सोप्पा केक

Submitted by के अंजली on 9 July, 2012 - 04:27
soppa cake
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करायला अगदी सोप्पा असा हा केक कालच करुन पाहिलाय Happy

हा मी तव्यावर केला होता.. मस्त झाला!

साहित्य: हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे, पारले जी बिस्किटांचा चा साधा एक पुडा,आठ चमचे साखर, दीड कप दूध, खाण्याचा सोडा किंवा कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा(४ रु.) चा सॅशे.

क्रमवार पाककृती: 

कृती: हाईड & सिक ची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित.
आठ चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा पोह्यांचा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्या नंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते.(खूप नाही)
केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो. Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोप्पी वाटतेय रेसिपी.
रुणुझुणू Lol ते फूल बाकी मस्त शोभतंय त्या केकवर Happy

अंजली, बिस्किटांचे आणी इनोचे त्यांच्या पाकिटांवरिल प्रमाण देणार कां प्लीज... इकडे पारले जी चे अगदीच मोथे किंवा अगदीच छोटे पुडे मिळतात.

मंजूडी, आयसिंगची रेस्पी कुठे दिली होती ? मग कसं करणार ? Proud
अगो, खरंच खूप सोप्पी रेसिपी आहे. नक्की करून बघ आणि तुमच्या केकचे विथ आयसिंग फोटो टाक. मावेत तर अगदीच फटाक्दिशी होऊन जाईल.
अंजली, हो. आम्हाला सगळ्यांना केक आवडला.
(गोड का लागत नव्हता ते आत्ता लक्षात आलं. किती ट्युबलाइट Blush
पारले जी चा देशातनं आणलेला स्टॉक संपल्यामुळे आम्ही केकमध्ये हाइड अ‍ॅण्ड सीक सोबत मारी बिस्कीटस टाकली होती. पण साखरेचं प्रमाण मात्र तुम्ही सांगितलेलंच ठेवलं. तिथे गोडीचा घोळ झाला. पुढच्यावेळी मारी टाकले तर साखर जास्त घालीन.)

मस्त सोप्पी रेसिपी आहे Happy

हाईड & सीक इथे नाही मिळणार.. त्याऐवजी कुठलीही चॉकलेट बिस्किट्स चालतिल असं वाटतय. करुन बघेन Happy

@रुणू, केक जबरीच दिसतोय एकदम.. त्यावरच्या कलाकुसरीमुळे जास्तच भारी Happy

मनी.. हाईड & सीक चा मध्यम आकाराचा पुडा. बहुदा२० ला मिळतो तो आणि ग्लुकोजचा ५ रू आणि इनोचे सहा रु चे सॅशे मिळतात..

लाजो Happy

माझ्या मैत्रिणीला दिलेली ही रेसिपी. तिच्याकडे दोन वेळा करुन झाला हा. खुप आवडला तिच्या घरी. मलाच अजून मुहूर्त मिळायचाय.

अंजली,
धन्यवाद ,केक ची इतकी सोपी रेसीपी इथे टाकली. माझा लेक तर जाम खुश झाला. आज मी आणी माझ्य लेकाने मिळुन केला केक. मस्त झाला. लेक म्हणाला मावशी ला Thanks सांग...

अंजली, कालच केला. इतका मस्त झाला. मला एवढा आनंद झाला की सांगता सोय नाही Happy स्पाँज-स्पाँज म्हणतात ते हेच हो Happy एवढा लाईट आणि फ्लपी..वॉवच एकदम. गरम गरम लग्गेच्चच खाल्ला पण. मुख्य म्हणजे लेकीला आवडला आणि आज स्वत:हून डब्यात नेण्यासाठी मागणी केली. नाहितर एरवी मॉन्जिनीज किंवा रि अँड ब शिवाय दुसरे केक चालत नाहीत.
मी मावे मधे केला. ५ मि. हाय पॉवर वर.
खरच खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्पच थँक्स ग तुला!!!

आज आत्ता सकाळीच करुन बघीतला, मस्त सच्छीद्र झाला, मुले खूष.... (पण साखरेचे प्रमाण ४ चमचे तरी हवेच हे मात्र खरे!)

धन्यवाद अंजली के!

रविवार असल्याने मारे जातीने केला खरे पण आज म्हणे चतुर्थी असल्याने घरातले काही सदस्य नाराज आहेत. अर्थात परत कधीही करण्यास अत्यंत सुट्सुटीत आणि खरोखरच सोप्पी अशी कृती असल्याने परतचा वायदा केला आहे.

केकचे मिश्रण मंद आचेवर चढले आहे. काय होते, बघायचे! Proud

अंजली, धन्यवाद Happy मस्त, सोपी रेश्पी आहे. मी कुकरमध्ये वाफवला ३० मिनिटे एकदम मंद आचेवर. थोडासा मॉइस्ट झाला, पण फुलला आहे. पसरट भांड्यामध्ये केला. अशाच सोप्या रेश्प्या देत जा!

DSC_0387_.jpg

पेरु.. मावे मध्ये हा केक करताना नाही घातलेत झाकण तरी चालेल बहुदा..

आणि हाईड & सिक च्या बिस्कीटांमुळे छान चॉकलेट फ्लेवरचा होतो हा केक, त्यामुळे ती तर हवीतच Happy पण नुसत्या मारी बिस्किटांचा अगोड होईल चवीला, त्यापेक्षा कोणतीही ग्लुकोज आणि मारी असे प्रमाण घेऊन पहा

हर्पेन आणि शैलजा Happy

धन्यवाद अंजली Happy
खरंच सोप्पी रेसिपी आणि मस्त आयडिया आहे.

मी डार्क चॉकलेट केक बनवला.
ओरीओ बिस्कीट्स २ पॅकेट्स आणि पारले जी १ पॅकेट.
ओरिओ बिस्किट्स थोडावेळ फ्रिज मध्ये ठेउन बाहेर काढल्यावर क्रिम वेगळे केले त्यात कपभर दुध टाकले. क्रिम गोड होते म्ह्णून साखर वगळली.
आणि बिस्किट्स ची पावडर करून त्यात बे. पावडर आणि बे. सोडा प्रत्येकी अर्धा चमचा घालुन क्रिम टाकलेले गोड दुध मिक्स केले. काचेच्या भांड्यात ३२५ फॅ. ला २० मिनिटे बेक केले.

choco_orio_cake.jpg

डॅफो... हा वरचा फोटो बघून मी डोळे हळुच मिटले आणि मनात मी तो केक खाल्ला अशी भावना आणून पुन्हा उघडले. अवघ्या २ सेकंदांची क्रिया पण केवढे ते समाधान मला... Proud

डॅफोडिल्स,

हायला! केक इतका सॉलिड होतो? छान दिसतोय. मॉईस्ट वगैरे. तुमची ती क्रीम वेगळे करून टाकायची आयडीया चांगलीय. चवीला कसा लागतो?

फायनली केला मी आज!!एकदम यम्मी झालयं ..अ‍ॅम हॅप्पी Happy
फक्त खाली थोडा लागला होता ..बहुतेक स्टीलचा तळ जाड नाहीये म्हणुन

वा डॅफोडिल्स मस्स्स्स्स्स्त! तुमचा फोटो इतका तोंपासु दिसतोय तर केक.. अहा!
ओरिओ बिस्किटांची आयडिया छानच आहे. हे नविन प्रमाणाने मीही बघतेच केक करुन Happy
खूप धन्यवाद!

मी काल २ हाईड अन सीक +पार्ले जी ,दुध्,साखर,काजु तुकडे व इनो घेवुन हा केक केला..फुल पॉवर वर [९००]मावे.त ५ मिनिटे बेक केला.बिओना च्या केक समोर हा केक वरचढ ठरला.खुप छान व "सोप्पी"केक रेसिपी आहे.आता २-३ दिवसात गुड-डे चॉकोलेट बिस्किटांचा करण्यात येईल..
अंजली,खरंच मस्त केक रेसिपी..धन्यवाद.

मी पण, मी पण.. असा पण केक होतो माहीतच नव्हते. मस्त वाटले स्वतः केलेला स्पाॅंजी केक बघून. आधी घाबरतच एका वाटीत केला, आवडला, अजुन एक वाटी करून खाल्ला.. मग पंटर आल्यावर पंटरसाठी एक वाटी.. जास्त प्रमाणात गोड जात पण नाही त्यामुळे बिस्कीट चुरा डबाबंद ठेवणे व जेव्हा हुक्की येईल तेव्हा ४ मिनीटात बनलेला गरमागरम केक चाॅकलेट साॅस घालून खाणे असा प्लान आहे. चहा-बिस्कीट पेक्षा चांगला पर्याय . खुपखुप आभार.

Pages