Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निंबे आंब्याचा रस आंब्याच्या
निंबे
आंब्याचा रस
आंब्याच्या पोळ्या
सुलेखाचे आंब्याचे लाडू
आंब्याचे मोदक
मॅम्गो पिस्ता बर्फी
सायोची मलईबर्फी आंबा पल्प टाकून
मँगो लस्सी
डिजे चा आंब्याचा शिरा
मी पण आणलाय एक तुझ्यासारखाच पल्प चा डब्बा. योग्य वेळ बघतेय उघडायला

आता दिवाळीत फार गोड झालंय.
आमरसाचा 'मावा' बनवून ठेवा
आमरसाचा 'मावा' बनवून ठेवा आटवून. किंचित साखर घालून. पाहिजे तेव्हा वापराल. बर्फी, शिरा आणि काय काय...
झंपे तुझ्याकडं खायलाच येते
झंपे तुझ्याकडं खायलाच येते आता, त्याशिवाय शांती नाही मिळणार जीवाला

मँगो शिरा
मँगो पाय आपल्याला माहीतच नाय.
मँगो पाय आपल्याला माहीतच नाय. फोटु आणि रेस्पी प्लीज
आंबा असतो ना त्याला पायाकडून
आंबा असतो ना त्याला पायाकडून शिजवायचा
दक्षे, गोड कमी खावं ग. चांगले
दक्षे, गोड कमी खावं ग. चांगले असते.
(गंमत करतेय)
झंपे
झंपे
निंबीच्या विपुत
निंबीच्या विपुत टाकलंय....कुणीतरी करा आणि मला फोटु धाडा....ती मैत्रीण आता दूर गेली म्हणून करून खाऊ घालणारं कुणी नाही निदान फोटूतरी.....मी विसरलेच होते या पायाला
रच्याकने माझ्याकडे पण तो आटवलेला आमरसाचा घट्ट गोळा आहे...चवीला चांगला लागतोय पण जरा जास्तच गोड लागतोय...शिरा कसा करतात जरा बैजवार सांगल का कुनी?
वेका सत्यनारायणाच्या प्रसादात
वेका सत्यनारायणाच्या प्रसादात केळ कुस्करून घालतात तिथे हा आमरसाचा गोळा घालायचा, पण साखर मात्र चव घेऊन हळू हळू घाल.
घरचे लहान आवळे (मोरावळा
घरचे लहान आवळे (मोरावळा करतात ते नाही..दुसरे लहान्..जे खाल्ले की खोकला होईल असे लहानपणी घरचे सांगत ते)आले आहेत बरेच. त्याचे काय करता येईल? टिकाऊ लोणचे वगैरे काही करता येईल का?
त्याची ओली चटणी चांगली होते.
त्याची ओली चटणी चांगली होते. ठेचून बिया काढाव्या लागतात. मग खोबरे, मिरच्या, आले, जिरे, मीठ घालून चटणी करायची. ( हि थोड्या वेळाने काळी पडते.)
अख्खे शिजवून लोणचेही करता येते, पण बिया दाताखाली येतात, म्हणून काढल्या तर चांगल्या.
तेलाच्या फोडणीवर हिंग, जिरे, हळद घालून ते टाकायचे. थोडे पाणी घालून शिजवायचे ( लवकर शिजतात ) मग त्यात तिखट, मीठ, साखर घालून, दाट पाक होईपर्यंत शिजवायचे. मोहरीची पूड वा तयार लोणचे मसाला घातला तरी चालतो. पाक दाट केला, तर आठवडाभर टिकेल.
धन्यवाद दिनेशदा.
धन्यवाद दिनेशदा. आवळासुपारीसदृश टिकाऊ काही करता येईल का? प्रयोग करायला हरकत नाही.
वाळून अगदीच कमी आकारमान होते
वाळून अगदीच कमी आकारमान होते त्यांचे. शिवाय जास्त दिवस ठेवले तर ते पांढरे आणि मऊ पडतात. त्या मोठ्या आवळ्यासारखे, खुडखुडीत नाही वाळणार कदाचित. अर्थात प्रयोग केलाच, तर मला पण जाणून घ्यायला आवडेल.
आवळा सुपारी करताना आवळे
आवळा सुपारी करताना आवळे शिजवून मग वाळवतात का की तसेच वाळवतात?
माझ्या माहितीप्रमाणे तसेच
माझ्या माहितीप्रमाणे तसेच वाळवतात. ( सुलेखानी, शिजवून वाळवण्यासंबधी लिहिले होते ).
मायबोलीकर नलिनीने मला आवळे किसून केलेली सुपारी दिली होती. आवळे किसायला त्रास होतो खरा, पण ती सुपारी जास्त चांगली लागते. किसतानाच त्यात थोडे आले किसायचे. मिठ, जिरेपूड लावायची. आणि वाळवायचे. किस फोडींपेक्षा लवकर वाळतो.
यम्म्म्म्म्म्म... रायआवळे....
यम्म्म्म्म्म्म... रायआवळे.... कित्येक वर्ष झाली खाऊन.....
सुमेधा, मला पाठवुन दे ते आवळे...
कोल्हापूरच्या आंबाबाईच्या देवळाजवळ हे आवळे मिळतात... मस्त मिठ आणि लाल तिखट लावलेले.... त्याला पाणी सुटुन ते थोडेसे मुरल्यासारखे होतात.... एकदम झिंट्यॅक लागतात.... :लागला लाजो:
मला आठवतय की आई हे आवळे बरणीत भरुन त्यावर मिठ घालुन ठेवायची.... उन्हात ठेवायची बहुतेक.... तसे मुरलेले आवळेही मस्त लागायचे.
या आवळ्यांची दिनेशदांनी सांगितली आहे तशी चटणी पन बेस्ट लागते
लाजो, तसे आवळे अजून असतात,
लाजो, तसे आवळे अजून असतात, महाद्वाराकडे.. शिवाय अंबोली, चिंचेचे गोळे आणि कैरीच्या दिवसात कैरी पण.. एवढे सगळे मोह टाळून, आंबाबाईला नमस्कार करायचा, म्हणजे भक्ताचा कस लागतो
हो दिनेशदा... दरवर्षी खाते मी
हो दिनेशदा... दरवर्षी खाते मी कोल्हापूरला गेले की... आवळे आणि चिंचा
आम्ही आधी नमस्कार करुन मगच तिकडे जातो.....
दगडू बाळा भोसले पण अजून आहे !
दगडू बाळा भोसले पण अजून आहे ! तसेच फिके पेढे मिळतात. ( मला ते पेढे कुठल्याही ग्रेव्हीवाल्या भाजीत कुस्करुन टाकायला आवडतात. ) नुसते खाऊन संपणार नाहीत, एवढ्या क्वांटीटीमधेच घ्यायचे असतात ते.
हो मागच्या वेळी दर्शनाला गेलो
हो मागच्या वेळी दर्शनाला गेलो तर त्याच्या चकत्या मिळाल्या मीठ लावुन वाळवलेल्या. पण त्याचा पांढरा शुभ्र रंग तसाच कसा राहिला ते कोडेच आहे. आवळ्यात लोह असल्याने चिरल्यावर तो लाल होतो ना सफरचंदासारखा?:अओ:
कोल्हापूरच्या हवेचा परिणाम
कोल्हापूरच्या हवेचा परिणाम असणार तो. तिथेच कापत असतात ते आवळे. कापायला लोखंडीच हत्यारे असतात.
कापल्यावर आवळा काळा पडतो, मुंबईत तरी.
बहुतेक आवळयाला कापून लगेच मिठ
बहुतेक आवळयाला कापून लगेच मिठ लावले तर चकत्या काळ्या पडत नसतिल असे वाटतेय.....
शक्यता आहे निवा तशी पण. आता
शक्यता आहे निवा तशी पण. आता किलोने आवळे आलेत. वर दिनेशजींनी सांगीतलेले लोणचे करुन बघावे. नुसता मोरावळा किंवा पाचक खाऊन किती खाणार?
नीधप | 20 November, 2012 -
नीधप | 20 November, 2012 - 12:37 नवीन
आंबा असतो ना त्याला पायाकडून शिजवायचा<<
<<
आंबा आहे ना, त्याचा पाय मोडलाय असं ऐकून आहे
लाजो...तु पुण्याला आलीस तर
लाजो...तु पुण्याला आलीस तर नक्कीच देईन तुला...अमाप आले आहेत यंदा. दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे चटणी झाली करून. मस्त चव आली आहे आणि रंग तर आहाहा....मस्त पोपटी कलर....
आले लसुणची पेस्ट जास्त दिवस
आले लसुणची पेस्ट जास्त दिवस टिकवायची काही युक्ती आहे का?
आंब्याची करतात तशी मी हे
आंब्याची करतात तशी मी हे रायआवळे घालून आवळ्याची डाळ केली...अप्रतिम चव आली आहे.. जरूर करून पहा.
लसणीचे कोवळे तुरे मिळतायत
लसणीचे कोवळे तुरे मिळतायत वसईवालीकडे. त्याचं काय करतात?
कोवळे तुरे म्हणजे लसणीची पात
कोवळे तुरे म्हणजे लसणीची पात का? लसणीच्या पातीची चटणी..आह्हा. मी भाजीवाल्याला सांगून ठेवलंय लसणीची पात मिळाल्याबरोबर मला सांग म्हणून.
हो हो. लसणीच्या पाकळीसकट असते
हो हो. लसणीच्या पाकळीसकट असते ती.
कशी करतात चटणी त्याची?
Pages