सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by योगी on 12 January, 2009 - 16:21

१२ जानेवारी:
पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान लेख आहे लोकप्रभामधला. वाचताना कौतुकाने डोळे भरुन आले.

काल रवीवारी सा रे ग म प ची मॅरेथॉन होती tv वर सकाळी १० ते संध्या ४ वाजे पर्यंत मजा आली सर्व ५० स्पर्धकांची गाणी दाखवीली
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

आता दर सोम व मंगळ रोजी आपल्या भेटीला पंचरत्ने येणार. काल कार्तिकी आली होती. पण प्रसादला कार्यक्रम खुलवता आला नाही.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

पोरांच्या गाण्याचा एम. पी ३ झी मराठीने काढून टाकलेल्या दिसतात.
मला शेवटच्या दोन भागांच्या (स्टुडीयोमधल्या) हव्या होत्या. कुणाकडे आहेत काय?

नकुल, youtube वर आहेत ह्या दोन्ही भागांतली गाणी. असे search कर.
srgmp m lc f17.1 आणि, srgmp m lc f17.2.

सारेगमप चे लि. चॅम्सचे पर्व संपेपर्यन्त मी ह्या बीबीवर येवुन कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. ज्यांना जे आवडते त्यांना ते आवडु दे. झी ला बिझिनेस करु दे, आपण आपले मनोरंजन पण चालु ठेवु यात. माझी अशी विचारप्रणाली आहे.

काल कार्तिकीची प्रसाद ओक ने घेतलेली मुलाखत बघितली, आणि एक जाणवले ते म्हणजे ह्या मुलीमधे कमालीचा अकृत्रीमपणा आहे आणि मला तो भावला. खुप नॅचरल आहे मुलगी कुठेही कसलाही आव नव्हता तीच्या वागण्याबोलण्यात आणि तो मला प्रचंड भावला. आणि वयाच्या मानाने बरीच समंजसपणे उत्तरे देत होती.

कार्तिकीला प्रथम क्रमांक देयला हवा होता का वैगरे गोष्टी मला माहीत नाही आणि त्यावर मी काही बोलुही इच्छीत नाही. Happy फक्त मला जे काल मुलाखतीतुन जाणवले ते लिहीले. Happy

काल आणि परवा आर्याची मुलाखत छान झाली.
आज पंचरत्नांचा शासकीय कौतुक सोहळा आहे. Happy
पण केवळ निमंत्रितांसाठी. Sad बाकी मंत्र्यांचे जाहिर नागरी सत्कार करतात तर यांचा का नको ?
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

m_varsha आपण जे म्हणालात त्याला माझे पूर्ण अनुमोदन...कार्तिकी जे गाते ते अगदी सहज आणि मनापासून...देवकी पंडीत आणि श्रेया घोशाल यानी सुद्धा हेच म्हंटले आहे..

परत एकदा मी youtube वर या सगळ्यांची गाणी ऐकत होतो.... कार्तिकी आणि प्रथमेश..खरोखर प्रत्येकवेळी अंगावर शहारे आणतात....दैवी देणगीच..दुसरे काय?

०--------------------------------०
उद्या उद्याची किती काळजी, बघ रांगेतुन
परवा आहे उद्याच नंतर......बोलु काही.

पंचरत्नांची 'झी' ने काढलेली सीडी कुणी पाहीली का ? कशी आहे ?
केसरी ट्रॅव्हल्स पंचरत्नांना घेऊन २३ मे ला युरोप टुरला जाणार आहे. Happy
या आठवड्यात विशेष भागात रोहीत राऊत आहे.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

लिटील चँप्सचा आज ठाण्याला live show आहे. दादोजी कोंडदेव स्टेडीअम.

दुबईत येत्या १४ मे म्हणजे गुरूवारी रात्री ८.०० वाजता यांचा "live" कार्यक्रम आहे.
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

मराठी लिट्ल चँप मधे ज्यांनी कार्तिकी ची सगळी गाणी follow केली आहेत त्यांनी आणि इतरांनीही बायस्ड न होता प्रामाणिक मत द्या, हिंदी लिट्ल चँप्स मधे सध्या ज्या तयारीचे चे स्पर्धक प्रायमरी राउंड मधे आहेत ते एलिमिनेट होत जाणार पण कार्तिकी ला मात्र फायनल राउंड मधे डायरेक्ट एंट्री मिळवणार, खरच ती डिझर्व करते का ??

मत मांडण्या पूर्वी हिंदी लिट्ल चँप च्या प्रायमरी राउंड चे हे व्हिडिओज जरुर पहा आणि compare करून तुमच मत लिहा कि कार्तिकी या स्पर्धकांना कट करून डायरेक्ट फायनल मधे जाणे डिझर्व करते का?

हे घ्या हिंदी लिट्ल चँप चे प्रायमरी राउंड चे व्हिडिओज:

यशोधन रावकदमः ( मौला मेरे मौला, दिल्ली ६)
http://www.youtube.com/watch?v=dhEpZsNvaPs

या रब्बा दे दे कोइ जान भी अगर
http://www.youtube.com/watch?v=1exQ6YMCwFE

अभिग्याद दास (अल्बेली नार: song starts @ 0:50 )
http://www.youtube.com/watch?v=NTmYYB5yNWY
अभिग्यान :कौन है जो सपनोमे आया
http://www.youtube.com/watch?v=AtxqsdbqQJg&feature=related

यथार्थ : सावन बीतो जाये
http://www.youtube.com/watch?v=kvj03dkmkTU
यथार्थः कैसे मुझे तुम मिल गयी
http://www.youtube.com/watch?v=ye1ZbL9xdXg&feature=related

श्रेयसी : must watch breathless ('दिल मे जागे 'सूर')
http://www.youtube.com/watch?v=WXvR3ePa140

हेमंत ब्रिजवासी ( मा दा लाडला बिगड गया)
http://www.youtube.com/watch?v=VoX4PcfQZlI

स्वरीत ( सर जो तेरा चकराये):
http://www.facebook.com/ext/share.php?sid=97295367938&h=oMwFQ&u=c6mEA

ए मेरी जोहराजबीन:
http://www.facebook.com/ext/share.php?sid=97295367938&h=oMwFQ&u=c6mEA

प्रियांका (गेंदा फुल्-दिल्ली ६):
http://www.youtube.com/watch?v=ZjdGoDL67Gs&feature=related

प्रियांका: (हमे तुमसे प्यार कितना)
http://www.youtube.com/watch?v=FJpnoKZ-BUU

फराह नाझ (पिया तोसे नैना लागे रे)
http://www.youtube.com/watch?v=E0IagN3I4fI

श्रेयसी ( ये हसीन वादिया)
http://www.youtube.com/watch?v=Fca9B5XAZME&feature=related

मला वाटत कि इथे कार्तिकी ला ऑडिशन मधूनच घरी जाव लागल असत !
आर्या किंवा रोहित असते तर चांगली काँपिटिशन दिली असती.

DJ

मला वाटतं इथे प्रश्न फक्त कार्तिकीचाच नसून सर्वच सारेगमप (मराठी) विजेत्यांचा आणि स्पर्धकांचा आहे. एक वैशालीचा अपवाद सोडला तर आतापर्यंतच्या कुठल्याही मराठी पर्वात देशपातळीवर सफाईने गाणारे तसे फारच कमी आढळतील.

रोहीत राऊतने एकदा भाग घेऊन झाला आहे.

समीर,
अनुमोदन , वैशाली माडे एकटीच अपवाद आहे...नाही तर अभिजीत कोसंबी पण अगदीच किरकोळ गायला हिंदी सारेगमप च्या लेव्हल ला!!
गेल्या वर्षी तरी अ‍ॅव्हरेज स्पर्धक होते हिंदी लिट्ल चँप ला पण सध्याच्या हिंदी लिट्ल चँप टॉप १२ मधे ज्या तयारीचे स्पर्धक आहेत तिथे कार्तिकी सारख्या मुलीला डायरेक्ट फायनल मधे एंट्री हा इतर स्पर्धकांवर खरच अन्याय आहे !
आर्या कदाचित ८ ते १३ या एज गृप मधे बसत नाही म्हणून तिला जिंकून दिल नसेल, रोहित मागच्या वर्षी येउन गेला म्हणून त्याचाही पत्ता कट झाला असेल.
पण ज्या मराठी लिट्ल चँप ची , तिथल्या दर्जा ची सगळी कडे एवढी चर्चा झाली, मोठय मोठ्या जजेस नी स्तुति केली त्याची विनर म्हणून कार्तिकी इथे रिप्रेझेंट करणार म्हणजे अगदीच इज्जत का फालुदा करु नये अशी आशा !

>>त्याची विनर म्हणून कार्तिकी इथे रिप्रेझेंट करणार म्हणजे अगदीच इज्जत का फालुदा करु नये अशी आशा
माझ्यामते तू कार्तिकीला फारच कमी लेखते आहेस. पण आता करतेच आहेस, तर तेवढीही आशा ठेउ नकोस काय? Light 1
~~
उस डोंगा परी रस नाही डोंगा , काय भुललासि वरलिया रंगा.

LOL DJ! कार्तिकीने "लंबी जुदाई" टाईपची गाणी गायली तर आशा आहे का? Happy
(मी तू वर दिलेल्या लिंक्स ऐकलेल्या नाहीत.)

कार्तिकीने "लंबी जुदाई" टाईपची गाणी गायली तर आशा आहे का?
<<<
चाफा,
छे फक्त गुणवत्ता पाहिली तर अज्जिबाsssत नाही !(Btw, लिंक्स जरुर पहा, आणि सांग कि या सगळ्यांनी ऑडिशन लेव्हल ला जी गाणी गायली आहेत त्या लेव्हल ला त्या मंचावर गायची पात्रता आहे कार्तिकी ची)
त्या लंबी जुदाइ टाइप folk genre चे even सुफी मधे हेमंत, यशोधन, प्रियांका किती तरी पटींनी उजवे आहेत , पण अता महाराष्ट्राचा एकही स्पर्धक नाहीये TOP १२ मधे म्हंटल्यावर पॉलिट्क्स मुळे कार्तिकीला ठेवल तर गोष्ट वेगळी, शेवटी काय झी चा फॉरर्मॅट आणि झी च्या कृपेने काय होइल सांगता येत नाही पण कार्तिकी साठी बिचारी ही क्लासिकल मधे प्रचंड तयार आणि आवाजाची सॉलिड रेंज असलेली मुल फायनल लेव्हल यायच्या आधीच आउट झाली तर very unfair to these talenetd kids !:(

डीजे, तुला समाजसुधारकान्ची रेसच्या घोड्यान्ची कन्सेप्ट माहित नाहिसे वाटते! Happy
पन्नासटक्के अन्तर पुढूनच रेसला उभे करण्याचा हा प्रकार आहे! त्यात गैर ते काय??? Proud
काय फियास्को बियास्को होत नाही!
अन नाही जमल तर आहेतच की रेडीमेड बोम्बा.... अमक्यामुळे जमल नाही नी तमक्यामुळे अडथळे आले वगैरे, अन ते पटवून देता नाही आल तर हुकमी हत्यार.... पूर्वजान्नी केलेले अन्याव/शोषण वगैरेवगैरे!
मला एक कळत नाही, तुला का ही काळजी पडलीये??? Biggrin हे असच चालत रहाणार!

टिलु,
ती अफ्शा मुसानी महा आगाउ पोरगी आहे, सहन करु शकत नाही तिची बडबड.

ती अफ्शा मुसानी महा आगाउ पोरगी आहे, सहन करु शकत नाही तिची बडबड
>>

पाहिजेत तेवढे मोदक...

जाम डॉक्यात जाते...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

>>ती अफ्शा मुसानी महा आगाउ पोरगी आहे, सहन करु शकत नाही तिची बडबड >> तिचं स्क्रिप्ट लिहिणार्‍याच्या कानाखाली पेटवली पाहीजे. ती मागच्या एका एपिसोडमध्ये अभिजितलाच फाडदिशी काहीतरी बोलली होती, Uhoh बिच्चारा गप्पच झाला होता.. Sad

तिचं स्क्रिप्ट लिहिणार्‍याच्या कानाखाली पेटवली पाहीजे.
<<आस्माचं स्क्रिप्ट लिहिणाराच असणार तो !
पण ती अगाउ पोरटी सगळं समजून बोलते, निरागस वगैरे मुळीच नाही दिसत, दीड शहाणी दिसते !

मराठी भाषिक गाणा-यात आणि इतर भाषिक गाणा-यात इतका फरक का पडतो?

महाराष्ट्रात गाण्याची परंपरा जुनी असुनही, इतर मुले विषेशतः उत्तर प्रदेश वगैरे प्रांतातली जिथे अगदी ५० वर्षांपुर्वीही गाणे शिकणे हे फक्त कोठेवाल्यांचे काम समजले जात होते (इती माझ्या युपीवाल्या संगित शिक्षिका), इतकी पुढे का आहेत?

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

बघितला तो विडिओ. इतकं डोक्यात जाणारं मला तरी काही नाही वाटलं.

कार्तिकी देवींचा वाइल्ड कार्ड एंट्री ने हिंदी सारेगमप मधे येण्यास नकार ..... थँक गॉड !!:खोखो:
धड हिंदी उच्चार करता येत नाहीत , आणि तिच्या गाण्या बद्दल तर नो कॉमेंट्स्...तिच्या न येण्याच खरं कारण जे सकाळ मधे लिहिलय तेच वाटतय.. नशीब लायकी नसताना वाइल्ड कार्ड ने न येण्या इतकी बुध्द्दी तरी झाली Proud
http://beta.esakal.com/2009/07/30000709/maharashtra-kartiki-gaikwad-re.html

मी आत्ता तेच लिहायला आलेलो डीजे. की चला तुझी काळजी मिटली. Biggrin

दिपांजली,

पण तिने येण्यास नकार देउन एक संधी (स्वतःची आणि दुसर्‍याचीही) फुकट घालवली ना?
तिथे लिटल चँप्स उपविजेते वगैरे ना संधी नाही का?(प्रथमेश, आर्या, रोहित यानी प्रयत्न तरी केला असता)
झी ने त्याना संधी द्यायला हवी.

बरं तुमच्यापैकी कोणी या स्पर्धकांना SMS करणार आहेत की आपापले लाडके मराठी लिटील चँप या स्पर्धेत नाही म्हणून कळफलकावर आदळाआपट करणार आहात?? एक कार्तिकी काय विजयी झाली लोकांना चघळायला विषय मिळाला, जो मराठी लिटील चँप्स च्या फायनल पासून सुरू आहे ते हिंदी लिटील चॅंप्स सुरू झाले तरी सुरूच आहे. Sad

बाकी ही चर्चा वाचून छान करमणूक झाली!

Pages