही ओलं? >>>>> हेहेहे.... नाही ग माऊ ! washbasin वर कानाखालच्या लेन्थ पासुन केस ओले करायचे आणि मग त्यावर कंडीशनर लावून ठेवायचा, मेंदी लावुन नाही का आपण काम करत.. तस्संच !

उप्स चुकलं..
तेल मुळापासून टोकापर्यंत आणि कंडीशनरही टोकापर्यंत नक्की लावा असं म्हणायचं होतं. सोरी सोरी!

चमकी, Happy हे डोक्यातच नाही आलं. कंडिशनर शॅम्पुनंतर वापरला जातो त्यामुळे मला वाटलं बाथरुममधे बसुन रहायचं. Happy

मी कंडिशनर लावते नेहेमी पण फक्त पाचच मि. ठेवते. आता अर्धा तास ठेउन बघते. रच्याकने, माझे केस एकदम वेव्ही आहेत.धड सरळही नाहित आणि कुरळेही नाहीत. त्यामुळे नीट मोकळेही सोडता येत नाही. अशा केसांसाठी काय करता येइल?

तेल लावा ना मुळापासून टोकांपर्यंत आदल्या रात्री. सकाळी धुवून टाका. हे आठवड्यातनं दोनदा जरी जमलं तरी फरक पडेल.

निरजा, तुमच्या रूटिनमधे सातत्य असू देत पण इतर काहीमधे दोन तीन गोष्टी अवश्य करा.

पेरू, केसांना फाटे फूटत असल्यास वारंवार ट्रीमिंग करून घेत जा. केस अशक्त झाले की असे फाटे फुटतात.

केसांना सशक्त ठेवण्यासाठी आहार विहार उत्तम आणि व्यायाम हवाच. याने केसांचा, त्वचेचा, नखांचा पोत सुधारतो. हे नसेल तर कितीही महागडी अथवा आयुर्वेदिक औषधे केसांना वरून लावून उपयोग होत नाही. चौरस आहार तोही वेळच्यावेळी घ्यायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे झोप. केसगळतीचे कित्येकदा अपुरी झोप आणि पोट साफ न होणे अशीदेखील कारणे असू शकतात. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते त्यामुळे त्वचा आणी केस दोन्ही सुधारतात.

त्याशिवाय उन्हामधे जाताना केस पूर्ण झाकून घेणे. उन्हाने केस कोरडे होतात.

कंडिशनर केसांना लावून ठेवण्याबाबत: कंडिशनरच्या बाटलीवर तो किती वेळ लावून ठेवायचा याच्या सूचना असतात त्याप्रमाणेच तो ठेवावा. जास्त वेळ ठेवल्यास केसगळती होऊ शकते. (मुळांना लावलेला नसलातरी) रंगवलेल्या केसांना मिळणारा खास शांपू आणि कंडिशनरच लावावा. केमिकलवाल्या कंडिशनरपेक्षा बीअर आणि अंडी यासारखे नैसर्गिक कंडिशनर लावणे जास्त चांगले. (अर्थात प्रत्येकाला तेही सूट होइल असे नाही)

Pages