Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्यामुळे बहुतेकवेळा स्वयंपाक
त्यामुळे बहुतेकवेळा स्वयंपाक केसरयुक्तच असतो.. >>> हे राम ...
ओके नी.
ओके नी.
मी सरळ तिला मेथी दाणे भिजत
मी सरळ तिला मेथी दाणे भिजत घालून त्यात जास्वंदी, कोरफड, आवळा पावडर, शिकेकई पावडर खोबर्याचा एखादा तुकडा<<<
जास्वंदी आणि कोरफड कोणत्या स्वरूपात?
जास्वंदीच्या पाकळ्या आणि कोरफडीचा गर? की अजून काही?
को चा ग नाहीये पण को जे आहे उजै चे. जा कसे मिळवणार फुलं नसतील उपलब्ध तर?
साधना साबांची मयुरी हिनावर
साधना
साबांची मयुरी हिनावर अतिशय श्रद्धा आहे, त्यामुळे त्या मयुरी हिना सोडतील असे वाटत नाही..
मामी,


त्यांचे केस जेवणातच काय कुठेही सापडतात..
:काहीही करु न शकणारी बाहुली:
SORRY THODYA VELANE LIHIN
SORRY THODYA VELANE LIHIN
माजे माथ्यावरचे केस खाज होऊन
माजे माथ्यावरचे केस खाज होऊन आपोआप तुत्ले जातात तक्क्ल पदायचि वेल आलि आहे केस हि खुप गलतात काहि उपाय सुचवा
लहान मुलांसाठी हिमालया चा
लहान मुलांसाठी हिमालया चा शाम्पू चांगला आहे/ liquid bath soap सुद्धा चांगला आहे. हिमालया चा anti hair fall शाम्पू मला चांगला वाटला .
माझे माथ्यावरचे केस खुपच विरळ
माझे माथ्यावरचे केस खुपच विरळ होत चाललेत,अगदि टक्कल दिसतोय काहीतरि उपाय सुचवा.
वरच्या ९०० पोस्टिंग पैकी कोणी
वरच्या ९०० पोस्टिंग पैकी कोणी कोणते उपाय केले व कोणाला कसा फायदा झाला हे पण सांगा ना सगळ्यानी? plz

मी प्रियांका. सध्या ब्रुनईत
मी प्रियांका. सध्या ब्रुनईत एप्रिलपासुन आहे. इथे आल्या पासुन हळु ह्ळु केसाचा रंग फिकट व्हायला लागला आहे. ईथल्या सगळ्या मैत्रिणीची हीच व्यथा आहे.
मी सुरुवातीला लक्ष नाही दिले पण आता सफेद केसांचे प्रमाण वाढ्ले आहे.
मला कोणी सागाल का मी आहारात बदल करु , अजुन केसांना काय लावू, की Calcium level check करु?
खोबरेल तेल लावतेच मी पण अधिक काय उपाय करता येतिल.
माझ्या कडे कोरफड आहे. आवळा मिळू नाही शकणार.
कृपया सांगा
माझ्या डोक्यात कोंड्याने
माझ्या डोक्यात कोंड्याने थौमान घात्ले आहे खुप उपाय केले डॉ.भरपुर रुपये दिले पण परत आहेच काय करु समजत नाहि त्यामुळे कपाळावर हि पुरळ उठते आहे...हॅराण झाले आहे.कोरडा कोंडा आहे केसहि कोरडे आहेत............
अमृता, कोंडयासाठी लशचा स्नेक
अमृता, कोंडयासाठी लशचा स्नेक बार वापरून पहा. माझ्या नवर्याला याचा उपयोग झालाय.
http://www.lushusa.com/Snake-Oil-Scalp-Treatment-Bar/00027,en_US,pd.html...
तुम्ही भारतात असाल तर 'Lush India' च्या वेबसाइट वरून मागवू शकता.
अग १००% उपाय म्ह्न्ण्जे
अग १००% उपाय म्ह्न्ण्जे ----- कोरफड , जास्वनद च्रुरण , दही, चहा चे उकळुन पानी , एकत्र करुन २ तास लाव. व मग केस धु ..... नक्कि फायदा होयिल.....
अग १००% उपाय म्ह्न्ण्जे -----
अग १००% उपाय म्ह्न्ण्जे ----- कोरफड , जास्वनद च्रुरण , दही, चहा चे उकळुन पानी , एकत्र करुन २ तास लाव. व मग केस धु ..... नक्कि फायदा होयिल.....>>>
हा कोंड्यासाठिच उपाय दिला आहे ना!
माझे केस पातळ आणि पांढरे
माझे केस पातळ आणि पांढरे आहेतच पण गळतही खूप होते शिवाय थोड्या प्रमाणात कोंडा होता.

फायनली विनय कोपरकर नावाचे डॉक्टर आहेत इथे, त्यांना महिन्यापुर्वी भेटून आले, त्यांनी त्यांचं तेल आणि शॅम्पू दिलाय, एक सोल्यूशन आणि एक गोळी. गोळी फक्त एक महिना घ्यायची आहे. शॅम्पू आणि तेल ३ महिने कमीत कमी वापरायचं आहे. पण पांढर्या केसांवर काहीही उपाय नाही असं ते म्हणाले.
असो, या महिन्याभरात १-२ वेळा सोडल्यास मी तेल्/शॅम्पू/सोल्यूशन लावण्यात किंवा गोळी घेण्यात ढिसाळपणा केलेला नाही. मला खूप चांगला अनुभव येतोय. अजून केस गळती पुर्णपणे थांबलेली नाही पण प्रमाण सिग्निफिकंटली कमी झाले आहे. शिवाय त्या शॅम्पू आणि तेलामुळे केसांना एक हेल्दी लूक आलाय. थोडा व्हॉल्यूमही बरा वाटतोय.
माय जर्नी टुवर्डस बिईंग हॅप्पी अबाऊट माय हेअर हॅज ऑलरेडी स्टार्टेड..
दक्षिणा डॉ. विनय कोपरकर फक्त
दक्षिणा डॉ. विनय कोपरकर फक्त पुण्यात असतील ना?
पुरुषांच्या केस गळती, टक्कल
पुरुषांच्या केस गळती, टक्कल यावर काय उपाय आहेत? कोणी चांगले डॉक्टर आहेत का (मुंबई, पुणे, हैद्राबाद मधे)?
डॉ. बत्रा कसे आहेत? कोणाचा अनुभव?
याविषयी आधी चर्चा झाली असेल तर लिंक देणे.
नामणदिवा, हे पोस्ट इथे टाकू
नामणदिवा, हे पोस्ट इथे टाकू कि नको..
मी केनयात असताना माझे केस खुप गळायचे, पण अंगोलात आल्यापासून केसगळती पूर्ण थांबलीय. मी
कुठलाच शांपू वापरत नाही. केसासाठी असा वेगळा साबणही नाही. उलट इथे माझे केसही भरपूर वाढताहेत.
मला अजून इथे सलून सापडले नाही ( भारतीय लोकांचे केस कापू शकणारे लोक, आफ्रिकेत शोधावे लागतात. )
त्यामूळे भारतात येईपर्यंत, माझा मकरंद देशपांडे, होणार आहे बहुतेक.
तसेच इथे आल्यावर, जादू केल्यासारखे माझे कोपरे मऊ झालेत, पुर्वी ते कडक आणि काळपट होते.. परत, काहिही उपाय न करता. पाण्याचा गुण म्हणायचा कि काय ?
नामणदिवा, तुम्ही ताबडतोब
नामणदिवा, तुम्ही ताबडतोब तुमची बदली अंगोलाला करून घ्या
दिनेश असेल पाण्याचा गुण. पुण्याच्या पाण्याने खूप गळतात केस, कोल्हापूरात आम्ही काही निगा राखायचो नाहि केसांची, आडाच्या पाण्याने धुवायचो, अंगाचा साबणच डोक्याला लावायचो तरी केस एकदम चकचकित होते.
जोक्स अपार्ट नामणदिवा तुम्ही
जोक्स अपार्ट नामणदिवा तुम्ही पुण्यात विनय कोपरकरांना भेटून पहा एकदा
Dr. Vinay Koparkar. MBBS
1002/10 SHILPA CORNER,
RAJENDRANAGAR,
PUNE - 411030, MAHARASHTRA
Ph No - 020 - 020-24530146
धन्यवाद दिनेशदा आणि
धन्यवाद दिनेशदा आणि दक्षिणा!
मलापण पाणीच कारण वाटतेय. हैद्राबाद्च्या पाण्यामुळे केस अक्षरशः झाडू सारखे राठ झाले आहेत.
नामणदिवा, हैद्राबादमध्ये कुठे
नामणदिवा, हैद्राबादमध्ये कुठे आहात???
अमृता, कोंडयासाठी लशचा स्नेक
अमृता, कोंडयासाठी लशचा स्नेक बार वापरून पहा. माझ्या नवर्याला याचा उपयोग झालाय.
http://www.lushusa.com/Snake-Oil-Scalp-Treatment-Bar/00027,en_US,pd.html...>>>
सुप्रभात
नविन मुबंइत किंवा पनवेलमध्ये साबण कुठे मिळेल???
अमृता, मला भारतातल्या लश
अमृता, मला भारतातल्या लश दुकांनानबद्दल माहित नाहिये. त्यांच्या वेबसाइट वरून मागवा. सर्विस उत्तम आहे.
केसांची वाट लावणारा शॅम्पू
केसांची वाट लावणारा शॅम्पू निघाला. मी पाच वर्षांपासून शॅम्पू लावत नाही. आता माझे केस पुर्ववत झाले आहेत फक्त करडे केस काळे होत नाही आहे.
अमृता, लश चा बार US मधे
अमृता, लश चा बार US मधे कोणत्या दुकानात मिळेल का?
बी एकदा पांढरे झालेले केस
बी एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे होत नाहीत.
अमृता, लश चा बार US मधे
अमृता, लश चा बार US मधे कोणत्या दुकानात मिळेल का?>>>
मला माहित नाहि
मी स्वतः लशच्या शोधात आहे.
सुप्रभातना माहित असेल...
कुणाला जास्वंदीच्या
कुणाला जास्वंदीच्या फुलांपासून तेल कसे तयार करतात माहिती आहे का? इथे ही फुले खूप मिळतात. मी गणपतीनिमित्त रोज ही फुले घरी घेऊन येते. निर्माल्याचा प्रश्न निर्माण होतो म्हणून सुकलेली फुले अर्धावाटी तेल कडक गरम झाले की त्यात टाकतो आणि गॅस बंद करतो. ती फुले कुरकुरीत पाडसारखी होतात. हे तेल डोक्याला कोमट असताना लावले की लवकर आत झिरपते आणि गार गार वाटते. ह्या फुलांचे तेल म्हणे खूप थंड असते. तेलाचा उपयोग हा की केंसाना चकाकी झळाली येते. केसांची वाढ खुंटत नाही उलट वाढ झपाट्याने होते. मला आठवत मी अभियांत्रिकीला असताना माझ्या बहिणीचे केस हेच तेल लावून काळेशार झळाळणारे झाले होते. पण ती हे तेल तिच्या मैत्रिणीकडून करुन घ्यायची. प्लीज ह्या तेलाची कृती लिहाला का कुणी.
दक्षिणा हो मलाही आता तसेच वाटायला लागले आहे.
बी, माझ्या माहितीप्रमाणे ते
बी, माझ्या माहितीप्रमाणे ते तेल तसच तयार करतात. माझी आई पुर्वी वरवंटा पाट्यावर घेउन थोड्या पाण्यात ही जास्वंदीची फुले वाटायची. जरा जाडसरच. चिकट आणि डार्क कलरचा चोथा होतो. यातच ब्राम्ही, माक्याची पाने मिळाली तर उत्तम. (मिक्सरमधे वाटल्यास चिकटपणा येत नाही).तो सगळा खोबरेल तेलात उकळुन घ्यायचा. कुरकुरीत होईस्तोवर! आणि मग खोबरेल तेल गाळुन वापरायचा. एकाच वेळेसाठी वापरायचा असेल तर तो चोथा केसांच्या मुळाशीही घासुन लावता येतो. किंवा तेल गाळून घेतल्यावर तो कुरकुरीत झालेला ही फेकुन देण्यापेक्षा केसांच्या मुळाशी लावतात.
Pages