केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमृता, लश चा बार US मधे कोणत्या दुकानात मिळेल का?>>>
मॉल मधे असु शकेल त्यान्चे दुकान . मिशिगन च्या मॉल मधे आहेत .

बी एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे होत नाहीत

Happy स्वानुभव.... Happy जर आजारामुळे झाले असतील तर निदान आशा तरी आहे, पण माझ्यासारखे लोक ज्यांच्या घराण्यात तारुण्यात रुपेरी केस मिरवण्याची पद्धत असते तिथे कसलीच आशा नाही. Happy Happy

बी एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे होत नाहीत
>>>>>> होतात Happy स्वानुभव. कशाने ते माहित नाहि. आवळा पावडरचा दर आठवड्याला वापर (मेंदी आणि मेथी पावडरबरोबर्),घरी बनवलेलं आवळा तेल,रोज सकाळी मोरावळलेला एक आवळा , विटामिन बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या ई उपाय आणि जंक फूड (ह्यात साखर्,बेकरी प्रॉडक्ट्स धरलेत Wink ) एकदम बंद. ह्यापैकि किंवा अजून कशाचा परिणाम झाला ते नक्कि माहित नाहि पण माझे पांढरे केस काळे झालेत. Happy

भान, आवळ्याचे तेल घरी कसे काढायचे ते सांग ना प्लीज. मी इतका मुर्ख ना की घरी दोन कोलो आवळ्याची पावडर होती ती मी फेकून दिली Sad

परत पांढर्‍याचे काळे करायची मी काहीही करायला तयार आहे.

माझे पांढरे केस काळे झालेत

अरे वा... आवळ्याचा परिणाम नक्कीच असु शकेल. किती टक्के केस पांढरे होते? जवळजवळ ८० टक्क्यापर्यंत पांढरे झाले असतील तर आशा आहे का? एक पांढरेपणा सोडला तर माझे केस खुपच सुंदर आहेत. इतक्या लांब केसांना दर आठवड्याला मेंदी लावणे किती दमवणारे आहे हे मला विचारा..... Sad

केस आहेत तसेच पांढरे ठेववत नाहीत आणि केस कापते म्हटले की सगळे अंगावर धावुन येतात, वेड लागलेय का विचारत.. Happy कंटाळलेय मी माझ्याच केसांना. कित्येकांनी केस रंगव म्हणुन सल्ले दिले, पण माझे केस आठवड्याला अर्धा सेमी वाढतात.... Sad रंगवले तर दर आठवड्याला टचपची भानगड गळ्यात घालुन घ्यावी लागेल.

मागे बीने सल्ला दिलेला त्याप्रमाणे आवळा पावडर लावते अधुनमदुन. पण लांब केसांवर मेंदीबिंदी लावत बसायचे म्हणजे हात, मान, पाठ सगळे भाग दुखायला लागतात. एकदा पार्लरमध्ये विचारले, तिने केस पाहुन सरळ एका वेळचे ६०० रुपये हा भाव सांगितला. शिवाय मेंदी तिला हवी तीच लावणार, मला ग्रेनिल लावुन हवी तर तो ऑप्शन मिळणार नाही. म्हटले यापेक्षा हात नी मान दुखलेले परवडले. Happy

रच्याकने, घरात कोणा दुस-याकडुन मेंदी घालुन घेण्याचा ऑप्शन आहे पण दुसरे कोणी म्हणजे फक्त माझी लेकच हे काम करु शकेल आणि तिला मेंदीच्या वासाचा नॉशिया आहे. दर आठवड्याला मी मेंदी लावली की तिचे डोके दुखायला लागते. Happy

बी,मी खोबरेल तेल उकळून त्यात आवळा पावडर(अंदाजानेच) ,आणि थोडी मेथी पावडर टाकायचे.पावडर काळी होऊन द्यायची नाहि.नाहित उपयोग नसतो असं वाचलेलं.
साधना, माझे अधून मधून पाढरे केस दिसत होते. पण पांढरे होण्याचं प्रमाण वेगाने वाढत होतं. तुझे ८०% केस पांढरे असतील तर मग माहित नाहि गं.घरी बनवलेलं आवळा तेल वापरून बघ. आणि आवळा आहरातून पण घेता आला तर बघ. तसहि मला हमखास उपाय माहितच नाहिये Happy

तसहि मला हमखास उपाय माहितच नाहिये

Happy तसा आवळा हा मुळात तारुण्यवर्धक आहे. तुला आलेला गुण हा त्याचाच परिणाम असणार.

खोबरेल तेल उकळून मग गॅस बंद करुन पावडरी टाकायच्या का? असे केले तर पावडरी जळणार नाहीत. अंदाजाने म्हणजे किती? १०० ग्रं तेलात १ टेबलस्पुन आवळा पावडर??

माझी मुलगी सध्या केस वाढवतेय. तिच्या केसांचा पोत माझ्या केसांसारखाच आहे पण सुदैवाने अजुन एकही पांढरा केस नाहीय. आवळ्याच्या तेलाने निदान तिचे तरी केस वाचवेन मी Happy

खोबरेल तेलात पावडरी टाकून त्यापण उकळायच्या,पण काळ्या होऊ द्यायच्या नाहित.लगेच गॅस बंद करायचा.
प्रमाणाबद्दल मला खरच आठवत नाहिये गं.मी एकदाच घरी बनवलय तेल तेहि काहि महिन्यांपुर्वी. पण मी नेटवरच बघितलेलं कसं बनवायचं ते. जवळपास सगळ्याच साईटवर सारखीच पद्धत होती.
http://www.ehow.com/how_6632302_make-homemade-amla-oil.html. हि अजून एक वेगळि पद्धत बघ.

एका ओळखीच्या काकांनी अनुभव सांगीतला होता.
त्यांचे जवळजवळ सगळे केस पांढरे झाले होते, त्यांनी त्यांच्या केसांना नवरत्न तेलाने रोज न चुकता मसाज करायला सुरवात केली. (भारतात त्याचे पाऊच मिळतात अस ऐकल आहे) . ते रोज १ पाउच वापरायचे. हळू हळू पांढरे केस कमी वाटतायत अस जाणवल्यावर त्यांनी जवळजवळ वर्षभर हा उपाय केला. आता त्यांचा १ ही केस पांढरा नाहीये म्हणे.( हे सगळ फोनवरच बोलण आहे, मी प्रत्यक्ष बघितलेल नाही)
हा उपाय कितपत लागु होतो माहीत नाही पण करुन बघायल हरकत नसावी. रोज रात्री तेल लाऊन सकाळी केस धुता येतील.

बेबे खरंच तुझे केस सुंदर आहेत वाद नाही. Happy हे मी झोपेत सुद्धा सांगेन अगदी.

नवरत्न तेल? इतकं इफेक्टिव? Uhoh

मी तर म्हणते पांढरे तर पांढरे, डोक्यावर केस आहेत हे ही नसे थोडके.
नाहीतर आमच्या हापिसात २४ आनि २५व्या वर्षी टकले झालेले लोक पाहिलेत मी.

माझ्या जुन्या नोकरीतला एक मॅनेजर त्यावेळी वयाने बत्तीस होता फक्त पण तुळतुळित एकदम.

तुमच्याकडे पिढीजात लवकर केस पांढरे होणे नसेल आणि त्यानुसार अकाली केस पांढरे होत असतील तर (आणि तरच) ताण कमी करणे, योग्य आहार आणि व्यायाम, जागरणे बंद, अल्कोहोल बंद, सुयोग्य दिनचर्या, बी कॉम्प्लेक्स, फॉलिक अ‍ॅसिड, आवळा, तेलाचा मसाज याने केस परत काळे होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
पण हे सगळं करायचं म्हणलं तरी शक्य नसतं.
आहार, व्यायाम आणि दिनचर्येची शिस्त लावण्यासाठी मुळात तुम्ही तिशीबत्तीशीला आयुष्यात सेटल असायला हवे. असं असतं का आजकाल?
आपल्या पिढीत कुठल्याही फिल्डमधे घर, संसार, मुलेबाळे, आर्थिक बाबी वगैरेंबाबत तिशीबत्तीशीत परफेक्टली सेटल होणे हे खूप कमी संभवते.

मी तर म्हणते पांढरे तर पांढरे, डोक्यावर केस आहेत हे ही नसे थोडके.
नाहीतर आमच्या हापिसात २४ आनि २५व्या वर्षी टकले झालेले लोक पाहिलेत मी.

हो गं, दु:खाच्या गुंतवळीमध्ये एखादी सुखाची बट शोधणे हा डिप्रेशन दुर ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे Happy

आहार, व्यायाम आणि दिनचर्येची शिस्त लावण्यासाठी मुळात तुम्ही तिशीबत्तीशीला आयुष्यात सेटल असायला हवे. असं असतं का आजकाल?
आपल्या पिढीत कुठल्याही फिल्डमधे घर, संसार, मुलेबाळे, आर्थिक बाबी वगैरेंबाबत तिशीबत्तीशीत परफेक्टली सेटल होणे हे खूप कमी संभवते

ही वाक्ये मी दोन्-चारदा वाचली आणि प्रत्येक वेळी पटली. सगळ्यांचा हा अनुभव आहेच आहे.

पण मी अगदी खुप तटस्थ होऊन स्वतःबाबतीत विचार केला तेव्हा वाटले की हे सगळे चालु असताना जेव्हा केव्हा थोडा वेळ मिळाला तेव्हा तो मी मला दिला का? आहार, व्यायाम आणि दिनचर्येची शिस्त थोडी त्या वेळेपुरती का होईना, पण मी पाळेन हा विचार केला का? दुर्दैवाने याचे उत्तर नाही असे आहे आणि याचे एकमेव कारण अंगभुत आळस. घर, संसार, मुलेबाळे, आर्थिक बाबी या बाबतीत करावे की करु नये हा विकल्प नव्हताच. पण आहार, व्यायाम आणि दिनचर्येची शिस्त की बोनस मिळालेला अर्धा तास पेपरातले गॉसिप वाचण्यात घालवणे हे निवडायचा विकल्प माझ्याकडे होता आणि दुर्दैवाने मी नेहमीच शॉर्ट टर्म विचार केला. वर आहार नियमन, व्यायाम बियाम हे नियमीत केले तरच फायदे होतात, उगीच भलत्या भानगडीत न पडता मिळतोय अर्धा तास तर जरा निवांत बसावे हा सोयीस्कर विचार करुन मनाला अगदी कंडिशन्डही ठेवले.... अशा वाया घालवलेल्या कित्येक तासांबद्दल आता वाईट वाटते.

आणि टेंशन्स अशी दूर ठेवू म्हणून जमत नाहीत Sad तशी उचल मनाने खाल्ल्याशिवाय शरिरावर परिणाम होत नाही त्याचा योग्य तो. आजकाल तर १२-१३ व्या वर्शी सुद्धा पोरांचे केस पिकायलेत.. आया काळजीत.

मी रोज दोन आवळे अगदी नियमित न चुकता अनाशापोटी खातो. हे मी गेले पाच वर्षांपासून सतत करत आलेलो आहे. माझा अनुभव हा आहे की आवळे खाऊन आहे ते काळे केस आणखी काळेशार होतात. पण पांढर्‍या केसांवर मात करु शकला नाही आवळा. माझी रोजची झोप कमीच आहे. फक्त ६ तास.

मला तर आवळ्यामुळे केस एकदम कोरडे होण्याचा अनुभव आहे. त्यामुळे मी तरी आवळा पावडरीच्या वाटेला न जाणेच प्रीफर करते. बाकी आवळा खाण्यासाठी दुसरा कसलाहे विचार करत नाही. Happy

बी, तूझा फोटो जो बघितलाय, त्यात तूला करडे केस पण नक्कीच शोभून दिसतील. माझ्या आठवणीत डॉ जब्बार पटेल आणि डॉ प्रभा अत्रे, दोघांनाही पिकलेले केस शोभून दिसतात.

पुण्याच्या पाण्याने खूप गळतात केस, कोल्हापूरात आम्ही काही निगा राखायचो नाहि केसांची, आडाच्या पाण्याने धुवायचो, अंगाचा साबणच डोक्याला लावायचो तरी केस एकदम चकचकित होते>>> +१.

माझे केस भरपुर होते अस आता मलाच आठवावं लागतय, Sad
फारच कमी झालेत.

विषयांतर होईल, पण एक लांबचे काका आत्ता भारतवारीत भेटले. मला आठवतय तेव्हा पासून त्यांचे केस अतिशय दाट, पण संपूर्ण पांढरेच होते. मात्र यावेळी salt and pepper! ते म्हणाले अग ब्रम्हविद्या ने शिकवलेले प्राणायाम करायला लागलो आणि हा effect! संशोधनाचा विषय होईल. कुणाला माहित आहे का ब्रम्हविद्या? वेगळा बीबी उघडला पाहिजे!

ज्यांना सर्दी आहे त्यांनी नवरत्न तेल लावू नये. ए. फु. स.
लावलं की कमीत कमी तीन दिवस डोकं दुखायचे. काहीही ढोसून(चहा, डोकेदुखीवरील गोळ्या वगैरे) तरी फरक नाही. केस १ तासात धुतले तरी डोकं काही थांबायचे नाही.

एरंडेल तेलाचा वापर कुणी केलाय का? मी नुसते एकून आहे.

कुणे एकेला तर इथे अनुभव लिहाल का?

ते इतकं चिकट असतं की वापरायला भिते वाटते.

एरंडेल तेल + तिळाचे तेल कोमट करुन मसाज केला तर कोंडा जायला व केस मऊ व्हायला मदत होते. मी केले आहे. हल्लीच आळशीपणा नडतोये Sad

एका नात्यातल्या डॉक्टर काकींनी सांगितले कॉडलिवर ऑईल च्या गोळ्या खाल्याने फरक पडेल. सध्या हा प्रयोग चालू आहे. माझ्या एका मैत्रिणीचे केस गळायचे कमी झाले असे ती म्हणाली. कुणाला माहित आहे का?

सामी मी कॉड लिव्हर ऑईलच्या गोळ्या घेते रोज २.
माझ्या डाएटिशियन ने मला सांगितलं त्याने पोट साफ राहत, मला तर माझी स्किन सुधारल्यासारखी वाटतेय. Uhoh नक्की काय उपयोग आहे त्या गोळ्यांचा?

ज्यांना सर्दी आहे त्यांनी नवरत्न तेल लावू नये. ए. फु. स.

मागे एकदा मुलीने मुद्दाम मागवलेले हे तेल मैत्रिणीच्या सल्ल्यावरुन. तिलाही सर्दी सुरू झाली आणि हे तेल कायमचे बाद झाले घरातुन. Happy

एरंडेल तेलाच्या विविध उपयोगांवर ह्या आणि उजळ कांती होणार बीबीवर पानेच्या पाने लिहिली गेलीत. उत्सुकांनी मागची पाने चाळावी Happy

खरच कोणी ब्रम्हा विद्या शिकले असेल तर माहिती दया ना. आमच्या इथे नेहेमी असतात हे क्लासेस बिबवेवाडी मधे. पण कधी केले नाहीत.

फुकटचा पण अनूभवी सल्ला ( स्वत:चा पण ).:फिदी:

माझ्या मैत्रिणीची आई ६५ वर्षा ची आहे. लहानपणा पासुन नहातेवेळी शिकेकाई+रीठा+आवळा+ मेंदी चे मिश्रण लावायची अजूनही लावते. ( तिच्या आजीपासुनची परंपरा) मात्र नहाण्याच्या आदल्या रात्री केसांना कोमट तेलाने मालीश + नहाण्याच्या आर्धा तास आधी डोक्याला दही किंवा ताकाची मालीश आणी मग हा उपचार.

आज खरोखर लांबसडक आणी काळेभोर केस आहेत त्यांचे. मात्र डोक्यावरुन शक्य असेल तर थंड पाणी घ्यावे, नाहीतर निदान कोमट पाणी तरी घ्यावे. गरम पाण्याने केस हमखास पांढरे होतात आणी गळतात.माझ्या सासुबाईंच्या मैत्रिणीची सुन हिवाळ्यातही थंड पाणी घेते, लांबसडक आणी भुंग्यासारखे काळे केस आहेत तिचे.

मी मात्र उर्जिता जैनचे जास्वंद तेल वापरते. त्यात ब्राम्ही तेल ( रामकृष्ण फार्मसी) मिक्स करते.

.माझ्या सासुबाईंच्या मैत्रिणीची सुन हिवाळ्यातही थंड पाणी घेते, लांबसडक आणी भुंग्यासारखे काळे केस आहेत तिचे. >>>>>>>>>>>>बापरे एवढ्या थंडीत पण गार पाणी ...ते पण डोक्यावरुन... Sad अवघड आहे

भुंग्यासारखे काळे >>>
ही उपमा पहिल्यांदाच ऐकली. Biggrin

नवरतन वा तत्सम तेलांच्या जाहिरातींमध्ये ह्या तेलामुळे डोके थंड राहते असा दावा केला जातो. उन्हाळयात तर अशा तेलांच्या व बोरोप्लस इ. हीट पावडर्स च्या जाहिरातींचा मारा केला जातो. प्रत्य्क्षात मेन घटक कुठला वापरतात माहीत नाही, पण कृत्रिम गार पणाच्या आभासासाठी मेंथॉल वापरतात त्यामध्ये. उलट ते लावून एक प्रकारची गार जळजळ जाणवते मला! थंड सुखद गारवा नुस्त्या माक्याच्या तेलाने खरंच मिळतो. पण ऑफिसला जाण्यापूर्वी प्रयोग करू नका प्लीजच. वेगळा वास अस्तो त्याचा. लोक बघायला लागतील. Wink रात्री झोपताना (जेव्हा दुसर्‍या दिवशी डोके धुवायचे आहेत हे माहीत असते) मस्तकावर लावावे.

Pages