Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीधप्,मी प्रत्येक महिन्याच्या
नीधप्,मी प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला हे अमुल बटर करायचे..स्वस्त अन मस्त.अजिबात फरक जाणवत नाही.
अक्खा बाफ दिला असताना इथे
अक्खा बाफ दिला असताना इथे दही, लोणी व तूपाची चर्चा चालूच.
आता चर्चा चालूच आहे तर सांगते ABC बेक्कार आहे लाडवांना. थोड्या दिवसाने वास मारतो तूपाचा.
मी सुपरवूमन कॅटगरीत बसत नाही(तसा सिंड्रोम नाही)
, तेव्हा सरळ कधी कधी व्हिपिंग क्रीम आणून लोणी काढून तूप बनवते. खूप छान छान नाही पण चांगले होते.
दक्षे, कोल्हापूरात नवरे
दक्षे, कोल्हापूरात नवरे स्वस्त आहेत की काय विरजणापेक्षा?
करंजीचे कव्हर मऊ झाले आहे,
करंजीचे कव्हर मऊ झाले आहे, काय करता येइल? पुन्हा तळाव्यात का? कींवा ओवन मधे ठेवल्या तर कीती टेम्प वर ठेवाव्या?
अमुल बटरची आइडिया ग्रेट आहे.
अमुल बटरची आइडिया ग्रेट आहे. करून बघीन जास्तच उत्साह कधी आला तर.
दिनेशदा, मी पण अनसॉल्टेड बटर
दिनेशदा, मी पण अनसॉल्टेड बटर बेसन भाजायला वापरत असे. पण माझा अनुभव असा .. बेसन खरखरीत होते. बटर मधे पाणी असल्याने ते तसे होत असावे. म्हणुन मी मग आता तुपातच बेसन भाजते.
चिवडा करताना गोटा खोबरं कापत
चिवडा करताना गोटा खोबरं कापत बसायचा कंटाळा यायचा...यावेळी सोलाण्यानं काप केले...एकसारखे, पातळ आणि देखणे काप झाले... पाच मिनिटात...
हायला चिवा! खोबर्याच्या
हायला चिवा! खोबर्याच्या काचर्यांबद्दलच विचारायला आले होते आणि तुझी ही पोस्ट बघितली!
खरं तर मी यावेळी इंग्रो मधुन कापच आणले पण त्याला किंचितसा वास येतोय!
त्यामुळे आता गोटा खोबर्याचे काप करत बसावे लागतील. तुझा शॉर्ट कट वापरुन बघते!
ते किंचित वास असलेलं खोबरं चिवड्यात वापरु का? फेकुन द्यायचं जीवाव्र आलय!
किंचीत वासवाले खोबरे लसूण
किंचीत वासवाले खोबरे लसूण चटणीत लपून जाईल वत्सला.
तळल्यावर वास गायब झाला!
तळल्यावर वास गायब झाला!
सुमेधाव्ही, अजुन एक पाकिट आहे त्यातले खोबरे चटणीत संपवते!
सुक्या खोब-याची वाटी(तुकडे
सुक्या खोब-याची वाटी(तुकडे करून) काही तास पाण्यात ठेवायची, नंतर ती पुसून तिचे काप करायचे. काप करायला सोपे जाते.
वरचा करंज्यांचा प्रश्न
वरचा करंज्यांचा प्रश्न माझाही...
माझ्या कडे थोडा साटा उरलाय्..एवढ तुप आणि तांदळाच पीठ टाकायला पण जीवावर येत आहे...
तळणी नसलेलं काही करता येइल का?
ओल्या नारळाच्या वड्या/बर्फी
ओल्या नारळाच्या वड्या/बर्फी करताना क्रीम घालायचे असेल तर ते किती आणि कधी घालावे?
चकली ब्लॉगातल्या रेसिपीत नाहीये क्रीम, त्यामुळे कळेना
मी काल अनारसे केले पण ते खुप
मी काल अनारसे केले पण ते खुप कडक होतायत. मऊ व्हावेत म्हणुन काय करावे?
इथे फक्त स्वयंपाकातल्या
इथे फक्त स्वयंपाकातल्या युक्त्या विचारायच्या आहेत का?
घरातल्या साफसफाईच्या युक्त्या, टीप्स कुठे विचारायच्या?
वैशाली, तो साटा वापरुन, पफ
वैशाली, तो साटा वापरुन, पफ पेस्ट्री करता येईल. ती बेक करायची.
राखी, क्रीम बर्फीचे मिश्रण एकत्र करुन शिजवतो त्यावेळीच घालायचे. प्रमाण, साधारण खोबर्याच्या निम्मे असावे. ( जास्त झाल्यास तूप सुटून, वड्या तूपकट लागतील.)
पिहू, अनारश्याच्या पिठात, सहा अनारश्याला जेवढे पिठ घेऊ त्यात एक टिस्पून साईचे दही किंवा तीन सेमी पिकलेल्या केळ्याचा तूकडा, कुस्करुन नीट मिसळून, अनारसे थापायचे. मऊ होतील.
मला घरच्याघरी पिझ्झा बनवायचा
मला घरच्याघरी पिझ्झा बनवायचा आहे. पिझ्झा बेस मी कायम विकतचा आणते. इथे कुठे मिळत नाही म्हणून घरीच बनवायच्या विचारात आहे. जितक्या रेसिपी वाचल्यात्यामधे यीस्ट वापरायचे होते. माझ्याकडे ड्राय यीस्ट आणि बेकरीमधले दोन्ही यीस्ट नाहीत. यीस्ट न वापरता पिझ्झाबेस बनवण्यासाठी काही युक्ती असेल तर सांगा प्लीज.
नंदिनी, उथ्थप्पा/भाकरी वापरून
नंदिनी, उथ्थप्पा/भाकरी वापरून केलेल्या पिझ्झाच्या फ्युजन रेसिपीज पाहिल्या/वाचल्या आहेत. करायचे/खायचे धाडस केलेले नाही/प्रसंग आले नाहीत.
ब्रेड वापरून मिनी पिझ्झा करता येईल.
पिझ्झा बेस म्हणजे ब्रेड
पिझ्झा बेस म्हणजे ब्रेड त्यासाठी यीस्ट लागणारच. नाहीतर फुगणार नाही. आंबट दही व साखर वापरता येइल पण अपेक्षित परिणाम मिळणार नाही. अन लीव्हन्ड ब्रेड्स असा गूगलसर्च करता येइल.
घरी यीस्ट बनवा यीस्टफ्री पिझा
घरी यीस्ट बनवा
यीस्टफ्री पिझा बेस
चेनै च्या हवामानात, नुसती
चेनै च्या हवामानात, नुसती सैलसर कणीक भिजवून ठेवली, तरी तिला ( अगदी पावाइतकी नाही ) जाळी पडेल.
सहा ते आठ तास लागतील. याला किंचीत आंबूस वास येईल. पण चवीला चांगली लागते ती.
ड्राय यीस्ट वापरणे सोपे, आणि तशी ती वाया जात नाही. ईडली / डोश्याच्या पिठात वापरता येते.
( कोमट दूध पाण्याच्या मिश्रणात, चण्याची डाळ आणि कच्चा बटाटा किसून घालून, ते मिश्रण ऊबदार जागी ठेवून, आमच्या घरी बेकरीसाठी, आजोबा यीस्ट करत असत. पण सध्या तयार बेकर्स यीस्टच वापरतात. )
इथे कोणीतरी (वत्सला बहुतेक)
इथे कोणीतरी (वत्सला बहुतेक) ने टीप लिहीली होती सिलिकॉन स्पॅच्युला घ्यायची, ते वाचून मी घेतला. अमेझिंग आहे ते. थँक्यु.
वरील यीस्ट तयार करण्याच्या
वरील यीस्ट तयार करण्याच्या पद्धतीत स्टार्चला बुरशी आणणेच आहे. तरीही अन कंट्रोल्ड वातावरणात इतरही हानिकारक बुरश्या स्टार्च ला येऊ शकतात. हवेत त्यांचे कण भिरभिरत असतात ते बसून. ते लहान मुलांच्या पोटास हानिकारक ठरू शकेल. ड्राय यीस्ट किंवा फ्रेश यीस्ट वापरावे कृपया.
पावाचा तुकडाच भिजवून यिस्ट
पावाचा तुकडाच भिजवून यिस्ट म्हणून वापरतात असे वाचले होते पण ट्राय नाही केले कधी.
आम्ही नेहमी चीज घ्यायचो ABC
आम्ही नेहमी चीज घ्यायचो ABC चे आता लोणी try करून बघते. चीज तर मस्तss असायचे आता विसरलो बरेच वर्षात.
तरीही अन कंट्रोल्ड वातावरणात
तरीही अन कंट्रोल्ड वातावरणात इतरही हानिकारक बुरश्या स्टार्च ला येऊ शकतात. हवेत त्यांचे कण भिरभिरत असतात ते बसून. ते लहान मुलांच्या पोटास हानिकारक ठरू शकेल. ड्राय यीस्ट किंवा फ्रेश यीस्ट वापरावे कृपया.>> मामी, हाच विचार केला होता म्हणून शक्यतो यीस्ट शिवाय बेस बनवायचा होता. सध्या पिझ्झा पोस्ट्पोन केलाय. सुदैवाने पिझ्झा खाणारीला टॉपिंगच्या चीझमधे जास्त इंटरेस्ट असल्याने ऑम्लेटवर चीझ घालून दिले तरी "पिझ्झा हय" म्हणत खपवता येतय.
पुढल्या महिन्यात चेन्नईमधे किराणा आणायला जाईन तेव्हा बेकर्स यीस्ट घेऊन येइन.
बेकर्स यीस्ट बरोबर बेकिन्ग
बेकर्स यीस्ट बरोबर बेकिन्ग पावडर, आयसिन्ग शुगर, व्हॅनिला इसेन्सची बाटली पण आणणे. केकसाठी.
माझ्याकडे हे तिघे आणे परेन्त केक करण्याचा उत्साह निघून जातो. 
येस्स, अमा. लिस्टच बनवायला
येस्स, अमा. लिस्टच बनवायला घेतलीये.
(No subject)
मामी, अती काळजी होतेय
फंगस जर 'युबिक्विटस' असेल, तर तुमच्या यीस्टला त्रास देईलच.
पण ना, इतकी जास्त काळजी घेउ नका. नॅचरल इम्युनिटी डेवलप होण्यासाठी एक्स्पोजर असावीच लागते हो. लहान बाळांबद्दल प्रेम इ. ठीकेय. but u know, a child needs some healthy neglect
Pages