Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पानाचे ठेले असतात ते लोक पण
पानाचे ठेले असतात ते लोक पण पानांमध्ये मेंथॉल घालतात कधी कधी. तोंडात पान घातले की गारेगार वाटते.
असला हा गारवा माझ्या तरी डोक्यात जातो. कृत्रिम प्रकार एकदमच! च्छ्य्या!
एरंडेल तेल + तिळाचे तेल कोमट
एरंडेल तेल + तिळाचे तेल कोमट करुन मसाज केला तर कोंडा जायला व केस मऊ व्हायला मदत होते. मी केले आहे. हल्लीच आळशीपणा नडतोये >>>>>>>>>>>> कुठला शँपू वापरता आपण मोनालीप्?मी एकदा ट्राय केले होते फक्त तिळ तेला ऐवजी पॅराशुट वापरलेले. केसांचा चिकट्पणा जाता जात नव्हता
उर्जिता जैन चे जास्वंद तेल
उर्जिता जैन चे जास्वंद तेल अप्रतिम आहे . माझे केस अगदी भराभर वाढले.. पण वास बेक्कारे !
पुर्वी टाटा ऑइल मिल होती
पुर्वी टाटा ऑइल मिल होती त्यावेळी मी त्या कंपनीत ट्रेनी होतो. त्यांचे शुद्ध खोबरेल तेल, त्यावेळी खुपच लोकप्रिय होते. त्या तेलाच्या खात्यात काम करणार्या एक बाई होत्या. बाटलीत तेल भरले कि उजेडाकडे ती बाटली धरुन, त्यात कुठे क्रॅक नाही ना, हे बघणे हे त्यांचे काम. अधून मधून तोच हात त्या केसांना पुसायच्या.
त्या एका उंच स्टुलावर बसायच्या, अनेक वर्षे त्याच खात्यात काम केल्यावर त्या बांईचे केस इतके लांब झाले होते कि त्या उंच स्टूलावर बसूनदेखील, त्यांचे केस जमिनीपर्यंत पोहोचायचे.
०००००००
कॉड लिव्हर ऑईल जास्त करुन डि जीवनसत्वासाठी देतात. भारतात आपल्याला नियमित सूर्यप्रकाश मिळत असल्याने, त्यासाठी तरी त्याची गरज नाही. पण केस / त्वचा / डोळे यासाठी पण ते चांगलेच.
नेटवरील एका साईटवर पाहिलेली
नेटवरील एका साईटवर पाहिलेली माहिती खाली देत आहे........
केस गळतात? टक्कल पडतंय? उपाय येथे आहेत
चांगले आणि घनदाट केस पाहिजे असतील तर Hair Care करणे जरुरी आहे. अनेक प्रकारचे shampoo आणि conditioner वापरून देखील चांगले केस मिळतील याची खात्री नाही. अश्यावेळी घरगुती उपाय कामी येतात. घरगुती उपाय म्हणजे योग्य खाणे-पिणे आणि काही अश्या गोष्टी ज्यामुळे केस सुंदर आणि निरोगी बनतील.
खाणे-पिणे - तुम्ही जे खाता तसेच तुम्ही होता हीच गोष्ट केसांवर लागू होते. योग्य भाजीपाला आणि फळे खालल्याने तुम्हाला प्रोटीन मिळते ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. याच बरोबर व्यायाम करणे ही अत्यंत गरजेचे आहे.
Hair Oil Massage - केसांमध्ये dandruff झाल्यास गरम तेलाने डोक्यावर मालीश करा आणि मग एक तासाने लिंबू लावा. यामुळे Hair dandruff दूर होईल.
आवळा - कच्चा आवळा किंवा याचा रस केसांना लावल्याने Hair Loss Problem दूर होतो आणि केस काळे राहतात.
अंडयाचा पिवळा भाग - जर Hair Loss अत्यंत वेगाने होत असेल तर अंडयाचा पिवळा भाग केसांवर लावा आणि एक तासासाठी तसेच ठेवा नंतर कोणत्याही माइल्ड शैम्पोने केस स्वच्छ करा. आठवड्यातून केवळ एकदा हा प्रयोग करा आणि चमत्कार पहा.
भुंग्यासारखे काळे >>> ए
भुंग्यासारखे काळे >>> ए भुंग्या, तुला काळं म्हणाताहेत बघ!!!!
मला केसांसाठी एक अयुर्वेदिक तज्ञाने दिलेला उपाय होता: पाव किलो आवळकाठी+पाव किलो गूळवेल्+पाव किलो नागरमोथा (हे तिन्ही आयुर्वेदिक दुकानात मिळेल) + पाव किलो वडाच्या पारंब्या (दुकानात मिळत नाहीत. वडाच्या झाडावर असतात) एकत्र करून एक किलो तेल आणि तितकेच पाणी घालून भरपूर उकळवायचे. पाणी उडून गेल्यावर मग राहिलेले तेल गाळून घेऊन बाटालीत भरायचे. नंतर हवे तसे वापरायचे.
या तेलाने माझे केस भरपूर चांगले वगैरे झाले होते. पण उठारेट बरीच असल्याने हल्ली कित्येक दिवसात केलंच नाही.
लेले. केसांचा चिकट्पणा जाता
लेले. केसांचा चिकट्पणा जाता जात नव्हता>>> ३/४ कोणतेही तेल. १/४ एरंडेल घ्यायचे. जरा कमी पण चालेल. शांपु कोणताही वापरला तरी फरक पडु नये मग. मी तर ग्राहक चा कोरफड वाला वापरते सद्ध्या.
आवळा - कच्चा आवळा किंवा याचा
आवळा - कच्चा आवळा किंवा याचा रस केसांना >> बापरे.. आवळ्याचा रस मुळीच केसांना आणि त्वचेला लावू नका. केस एकदम खराब होतात. कारण त्यात अॅसिड असतं ते केसांना लागतं. डोळ्यात एक थेंब जरी गेला रसाचा तर डोळ्यात जळजळ सुरु होते.
दवे ह्यांचे जास्वंदाचे तेल मिळते. चांगले असते का?
मी रोज देवाला एकदा तरी माझे केस काळे होऊ देत असे दान मागतो.
प्राणायाम मीही करतो. शीर्षासनही करतो. पण परिणाम होत नाही आहे केसांवर त्याचा. जे केस काळे आहेत ते काळेशार होतात. पण पांढरे केस पांढरफटकचं राहतात. करडे देखील दिसत नाही. पांढरे केस करडे जरी झाले तरी आनंदच होईल मला.
मला केसांसाठी एक अयुर्वेदिक
मला केसांसाठी एक अयुर्वेदिक तज्ञाने दिलेला उपाय होता: पाव किलो आवळकाठी+पाव किलो गूळवेल्+पाव किलो नागरमोथा (हे तिन्ही आयुर्वेदिक दुकानात मिळेल) + पाव किलो वडाच्या पारंब्या (दुकानात मिळत नाहीत. वडाच्या झाडावर असतात) एकत्र करून एक किलो तेल आणि तितकेच पाणी घालून भरपूर उकळवायचे. पाणी उडून गेल्यावर मग राहिलेले तेल गाळून घेऊन बाटालीत भरायचे. नंतर हवे तसे वापरायचे. >
आम्ही सावंतवाडिला असताना अशाच प्रकारे माझी आई जास्वंदीच तेल बनवायची. त्यात जास्वंद, आवळा, ब्राम्ही, माका अशा सगळ्या पदार्थंची पेस्ट करुन पाणी आणि तेल (सारख्या प्रमाणात) मिक्स करुन पाणी उडेपर्यंत उकळायची. थंड झाल्यावर कापुर मिक्स करुन वापरायला सुरवात. हो पण मुख्य म्हणजे वापरलेल्या सगळ्या वस्तु घरातल्याच असायच्यात.
मीही ऐकले कापराबद्दल.
मीही ऐकले कापराबद्दल. कापुराचा नक्की काय उपयोग होतो तेलामधे?
डोक्यात ऊवा झाल्या असतील तर
डोक्यात ऊवा झाल्या असतील तर खोबरेल तेलात कापराची वडी विरघळवून लावतात इतके माहीत आहे.
कापराच्या उग्र वासामुळे
कापराच्या उग्र वासामुळे ऊवांची अंडी तग धरत नाहीत , असे ऐकलेय
अगं निंबुडा खरच तशी उपमा आहे,
अगं निंबुडा खरच तशी उपमा आहे, हसू नकोस.:खोखो:
शिवलीलामृतात वर्णन आहे " कुरळ केश देखोनी तिचे, भ्रमरपंक्ती रुंजी घालती."
येथे भ्रमर म्हणजे खरा भुंगा ( माबोवरचे भुंगा आणी भ्रमर नव्हे ):फिदी:
अनुसया ती खरच थंड पाणी वापरते, पण बाकी तिच्या डाएट कल्पना भयंकर आहेत्.:अओ:
हे वटजटादी तेल ( जे वडाच्या
हे वटजटादी तेल ( जे वडाच्या पारंब्यांपासुन बनवतात व ज्यात कापूर पण असतो ) ते मी वापरलय, माझे केस मस्त लांब झाले, पण मध्येच मुर्खासारखी ब्युटीपार्लरमध्ये जाऊन कापुन आले, तेव्हापासुन वाढ जरा कमी आहे. पण ते तेल जरा चिकट आणी वास येणारे असल्याने आदल्या रात्री मालीश करुन दुसरे दिवशी धुवुन टाकावे.
हे तेल वटाच्या पारंब्याचे आहे
हे तेल वटाच्या पारंब्याचे आहे हे मला माहिती नव्हते. मी ईंडोनेशियामधे एके ठिकाणी जावानीज मसाजला गेलो तिथे त्या स्त्रियांनी माझे डोके बघून मला हे तेल घ्या अशी त्यांच्या भाषेत विनंती केली पण मला त्या तेलाची भिती वाटली कारण माहिती नसताना मी प्रयोग करत नाही. आता पुढील वेळी ते तेल विकत घेईन.
त्या तेलाच्या बाटलीत एक
त्या तेलाच्या बाटलीत एक पारंबी होती.
हल्ली ऊवांचे प्रमाणे कमी झाले
हल्ली ऊवांचे प्रमाणे कमी झाले आहे असे मला वाटते.
बी असं काही नाही. उवांचे
बी असं काही नाही. उवांचे प्रमाण तितकेच आहे.
मी खडीवाले वैद्याच
मी खडीवाले वैद्याच जपाकुसुम्,वटजठादी,आनि आमलकाय्दी तेल वापरुन झाले आहे...तीन ही चांगले आहेत...आनि केसगळती कमी झाली... दरवेळी पावसाळ्यात माझी त्यांच्याकडे केसगळती थांबवण्यासाठी चक्कर असतेच....याशिवाय केस गळ्ती साठी पोटामधे/तुन
गोळ्या घेतल्यास लवकर फायदा होतो,...हा स्वानुभव 

माझ्या हापिसातल्या एक ज्येष्ट बाई चा सल्ला...आधी हाड मजबुत करा..केस आपोआप मजबुत होतील...:अओ:
हे मला काही फारस झेपल नाही
आमचे कन्यारत्न वय वर्षे २,
आमचे कन्यारत्न वय वर्षे २, केसांचा रंग पिंगट आहे. तिला जन्मा पासून एक पांढरा केस होता आता आणखीन २ / ३ दिसून येतायत काय कारण असू शकेल ? काही उपाय आहे का ?
याशिवाय केस गळ्ती साठी
याशिवाय केस गळ्ती साठी पोटामधे/तुन गोळ्या घेतल्यास लवकर फायदा होतो,...हा स्वानुभव >> अनु सेम पिंच.
केड्या.. डॉक ला दाखवलेस का?
केड्या.. डॉक ला दाखवलेस का?
केड्या.. डॉक ला दाखवलेस का? >>> नाही, डॉक लय भारी आहे त्याला नविन नाविन शंका विचारल्या तर तो आम्हालाच म्हणतो खूप काळजी करताय
वजन उंची व्यवस्थित आहे ना मग !
दक्षे.. कुठल्या गं गोळ्या
दक्षे.. कुठल्या गं गोळ्या केसांसाठी???
केसासाठी सांगते की खरच जंक
केसासाठी सांगते की खरच जंक फुड कमीच करा, त्याने एकतर पोट साफ न होता उष्णता वाढते, तब्येतीवर पण परीणाम होतो. दुर्दैवाने मी त्यातुन गेलेय म्हणून सांगते.:अरेरे:
आधी माझे केस काळेभोर आणी लांबसडक होते, पण मी नीट नीगा राखली नाही. लोणचे, चिप्स वगैरे सारख्या पदार्थांनी मीठ जास्त खाल्ले जाते, त्यामुळे लहान वयातच केस पांढरे होणे, गळणे चालू होते.
त्यापेक्षा सिजनल फळे, दूध, दही, ताक, नारळ पाणी, ज्युस, सुकामेवा, भाज्या केव्हाही चांगले.
अनुसया हाडे मजबुत करा म्हणजे calcium वाढवा. जे दुध, दही, ताक, अंजीर, नाचणी, अननस, केळी वगैरेत असते. लोणचे टाळणे शक्य नसेल तर रोज एक केळ खा, मीठाची पातळी समान रहाते.
दिपाली प्रेट्टी हेअर नावाची
दिपाली प्रेट्टी हेअर नावाची एक गोळी दिली होती मला डॉकनी, फक्त एक महिनाभर. केसगळती सिग्निफिकंटली कमी झाली त्याने.
mi dr. janujache keshking tel
mi dr. janujache keshking tel v shampoo vaparayala suravat keli aahe te tel kase aah kunala mahit aahe ka?kes galatisathi sharangadar shavida tabalet ghevu ka?
टिचप तेल आणि शैम्पु कसे आहे?
टिचप तेल आणि शैम्पु कसे आहे? कोणि वापरले आहे का?
जास्वंद जेलने माझे केस राठ
जास्वंद जेलने माझे केस राठ होतात अगदि झाडु सारखे दिसत आहेत, ब हुदा माज्या केसांना सुट होत नाहि काय करु
मनुरुचि
जास्व.न्द जेल आणी तेल असे
जास्व.न्द जेल आणी तेल असे वेगवेगळे प्रॉड्क्ट आहेत का?
उर्जिताचे जास्वंद जेल आहे.
उर्जिताचे जास्वंद जेल आहे. तेलाचे काही माहित नाही. अर्थात तेल वेगळॅ असणार. जेल बहुतेक जास्वंदीच्या फुलांच्या चटणीवर प्रक्रिया करुन बनवले असणार. तेल, जास्वंदीची फुले तेलात उकळुन केले असणार.
मी आज आवळा तेल बनवण्याचा उद्योग हाती घेतलाय. दोन लिटर पाण्यात १२५ ग्र. आवळा पावडर मंदाग्नीवर उकळत ठेवलीय. दोन्-अडिच तास झालेत, अजुन अर्धा-पाव लिटर वाफ उडुन जायला हवीय.
मनु, सुट होत नाहीय तर अर्थातच वापर बंद करावा हे उत्तम. कोणत्या ब्रँडचे वापरत होतात? बाजारात उर्जिता जैन सोडुन इतरांची जेल्सही मी पाहिलीत.
Pages