Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वराली , प्रित, श्रुती ,
स्वराली , प्रित, श्रुती , वर्शा----- अग १ चमचा चहा + १ चमचा कोफी , थोड पाणी ..उकळुन गार कर आणी ह्या पाण्यात मेन्दी भिजव..... त्यात आवळा + जास्वन्द+ कोरफड + शिकेकई + मेथी+ माका+ गवला +कचोला ह्या पावडरी घाल ( अन्दाजे -- १/४ चमचा ) ... आणी मेन्दी भिजवुन झाली कि त्यात २ चमचे ओलिव तेल घाल ..हे सगळ रात्र भर भिजत राहु दे ...मग ते केसाला लाव ---२ -३ तासाने केस शाम्पू ने धुवा ....मस्त झलके झलके होतिल..... आनी रन्ग पन मस्त येइल......
सुहास्य धन्यवाद...........
सुहास्य धन्यवाद...........
झलके झलके लॉल..
झलके झलके
लॉल.. 
सुहास्य,तुमचा उपाय तर मस्तच
सुहास्य,तुमचा उपाय तर मस्तच वाटातोय. पण कोरफड ,जास्वंदची पावडर मिळते? आणि गवला कचोरा म्हणजे काय? आयुर्वेदिक दुकानात बघायला हवं.
अर्पणा, बीयर केसांत ओतून
अर्पणा, बीयर केसांत ओतून जिरवायची का ? किती वेळ ठेवायची ? साधारण किती बीयर वापरली एका वेळी ( quantity ) ? त्यानंतर नेहेमीचा शँपू लावून केस धुतले का ? इथे आयुर्वेदिक पावडरी मिळणं कठीण आहे पण हा उपाय सहज करता येण्यासारखा आहे
अगो, एक मगभर बियर आधीच काढून
अगो, एक मगभर बियर आधीच काढून फ्लॅट करून ठेव. शॅम्पू+कंडिशनर झाले की, ती हळूहळू डोक्यावर ओतायची आणि हाताने थोडीफार केसांत जिरवायची. पाचदहा मिनिटांनी फक्त पाण्याने केस धुऊन घ्यायचे.़
मी केसाना कंडिशनर लावत नाही.
मी केसाना कंडिशनर लावत नाही. त्याच्याने माझे केस जास्त गळतात. त्याऐवजी बीअरच लावते.
धन्यवाद श्रद्धा, नंदिनी. करुन
धन्यवाद श्रद्धा, नंदिनी. करुन बघते आता
सुहास्य ने सांगीतलेले मी पण
सुहास्य ने सांगीतलेले मी पण तसेच करते फक्त... मी रंग येण्यासाठी... बिट घालते..वाफवुन मिक्सर पेस्ट काढुन मेंदीमध्ये भिजविणे... मस्त रंग येतो.
लाइट कलर बिअर वापरा अगो,
लाइट कलर बिअर वापरा अगो, फ्लॅट करून ठेवायची आणि वर श्रद्धा म्हण्ते तसं केस स्वच्छ धुवून झाल्यावर कंडिशनर ऐवजी लावायची. जरा चोळायचं...आणि परत पाण्यानं केस धुवून टाकायचे ( मेन म्हण्जे वास घालवण्यासाठी ).
बिअर लावणार असाल तर कंडिशनर लावायची गरज नाही....डार्क बिअर ( लागर वगैरे ) वापरू नका.
स्मितू... बीट रूट चा रंग केस
स्मितू... बीट रूट चा रंग केस धुतल्यावर निघून जात नाही का? आणि राहिला तरी इतर ठिकाणी उशा, स्कार्फ इ. ला डाग पडतात का?
धन्यवाद ग सुहास्य ! माझ्या
धन्यवाद ग सुहास्य !
माझ्या कडे चहा आणि कॉफी आहे बाकी पावडरी नाही.त्यामुळे सध्या त्यातच भिजवते.
स्मितू... बीट रूट चा रंग केस
स्मितू... बीट रूट चा रंग केस धुतल्यावर निघून जात नाही का? नाही , उलट छान कलर येतो, हो पण या कलरचा ईफेक्ट उन्हातच छान कळतो.
आणि राहिला तरी इतर ठिकाणी उशा, स्कार्फ इ. ला डाग पडतात का? नाहिच , मी नेहमी मेंदी बीटच्या पाण्याने भिजवते.
जुई, माझी आधीची पार्लर वाली
जुई,
माझी आधीची पार्लर वाली बीट टाकायची किसुन मेंदीमधे.
मस्त कलर येतो. मी वर्षातुन २ वेळाच लावायचे कंडीशनिंग साठी, पण काळे केस सुध्दा थोडेसे ब्राउनिश झाक असल्या प्रमाणे वाटतात.
एक प्रश्न? बीअर फ्लॅट करायची
एक प्रश्न? बीअर फ्लॅट करायची म्हणजे काय करायच?
बीअर ग्लासात ओतून त्यातला
बीअर ग्लासात ओतून त्यातला फेस/बुडबुडे निघून जाईपर्यंत थांबणे.
केस गळण थम्बवण्या साठी कोणी
केस गळण थम्बवण्या साठी कोणी रामदेव बाबान्चा ऊपाय करुन पाहिला आहे का ? दोन्हि हाताची नख रोज ५ मिनिट घासायची एकमेकानवर. ते म्हणतात कि नविन केस पन ऊगवतात.
नखांवर?
नखांवर?
बेफी
बेफी
बालजी ताम्बे याच्या सन्तुलन
बालजी ताम्बे याच्या सन्तुलन च्या हैर सन (Hair San ) आयुर्वेदिक गोळ्या घेतल्यनी फार चान्गला फरक पड्तो - केस गळणे आणि कोन्डा होणे. मी २-३ महिन्यापासुन घेत आहे.
dmugdha, बालजी ताम्बे याच्या
dmugdha,
बालजी ताम्बे याच्या सन्तुलन च्या हैर सन (Hair San ) आयुर्वेदिक गोळ्या घेतल्यनी फार चान्गला फरक पड्तो - केस गळणे आणि कोन्डा होणे. मी २-३ महिन्यापासुन घेत आहे.>>>>>>>>>मुंबईत कुठे मिळतील ह्या गोळ्या?
मागचे दोन आठवडे बीअर वापरुन
मागचे दोन आठवडे बीअर वापरुन पाहिली केसांसाठी. केस चमकदार आणि मऊ झाले पण कोरडेपणाही वाढला केसांचा ( एकाचवेळी मऊ आणि कोरडे असं वाचायला विचित्र वाटेल, पण तसंच झालंय खरं
). आता मागची पानं चाळताना नारळाच्या दुधाचा उपाय एकदम आवडून गेलाय. तो करुन बघणार आता. मागे वाचल्याचं आठवत नाही म्हणून खात्री करुन घ्यायला परत एकदा विचारते, नारळाचं दूध लावल्यावर कंडिशनर लावायची गरज नाही ना ?
नारळाचं दूध त्वचेला लावल्यानं
नारळाचं दूध त्वचेला लावल्यानं कांती उजळ होते असही म्हणतात
म्हणून मी ते केसाला लावायला कचरते आहे ...
अर्पणा त्याला ओशटपणा असतो जो
अर्पणा
त्याला ओशटपणा असतो जो कोरड्या केसांसाठी चांगला असं वाटतंय.
aparna123: मी रामदेवबाबांचा
aparna123: मी रामदेवबाबांचा तो कार्यक्रम टिव्हीवर पाहिला आहे. त्यात ते असंही म्हणतात की अंगठा सोडून इतर बोटांची नखंच एकमेकांवर घासायची अन्यथा ( अंगठ्याचं नख इंक्लूड केल्यास ) दाढी मिशा येतील ...:) ज्यांना प्रयोग करायचाय त्यांनी अंगठा वगळा
हो अगो,एकदम मऊसूत होतील असं
हो अगो,एकदम मऊसूत होतील असं वाटतय नारळाच्या दूधानं पण रंगही गोरा वगैरे झाला तर
नको तिथं नको ते ...
ना दू हा एकदम मस्त उपाय
ना दू हा एकदम मस्त उपाय आहे.
अगो, केस खूप कोरडे असतील तर ना दू लावून मग शांपू केल्यावरही कंडिशनर लावायला लागेल. शांपू केल्यावर टेक्श्चर कसं वाटतंय त्यावर कंडिशनर लावायचं की नाही ते ठरव.
माझं मत म्हणशील तर आदल्या रात्री थोडं तेल लाव आणि सकाळी केस धुवायच्या आधी तासभर ना दू लावून व्यवस्थित चोळ. केसांच्या मुळाशी लावायचेच पण केसांच्या टोकांपर्यंतही लागले पाहिजे ना दू.
हे केल्यानंतर शांपू नुसता केलास तरी पुरे होईल.
ओके, तसेच करते. धन्यवाद नीरजा
ओके, तसेच करते. धन्यवाद नीरजा
गेल्या वर्षी केसांचे स्ट्रेटनिंग करण्याच्या नादात तेलाला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हा जाणवले नाही, आता स्टेटनिंग पूर्ण गेलेय तर फारच कोरडे झाले आहेत केस.
एवढे कोरडे असतील तर रात्री
एवढे कोरडे असतील तर रात्री तेल लावशील ते व्यवस्थित लाव. चांगलं मुरव.
हो
हो
Pages