Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगो, हा माझा अनुभव मागच्या
अगो, हा माझा अनुभव मागच्या कुठल्यातरी पानावर होता...
बाय द वे, मला कोंड्यावर अजून एक उपाय मिळाला. नारळाचं दूध घरी नीट होत नाही, कॅनच्या दुधाची खात्री नाही. मग मी आता रेग्युलरली असं करते -
शिकेकाई, आवळा आणि कडुनिंब पावडरी समप्रमाणात एकत्र करून पाणी घालून त्याचा काढा करते. खूप न उकळता २-४ मिनिटं उकळून पुरतं. मग तो काढा वस्त्रगाळ करून कंडिशनर म्हणून वापरते. कोंडाही गेला या उपायाने. तो जावा म्हणूनच मी अॅक्चुअली कडुनिंब घालते. पूर्वी मी काहीही केलं तरी आठवडा होत आला की कोंडा हजर. आता सलग २-३ वेळा हा उपाय केल्यावर कोंड गेला. गॅप पडली तर होणार परत, पण निदान दर आठवड्याला नाही होत. आणि सतत हाच घरगुती कंडीशनर वापरला तर नक्कीच फरक पडेल.
मी उसगावात होते तेव्हा हे करायचे. इथे इतके सवडच नाही होत, पण (टचवुड!!) कोंडा अजिबात नाहिये! (आत्मस्तुती असेल तरी... माझे केस खरंच निरोगी, मऊ, लांब आणि दाट होते. आता खूप पात्तळ झालेत!
नशिबाने मऊ आहेत अजून आणि निरोगीही)
कोंडा-शहनाझ हुसैन चे शा-रिन्स
कोंडा-शहनाझ हुसैन चे शा-रिन्स मस्त्त आहे. कोंडा जातो.
स्मिता, Outlet Santulan
स्मिता,
Outlet
Santulan Ayurveda -
the ayurveda store
Shop No. 1, Jyoti Kutir,
Adarsh lane, off Marve Road,
Malad (W), MUMBAI 400 064
Tel. : 022-28637779 / 28657779
Dealers
DADAR PHARMACY
5A, Dallas Bldg., Gyan
Mandir Road, Off S.K.Bole
Road, Dadar (West),
Mumbai 400 028
Tel. : 022-2422 8035
MANILAL LALLUBHAI & CO.
225, Kalbadevi Road,
Near Narayan Mandir,
Mumbai 400 002
022-22413970
SMT. USHA MAHESHWARI
8, Setalwad lane, 1st floor,
Madhav Vilas,
Mumbai 400 036
M. : 9322420089
सन्तुलन वेब - http://www.santulan.in/index.html
ओके, तसेच करते. धन्यवाद नीरजा
ओके, तसेच करते. धन्यवाद नीरजा स्मित गेल्या वर्षी केसांचे स्ट्रेटनिंग करण्याच्या नादात तेलाला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हा जाणवले नाही, आता स्टेटनिंग पूर्ण गेलेय तर फारच कोरडे झाले आहेत केस. >> सेम हिअर.

मी पण तेच केलय, आणि आता त्यामुळे केर बरेच गळतायत.
धन्यवाद dmugdha
धन्यवाद dmugdha
हिमालयाचे anti hair fall oil
हिमालयाचे anti hair fall oil कुणी वापरले आहे का?
आधी लिहीलेय की नाही ते माहीत
आधी लिहीलेय की नाही ते माहीत नाही... म्हणुन परत एकदा...
नारळाचे दुध लावण्याआधी केसांना तेल लावायची तशी फारशी गरज नसते... केस धुवण्यापुर्वी स्वतःला झेपेल तेवढा वेळ आधी नारळाचे दुध लावावे... १०-१५ मिनिटात माझे डोके जड व्हायला लागते (मेहंदी किंवा आवळा पावडरच्याबाबतीतही असेच... १०-१५ मिनिटात डोके जड होते)... मग नुसत्या शॅम्पुने दोनदा केस धुवुन टाकावेत... कंडिशनरची गरज नाही लागत... हे माझ्या अनुभवावरनं... कारण एरवीही माझ्या केसात कंडीशनरचा काही खास ईफेक्ट दिसुन येत नाही... मेहंदीनेही कंडीशनच काय तर रंगही येत नाही... आता ट्राय करायचीये... अधेमधे दिसणारी सिल्वरलाईन कितपत रंग बदलते ते चेक करायला...
माझी मम्मी नारळाचे दुध काढुन त्यातनं तेल येईपर्यंत उकळवते... मग आम्ही केसांना लावताना त्यात वाटलेली खुशबय (बहुतेक दिवाळीत ऊटण लावतात ते) मिसळुन लावतो... केस मस्तं सॉफ्ट होतात, चमकतात, काळे दिसतात...
तेल थंड पडु नये म्हणुन मम्मी तेल गरम करताना त्यात वेखंड घालुन गरम करायची...
जुन्या मायबोलीवर वाचल्याप्रमाणे... पाव वाटी तिळाचे तेल, एक वाटी खोबरेल तेल, आवळा नि कढीपत्ता एकत्र गरम करुन ठेवले आहे... आठवड्यातनं एकदा लावते... त्याबद्दलचा अनुभव थोड्यादिवसांनी लिहीन...
hi me ithe navin aahe majh
hi me ithe navin aahe majh nav manisha
मनिषा मायबोलीवर स्वागत.
मनिषा मायबोलीवर स्वागत.
केस पांढरे झालेत फक्त पुढचे..
केस पांढरे झालेत फक्त पुढचे.. अगदी खराब दिसतात. मेंदी लावून कोरडे होतात. हेअर कलर हा उपाय कायमचा आहे का? १५-२० दिवसात परत पांढरे केस दिसायला लागतात कोणताही हेअर कलर लावला तरी. प्लीज उपाय सुचवा.
कोणताही कलर लावा नवीन वाढलेले
कोणताही कलर लावा नवीन वाढलेले केस पांढरे येतात ते तसेच दिसणारच. दुर्लक्ष करणे, आहेत तसेच मिरवणे किंवा दरवेळेला वाढले की मुळांना कलर टचप करणे एवढेच उपाय.
चांगल्या प्रतीचा कंडिशनर
चांगल्या प्रतीचा कंडिशनर वापरलात तर मेंदीमुळे येणारा कोरडेपणा जातो. हा वैयक्तीक अनुभव आहे. मेंदीने येणारा रंग बरेच दिवस टिकतोही. हल्ली केसांतली फ्रिझ कमी करणारे शँपू आणी कंडिशनर्स येतात. त्यांचा उपयोग व्हावा.
मेंदी आधी नुसती पाण्याने
मेंदी आधी नुसती पाण्याने धुवून केस वाळवून केसांना तेल चोपडून ते ओव्हरनाइट ठेवायचं. मग दुसर्या दिवशी शँपूने धुवायचे म्हणजे कोरडे होत नाहीत केस.
धन्यवाद .. नुपुर मेंदी चांगली
धन्यवाद .. नुपुर मेंदी चांगली आहे का?
मेंदी केसावर अजिबात वाळू
मेंदी केसावर अजिबात वाळू द्यायची नाहि.हवंतर केसावर कॅप घालावी.केस कोरडे नाहि होत.आणि वर स्वातीने लिहिल्याप्रमाणे तेल चोपड्णे मस्ट
वेगळाच कलर येतो तीचा.
नुपूर मेंदीत मला केमिकल्स टाकल्यासारखे वाटतात
माझे केस भयंकर फ्रिझी आहेत.सध्या मी जॉन फ्रिडाचा कंडिशनर वापरतेय. आत्तापर्यंतचा बेस्ट कंडिशनर आहे केस बरेच बरे वाटतायत.
प्रॅडी, कोणता कंडीशनर वापरला?
भान, जॉन फ्रिडाच.शँपू आणी
भान, जॉन फ्रिडाच.शँपू आणी कंडिशनर,सिरम्,कधी स्टाईल करायचे असल्यास हीट रेसिस्टंट स्प्रे सर्वकाही जॉन फ्रिडा.मिरॅक्युलस रिझल्ट्स आहेत.
अरे व्वा मी राईट ट्रॅकवर आहे
अरे व्वा
मी राईट ट्रॅकवर आहे तर.
मी शांपूपण आणायचा विचार करतच होते.आता आणतेच. धन्यवाद
मेंदीच्या काल्यात मी २ छोटे
मेंदीच्या काल्यात मी २ छोटे चमचे ऑऑ घालते. अजिबात कोरडे होत नाहीत मग.
आता या सगळ्या टीप्स वापरून
आता या सगळ्या टीप्स वापरून बघते
जॉन फ्रिडाला माझेही फुल्ल
जॉन फ्रिडाला माझेही फुल्ल मार्क्स!
भान, देशातून काष्ठौषधीच्या
भान, देशातून काष्ठौषधीच्या दुकानातून त्यांची स्वतःची मेंदी घेतलीस तर ती प्युअर मिळेल.
पार्ल्यातलं अतुल मेडिकल जे आहे त्यांच्या स्वतःचं सगळ्या पावडरी बनवायचं युनिट आहे. त्यांच्या वस्तू एकदम प्युअर असतात किंवा मग पुण्यात तुबाच्या इथे जे काष्ठौषधी आहे ते.
मी पर्वाच केला में डा. लोखंडी कढईत चहाच्या पाण्यात मेंदी भिजवली, थोडे ना दू घातले त्यातच. रात्रभर ठेवली. मग जटामांसी, नागरमोथा, आवळकाठी, गवलाकचरी, मंजिष्ठा, ब्राह्मी, भृंगराज अश्या सगळ्या पावडरी अर्धा अर्धा चमचा घातल्या आणि चांगले मिक्स करून घेतले. तेव्हाच ऑऑ घातले.
में डा/ में कं लावून झाल्यावर नुसत्या पाण्याने धुवून टाकले आणि एक दिवसाने रात्री थोडे तेल मुरवले केसात. मग सकाळी अंघोळीच्या आधी भरपूर ना दू स्काल्प आणि केसांच्या टोकापर्यंत लावले, चोळले. माइल्ड शांपूने धुतले. कंडिशनरची गरजच पडली नाही. एकदम मस्त झालेत.
लाडके, वय वाढू लागलं की केसांच्यात रूक्षता यायला लागते बयो. नुसत्या ना दू ने उपयोग होत नाही मग
नी तसं असेल तर मलाही एकदा ना.
नी तसं असेल तर मलाही एकदा ना. दु. लावुन कंफर्म करावं लागेल...
आज शिकेकाई आवळा नि कढी लिंबाचा कंडीशनर वापरला... रिझल्ट्स थोड्या दिवसांनी सांगतेच...
माझी मुलगी ६ वर्षांची आहे.
माझी मुलगी ६ वर्षांची आहे. तिचे केस पुर्ण कुरळे आहेत. एक पोनी बांधला तरी झिपर्यासारखे होतात तेल लावले तरीही. अगदी न विंचरल्यासारखे वाटतात. राठही होतात. कुठे जायच असेल तर कंडीशनर लावावे लागते. काय उपाय करावा ?
जागु, मस्त कर्ली (मासा नव्हे
जागु, मस्त कर्ली (मासा नव्हे :-)) लुक असेल तर छानच आहे की. ती पण एक स्टाइल आहे.
सस्मित पण ते राठ होतात ना
सस्मित पण ते राठ होतात ना त्यामुळे न विंचरल्यासारखे दिसतात.
जागु, लहान आहे ती अजुन तर मग
जागु, लहान आहे ती अजुन तर मग तेल लाउन मस्त घट्ट दोन वेण्या घालायच्या. पोनिटेल मुळे हा प्रॉब्लेम येणारच. माझी ही लेक ६.५ वर्षाची आहे. केस बर्यापैकी मऊ सिल्की आहेत. पण तरीही मी ती सकाळी शाळेत जाताना तेल लाउन दोन घट्ट वेण्या घालते त्या संध्याकाळ पर्यंत तशाच असतात. कधी संध्याकाळी ट्युशन ला जाताना पोनीटेल बांधला की मग आहेच सकाळी शाळेत जातांना जटा सोडवताना रडारड नी वेळ जातो म्हणुन माझी चिडचिड.
हो ग पण वेण्या बांधण्याएवढे
हो ग पण वेण्या बांधण्याएवढे मोठे केस नाहीत. कुरळे असल्याने मधूनच निघतात. तरीपण प्रयत्न करेन.
जागू, कंडिशनर म्हणजे काय, कसं
जागू, कंडिशनर म्हणजे काय, कसं आणि कधी लावतेस तू श्रावणीच्या केसांना?
आज शिकेकाई आवळा नि कढी
आज शिकेकाई आवळा नि कढी लिंबाचा कंडीशनर वापरला>> कडूनिंब का?
मेंदिचा विषय आहे म्हणून.....
मेंदिचा विषय आहे म्हणून..... मी या रविवारी पतंजली ( रामदेव बाबा ) दुकानातून मेंदी आणली, लोखंडी भांड्यात भिजवली, भिजवतानाच ५ , ६ जास्वंदाची फुले वाटून त्यात मिक्स केली. मेंदी धुतल्यावर मस्त केस असे सॉफ्ट वाटत होते. रात्री तेल लावून सकाळी शँपू केल्यावर केस फारच छान वाटू लागले आहेत. कलरही सुंदर ...
Pages